Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRASANSKRITISANSKRITI DHARA

Lata Mangeshkar – स्वरमाउलीचे पसायदान

1 Mins read

Lata Mangeshkar – स्वरमाउलीचे पसायदान

लेखक : ज्ञानेश महाराव 

 

 

‘एक चिमणी आली नि दाणा घेऊन गेली’ ही अखंड चालणारी ‘चिमणकथा’ Lata Mangeshkar – लता मंगेशकर, यांनी १९४७ ते २००६ ह्या काळात नव्या रूपाने आणली होती. ‘आप की सेवा मे’ पासून सुरू झालेली त्यांची भारतीय चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायनाची कारकीर्द तब्बल ६० वर्षांनी ‘रंग दे बसंती’ने थांबली. दरम्यानच्या काळात चिमणकथेतल्या चिमणीसारख्या एकेक नट्या आल्या आणि त्या Lata Mangeshkar – लतादीदींच्या आवाजावर लहरत- लहरत दीदींसाठी काळाला आपल्या वयातलं एक वर्ष देऊन गेल्या. मधुबाला ते माधुरी दीक्षित आणि ‘रंग दे’ मधली क्रिकेटपटू पतौडी आणि शर्मिला टागोर यांची मुलगी- सोहा अली खान. अशा ६० हून अधिक नट्या असतील. त्या सगळ्या आल्या आणि गेल्या. Lata Mangeshkar – लतादीदींचा आवाज मात्र वयाच्या ७७ वर्षी ‘रंग दे’मध्येही ‘मै सोला बरस की’सारखा कोवळाच राहिला. तो आवाजच नाही, तर ते बालिश हसणं- बघणं, लाजणं- वागणं; लहान मुलीची नम्रताही अखेरपर्यंत तशीच होती. Lata Mangeshkar – लतादीदींची गाणी ऐकता-ऐकता अठरा वर्षांचे ऐंशी वर्षांचे झाले. मात्र, त्यांचे वार्धक्य क्षणात झटकून तारुण्यात पोहोचवण्याचे काम Lata Mangeshkar – लता मंगेशकर यांनी गायलेल्या प्रत्येक गाण्याने केलं आहे आणि पुढेही अनंतकाळ करीत राहिलं. त्यांच्या गाण्यात जणू काळाला विरघळून टाकण्याचे सामर्थ्य होते आणि आहे; इतके ते चिरतरुण आहे. हा ’अजीब दास्ता’ आहे. तो ‘कहा शुरू, कहा खतम’ असा ‘भुतो न भविष्यति’ असा आहे. तो तसा, वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या अकाली निधनानाने १९४२ पासून सुरू झाला होता. त्याआधीही त्यांनी वडील असताना, त्यांच्या मालकीच्या ‘बलवंत संगीत नाटक कंपनी’साठी अडचणीच्या प्रसंगात ‘संगीत सौभद्र’ नाटकात ‘नारद’ वयाच्या ७-८ व्या वर्षी सादर केला होता. तेव्हाच त्यांनी आपल्यातल्या उपजत गानकौशल्याची चुणूक दाखवली होती. तीच त्यांनी ‘किती हसाल’ ह्या चित्रपटासाठी गायलेल्या पहिल्या गाण्यातूनही दाखवली. त्यातील ’नाचू या गडे, खेळू दारी’ ह्या गीतगायनासाठी त्यांना मानधनाचे ३० रुपये मिळाले होते. त्याच वर्षी त्यांनी ’पहिली मंगळागौर’ ह्या चित्रपटात गाण्यासह अभिनयही केला होता. त्यानंतरच्या