Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRA

pune city – संत उल्हासदादा पवार !

1 Mins read

pune city – संत उल्हासदादा पवार !

समीरण वाळवेकर

 

 

pune city – उल्हासदादा पवार यांचा आज 77 वा वाढदिवस. एक अत्यंत सुसंस्कृत, प्रगल्भ, अनुभवी, अजातशत्रू, राजकारणी म्हणून तर ते अवघ्या महाराष्ट्राला सुपरिचित आहेतच,

पण त्या पलिकडे जाऊन संत साहित्याचे अभ्यासक, उत्तम निरुपणकार आणि अध्यात्म, आणि भक्ती संप्रदायाचे निष्ठावान वारकरी म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत.

दादा काँग्रेसचे मागील सहा दशकं निष्ठावान कार्यकर्ते आणि नेते. स्वातंत्र्यसैनिक असलेल्या मामांमुळे घरात मोठया काँग्रेस नेत्यांचा राबता.

त्यामुळेच लहानपणापासून काँग्रेस विचारांचा मनावर पगडा. अनेक प्रसंगात वेळ येऊनहि कधीच त्यांनी पक्ष बदलला नाही. आपल्या विचारांवर अढळ श्रद्धा आणि अचल निष्ठा.

pune city उल्हासदादांच्या बोलण्यात विलक्षण साधेपणा, नम्रता, आणि मृदुता. कधी चुकूनही आवाज चढणार नाही, संताप नाही, कुणाविषयी अवाक्षर वाईट बोलणं नाही.

कसली खंत नाही की खेद नाही. विरक्ती आणि विरागी वृत्तीची सारी लक्षणं एकवटलेली.

इंदिरा गांधी, संजय गांधी, यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, यांच्याशी थेट संपर्क. pune city – युवक काँग्रेस अध्यक्ष पदा पासून

प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष पदापर्यंत सर्व पदं भूषविली. काॅन्ग्रेसच्या बड्या नेत्यांच्या अनेक सभा त्यांनी घडवल्या, भरवल्या, आयोजित केल्या.

अनेकदा pune city उल्हासदादांचा पक्षाकडून विचार होऊनहि, शेवटच्या क्षणी त्यांची मंत्रीपदं कशी आणि का हुकली, याच्या सुरस आणि चमत्कारिक कहाण्या,

जवळच्या सगळ्यांनी pune city पुण्याच्या मंडईच्या मध्यवर्ती रिंगणात रमेश खन्नांची भजी खात अनेक वर्षं ऐकलेल्या!

अंतर्यामी कितीहि विवंचना, दुःखं, शल्य असली तरी दादांच्या मेंदी भरल्या दाढी असलेल्या चेहऱ्यावर कायम हसू असतं. ओठावर विठूनाम,

आणि तोंडी बाळासाहेब भारदेंची शिकवण, त्यांच्या अनुभवाची शिदोरी, आणि विधानसभा, विधान परिषदेचे अफाट किस्से असतात.

खरं तर pune city – उल्हासदादा आजकालच्या राजकारणात एकदम मिसफिट माणुस. कोणत्याहि थराला जाण्याचं,

कोणतीही किंमत मोजून तिकिट मिळवण्याचं आजचं राजकारण त्यांना पचलं नाही, आवडलं नाही आणि जमलंहि नाही.

सरळ मार्गानं जेवढं जमलं तेवढं केलं, मिळालं ते निष्ठेनं पार पाडलं. विलासराव देशमुखांची आणि त्यांची खास दोस्ती.

युवक काँग्रेस च्या काळापासूनची. सावली सारखे दादा विलासरावांच्या कायम सोबत राहिले.

दादा तीनदा विधान परिषद आमदार होऊनहि,आणि विलासराव मुख्यमंत्रीपदी असूनहि,

त्यांच्या मनात असूनहि उल्हासदादांना ते महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्रीपद काही देऊ शकले नाहीत.

मग मंत्रीपदाचा दर्जा असलेलं पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे, आणि उर्वरित महाराष्ट्र विकास महामंडळाचं अध्यक्ष पद मात्र त्यांनी काही वर्ष भूषवलं.

पण त्या काळातही दादांनी सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक महत्वाचे निर्णय विलासरावांना आग्रहानं घ्यायला लावले.

वयोवृद्ध कलावंतांना, विशेषतः लोककलाकारांना शासन दरबारी मान सन्मान, मदत मिळवून दिली.

pune city – पुण्याचं लोकसभेतलं प्रतिनिधीत्व उल्हास दादांसारख्या प्रगल्भ, अनुभवी,सुसंस्कृत नेत्यानं करावं अशी अनेक pune city पुणेकरांची,

अनेक काँग्रेस जनांची इच्छा असूनहि, “हायकमांड”ला मात्र त्यांच्यात इलेक्टोरल मेरिट दिसलं नाही.

निवडणूकीत आजच्या काळात ओतावा लागणारा पैसाही दादांकडे नव्हता, आणि धनदांडग्या उमेदवारांशी त्यांना स्पर्धाहि करायची नव्हती.

आपलं सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, अध्यात्मिक आयुष्य ते आपल्याच गतीनं समाधानानं जगत राहिले.

त्यांचं अफाट जनसंपर्काचं, आणि शुभचिंतकांच्या संग्रहाचं मेरिट मात्र भल्याभल्यांना हिरावून घेता आलं नाही, किंवा त्यांची बरोबरीहि कोणाला करता आली नाही.

साहित्य, संगीत, नाट्य, चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांशी त्यांचे वैयक्तिक संबंध जिव्हाळ्याचे राहिले, याचं कारण कलेविषयी,

साहित्या विषयी,आणि अध्यात्मा विषयीचं असलेलं त्यांचं ज्ञान आणि जाण.

काहिसा आळशी स्वभाव, स्वतःसाठी काहीच न मागण्याची विरागी वृत्ती, आणि राजकारणात लागणारया आक्रमकतेचा

अभाव उल्हासदादांना आघाडीवर नेण्यातले अडथळे ठरले. पण त्यांना त्याची ना खंत ना खेद!

संत प्रवृत्तीची अशी मंडळी स्वार्थाच्या निर्दयी राजकारणात बाजूला पडतात . पण pune city – उल्हासदादां सारख्या स्फटिकाप्रमाणे निर्मळ पारदर्शी नेत्यांचं असणं,

समाजासाठी दिशादर्शक आणि आश्वासक असतं. त्यांची उपस्थिती एखाद्या कार्यक्रमास, चळवळीस आणि समाजासच नवचैतन्य, शुचिता आणि अधिष्ठान देते!

तर अशा या संत प्रवृत्तीच्या उल्हासदादा पवारांच्या आजच्या वाढदिवशी, त्यांना दीर्घायुरारोग्य लाभो,अशीच शुभेच्छा !

 

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Postbox India

Leave a Reply

error: Content is protected !!