Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRA

Navratri 2022 – पहिली नवदुर्गा

1 Mins read
  • पहिली नवदुर्गा

Navratri 2022 –  नवरात्रोत्सव १

Navratri 2022 –  ओळख वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!

 

 

 

 

डॅा. गीताली वि. मं.

Navratri 2022 – डॅा. गीताली विनायक मंदाकिनी उर्फ डॅा. गीताली वि.मं. हे नाव जवळपास पुणेकरांना नक्कीच माहीत आहे. पण मिळून साऱ्याजणी व नारी समता मंच म्हटलं की विद्याताई बाळ व गीताली वि. मं. ही जोडी कधीच विसरू शकणार नाही. वयाच्या पंच्याहत्तरीत गीतालीताई काम करत आहेत. फर्ग्युसनमधून रसायनशास्त्र विषयाचे ३३ वर्षे अध्ययन करून त्या निवृत्त झाल्या. आज त्या ‘मिळून साऱ्याजणीच्या व पुरूष उवाच’ या दिवाळी अंकाच्या संपादक आहेत. त्यांचा सामाजिक व साहित्यिक कामाचा आवाका व आढावा प्रचंड मोठा आहे. गडचिरोली भागात प्रौढ महिलांमध्ये जाणीवजागृती, साक्षरताअभियान एक वर्ष राबवलं, नर्मदा बचाव आंदोलन समर्थक गटात सक्रिय राहिल्या, नारी समता मंच,शाश्वत,जीवन, पालकनीती निगराणी महिला बालक विकास संस्था आदीच्या संस्थापक सदस्य आहेत. स्त्रीपुरूष समतेबाबत पुरूषांमधे जाणीव जागृती करणाऱ्या पुरूष गटात ३६ वर्ष सहभाग, पुरूष उवाच मासिक अभ्यास वर्गाचे १५ वर्ष आयोजन, आकाशवाणीत अनेक चर्चात सहभाग, मासिक व वृत्तपत्रातून लेखनासोबत स्त्री चळवळ आणि राजकारण: समतेसाठी सत्ता संघर्ष, कथा गौरीची, स्त्री प्रश्न सोडवताना, प्रश्न पुरूष भानाचे, Breaking The Moulds,गोष्टी साऱ्याजणीच्या, संदर्भासहित स्त्रीवाद, स्वातंत्र्यपूर्व संध्या, शाश्वत विकासाचे वाटाडे ,बाप लेक नात्याचा कॅलिडोस्कोप , मोठ्या धरणांची सामाजिक किंमत,अशा एकूण ११ पुस्तकांचे लेखन, संपादन व अनुवाद त्यांनी केले आहेत.

हे सारं करत असताना ताईंनी आपल्या आयुष्यात किती भोगलं, सोसलं, सहन केलं असं मी म्हटलं तर ते त्यांना कदाचित आवडणार नाही. पण त्यांचे जीवन हे परिस्थितीचा स्वीकार करत, प्रत्येकाच्या मताचा आदर राखत, पारदर्शी, तत्वनिष्ठ, परखड व स्पष्ट भूमिका घेत संघर्ष करत स्त्रीवादी विचारांचा जागर करत आपली स्पष्ट मत मांडत, जे योग्य वाटेल व बुध्दीला पटेल ते करत राहणारे आहे. आज या वयातही त्या तरूणांना लाजवतील अशा वेगाने, उत्साहाने मिळून साऱ्याजणीची धुरा सांभाळत आहेत.
‘लग्नच करायचे नाही आणि लग्नानंतर स्वतःच मूल न होऊ देण्याच्या ठाम निश्चयाला आई-वडील, सासू-सासरे व नवरा यांचा विचार करून तिलांजली दिली’ असं म्हणत, ‘हिच काय सगळंच वेगळं असतं’ असे आई नेहमी म्हणायची असे त्या सांगतात.

