Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRA

kolhapur – छत्रपतींचा वारसा, सांगे आरसा –  ज्ञानेश महाराव

1 Mins read

kolhapur – छत्रपतींचा वारसा, सांगे आरसा

 ज्ञानेश महाराव

     छत्रपतींच्या kolhapur – कोल्हापूर गादीचे वारस संभाजीराजे छत्रपती यांनी, राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने खासदारकीवर ठोकलेला आणि सोडलेला दावा, हा राज्याच्या राजकारणात पुढची काही वर्षे चर्चेचा विषय राहणार आहे!

kolhapur – कोल्हापूरच्या राजघराण्याची परंपरा मोठी आहे. संस्थाने खालसा झाल्यानंतर हे घराणे काही अपवाद वगळता संसदीय राजकारणापासून अलिप्त होते. हा जो अपवाद म्हणून उल्लेख केला, तो १९६७ च्या लोकसभेच्या निवडणुकीचा आहे.

त्यावेळी विजयमाला राणीसाहेब या ‘शे.का. पक्षा’कडून निवडणूक लढवून विजयी झाल्या होत्या. त्यानंतर kolhapur – कोल्हापूरचे राजघराणे संसदीय राजकारणाच्या बाबतीत थोडेसे बाजूला राहिले.

      या गादीचे सध्याचे वारस शाहू छत्रपती यांची निवडणुकीच्या वेळी उमेदवारीबद्दल चर्चा व्हायची; मात्र ती तात्पुरती असायची. २००४ साली या घराण्यातील तरुण उमेदवार मालोजीराजे यांनी kolhapur – कोल्हापूर शहराचे आमदार होऊन दाखविले.

विजयमाला राणीसाहेब यांचे १९६७ च्या लोकसभा निवडणुकीतले यश हे kolhapur – कोल्हापूर शहर सोडून एक उमेदवार म्हणून आणि ‘शेतकरी कामगार पक्षा’च्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ होते!

तर मालोजीराजे यांचे २००४ च्या विधानसभा निवडणुकीतील यश हे राजघराण्याचा उमेदवार म्हणून होते. याचा अर्थ, kolhapur – कोल्हापूरकर एक वारसा म्हणून या राजघराण्याला मानतात, असे अजिबात नाही.

मालोजीराजे यांचा एकमेव विजय सोडला तर त्याच्या पुढच्या किंवा मागच्या निवडणुकीत राजवंशाचे उमेदवार- मग ते विक्रमसिंह घाटगे, समरजीतसिंह घाटगे, संजय घाटगे, (घाटगे हे राजर्षि शाहूराजांचे जन्म घराणे. त्यांना kolhapur – कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने दत्तक घेतले.)

स्वतः मालोजीराजे, संभाजीराजे यांना बहुतांशवेळा निवडणुका हरताना kolhapur – कोल्हापूरकरांनी पाहिले आहे. संसदीय किंवा निवडणुकीचे राजकारण करत असताना जी लोकशाहीपूरक कार्यपद्धती असते; साधने असतात, त्याचा अवलंब करताना ते कधी दिसले नाहीत.

म्हणून सातारा गादी असो वा kolhapur – कोल्हापूर; गादीचा वारसा सांगणाऱ्यांना जनतेने पराभवाचा प्रसाद चाखायला दिला आहे. तरीही वारसा आणि प्रतीक म्हणून राजकीय पक्षांना राजघराणी जवळ करावीशी वाटतात.

     स्वातंत्र्यप्राप्तीनंतर चक्रवर्ती राजगोपालचारी यांनी ‘स्वतंत्र पक्ष’ स्थापन करून संसदीय राजकारणात रस असणाऱ्या राजघराण्यांना आमदार-खासदार व्हायची संधी दिली. हा पक्ष संस्थानिक, जमीनदार आणि भांडवलदार यांची उघडपणे बाजू मांडत होता.

स्वतंत्र पक्षानंतर ‘रा.स्व. संघा’ची राजकीय शाखा असलेल्या ‘जनसंघ’ व ‘भारतीय जनता पक्ष’ने अविरतपणे राजेरजवाड्यांना कथित हिंदू संघटनाचे प्रतीक बनविले आणि जमेल तिथे निवडणुकांत संधी दिली. त्यासाठी ‘राजा हा विष्णूचा अवतार असतो,’ ही थापही वापरली.

२००९ मध्ये kolhapur – कोल्हापूर व सातारा लोकसभेच्या जागेवर उमेदवारी द्यायची वेळ आली, तेव्हा राजघराण्यांना जवळ करायचा मोह ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ पक्षालाही आवरता आला नाही. साताऱ्यात त्यांनी उदयनराजे आणि कोल्हापुरात संभाजीराजे यांना उमेदवारी दिली. सातार्‍यात हा निर्णय योग्य ठरला; तर kolhapur – कोल्हापूरकरांनी संभाजीराजे यांचा पराभव घडवला.

