Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

Law & Order

Gunratn Sadavarte गुणरत्नेंकडून विष पेरणी ! – प्रवीण पुरो

1 Mins read

एसटीतील संपकर्‍या कामगारांनी आणि Gunratn Sadavarte आता सार्‍या मर्यादा ओलांडल्या आहेत.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावर हल्ला करून त्यांनी स्वत:चीच बदनामी केली असं नाही तर सार्‍या राज्याला आणि राज्याच्या परंपरेला शरमेने मान खाली घालायला लावली आहे.

असला आगाऊपणा आजवर कोणत्याही संपकर्‍यांनी केल्याचं दिसत नाही. एसटीचा हा संप कसा आणि का भरकटत गेला याचे असंख्य दाखले देता येतील.

शक्य नसलेल्या मागणीसाठी पाच महिन्यानंतरही कर्मचार्‍यांना संपाची आवश्यकता भासत असेल तर अशांना कायमचं घरी बसवणंच योग्य.

सहानुभूती टिकावी म्हणून नेत्याने आणि संपकर्‍यांनी स्वत:ला आवर घातला पाहिजे.

Also Visit : https://www.postboxlive.com

आपल्यातल्या १०० जणांनी आत्महत्या केल्या म्हणून गळे काढणार्‍यांनी त्यांच्या कुटुंबाला कायमचं रस्त्यावर आणून बसवणार्‍या उद्दाम नेत्याला कधी दोष दिला नाही.

ते आता शरद पवार आणि त्यांच्या समर्थकांवर दगडं फेकत आहेत. हे एका दिवसात घडलं असं नाही.

गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत या भाजपच्या म्हेरक्यांनी या संपाला काडी लावली आणि त्यात Gunratn Sadavarte गुणरत्न सदावर्ते यांनी त्यात तेल ओतलं.

आपली मागणी मान्य होऊ शकत नाही, हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ते मुख्यमंत्री असताना जाहीररित्या सांगूनही हे दोन नेते विलिनीकरणाची मागणी कोणत्या आधारे करत होते?

व्यवहाराची साधी जुळवणी न समजणार्‍यांना या दोन नेत्यांनी गाजर दिलं आणि सारी गणितं राजकारणात विसावली.

महामंडळातील कर्मचार्‍यांचं वेतन अल्प होतं हे कोणीही अमान्य करू शकत नाहीत. हे वेतन वाढवून मिळावं, म्हणून त्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला जनतेची सहानुभूतीही होती.

मात्र वेतन वाढीसाठी प्रयत्न करण्याऐवजी या नेत्यांनी आगीला धग दिली आणि कर्मचार्‍यांना रस्त्यावर आणलं. आपल्या मागण्या पदरात पाडण्यासाठी आंदोलनं केली जातात.

पण इतक्या टोकापर्यंत ती पोहोचवली जात नसतात, हे गणित Gunratn Sadavarte सदावर्ते यांना ठावूक नाहीत असं नाही. या निमित्ताने ते राज्यातल्या सरकारला धडा शिकवायचा प्रयत्न करत होते, असंच चित्र होतं.

राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारला नेस्तनाबुत करण्यासाठी भाजपच्या खांद्याला Gunratn Sadavarte सदवर्ते यांनी कायम खांदा दिला. सरकारच्या बदनामीसाठी भाजपने काय केलं नाही?

२०१४ च्या पाच वर्षांच्या सत्तेनंतर या राज्यावर आपलाच मक्ता आहे, असं त्यांना वाटू लागलं. पण सत्ता काही मिळाली नाही. गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश ही राज्य हाती येऊनही देशात समृध्द असलेला महाराष्ट्र आपल्याला मिळत नाही, याची सल या पक्षाच्या नेत्यांना सातत्याने बोचत होती.

यातून एकेका घटकाला चिथावणी देण्याचे उद्योन येनकेन प्रकारेन केले जात होते आहेत. एसटीचा संप याच पठडीत बसणारा होता.

संप करून कर्मचार्‍यांच्या पदरात फायदा मिळवून देणं, हा भाजप नेत्यांचा आणि खुद्द सदावर्ते यांचा प्रामाणित हेतू असता तर संप केव्हाच मिटला असता. पण या संपाआडून त्यांना राजकारण करायचं होतं.

संपकर्‍यांच्या व्यासपीठावरून ओकली जाणारी आग ही संपाला हत्यार करण्याच्या दिशेची होती. आधी पडळकरांसारखा उद्दाम नेता बरळला. नंतर खोतांनी राज्यातल्या सत्ताधार्‍यांची लाज काढली.