Navratri 2022 – सामाजिक कामाची आस असलेल्या उमद्या आणि देखण्या मावस भावानं जीवनात तुझी समर्थ साथ मिळाली तर चंचल स्वभावाच्या मला पूर्णवेळ सामाजिक काम करायला बळ मिळेल असं म्हणून लग्नासाठी मागणी घातली . ताईंनी पूर्ण वेळ नोकरी करून २ मुली ,घर संसार सांभाळायचे ठरवले. पण ‘आदर्श रोमॅंटिक कपल’ समजल्या जाणाऱ्या ताईंच्या सहजीवनात नवऱ्याच्या ‘बाई, बाटली, हिंसाचार’ या त्रिसूत्रीने संसाराची घडी विस्कटली. नवऱ्याच्या आयुष्यात दुसरी स्त्री आली की बाई उन्मळून पडते. पण ताई म्हणतात, ‘मला आश्चर्य, धक्का, विश्वासघात वगैरे काही वाटलं नाही,कारण त्याच्याकडून ते अपेक्षित होतं पण दुःख जरूर झालं.’ असं काही झालं तर घटस्फोटाचा पर्याय आहे असं ताईंना वाटतं होतं पण ताईंच्या नवऱ्याला तो नको होता. बायको हवी आणि मैत्रीण पण हवी ही त्याची मानसिकता होती. एक पुरूष दोन बायका हे ‘त्रिकूट’ पारंपरिक व बाईचे शोषण करणारं आहे असे ताईंचे मत होते. एकतर्फी योनी शुचिता बाईवर अन्याय करणारी आहे. पितृसत्ताक पुरुषप्रधान व्यवस्था लिंगशुचितेविषयी ‘ब्र’ पण काढत नाही हे ताईंनी धीटपणे समाजापुढे आणलं. बायको म्हणून ताईंनी ही त्रिसूत्री मान्य केली नाही. नवऱ्याकडून परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. त्याला सुधारण्यासाठी जमेल तेव्हा मदत केली. स्त्रीवादी विचारसरणी असलेल्या ताईंनी तुला ‘मैत्रीण’ असेल तर मला ‘मित्र’ असेल ! हे म्हणताच नवऱ्याने ताईंचे पातिव्रत्य, प्रेम, एकनिष्ठता, विश्वास असं सारं कुठे गेले असे म्हणत आगपाखड केली. पण सुमारे ३०-४० वर्षांपूर्वी ताईंनी ही गोष्ट आपले आईवडील व सासूसासरे यांना सांगायचे धाडस केले. पण ‘एकाने गाय मारली तर दुसऱ्याने वासरू मारावे का?’ हा विचार सर्वांनी मांडला .तेव्हा ताईंनी विवाहसंस्था मानव निर्मित आहे आज तिचा पाया पितृसत्ताक पुरुष प्रधान आहे तो बदलून स्त्री पुरुष समतेच्या पायावर विवाहसंस्था उभी केली तरच ती टिकेल अशी आग्रही भूमिका मांडली.

‘नवरा नाही मग मित्र असावा’ अशी परावलंबी अवस्था मात्र त्यांना स्वतःची होऊ द्यायची नव्हती. स्वातंत्र्य, समता, मैत्रभाव या तत्वांचा लढा ताई लढत होत्या. मुलींना एकटीने बाणेदारपणे वाढवले. सोबतीला मित्र पण होते, नारी समता मंचाचा आधार होता. त्यांचा समाजासोबतचा लढा हा फार गुंतागुंतीचा आणि वेगळा होता. एकट्या राहाणाऱ्या बाईकडे पाहाण्याचा सामाजिक दृष्टिकोन निकोप नाहीच. नोकरी व सामाजिक काम करताना तिच्यासोबत कोणी पुरूष दिसला तर मग तिच्याबद्दल खालच्या पातळीवर बोलले जाते हाही अनुभव ताईंनी घेतला. पण ताई डगमगल्या नाहीत.एकाधिक नात्याचा त्या पुरस्कार करत राहिल्या. विद्याताई, मुलीही कायम सोबत होत्या. यानिमित्ताने स्त्रीप्रश्नासंदर्भातील अधिकाधिक अभ्यास ताईंनी केला. पुरूषप्रधानता, लैंगिकता, स्वातंत्र्याच्या कल्पना, मित्र-मैत्रीणी, स्त्रीपुरूष नातेसंबंध, विवाहसंस्था इ. विषयी सखोल अभ्यास ताई करत गेल्या. विषय, प्रश्न मांडत गेल्या. लिहित गेल्या.

सतत धमकावणाऱ्या पहिल्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांनी दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला. यामागे एकाधिक नात्यातले ताणतणाव हे एक कारण होतं तसंच विवाह संस्था बदलायला विवाहसंस्थेच्या आतूनही धक्के द्यायला हवेत हा विचार होता.मुलींना आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली. त्या सोबत होत्याच. मंचातील मित्र मैत्रीणींत बरीच चर्चा झाली. पण १७ वर्षांनी लहान व अविवाहित पस्तीशीतील तरूणाशी ताईंचा सत्यशोधकीय पद्धतीनं आंतरजातीय विवाह झाला. अगदी आपापल्या घरी राहून आपण नवरा बायको राहू शकतो इथपासून ते काही दिवसांनी आपल्याला एकत्र राहायला नको असं वाटलं तरीही आपण सहजपणे वेगळे होऊ शकतो असाही विचार ताईंनी मांडला. पण आज ताईंचे पती व ताई आपापल्या क्षेत्रात, समतेच्या वाटेवर चालत यशाच्या शिखरावर आहेत. ताईंच्या दोन्ही मुली आपापल्या पायावर उभ्या आहेत. ताईंच्या कौटुंबिक, सामाजिक, साहित्यिक जीवनातून आपण बरंच काही घेऊ शकतो. कोण काय घेणार व काय घ्यायचे ? हा मात्र ज्याचा त्याचा प्रश्न..!!

अशा या धाडसी पण वेगळ्या वाटेने चालणाऱ्या आणि आपले विचार ठामपणे मांडणाऱ्या व अंमलात आणणाऱ्या आधुनिक Navratri 2022 – नवदुर्गेला मानाचा मुजरा..!!! 

ॲड. शैलजा मोळक.

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

 

Leave a Reply

×
BLOGSINDIA

Navratri 2022 - कित्तूरच्या केलाडी राणी चेन्नम्मा

error: Content is protected !!