Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRA

Navratri colors –  नवरात्रोत्सव 8

1 Mins read
  • Navratri colors -  नवरात्रोत्सव 8

Navratri colors –  नवरात्रोत्सव 8

Navratri colors –  ओळख वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!

 

 

 

 

Navratri colors –  शर्वरी सुरेखा अरुण

आपल्या आईवडीलांचे नाव पुढे नेणाऱ्या काहींपैकी ही एक शर्वरी सुरेखा अरूण. जातीची ओळख पुसून मानवतावादी विचार जोपासण्याचे व महिलांच्या आरोग्यासाठी जागृतीचे काम शर्वरी करतेय. शर्वरी मूळची कोल्हापूरची. शिवाजी विद्यापीठातून MA English, D Ed. ही पदवी संपादन केली. सध्या जे सामाजिक काम हाती घेतलेय त्यासाठी गागोदे बुद्रुक, ता पेण, जि. रायगड येथे वास्तव्य. शालेय वयात Gymnastics मधील रोप -मल्लखांब या खेळात विशेष प्राविण्य. राज्य पातळीवर सहभाग. वडिलांची फिरती नोकरी आणि घरातून या खेळासाठी म्हणावी तशी साथ न मिळाल्याने राज्य स्तराच्या पुढे खेळता आले नाही. सर्वसामान्य कुटुंबाप्रमाणे मुलीपेक्षा मुलाच्याच शिक्षणाला प्राधान्य देणे हे तिच्याही घरी होते. त्यामुळे बारावीनंतर स्वस्त आणि सोयीचं अशा D. Ed. ला प्रवेश घेतला. ते करत असतानाच शर्वरीने मुक्त विद्यापीठातून BA पूर्ण केलं. त्यानंतर MA चे कॉलेज करत असताना कोल्हापूरच्या क्रीडा प्रबोधिनीत Gymnastics Coach म्हणूनही काम केले. विशेष बाब म्हणजे ज्या खेळात शक्यतो मुलांचे वर्चस्व असते अशा या खेळात मुलींना प्रोत्साहित करत, त्यांच्या पालकांशी संवाद साधत अनेक मुलींना ती राज्यस्तरावर विविध स्पर्धेसाठी घेऊन गेली.

हे सर्व करत असतानाच शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे सरांशी तिचा संपर्क आला आणि तिच्यापुढे ज्ञानाची व विवेकाची कवाडे खुली झाली. D. Ed. पूर्ण झाले तेव्हा शिक्षक भरतीचा प्रश्न नुकताच सुरु झालेला. त्या विषयाला धरून होणाऱ्या आंदोलनात शर्वरी अग्रेसर होती. ‘विचारांशिवाय कृती अंध असते आणि कृतीशिवाय विचार वांझ असतो’ ही कॅा. गोविंद पानसरे सरांची शिकवण शर्वरी सत्यात उतरवत होती. प्रेरणा असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेत स्वयंसेवक म्हणून काम करताना अनेक छोट्या मोठ्या उपक्रमात सहभागी होत अंध बांधवांना घेऊन जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी ती भारत-पाकिस्तान सीमेवरही गेली. अभयारण्य अंध बांधवांना ही अनुभवता यावं यासाठी राधानगरी येथील दाजीपूर अभयारण्यातील sensory wildlife sanctuary हा देशातील पहिला भन्नाट प्रकल्पही तिने आणि तिच्या सहकाऱ्यांनी साकारला. त्याच काळात ती मुस्लिम सत्यशोधक मंडळात ही सक्रियपणे कार्यरत होती. सोबतीला शिक्षण, अभ्यास आणि शिकवणं चालूच होतं.

