Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRA

Dussera Durga –  नवरात्रोत्सव 9

1 Mins read

Dussera Durga –  नवरात्रोत्सव 9

Dussera Durga –  ओळख वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!

Dussera Durga

Dussera Durga

ओळख : वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!

अर्चना झेंडे

 

 

Dussera Durga – ‘मूर्ती लहान पण किर्ती महान’ असे म्हणतात ते अर्चनाकडे पाहिले की अगदी खरं वाटतं. किती वर्ष झाली अर्चनाची ओळख होऊन तसं निश्चित आठवत नाही पण सत्यशोधक चळवळीत किंवा विद्यापीठांत मला ती भेटली. तिचा अभ्यास, तिचे ग्रामीण महिलांशी बोलणे, त्यांचे प्रश्न व शंका समजून घेऊन त्यांना त्या समजेल अशा सोप्या भाषेत समजून सांगणे हे मी अनुभवलेय.

अहमदनगर जिल्ह्यातील कोतूळ या खेड्यातील जन्म. वडील मुंबईत एका खाजगी कंपनीत कामाला. आई एस.एस.सी. झालेली पण लवकर लग्न झाल्याने पुढे तिला काही करता आलं नाही. मुंबईत चाळीच्या भाड्याच्या घरात बालपण गेले. मुंबईच्या बकाल जीवनात सभोवती गुंडाच्या परिसरात काही दिवस वास्तव्य. ‘तेथे सिनेमातारका नर्गीस दत्त एका फळवाल्याकडे नियमित यायच्या तेव्हा मी गोडगोजिरी असल्याने त्या माझे खूप लाड करायच्या. मला त्यांनी वडिलांकडे कायमच मागितलं होतं पण त्यांनी नकार दिला.’ ही आठवण त्या आज आनंद व अभिमानाने सांगतात.

मुंबईतून वडीलांनी काही कारणांनी विरारला घर घेतले तेव्हा आदिवासींची बारदाणावरची शाळा असते हे प्रथम कळले. सहावीत असताना सरांनी ‘जात’ विचारली. अर्चनाने ‘न्हावी’ असे उत्तर दिले. त्यावर तुझी भाषा चांगली आहे. रंग गोरा आहे तू खोटं सांगतेय, घरी विचारून ये असे सर म्हणाले. आणि माझी जात कन्फर्म झाल्यावर सरांचं वागणं बदललं हे वास्तव त्या मांडतात.
विरार हे गुंडगिरीसाठी प्रसिध्द असे गाव. तेथे दोन गटात सतत मारामाऱ्या होत असतं. त्या झाल्या की शाळा सोडून दिली जात असे. तेथे रोज सायंकाळी विशिष्ट वेळेला लाईट जायची व अर्नाळा बंदरावर स्मगलिंगचा माल यायचा. सारी गुंड मंडळी गणपती-दिवाळीत सर्वांच्या घरी हक्काने चहा-नाश्ता करून जायची. त्यांची एवढी दहशत होती की कोणाशी पंगा घ्यायचा नाही हे सर्वांच्या डोक्यात पक्के होते. तेथे एक गुंड बाई सुध्दा होती, तिच्या personality वर अर्चना फिदा होती. ‘मी जर शिकले नसते तर नक्की गुंड झाले असते’ असे ती सांगते. तशीही अर्चना आजही तितकीच बोल्ड, परखड, स्पष्टवक्ती व निर्भिड आहे. तिने मनात आणले तर ती काहीही करू शकते व तिने जे तिला करायचे होते ते केलेय.

१० वीत असताना गणिताच्या भीतीने नापासचा शिक्का तिच्यावर बसला होता. मग न्हावी जातीची असल्याने आता काय ब्युटीपार्लर कोर्स करायचा का ? असे लोक विचारू लागले. हे ऐकून काहीही झालं तरीही आपण खूप शिकायचं आणि काहीतरी करून दाखवायचे हा ‘प्रण’ तिने केला. आईही नेहमी ‘माझ्यासारखे राहू नकोस, चांगलं आयुष्य जगं.’ असे सांगायची. आणि मग मागे वळून पाहिले नाही. दादरच्या किर्ती कॅालेजात B.A. केलं. मराठी, इंग्रजी टायपिंग व शॅार्टहॅंड केलं. शिक्षणासाठी उन्हाळी सुट्टीत साड्या विकणे, STD बुथवर काम करणे, टिकल्यांची पाकिटे ग्रोसवर आणून त्यावर मोती/चमकी लावणे अशी विविध कामं करत पैसा कमावला. असं करत MSW केले. कित्येकदा डब्यात शिळी चपाती व भाजी नेली पण त्याची कधी तक्रार केली नाही.
दरम्यान नात्यातील बहिणींची लग्न-मुलं-संसारातील क्लेष,सततची भांडणं याचाही गांभीर्यानं विचार व अभ्यास अर्चना करत गेली. आणि तेव्हाच ठरवलं की आपलं लग्न स्वतःला वाटेल तेव्हाच आपल्या मर्जीने करायचं. आईवडीलांची मात्र परिस्थितीमुळे सतत भांडण व्हायची. कधी वडील जीव देतो म्हणून निघून जायचे तर कधी आई घराबाहेर जायची. याची कारणे अर्चनाला MSW झाल्यावर कळू लागली. वयाच्या २६ व्या वर्षी अर्चनाने घर सोडून स्वतःचेच हिंमतीवर जगायचा निर्णय घेतला आणि तिने औरंगाबाद गाठलं. दरम्यान वर्षभर घरच्यांनी चौकशीही केली नाही. पण ती सतत आपल्याला सिध्द करत राहिली.

