Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSHISTORYINDIAMAHARASHTRA

Mumbai – मुंबई आमच्याच बापाची आहे.

1 Mins read

Mumbai – मुंबई आमच्याच बापाची आहे

प्रतिमा जोशी-कदम 

 

 

होय, Mumbai – मुंबई आम्ही ६० कोटी ६६ लाख रुपयात विकत घेतलीय – प्रतिमा जोशी-कदम.

Mumbai – मुंबई नगरी ही पहिल्यापासूनच बहुभाषी असली आणि तिच्या उभारणीत नि जडणघडणीत मराठ्यांसह सर्व प्रांतीयांचा वाटा असला,

तरी तिचे अव्वल भौगोलिक स्थान आणि प्राचीनत्व हे निखळ मराठी आणि मराठीच आहे.

महाराष्ट्राला गुजरातशी सयामी जुळ्यासारखे जोडून द्वैभाषिक राज्य चालवण्याचा केंद्राचा हेका महाराष्ट्रीयांनी मोडून काढला.

Mumbai – मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण केला. आणि गेली पन्नास वर्षे ‘मुंबई कोणाची?

‘ हा प्रश्न सतत ऐरणीवर येत राहिला.

Mumbai – मुंबई फक्त मराठ्यांचीच नव्हे तर सगळ्यांची, इथपासून ते ‘मुंबई तुमची,

भांडी घासा आमची’ म्हणण्यापर्यंत कटुता ताणली जात असते.

Mumbai – मुंबई हे दक्षिण आशियाचे इकॉनॉमिक हब होण्यापर्यंतची घोडदौड ही परप्रांतीयांच्या भांडवलामुळे झाली असे उदाहरणांसकट मांडले जाते.

पैसा, भांडवल हे शब्द नुसते ऐकले तरी मराठी माणसाला विनाकारण हुडहुडी भरते.

किंबहुना पैसा आणि मराठी हे दोन विरुध्दार्थी शब्द असल्यागत आपली वाटचाल असते.

त्यामुळे भांडवलवाल्या अमराठी माणसांसमोर मराठी माणसे कायम न्यूनगंड घेऊन वावरत असतात.

रस्त्यावरच्या राड्यांमागेही हाच न्यूनगंड असतो. पण याच महाराष्ट्राने Mumbai – मुंबईसह स्वतंत्र राज्य म्हणून

जन्माला येण्यापोटी गुजरातला चक्क कोट्यवधी रुपये मोजले आहेत, हे फारच कमीजणांच्या गावी असेल.

महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन स्वतंत्र राज्ये अस्तित्वात येणार ही काळ्या दगडावरची रेघ ठरल्यानंतर

राज्यघटनेच्या ७ व्या व ८ व्या परिशिष्टात …आवश्यक सुधारणा करण्यात आल्या. कलम ४२(२), ४८(१) आणि ५१(५) अनुसार

गुजरात राज्याची राजधानी विकसित करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या राज्याच्या कॅश बॅलन्स इन्व्हेस्टमेंट

अकाऊंटमधून १० कोटी रुपये इतकी रक्कम देण्यात यावी असे प्रस्तावित करण्यात आले.

त्यानंतर – 

गुजरात राज्याची वार्षिक तूट भरून काढण्यासाठी १९६० साली ६.०२ कोटी रुपयांपासून सुरुवात करून १९६९-७० पर्यंत १.१४ कोटी अशा क्रमाने रकमा द्याव्या असे ठरले,

याखेरीज १९६२-६३ पासून १९६९-७० पर्यंत ८ आथिर्क वर्षांत गुजरातला २८.३९ कोटी रुपये लाभ व्हावा असाही निर्णय झाला.

बॉम्बे रिऑर्गनायझेशन अॅक्ट १९६० च्या कलम ५२खाली महाराष्ट्राने गुजरातला

१९६२-६३ साली ६१२ लाख,

६३-६४ साली ५८५ लाख,

६४-६५ साली ५०१ लाख,

६५-६६ साली ५२६ लाख,

६६-६७ साली ४३३ लाख,

६७-६८ साली ३४० लाख,

१९६८-६९ साली २०९ लाख असे ३२ कोटी ६६ लाख रुपये दिले.

यात नव्या तरतुदीनुसार दिलेले ३८ कोटी धरून एकूण ६० कोटी ६६ लाख रुपये महाराष्ट्राने गुजरातला दिल्याची नोंद ‘द गॅझेट ऑफ इंडिया एक्स्ट्रा ऑडिर्नरी’ मध्ये आहे.
याचा अर्थ, Mumbai – मुंबईवरील ताबा राखण्यासाठी महाराष्ट्राला ६० कोटींची किंमत चुकवावी लागली आहे. होय, एका परीने मुंबई आपण विकत घेतलीय.
भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी झालेल्या फाळणीत पाकिस्तानला ५५ कोटी रुपये द्यावे लागले. त्यावरून आजही एक वर्ग सतत विखारलेला असतो.

इथे तर स्वतंत्र भारतातीलच एका राज्याने दुसऱ्याला ही किंमत मोजली आहे.
या Mumbai – मुंबईत कामगार, चाकरमानी, कारकून, कष्टकरी,आणि निर्धन बुद्धिवादी इतकीच ओळख, असलेल्या मराठी माणसाला कोणताच न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही.
मुंबईसह महाराष्ट्र अस्तित्वात आणण्यासाठी १०६ हुतात्म्यांचे रक्त तर आपण सांडले आहेच. पण ६० कोटी ६६ लाख रुपयेही मोजले आहेत.

हि महत्वाची माहिती जास्तीतजास्त पसरून आमची मुंबई म्हणणाऱ्यांचे तोंड बंद करा.
Mumbai – मुंबई आमची म्हणणाऱ्या गुजराती लोकांनी हा लेख वाचावा. कारण हा लेख मुंबई बाबत महाराष्ट्र आणि गुजरात मधल्या व्यवहाराचा आहे,
पाकिस्तान देश नवीन वसवताना ५५ कोटी दिले ते अखंड भारताने दिले होते येथे गुजरात राज्य उभारणी साठी महाराष्ट्र राज्यातील सरकारने ६० कोटी दिले होते हे विसरून गेले.

जय महाराष्ट्र

 

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Postbox India

Leave a Reply

×
BLOGSINDIAMAHARASHTRA

वा.रा.कांत - बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात

error: Content is protected !!