Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRA

Navratri colors –  नवरात्रोत्सव 6

1 Mins read
  • Navratri 2022 -  नवरात्रोत्सव 6

Navratri colors –  नवरात्रोत्सव 6

Navratri colors –  ओळख वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!

 

 

 

तमन्ना इनामदार

मुस्लीम, दलित, सत्यशोधक, पुरोगामी, अंधश्रध्दा निर्मूलन चळवळीत तमन्ना इनामदार यांचे नाव मोठे आहे. वयाच्या १८ वर्षापासून त्यांचे सामाजिक कार्य सुरु आहे. अनाथ, अपंग, विधवा, घटस्फोटित, परितक्त्या महिलांसाठी ज्या सरकारी सवलती, स्कॅालरशिप, पेन्शन तसेच विविध विषयावर सल्ला व मार्गदर्शन त्यांनी सुरू केले. आणि त्या महिलांमधे लोकप्रिय झाल्या. मुस्लीम महिलांसोबत सर्वधर्मीय महिलांच्या विविध प्रश्नावर त्यांनी काम सुरू केले. विविध चळवळीत त्यांचा सहभाग वाढला. DSW करून त्यांनी मॅरेज कौन्सिलिंग कोर्स पूर्ण केला. शालेय विद्यार्थी, वैयक्तिक नातेसंबंधाविषयी समुपदेशन यात त्यांचा हातखंडा आहे. १९९५ पासून ‘आरजू मुस्लीम मॅरेज ब्युरो’ या वधू-वर सूचक केंद्राच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रभर वधू वर मेळाव्याचे आयोजन केले आहे.

Navratri colors – ताईंची घरची परिस्थिती अतिशय गरीब होती. आई अशिक्षित. वडीलांचे लहानपणीच निधन झाल्याने अतिशय कष्टाने शिक्षण घ्यावे लागले. त्यांचे वास्तविक मिश्र वस्तीत होते पण आजूबाजूला सारेच गरीब व निरक्षर लोक होते पण ताई प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन त्या घरातली पहिली शिक्षित, कमावती,लेखिका, सामाजिक कार्यकर्ती झाल्या.

ताईंच्या विवाहानंतर त्यांना पूर्ण पाठिंबा मिळाल्याने आज त्या विविध सामाजिक कामात सक्रीय सहभागी असतात.
ताईंचा एक मुलगा इंजिनिअर व दुसरा MBA करत आहे. मुलगी MSc‌ करतेय शिवाय कथक विषारद करतेय. ताई शिकल्याने त्यांची पुढची पिढी शिक्षित झाली आहे.

Navratri colors – मुस्लीम अलुतेदार-बलुतेदार तसेच मुस्लीम S.T., N.T.,S.C., VJNT या घटकांबाबत संशोधनपर लेखनासाठी महाराष्ट्रभर दौरे करणाऱ्या तमन्नाताई अल्पावधीतच मुस्लीम प्रश्नांवर व राष्ट्रीय एकात्मता या विषयावर व्याख्यानासाठी फिरू लागल्या. याबरोबरच वृत्तपत्र सदर लेखन, मिळून साऱ्याजणी, सत्याग्रही, बहिणा, पत्री सरकार, मुस्लीम सत्यशोधक पत्रिका, दिवाळी अंक यात महिला व मुस्लीम विषयक लेखन करून प्रश्न व समस्या मांडू लागल्या.

सातत्याने काही काम करणाऱ्या महिलांना कामाची संधी नेहमी चालून येत असते, त्याप्रमाणे त्या एस.एम.जोशी सोशॅलिस्ट फाऊंडेशन, महात्मा फुले समता प्रतिष्ठान, ब्लॅासम ग्रुप ॲाफ कौन्सिलर्स, मुस्लीम सत्यशोधक मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहिःशाल विभाग व्याख्याता, सामाजिक कृतज्ञता निधी सदस्य, विद्रोही साहित्य संमेलन अशा विविधांगी संस्थांमधे त्या नेहमीच क्रियाशील असतात.

विविध कामांचा अनुभव घेत त्यांनी त्यांच्या अनुभवातून एक नजर तलाकनंतर, मुस्लीम महिलांच्या समस्या, बाईच्या जातीनं, मुस्लीम बलुतेदार, रिवायत, अभेद्य ते भेदताना, प्रहार, युवामोहर, मुस्लीम बलुतेदार भाग २, बेनकाब, मुसलमान : समज गैरसमज आणि वास्तव अशा ११ पुस्तकांचे लेखन केले आहे.

आज त्या मुस्लीम असतानाही सत्यशोधकीय मुस्लीम संघटनेत काम करतात. व सर्वधर्मसमभावाचे विचार मांडतात तेव्हा त्यांना काही कर्मठ मुस्लीम बांधवांनाही तोंड द्यावे लागते. तरीही त्या न डगमगता निर्भिडपणे आपली मते मांडत असतात. समाज जागृतीचे व प्रबोधनाचे काम करत असतात. मुस्लीम समाजानेही अंधश्रध्दा किंवा धार्मिक अंधश्रध्देत अडकू नये यासाठी त्या कार्यरत आहेत.
सत्यशोधकीय कार्यासाठी, तळमळीने महिलांना जागृत करण्यासाठी, विपुल लेखनासाठी तसेच परखड व ठामपणे आपले मुद्दे मांडण्याच्या त्यांच्या धाडसीपणासाठी या आधुनिक Navratri colors – दुर्गेला मानाचा मुजरा..!! 

 

 

 

ॲड. शैलजा मोळक

 

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

 

 

 

Leave a Reply

×
BLOGSINDIAMAHARASHTRA

Navratri 2022 - पहिली नवदुर्गा

error: Content is protected !!