       काही वर्षे उलटून गेल्यावर पक्ष बदलला, या कारणास्तव सातार्‍यात उदयनराजे यांचाही लोकसभा निवडणुकीत जनतेने पराभव घडवला आहे. तरीही म्हणजे, यांचे सतत पराभव होत असले तरी या व असल्या घराण्यांचे सर्वच राजकीय पक्षांना आकर्षण हे आहेच.

म्हणून ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ पक्षाकडून लोकसभेला हरलेल्या kolhapur – संभाजीराजे छत्रपती यांना ‘भाजप’ने सहा वर्षांपूर्वी ‘राष्ट्रपतीनियुक्त’ राज्यसभा सदस्य केले. तसेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस’कडून विजयी झालेल्या उदयनराजे यांना अवघ्या सहा महिन्यांत पोटनिवडणुकीत पडायची अवदसा सुचवून त्यांना राज्यसभेचे सदस्य केले.

असे वेगवेगळ्या पक्षांनी राजे लोकांना आवतणं धाडणे, उमेदवाऱ्या देणे, सन्मान करणे ही त्या त्या पक्षांची गरज आहे. पण हे राजकीय पक्ष राजे लोकांना मालक, श्रेष्ठ होऊ देत नाहीत. यासंबंधात राजघराण्यात प्रसिद्ध असा आणि पेशव्यांनी जन्माला घातलेला ‘लागू पुरता उतारा’ हा वाक्प्रचार राजकीय पक्ष आपल्या कृतीतून दाखवून देतात.

     उदयनराजे यांना ‘भाजप’ने १९९८ मध्ये आमदार जरूर केले. पण संधी द्यायची वेळ आली, तेव्हा त्यांना ‘राज्यमंत्री’ पदावर भागवले. कॅबिनेट मंत्री केले नाही. त्यानंतर उदयनराजे ‘लेवे खून’ (२००२) प्रकरणात अडकल्यावर त्यांच्याकडे गैरसोय म्हणून पाठही फिरविली. हे बरेच जुने झाले. अगदी अलीकडे त्यांचा लोकसभेला पराभव झाल्यावर त्यांना राज्यसभेचे खासदार केले. मात्र शब्द देऊनही त्यांना केंद्रात मंत्री केले नाही. तीच अवस्था ‘भाजप’ने kolhapur – संभाजीराजे यांची केली.

त्यांची ‘राष्ट्रपती नियुक्त’ खासदारकीची मुदत संपल्यावर त्यांना ‘भाजप’ने पुन्हा त्याच पदावर नियुक्त करायला हवे होते. पण संभाजीराजे यांना खासदारकी हवी; पण आपला मळवट ‘भाजप’च्या कुंकवाने माखून घ्यायचा नव्हता. तोच प्रकार सध्या चाललेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत त्यांनी केला. राज्यसभेचे सदस्यत्व हवे. पण ‘शिवसेना’चे सदस्यत्व नको होते.

      या प्रकरणात एक बाजू अशीही समोर येते आहे की, त्यांना सर्व पक्षांचा पाठिंबा घेऊन खासदार व्हायचे होते आणि सोयीची भूमिका घेत व्यक्तिकेंद्री वर्तन करायचे होते. त्यांच्या या मनसुब्यामुळे राज्यात सत्तेत असणार्‍या ‘महाविकास आघाडी’ सरकारची वीण उसवली जाणार होती.

म्हणूनच हे प्रकरण उद्धव ठाकरे यांनी बेताबेताने हाताळले. जसजसा अर्ज भरायची वेळ आली, तोपर्यंत संभाजीराजे ह्यांच्या सगळ्या हालचाली ‘भाजप’च्या इशा‍र्‍यावरून, सोयीसाठी होत असल्याचे जनमानसात स्पष्ट झाले होते. शेवटी वेळ अशी आली की, संभाजीराजे यांना अर्ज भरायच्या अगोदरच माघार घ्यावी लागली.

आपल्या माघारीचे खापर त्यांनी ‘शिवसेना’वर फोडले. ते बोलून खाली बसत नाहीत, तोपर्यंत फडणवीस यांनी त्यांची ‘री’ ओढली. पुढे पुढे तर संभाजीराजे यांचा उद्धार खुद्द त्यांच्या वडिलांनीच- म्हणजे विद्यमान छत्रपती शाहूराजे यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांनाही kolhapur – कोल्हापूरकर शाहू छत्रपती यांनी चांगलेच ऐकविले. एवढे होऊनही ‘भाजप’ने आपली शोभा करून घेण्यात कसर ठेवली नाही. त्यांनी आपले उमेदवार जाहीर केले.