Navratri colors –  याच दरम्यान एका सामाजिक परिषदेसाठी ती पुण्यात आली असता समाजबंध संस्थेमार्फत मासिक पाळी विषयावर काम करणाऱ्या सचिन आशा सुभाष या तरुणाला ती पहिल्यांदा भेटली. फेसबुकवर ओळख होतीच पण प्रत्यक्षातील भेटीने त्यांची मैत्री आणखी घट्ट झाली. त्यानंतर दोघांनी मिळून पुण्यात कात्रज भागात समाजबंध प्रकल्पाजवळच स्थलांतरीत लोकांच्या मुलांसाठी पूर्व प्राथमिक शाळा सुरु करण्याचं ठरवलं आणि शर्वरी कोल्हापुरातील चांगली नोकरी सोडून पुण्यात आली. स्वतःचीच शाळा असल्याने शर्वरी स्वतःला फक्त दीड दोन हजार रुपये मानधन घेत असे आणि खर्च भागवण्यासाठी दुसरी Part time नोकरीही करत असे. शाळेनिमित्त वाढलेल्या सहवासातून दोघांचं अव्यक्त प्रेम तर फुलत गेलंच पण नुकतंच सुरु झालेलं समाजबंधचं कामही दुप्पट वेगाने वाढायला सुरुवात झाली. शर्वरी हाडाची शिक्षिका असल्याने मासिक पाळीचे वर्गही ती फारच कलात्मक पद्धतीने घेई. जेवढं डोळस प्रेम केलं तितकंच डोळसपणे लग्न करायचं असं दोघांचंही ठरलं आणि त्यातून घरच्यांना सांगत, समजावत, भांडत दोघांनी सत्यशोधक लग्नाचा पर्याय निवडला. २६ जानेवारी २०१९ रोजी राष्ट्र सेवा दल, पुणे येथे अनोख्या पद्धतीने सत्यशोधक विवाह बंधनात दोघांनी प्रवेश केला. त्यानिमित्ताने आलेल्या लोकांना भेट देण्यासाठी शर्वरीने ‘विवेकी सहजीवन’ हे पुस्तक लिहिले. आणि गावाला ग्रंथालय सुरु करायचे असे सांगून लोकांकडूनही पुस्तके भेटीदाखल मागितली.

लग्नानंतर सचिन शर्वरी या जोडीने मासिक पाळी या विषयावर जनजागृती करत जवळजवळ अर्धा महाराष्ट्र पिंजून काढला. पुणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, गडचिरोली, नागपूरला, वर्धा, धुळे, सोलापूर, कोल्हापूर, बेळगाव अशा विविध ठिकाणी याविषयी आजवर अनेक सत्र शर्वरीने घेतली आहेत. तसेच अनेक महिला, बचत गटांना कापडी पॅड बनवण्याचे प्रशिक्षणही दिले आहे. लग्नाआधीच दोघांनीही आपल्या कामाची जिथे जास्त गरज आहे अशा ठिकाणी जाऊन राहण्याचं ठरवलं होतं, अडीच वर्षांपूर्वी दोघांनी पुणे सोडलं आणि कातकरी आदिवासी बहुल असणाऱ्या रायगडमधील पेण तालुक्यात गागोदे या गावी आपला मुक्काम हलवला. तिथेच एका कातकरी वाडीवर कापडी पॅड निर्मितीचा प्रकल्प सुरु करून आसपासच्या वाड्यांवर ते पॅड कातकरी आदिवासी महिलांना एकदा वापरायला मोफत देऊन त्याविषयी जनजागृती केली जाते. कमीतकमी संसाधनात राहून जीवनावश्यक आहे तेवढंच घ्यायचं आणि तेवढं घेण्यासाठी लागतात तेवढेच पैसे कमावायचे हा साधा नियम दोघांनी लावून घेतला आहे. त्यामुळेच दोघेही पूर्णवेळ कार्यकर्ता बनून समाज सुधारणेचे काम करू शकत आहेत. युवकांना शहराचं आकर्षण असताना, या दोघांनी मात्र पुण्यातील कामं, प्रसिद्धी सर्व सोडून स्वेच्छेने गावचा रस्ता धरला कारण प्रदूषण, महागाई, ट्रॅफिक यात आयुष्यातील महत्वाचा वेळ वाया घालवण्यापेक्षा निसर्गाच्या सानिध्यात आणि साध्या माणसांच्या सहवासात राहणं केव्हाही चांगलं. शिवाय कामालाही अधिक वेळ मिळतो आणि त्या श्रमाने शरीर थकत नाही.