याच सभांमध्ये नारायण राणे पुत्र नितेश यांनी मुख्यमंत्र्यांच्या दुखण्याचंही राजकारण केलं. Gunratn Sadavarte गुणरत्न सदावर्ते तर नेता कसा नसावा, याचं उत्तम उदाहरण होय. या सदावर्ते यांनी याच व्यासपीठावरून विषाची पेरणी केली.

राज्याचा मुख्यमंत्री कोणीही असो त्याचा मान राखणं हे राज्यातील प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्यच होतं. मात्र स्वत:ला मोठा विधिज्ज्ञ समजणार्‍या गुणरत्ने यांना हे कधीच कळलं नाही.

उध्दव यांचा ते कायम एकेरी उल्लेख करत आले. परिवहन मंत्री अनील परब यांच्याविषयीची शाब्दिक लाखोली तर पराकोटीची होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जागा Gunratn Sadavarte गुणरत्ने यांच्या लेखी त्यांच्या पासंगालाही नसावी.

शरद पवार यांना तर त्यांनी कायमच पाण्यात पाहिलं. हे लक्षात घेता पवार यांच्या घरावर झालेला हल्ला हा याच विष पेरणीचा भाग होऊ शकतो, हे उघड सत्य आहे.

हे नेते आपल्याला राबवतात आणि आपल्याआड राजकारण करतात इतकंही अकलन संपकर्‍या एसटीच्या कर्मचार्‍यांना राहिलं नाही. विलिनीकरण होऊ शकत नाही,

याची जाणीव होऊनही कर्मचारी संपापासून दूर जात नाहीत, असं लक्षात आल्यावर किमान न्यायालयाच्या निर्णयाचा आब राखला जाईल, अशी सार्‍यांची अपेक्षा होती.

कारण याच न्यायालयाच्या आड Gunratn Sadavarte गुणरत्ने यांनी आजवरचे इमले निर्माण केले होते. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाची लागलेली वासलात ही न्यायालयाआडून केलेली कृती गुणरत्ने यांच्या पथ्यावर पडली होती.

यामुळे ते किमान न्यायालयाच्या निर्णयांचा आब राखतील असं वाटणं स्वाभाविक होतं. मात्र त्याऐवजी त्यांनी न्यायालयालाही गृहित धरण्याचं पाप केलं.

उच्च न्यायालयाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या अहवालाची वाट पहावी, असंही Gunratn Sadavarte गुणरत्ने यांना वाटलं नाही.

पाच महिन्यानंतर न्यायालयाने विलिनीकरण करण्याचा विषय दूर ठेवत कर्मचार्‍यांना इतर फायदे देण्याचा आदेश काढला. ज्या मागण्या याआधीच सरकारने मान्य केल्या होत्या.

मग आता त्याहून अधिक काय मिळालं? जे वचन गुरुवारी न्यायालयाकडून मिळालं तेच समिती नेमण्यावेळी मिळालं होतं. मग पाच महिन्यांच्या संपाचं फलित काय? उधळलेल्या गुलालात काय होतं?

कर्मचार्‍यांना मुर्ख बनवण्याचा हा मार्ग होता, हे लक्षात घेतलं पाहिजे.

पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी कर्मचार्‍यांनी अचानक येणं आणि चप्पल आणि दगडफेक करणं ही अजिबात अपेक्षित नसलेली घटना घडत असताना भाजपचे नेते त्याचंही राजकारण करत राहिले.

काय प्रतिक्रिया देत होते भाजपचे नेते? स्वत:ला मजूर बनवून मुंबई बँकेची फसवणूक करणारे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया केवळ आगलावी होती.

पाच महिने सरकारने एसटी कर्मचार्‍यांची कबर खोदली, असं म्हणणार्‍या दरेकर यांनी विलिनीकरण हा एकच पर्याय होता तर फडणवीसांना का समजवलं नाही?

दुसरं म्हणजे जेव्हा आपल्याच पडळकर आणि खोत यांना आझाद मैदानातून कर्मचार्‍यांनी चालतं केलं तेव्हा दरेकरांना विलिनिकरणाचं महात्म्य कळलं नाही?

भाजपचे दुसरे माथेफिरू माजी मंत्री अनील बोंडे यांचं वक्तव्य आगीत पेट्रोल टाकण्यासारखं होतं. करावं तसं भरावं, असं सांगणार्‍या बोंडेंना स्थानिक न्यायालयाने तीन महिन्यांचा कारावास सुनावला आहे.

त्यांच्यावरील हा गुन्हा राजकीय स्वरुपाचा असू शकतो. अशावेळी करावं तसं भरावं, असं त्यांना कोणी म्हटलं तर? उचलली जीभ लावली टाळ्याला असा हा प्रकार.