Dussera Durga –  नवरात्रोत्सव 9अर्चना आपले कार्यकर्तृत्वाच्या कक्षा रूंदावत होती. मग घरच्यांनी तिला बोलावून तिने लग्न करावे म्हणून जातीच्या वधूवर मंडळात नाव नोंदवले. तिथेही अर्चनाने फॅार्मवर मंगळसूत्र घालणार नाही, कुंकू लावणार नाही, स्वतःच मूल नको, दत्तक चालेल, हुंडा देणार नाही, लग्नाचा खर्च माफक व वाटून केला पाहिजे हे मुद्दे लिहिले आणि वधूवर मेळाव्यात स्टेजवरून माहिती सांगताना, लग्न ही काही फक्त मुलीची गरज नाही, दोघांचीही आहे हे स्पष्टपणे सांगितले. यामुळे अर्चना अतिशहाणी ठरली पण नकोशी असलेली स्थळे बाहेरच्या बाहेर कटली असे अर्चना म्हणते.
समाजकार्य करताना रविंद्रशी ओळख-मैत्री झाली. वैदिक पध्दत नाकारत अमावस्या व शनिवार पाहून संध्याकाळी सत्यशोधक पध्दतीने लग्न केले. पण लग्नाआधी काही महिने एकत्र (live in relationship)राहून पाहिले. ‘समतावादी विचारांमुळे आयुष्यात जे काही करू ते एकत्र करू या विचारांमुळेच आज रविंद्र माझी PHD पूर्ण व्हावी म्हणून त्याची जीवलग मुंबई, मित्र आणि त्याच्या उन्नतीच्या संधी सोडून माझ्यामागे ठामपणे उभा आहे. अनेक आर्थिक प्रश्न, माझे आजारपण, women’s studies मधे Gender culture & development मधे master’s degree यामधे खंड पडू दिला नाही. ही सोबत आयुष्याने दिलेली देणगी आहे’ अशी कृतज्ञता अर्चना व्यक्त करते.
अर्चनाने तीन वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काम केले. विविध विषयावर Acadamic conference मधे पेपर सादर केले. सध्या ती न्हावी जातीत होणारी लग्न जातनिहाय की जातीबाहेरःमुलं आणि मुली काय विचार करतात याविषयावर PHD करत आहे.

Dussera Durga – आजपर्यंत अर्चनाने –

१)MSW नंतर वर्षभर FACSE मधे तिने बाललैंगिक शोषण प्रतिबंध या विषयावर काम केले. वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रीया आणि तृतीय पंथीय यांच विदारक जीवन व मृत्यू तिने जवळून अनुभवले.
२) महाराष्ट्र पोलिस आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्था यांच्या माध्यमातून कौटुंबिक हिंसाचार समुपदेशन ते पंचनामा ते Dying declaration अशा गंभीर केसेसवर काम केले.
३) पोलिस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले.
४) कौटुंबिक समुपदेशन, जेंडर आणि विकास ट्रेनिंग, जात-लिंग-भाव-पितृसत्ता या विषयावर ट्रेनिंग कार्यक्रम घेतले.
५)जतन फौंडेशन फॅार इक्लूजन या संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून कोविडच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्र सरकारला एक कोटी रुपये किमतीचे वैद्यकीय सामान अमेरिकेहून मिळवून देण्यात आले. तसेच, अमेरिकन संस्थेकडून मिळालेले ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर गरजू रुग्णांना मोफत देण्यात आले. या वर्षी जतन फाऊंडेशन महाराष्ट्रातील सर्व तालुक्यांमध्ये अडीच लाख वाचनाचे चष्मे गरजू लाभार्थींना विनामूल्य देणार आहे. महाराष्ट्रातील नेत्र आरोग्य संदर्भात मोठे जागरण यानिमित्ताने घडणार आहे. या मोहिमेचे नेतृत्व अर्चना स्वतः प्रत्यक्ष फिल्डवर उपस्थित राहून करत आहे.
अशी हसरी, बोलकी, हुशार, परखड, स्पष्टवक्ती, कष्टाळू, परिवर्तनीय विचार कृतीतून मांडत भयमुक्त समाजनिर्मितीत योगदान देणारी, स्वतःपेक्षा समाजाचा व विशेषतः सतत महिलांचा विचार करणारी व त्यांच्या प्रश्नांवर अभ्यास करणाऱ्या आपल्या आधुनिक Dussera Durga – नवदुर्गेस मानाचा मुजरा..!!! 

 

 

 

ॲड. शैलजा मोळक

Leave a Reply

×
BLOGSINDIAMAHARASHTRA

Navratri colors -  नवरात्रोत्सव 6

error: Content is protected !!