१९६४ व १९६५ सलग दोन वेळा wrestling महाराष्ट्र केसरीची गदा मिळवणारे पैलवान गणपतराव खेडकर.
हे श्री शाहू विजयी गंगावेश तालमीचे दिग्गज पैलवान
आण्णानी सुरवातीला गवळी वस्तादाच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरवले,
बगता बगता जोड वाढत गेली.
उंची 6″5 वजन 140 असे भारदस्त व शरिरसंपन्नतेचे मालक असलेल्या खेडकर आण्णा यांनी तत्कालीन wrestling कुस्ती क्षेत्रात दबदबा निर्माण केला होता.
हजारो wrestling कुस्तीशौकीनांचे पैलवानाचे खेडकर अण्णा है गळ्यातील ताईत बनले होते.
कोणत्याही मैदानात खेडकर अण्णा आले कि लोकांचा टाळ्यांचा कडकडाट व जल्लोष असायचा.
त्यांची wrestling कुस्ती व आशीर्वाद घ्यायला लोकं तासनतास त्यांच्या मागे रेंगाळत असायचे.
महाराष्ट्राचे पहिले डब्बल महाराष्ट्र केसरी किताबा बरोबरच खेडकर आण्णाच्या नावावर कुस्तीतलं बरंच योगदान आहे..
त्यानी गंगावेश तालीममधे एकसे एक मातब्बर व लढवय्ये पैलवान तयार केले.
रुस्तम-ए-हिंद ,सर्वोत्तम महाराष्ट्र केसरी पैलवान
कै.हरिश्चंद्र बिराजदार मामा .
हिंदकेसरी ,महाराष्ट्र केसरी, महान भारत केसरी पैलवान गुरुवर्य. दिनानाथ सिंह आण्णा.
महाराष्ट्र केसरी पैलवान आप्पासाहेब कदम. महाराष्ट्र केसरी पैलवान संभाजी पाटील आसगावकर.
Also Visit : https://www.postboxlive.com
महाराष्ट्र केसरी पैलवान नामदेव दादा मोळे.
मल्ल सम्राट रावसाहेब आप्पा मगर .
महान मल्ल पैलवान टोप्पाना गोजगे .
जुने पैलवान बाला रफिक शेख .
इत्यादी शेकडो एका पेक्षा एक दर्जेदार पैलवान आण्णानी निर्माण केले..
दिल्लीच्या महाबली पैलवान सतपाल नावाच वादळ आलं होत. या वादळाला कोण थोपविणार ? असा प्रश्न्न प्रत्येक तालमीत विचारला जात होता.
उत्तरेकडून आलेला हा पैलवान अजिंक्य ठरून जाणार काय ? अस वाटत असतानाच हे वादळ रोखलं रस्तुम ए हिंद हरिश्चंद्र मामा बिराजदार यांनी.
त्यांनी सामने थंडर या डावावर महाबळी सतपालला चित केलं . या wrestling कुस्तीसाठी मामांना धडे दिले खेडकर अण्णांनी .
Also Read : https://www.postboxindia.com/marathi-नवी-मुंबई-चे-संग्राम-पाट/
महाबली सतपालला चित केल्यावर या गुरु शिष्याच्या जोडीला अवघ्या महाराष्ट्रान सलाम केला होता .
खेडकर अण्णांचे गावं वाळवा तालुक्यातील नवेखेड.
एका छोटयाश्या खेडयात जन्मलेले आण्णा wrestling कुस्तीच्या वेडासाठी कोल्हापूरला गेले. अखंड साधना करून ते स्वत डबल महाराष्ट्र केसरी झालेच , पण त्यांनी नामांकीत मल्ल घडविले. आयुष्यभर कुस्तीसाठीच जगले अण्णा कुस्ती वाढवली .
आजची पिढी एकाद्या अभिनेत्यावर किंवा क्रिकेटपटूवर जसं प्रेम करतात तसचं प्रेम ज्या पैलवानांना मिळालं त्यापैकीच खेडकर अण्णा होते .
अण्णांच्या निधनानंतर त्यांच्या गावात त्यांचे स्मारक उभा करण्याची घोषणा झाली होती. पण अजूनही त्या घोषणेचे कृतीत रुपांतर झालेले नाही .याची खंत वाटते,
अण्णांना wrestling कुस्ती सुटल्यानंतर खूप हलाखीत राहावे लागले. पण हा स्वाभिमानी पैलवान आयुष्यभर ताठ मानेनच जगला. गरिबीच्या वेदना सहन केल्या पण त्या कोणापुढे व्यक्त केल्या नाहीत .
असा हा महान मल्ल .
या कर्तबगार पैलवानाला मानाचा मुजरा.
धन्यवाद..
पैलवान संग्राम कांबळे