या सार्‍या प्रकारात सरकारने संपाप्रति दाखवलेली उदासीनता आणि न्यायालयाने कामगारांप्रति दाखवलेला प्रेमाचा अतिरेक संपकर्‍यांच्या अतिरेकी कृतीला पोषक ठरला.

आझाद मैदानात सुरू असलेल्या संपावेळी सुरुवातीला भाजपचे नेते काहीबाही बोलत होते. त्यांनी कामगारांना दिलेल्या चिथावणीनंतरही या नेत्यांवर काहीच कारवाई झाली नाही.

यामुळे बोट चेपलेेल्या Gunratn Sadavarte गुणवंत सदावर्ते यांच्या जिभेला हाड राहिलं नाही. ते हवं तसं बडबडत गेले. समोरच्या कामगारांना तेच हवं होतं. ते टाळ्या पिटायचे आणि सदावर्ते सुटल्यासारखं बोलायचे.

यात वाहिन्यांचा अतिरेक होताच. असं वक्तव्यं Gunratn Sadavarte सदावर्ते यांनी द्यावं, अशीच जणू बाईट त्यांना हवी असायची. देशभर असा तमाशा जाऊनही पोलिसांनी आणि त्यांच्या गृहमंत्र्यांनी बघ्याची भूमिका घेतली.

वकील असलं तरी कायद्यापुढे सारे समान असतात हे सनातनच्या राजू पुनाळेकर यांच्या अटकेवरून सदवर्ते यांनी समजून घ्यायला हवं होतं.

पण भाजपकडून राजकीय बळ मिळत असल्याचा गैरफायदा त्यांनी घेतला आणि ते बोलत सुटले. जी जी वक्तव्यं सदावर्ते कामगारांपुढे करत तीच वक्तव्यं पवारांच्या घरावर चाल करून गेलेल्या कामगारांच्या तोंडी होती.

Gunratn Sadavarte सदावर्ते हे कामगारांना चिथावणी देत आहेत, हे लक्षात घेऊनही आझाद मैदान पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केलं. वेळीच मुसक्या आवळल्या असत्या तर सदावर्ते सुतासारखे सरळ झाले असते.

आझाद मैदानात होणार्‍या आंदोलनांवर पोलिसांची विशेष नजर असते. आंदोलक मंत्रालयापर्यंत जाऊ नयेत, यासाठी मैदानात सिव्हिलियन पोलिसांचा विशेष राबता असतो.

एसटीच्या कर्मचार्‍यांना न्यायालयाच्या निर्णयानंतरही चार्ज केलं जात असल्याचं दिसत असूनही पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली.

न्यायालयाच्या निर्णयानंतरच्या गुलाल उधळणीत Gunratn Sadavarte सदावर्ते यांनी १२ तारखेला बारामतीत पवारांची पोलखोल करायला जायची भाषा करत होते. तरीही पोलीस बघत राहिले.

इतका उदारपणा पोलीस सामन्यांसाठी कधी दाखवत नाहीत. मग सदवर्तेंसाठी इतका मानमरातब का? सरकार आणि सरकारचे परिवहन मंत्री अनील परब केवळ इशारा देत राहिले.

त्यांनी मुंबईतल्या बेेस्टचा संप डोळ्यासमोर आणला असता तर संप इतका ताणला गेला नसता. बेस्टच्या संपात मुंबईत एसटी बसेस उतरवल्या गेल्या होत्या.

एसटीच्या संपात खाजगी वाहने ताब्यात घेऊन प्रवाशांची अडचण दूर केली असती तरी संपाची धार बोथट झाली असती.

उच्च न्यायालयानेही या कामगारांप्रति कमालीची सहानुभूती दाखवली. खरं तर त्रिसदस्यीय समितीचा अहवाल येताच सदावर्ते आणि संपकर्‍यांना न्यायालयाने सबुरीचा आणि कठोर पावलं उचलण्याचा इशारा दिला असता तर तेव्हाच सारं संपलं असतं.

त्याऐवजी सिंह की कोकरूच्या व्याख्येत न्यायालय अडकलं आणि होत्याचं नव्हतं झालं. हाच कोकरू जेव्हा लांडग्याच्या भूमिकेत उतरतो तेव्हा अशा हल्ल्याच्या घटना घडतात, हे न्यायालयाला कळलं तर खूचप चांगलं होईल.

या राज्यात असंख्य संप झाले. इतिहासात नोंदवल्या गेलेल्या गिरणी संपाने तर सारे रेकॉर्ड मोडले.

पण तेव्हाही असं झालं नाही. ज्यांनी हे केलं आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासला त्या सर्वांना कडक शासन झालं तरच असे प्रकार टळतील, हे आता साऱ्यांनी लक्षात घ्यावं.

Leave a Reply

error: Content is protected !!