पुढच्या १९४२ ते ४७ ह्या ५ वर्षांत त्यांनी ‘चिमुकला संसार’, ‘गजाभाऊ’, ‘माझं बाळ’, ‘छत्रपती शिवाजी’, ह्या मराठी चित्रपटांसह ‘बड़ी माँ’, ‘जीवनयात्रा’, ‘मंदिर’, ‘सुभद्रा’ ह्या हिंदी चित्रपटात अभिनयासह गाणी गायली. १९४७ च्या ‘आप की सेवा मे’पासून मात्र त्यांचा निव्वळ पार्श्वगायनाचा प्रवास सुरू झाला. ३० रुपयांच्या मानधनापासून सुरू झालेला हा गानप्रवास ‘भारतरत्न’पर्यंतचे असंख्य सन्मान प्राप्त करीत; सार्थपणे मिरवीत करोडो रुपयांची संपत्ती मागे ठेवीत, ६ फेब्रुवारीला वयाच्या ९२ वर्षी (जन्म : २८ सप्टेंबर १९२९) अनंतकाळाच्या आठवणींसाठी थांबला. यातील ७५ वर्षं त्यांनी भारतीय कुटुंबातील आजी-आजोबा आणि नातवंडं, अशा तीन पिढ्यांना एकाच वेळी आयुष्य सुरेल करण्याचा साक्षात अनुभव दिला. तो आनंददायी असला तरी त्याची निर्मिती आनंदातून झालेली नाही. गाणार्‍या पाखराची एक गोष्ट आहे. हे पाखरू सुरेल गातं. पण त्यासाठी ते स्वतःला काटेरी झुडपावर लोटून देतं, आपल्या काळजात काटा खुपसून घेतं. काटा जेवढा आत घुसेल, तेवढं त्या पाखराच्या कंठातून येणारे गाणं अधिक गोड होतं. गोष्टीतलं हे पाखरू प्रत्यक्षात कुणीही पाहिलं नसणार. पण दुःखाचं नितांतसुंदर गाणं होऊ शकतं, याचा प्रत्यक्ष अनुभव ‘अखंड भारत’ गेली ७५ वर्षं घेत होता आणि तो जगभर पोहोचला होता. जगाला आनंद देणाऱ्या लताबाईंच्या दु:ख- दुर्दैवाची सुरुवात वयाच्या ५ व्या वर्षांपासून झाली होती. तेव्हा त्यांना ‘देवी’ आल्या होत्या. त्या त्यांना उद्ध्वस्त करायचं ठरवूनच आल्या होत्या. एक गेली की दुसरी यायची. आगीला आग लागावी, असा प्रकार होता. त्याबाबत लतादीदींच्या आईंनी – माईंनी सविस्तर लिहिलंय. तीन महिन्यांनी ह्या ‘देवी’ गेल्या, पण सर्वांगावर जीवघेण्या झुंजीचे व्रण ठेवून गेल्या. मात्र एवढे करूनही देवींना Lata Mangeshkar – लतादीदींच्या कंठातलं गाणं आणि काळजातली हिंमत नेता आली नाही. त्यामुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वडिलांचं निधन झाल्यावर लतादीदी आई आणि चार भावंडं यांचं कुटुंब सावरण्यासाठी वयाच्या १३ व्या वर्षी घराबाहेर पडल्या. चरितार्थासाठीच्या कमाईकरिता चित्रपटाच्या- स्वप्नांच्या सौदागरांच्या दुनियेत शिरल्या. त्यासाठी गाठीशी ‘दीनानाथांची मुलगी’ ही ओळख आणि गळ्यातलं गाणं एवढंच होतं. यातली पहिली गोष्ट सांगायची होती आणि दुसरी करून दाखवायची होती. दोन्हीला साजेसं कर्तृत्व गाजवायची जबाबदारी दीदींनी कोवळ्या वयात उचलली होती.

