Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRA

politics news – अडीच वर्षांचा महिमा, किती कामाचा ? – ज्ञानेश महाराव

2 Mins read

politics news – अडीच वर्षांचा महिमा, किती कामाचा ?

-ज्ञानेश महाराव

    politics news ‘सत्तेची अडीच वर्षे’ हा दखल घ्यावा, असा काळ नाही. तथापि, ‘अडीच वर्षे’ हे दोन शब्दच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘महाविकास आघाडी’ सरकारच्या स्थापनेला कारण ठरलेत! २०१९ ची विधानसभा निवडणूक ‘भाजप’ व ‘शिवसेना’ पक्ष युती करून लढले. त्याआधीची २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘शिवसेना-भाजप’ ही २५ वर्षांची युती मोडली होती.

कारण एप्रिल-मे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘भाजप’ने मित्र पक्षांच्या (NDA) साथीने बहुमत मिळवून देशात ‘मोदी सरकार’ स्थापन केले, हे होते. यानंतर ‘भाजप’ने मित्रपक्षांवर दबाव आणण्यासाठी ‘शत प्रतिशत-भाजप’चा नारा ठोकत स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा केली.

ह्या घोषणेतील अप्पलपोटेपणा उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी यांना वेळीच समजला. म्हणून ‘शिवसेना’ आणि ‘तृणमूल काँग्रेस’ हे पक्ष ‘भाजप’चे ‘मित्राला खाणारे संकट’ टाळण्यासाठी सिद्ध झाले.

ही तयारी त्यांनी केली नसती तर त्यांच्याही पक्षाची हालत प्रकाशसिंग बादल (अकाली दल), चंद्राबाबू नायडू (तेलगू देशम), नितीशकुमार (जनता दल-युनायटेड), रामविलास पासवान (लोक जनशक्ती), रामदास आठवले (भारतीय रिपब्लिकन) आणि मायावती (बहुजन समाज पक्ष) यांच्या पक्षांसाठी झाली असती ! यातील काही पक्ष व त्यांचे नेते ’भाजप’ बरोबर सत्तेत आहेत; पण त्यांच्यातला जिवंतपणा संपलाय. – politics news

      एप्रिल-मे २०१४ मध्ये ‘मोदी सरकार’ देशात स्थापन झाल्यानंतर ऑक्टोबर-२०१४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका दरम्यान ‘भाजप’ने ‘मोदी सरकार’चा धाक व साम-दाम-दंड-भेदाचे प्रयोग करीत ‘काँग्रेस’ व ‘राष्ट्रवादी काँग्रेस’सह ‘शिवसेना’च्या उमेदवारांचीही मोठ्या प्रमाणात पळवापळवी केली होती. त्याच बळावर ‘भाजप’ने जागा वाटपात ‘शिवसेना’ला झुकवण्यास सुरुवात केली.

या ओढाताणीत युती तुटली. ती ‘भाजप’ला राज्यातील सत्तप्राप्तीसाठी इतर पक्षांतून आयात केलेल्यांना उमेदवारी देण्यासाठी तोडायचीच होती. या निवडणुकीत ‘भाजप’ आणि ‘शिवसेना’ स्वतंत्रपणे लढले.

politics news – ती ‘शिवसेनाप्रमुख’ बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा कस पाहणारी पहिली निवडणूक होती. ती उद्धव ठाकरे यांनी ‘युतीत शिवसेनेची २५ वर्ष सडली!’ म्हणत लढवली आणि ४८ चे ६३ आमदार केले.

दुसरीकडे, ‘भाजप’ने मोदी-शहांसह अख्खं केंद्रीय मंत्रिमंडळ निवडणूक प्रचारासाठी महाराष्ट्रात फिरवलं. ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्या नावाचा वापर जाहिरातीतून केला. तरीही ‘भाजप’ला स्वबळाच्या सत्तेसाठीचा १४५ आमदारांचा आकडा गाठता आला नाही.

politics news ‘भाजप’ची मजल १२२ आमदारांवर थबकली. त्या बळावर देवेंद्र फडणवीस यांनी ‘सरकार स्थापनेसाठी आवश्यक आमदारांचे संख्याबळ विधानसभेत सिद्ध करू,’ असं पत्र राज्यपालांना देऊन मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. विधानसभेत ‘शिवसेना’ हा प्रमुख विरोधी पक्ष म्हणून बसला.

एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते झाले. ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ने अप्रत्यक्षपणे दिलेल्या पाठिंब्यावर ‘फडणवीस सरकार’ अधिकृत झाले.

     हे ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ने केले; कारण फडणवीस हे मोदी-शहा याच्या केंद्रीय सत्तेच्या माध्यमातून ‘शिवसेना’ला टाळून दोन्ही ‘काँग्रेस’चे आमदार फोडतील अशी शक्यता होती. ते ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ने बाहेरून पाठिंबा देऊन टाळले आणि ‘भाजप’ला ‘शिवसेना’शी सत्ता सहभागाची बोलणी करण्यास भाग पाडले.

त्यावेळी ‘काँग्रेस’चे ४१ आणि ‘राष्ट्रवादी काँग्रेस’चे ४० आमदार विधानसभेत होते. दोन्ही ‘काँग्रेस’नी स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवली होती. म्हणजे, तेव्हाही ‘शिवसेना’ला दोन्ही ’काँग्रेस’ सोबत घेऊन आजच्या सारखी ‘महाविकास आघाडी’ करून सरकार स्थापन करता आले असते.

तसे का केले नाही, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक, हे तीन पक्ष एकत्र आले असते, तर त्यांची संख्या १४४ होत होती. त्याला अपक्ष व डाव्या पक्षांची साथ मिळून सरकार बनले असते; पण ते फार काळ टिकले नसते.

दुसरे कारण, politics news ‘काँग्रेस’ने २०१९ मध्ये ‘शिवसेना’सह सत्तेत सहभागी होण्याची तयारी दाखवली; तशी तयारी २०१४ मध्ये दाखवली नसती. सत्तेसाठी एकत्र येण्यासाठी संख्याबळाप्रमाणे वास्तवाची तीव्रता समजण्यासाठी काळही जावा लागतो.

     २०१४ ते २०१९ ह्या काळात ’मोदी सरकार’ने ‘काँग्रेस’सह विरोधकांना संपवण्यासाठी ज्याप्रकारे सत्तेची ताकद वापरली, त्यानेच राज्यातल्या ‘महाविकास आघाडी’ची बीज-पेरणी केली आहे. ‘फडणवीस सरकार’ स्थापन झाल्यानंतर ‘शिवसेना’ त्यात तब्बल दोन महिन्यांनी सामील झाली.

त्यासाठी दोन पक्षांत बऱ्याच ‘उठा-बशा’ झाल्या. ‘शिवसेना’ला मुख्यमंत्रीपद वगळता सत्तेचा समान वाटा पाहिजे होता. तो ‘भाजप’ श्रेष्ठींनी नाकारला. ‘भाजप’ आमदारांची संख्या ‘शिवसेना’पेक्षा दुप्पट असल्याने ‘दोनास एक’ अशी सत्तेची वाटणी झाली.

त्यात ‘भाजप’कडे २६, तर ‘शिवसेना’कडे १३ मंत्रीपदे आली. युतीतला छोटा भाऊ मोठा झाला. पण तो खोटा असल्याची बोंब मारत ‘शिवसेना’चे मंत्री पुढची ५ वर्षे खिशात राजीनामे घेऊन फिरत होते.

     दरम्यान, politics news २०१७ मध्ये ‘मुंबई महानगरपालिका’ची निवडणूक ‘शिवसेना’ व ‘भाजप’ स्वतंत्रपणे लढले. त्यात ‘भाजप’ची सरशी व्हायची होती. पण ८६-८४ अशा निसटत्या फरकात ‘शिवसेना’ने मुंबई महानगरपालिकेची सत्ता मिळवली. त्यानंतर ‘शिवसेना-भाजप’ यामधील दूरी वाढू लागली.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘शिवसेना’ने पंढरपुरात महाअधिवेशन घेऊन स्वबळाचा नारा दिला. तो ‘भाजप’ची महाराष्ट्रात काशी करण्यासाठीच होता. हे नुकसान लक्षात घेऊन, तेव्हा ‘भाजप’चे’ राष्ट्रीय अध्यक्ष असलेले अमित शहा हे युतीच्या चर्चेसाठी मुंबईत ’मातोश्री’वर आले.