Navratri colors –  शर्वरीने गागोदेच्या शांततेत राहून ‘प – पाळीचा’ किशोरी आरोग्य पुस्तिकेचे लेखन केले ज्याच्या आजवर ३५,००० प्रती मुलींपर्यंत पोहोचल्या आहेत. त्याचसोबत ‘ती’चा स्वातंत्र्यलढा, ते पाच दिवस अनुभवकथन या पुस्तकांचे संपादनही तिने केले आहे. शर्वरी मासिक पाळीचे केवळ संवाद सत्र घेत नाही तर या विषयात काम करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांना ती संवादक प्रशिक्षणही देते. समाजबंधचे आता महाराष्ट्रात ३० हून अधिक प्रशिक्षित संवादक कार्यरत आहेत.

आपण पाहिलेय की अनेक सामाजिक काही चळवळीत काम करणारे कार्यकर्ते आपल्याला मूल नको असे ठरवतात व दत्तकही घेतात. किंवा मुलाची जबाबदारी घ्यायला आपण समर्थ नाही किंवा मुलं करियरच्या आड येऊ शकतात अशा समजातून मूल नको हा निर्णय घेतात पण सचिन व शर्वरीने या सगळ्या गैरसमजांवर मात करत मागच्या वर्षी म्हणजे ११ महिन्यांपूर्वी शर्वरीने एका गोंडस बाळाला जन्म दिला आणि तिचं नाव ठेवलं आहे साज्यो! सावित्रीमाई मधील सा आणि ज्योतिबा मधील ज्यो घेऊन साज्यो हा शब्द तयार करून ते नाव त्यांनी आपल्या मुलीला दिलं आहे. अशाप्रकारे आपल्या सत्यशोधक विचारांचं बाळकडू जन्मापासून शर्वरी आपल्या पुढील पिढीला देत आहे.

ही अशी काही उदाहरणे पाहिली की, कोण म्हणतं तरूणाई भरकटलीय ? तरूणाईला दिशा नाही. तरूणाईला विचार नाही. हे सारं खोटं वाटू लागतं. आज अशा अनेक तरूणी आहेत की ज्या आपल्या आयुष्याचा, कामाचा, आवडीचा, करियरचा योग्य विचार करतात. आणि पारंपरिक चौकटीला छेद देत आपले आयुष्य आपल्याबरोबर
समाजातील वंचित, उपेक्षित, गरीब, दुर्बल, अज्ञानी घटकांसाठी जगतात. अशी वेडी माणसंच खूप काही करू शकतात हा इतिहास आहे.

अशा अत्यंत लहान वयात स्वतःच्या आयुष्याचे काही निर्णय असे प्रगल्भतेने घेणाऱ्या, सत्यशोधकीय व पुरोगामी विचारांचा कौटुंबिक वारसा नसताना ते जतन करणाऱ्या, शहर सोडून आदिवासी भागात आपल्या बाळाला जन्माला घालून वाढवणाऱ्या आणि समाजबंधच्या माध्यमातून ‘पाळी बाईची’ या दुर्लक्षित विषयावर महिलांचे प्रबोधन करणाऱ्या या आधुनिक Navratri colors –  नवदुर्गेस मानाचा मुजरा..!!! 

 

 

 

ॲड. शैलजा मोळक

 

 

Visit: https://www.postboxlive.com

 

Leave a Reply

×
BLOGSINDIAMAHARASHTRA

Navratri 2022 - पहिली नवदुर्गा

error: Content is protected !!