त्यांच्या आई-माई ह्या कवी नव्हत्या. पण लतादीदींचे त्यावेळचे जगणं – वागणं आठवताना त्यांचे शब्दही कविता झाले. त्या लिहितात – बापाचा लळा फार, रडून रडून डोळे सुजले फार बाप तिचा सागर, ती दु:खाने झाली बेजार- ओल्या डोळ्याने बापाला बघितले वरती सागराला आली भरती – १ *सान असताना पडला तिजवर बोजा शत्रू आणि मित्र पाहात होते मजा- लहानगी भावंडं बघुनी तिचे हृदय भरले ओल्या डोळ्यांनी तिने तंबोऱ्यास हाती धरले – २ Lata Mangeshkar – लतादीदींचं गाणं कसं सुरू झालं, त्याचं त्यांच्या आईने काढलेलं हे शब्दचित्र आहे. ओल्या डोळ्यांनी तंबोरा हाती धरणार्‍या लताबाईंनी आपले आणि आपल्या कुटुंबाचे डोळे कधीच कोरडे राहू नयेत, ह्याची काळजी घेणारे गानकौशल्य आयुष्यभर दाखवले. त्यासाठी गाणार्‍या पाखरानं काळजात काटा रुतवून घ्यावा, तसं लतादीदींनी दुःखाला काळजातच कोंडून ठेवलं. दुःख, दैन्य, अपमान, अवहेलना, टवाळी आणि उपेक्षासुद्धा शांतपणे रिचवली- पचवली. त्या सगळ्याचंच त्यांनी गाणं केलं आणि त्यांना नानारूपात पेश करीत रसिकांना नादावलं. आपलं गाणं, लोकाचं केलं. त्यामुळे अरसिकही रसिक झाले. अमानुषांना माणूस होता आले. कृतघ्न कृतज्ञ झाले. आजारी लतादीदींची गाणी ऐकत ठणठणीत बरेही झाले. त्यांचं गाणं प्रेमिकांचे प्रेम बनले. दीनदुबळ्यांचे आधार बनले. शत्रू राष्ट्राशी मैत्री संबंध जोडून देणारे ‘राजदूत’ही बनले. असं सर्वस्पर्शी – सर्वव्यापी गाणं गाणार्‍या Lata Mangeshkar – लतादीदी आपल्याला चालत्या-बोलत्या गात्या पाहायला- अनुभवायला मिळाल्या. त्यांचं सर्वसाक्षी असलेलं ऐश्वर्य समजलं. पण त्याच्या मुळाशी असलेलं प्रचंड दुःख -दैन्य आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी घेतलेली खडतर मेहनत समजली का? की, ती घेण्यास उसंतच मिळाली नाही? किंवा ते समजून घेण्याची आवश्यकताच वाटली नाही? यापैकी काहीही असेल, तर तो करंटेपणा झाला. लता मंगेशकरांना ‘भारतरत्न’ हा देशातला सर्वोच्च पुरस्कार मिळाला. तरीही त्या गात राहिल्या. कारण त्यांनी गायनकलेपेक्षा आपण मोठे आहोत, अशी स्वतःची समजूत करून घेतली नाही. ७०० वर्षांपूर्वी आई-वडील गमावल्याचं दु:ख ताजं असताना, सनातनी वृत्तीच्या नीच धर्मलंडी ब्राह्मणांकडून झालेला अपमान, अवहेलना शांतपणे स्वीकारत ‘अमृतातेही पैजा’ जिंकणारा मुलगा आपल्या महाराष्ट्रभूमीत भावंडांसह ‘संत’ झाला! त्या ‘योगीराज माउली’चीच वाट चालतच Lata Mangeshkar – लता मंगेशकर ‘स्वरमाउली’ झाल्या आहेत. संत ज्ञानेश्वरांनी ‘पसायदान’ लिहिले. त्या शब्दांना Lata Mangeshkar – लतादीदींनी आईच्या ममतेनं सुरांनी सजवले. शब्द-सूर एक झाले. ‘पसायदान’ सर्वभूती- सर्वसुखी करणारे झाले!

ज्ञानेश महाराव

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Postbox India

Leave a Reply

error: Content is protected !!