त्यात अनिल बोंडे यांच्यासारख्या भडकावू बोलण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या कार्यकर्त्यांला संघी तर दिलीच; पण आणखी एक जागा लढवायची म्हणून kolhapur – कोल्हापूरच्या धनंजय महाडिक यांना मैदानात आणलेय.(ते २०१४ ते १९ या काळात लोकसभेत राष्ट्रवादीचे खासदार होते.)

      ‘भाजप’ला संभाजीराजे यांचा खरोखरच सन्मान करावयाचा होता आणि संभाजीराजे यांनाही खासदारकीने पुन्हा पावन व्हायचे होते, तर ‘भाजप’च्या तीन उमेदवारात त्यांचा समावेश का झाला नाही ? तात्पर्य, दक्षिण महाराष्ट्राच्या भूमीत ‘भाजप’ला आपले कमळ रुजवायचं-वाढवायचं आहे.

तिकडच्या तीन जिल्ह्यात फक्त सांगली जिल्ह्यात ‘संघ-भाजप’चे कार्यकर्ते यशस्वी होताना दिसले आहेत. इतरत्र म्हणजे kolhapur – कोल्हापूर- साताऱ्यात ‘भाजप’चे नेते – कार्यकर्ते ‘आले- गेले’ या वर्गवारीत आहेत. संभाजीराजे, धनंजय महाडिक यांच्या रूपाने त्यांना पक्ष विस्तार करायचा आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेचा निकाल स्पष्ट आहे. त्यामुळे महाडिक यांची निवड केलीय, ती लोकसभेची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच! तोपर्यंत संभाजीराजे यांनाही हाताळले जाईल. हे सर्व असेच घडणार, हे स्पष्ट झाल्याने उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या वाट्याला आलेली दुसरी उमेदवारी kolhapur – कोल्हापुरातील संजय पवार ह्या शिवसैनिकाला देऊन समास साधला आहे.

    परिणामी, ‘भाजप’ विरुद्ध ‘महाआघाडी’ हा सामना मुंबईवरून kolhapur – कोल्हापूर मुक्कामी आला आहे. आता परिस्थिती अशी आहे, की ‘भाजप’ला ही निवडणूक घडवून आणायचीय. राज्यात जेव्हा ‘महाआघाडी’ सत्तेत आली तेव्हा त्यांचे संख्याबळ १६९ आणि ‘भाजप’ आघाडीचे ११९ होते.

त्यात चार-दोन इकडे तिकडे झाले असणार. ही निवडणूक पसंती क्रमांक आणि कोटा पद्धतीने होत असते. सहा जागांसाठी सात उमेदवार उभे राहणार आहेत. सातपैकी पाच उमेदवार ठरविलेल्या कोट्यानुसार पहिल्या पसंतीची मते मिळवू शकतात.

मात्र सहाव्या जागेसाठी ‘भाजप’ आणि ‘शिवसेना’ या दोन्ही पक्षांचे उमेदवार पहिल्या पसंतीची व कोटा पूर्ण करतील, एवढी मते मिळवू शकणार नाहीत. त्यामुळे पसंती क्रमांकाच्या दोन ते सहा अशा पाच- पाच फेर्‍या मोजाव्या लागणार आहेत.

‘मनसे’चा एक आमदार ‘भाजप’ला मतदान करेल. ‘माकप’चा एक आणि ‘एमआयएम’चे दोन असे एकूण तीन आमदार विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी तटस्थ होते. त्यातील ‘एमआययएम’ दोन्ही बाजूंना जाहीरपणे नको आहे. पण त्यांची दोन मते आमदार एकमेकांना दाखवू शकणार असल्याने ती कुणाकडे जातील, हे सांगता येत नाही.

      आजच्या घडीला सत्ताधारी आघाडीचा आकडा १६८; तर ‘भाजप’चा ११९ आहे. सहावा उमेदवार विजयी करताना दोघांकडे पहिली पसंती पुरेशी नाही. दुसर्‍या दर्जाच्या सर्वपक्षीय राजकारणात पसंतीक्रम आणखी किती घसरतो, हे या निवडणुकीत दिसेल. पहिल्या पसंतीची मते कमी पडणारे, ‘आम्ही यांची इतकी मते फोडली,’ म्हणून ‘जितम् जितम्’ छात्या बडवून घेताना दिसतील !

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021. Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company. Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement, News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World. Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Postbox India
Anytime Everything

Leave a Reply

error: Content is protected !!