तेव्हा त्यांना ‘शिवसेना’च्या आग्रहानुसार, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या युतीची एकत्र बोलणी करावी लागली. त्यात राज्यात पुन्हा सत्ता आल्यास ‘फिफ्टी-फिफ्टी’ वाटणी करण्याचे निश्चित झाले. ही आधीच्या ’दोनास-एक’ सत्ता वाटणीतील घाट्याची वसुली होती.

ह्या सत्तावाटणीत मुख्यमंत्रीपदाची प्रत्येकी अडीच वर्षांची वाटणी नाही, असे गृहीत धरणे, हे राजकीय बावळटपणाचे होते.

      तो बावळटपणा ‘बुद्धीचे नाना सागर’ असल्याच्या टेचात बोलणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडून झाला आणि पुढचे ‘महाविकास आघाडी’चे सरकार स्थापन होण्यापर्यंतचे रामायण – महाभारत घडले. ‘उत्तर रामायण’ घडते आहे. त्याचा तपशील ताजा आहे.

तथापि, ‘थोरल्याला धाकटा भाऊ’ करण्याची करामत करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय हिशेब करून ‘शिवसेना’ला अपेक्षेप्रमाणे अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद दिले असते; तर आज उद्धव ठाकरे पायउतार होऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी पुन्हा बसलेले दिसले असते. असे चित्र आता दृष्टिपथात नाही. कारण अट्टहास ! politics news

   अट्टहास वाईट नसतो; तर त्यातला स्वार्थ वाईट; विनाशकारी असतो. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचा अट्टहास धरला. फुले-शाहू-आंबेडकर यांनी सामाजिक समतेचा आणि महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्याचा अट्टहास धरला. तो मावळ्यांनी, सत्यशोधकांनी, स्वातंत्र्यसैनिकांनी आपला मानला. म्हणूनच स्वराज्य- समता- बंधुता यांचा पूर्ण आनंद देणारा स्वतंत्र भारत देश निर्माण झाला.

त्याच आनंदाचे आपण लाभार्थी आहोत. या उलट, रावणाने सीतेसाठी अट्टहास धरल्याने त्याला स्वतः उभारलेली सोन्याची लंका जळताना पाहावी लागली. दुर्योधन- दुःशासनाने सत्तेचा अट्टहास धरला. त्यात कौरव-पांडवांच्या ‘कुरू’ कुळासह युद्धात सामील झालेल्या सर्वांचा नाश झाला.

‘विष्णु अवतारी’ भगवान राम-कृष्ण यांचीही राख झाली. ही उदाहरणं कल्पनिक असली तरी शहाणपण देणारी आहेत.

     यातून ’राम-कृष्ण जन्मभूमी मुक्ती’साठी गेली ३५ वर्षे देशाला वेठीस धरणाऱ्यांच्या पंत-प्रतिनिधीनी खूप काही बोध घ्यायला पाहिजे. सत्ता – स्वार्थाच्या स्वप्नांची राख केवळ सत्यच करू शकते.

सत्य काय आहे ? देवेंद्रजींच्या ‘मुख्यमंत्रीपदावर मीच परत येईन’ ह्या अट्टहासापायी ‘काँग्रेस’ व ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ला सत्तेची लॉटरी लागली! आणि ‘आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन’ ह्या उक्तीनुसार ‘शिवसेने’च्या मुख्यमंत्रीपदाची अडीच वर्षे पूर्ण होऊन, दुसरी अडीच वर्षे सुरू झाली.

ह्यातील पहिल्या अडीच वर्षांत ‘महाविकास आघाडी’तील तीनही घटक पक्षांची शान वाढावी, असे काही घडलेले नाही. ते पुढील अडीच वर्षांत दिसावे; आणि ‘भाजप’ने आपले सत्ता-लंपटतेचे प्रयोग थांबवावेत.

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021. Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company. Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement, News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World. Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Postbox India

Leave a Reply

error: Content is protected !!