Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

INDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

Navratri 2022 – महाराणी येसूबाई राणीसाहेब

1 Mins read

Navratri 2022 – महाराणी येसूबाई राणीसाहेब

 

Navratri 2022 –  महादुर्गा महाराणी येसूबाई राणीसाहेब

 

 

 

9/10/2021,

आजच्या तिसर्या महादुर्गा महाराणी येसूबाई राणीसाहेब.
तिसरी माळ महाराणी येसूबाई राणीसाहेब यांच्या चरणी अर्पण
महाराणी येसूबाई साहेब, ह्या शिवरायांच्या जेष्ठ सूनबाई तर छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी आणि छत्रपती शाहू महाराजांच्या राजमाता होत्या.
कोकणातल्या शृंगारपूरच्या पिलाजीराव राघोजीराव शिर्के यांच्या घराण्यात जन्मलेल्या जिऊबाई म्हणजेच महाराणी येसूबाईसाहेब .
सन.१६६५ च्या दरम्यान त्यांचा विवाह शिवपुत्र संभाजी राजांशी संपन्न झाला. विवाहाच्या वेळी त्यांचे वय जेमतेम ६-७ वर्ष होते.

Navratri 2022 - Color - white

Navratri 2022 – Color – white

त्यामुळे त्यांची जडण-घडण छत्रपती संभाजी राजांसमवेत जिजाऊ माँसाहेब यांच्या देखरेखीखाली झाली. त्याचा एकंदरीतच परिणाम त्यांच्या जीवनावर झालेला दिसून येेतो.
सन १६७४ ला शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे पाहिले छत्रपती बनले. छत्रपती संभाजीराजे युवराज व येसूबाई साहेब युवराज्ञी बनल्या.
. महाराणी येसूबाई रणरागिणी नसल्या तरी त्या धैर्यशील, कर्त्यव्यदक्ष, कणखर वृतीच्या होत्या. सन १६८० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणा नंतर संभाजीराजे छत्रपती पदावर आरूढ झाले आणि येसूबाई हिंदवी स्वराज्याच्या महाराणी बनल्या .

Navratri 2022 - Color - Red

Navratri 2022 – Color – Red

या काळात स्वराज्या वर चहुबाजुनी संकटे घोंगवू लागली, खासा शहेनशहा औरंगजेब पाच लाख सैन्य घेऊन दक्षिणेत उतरला, आशा वेळी हाती समशेर घेऊन छत्रपती संभाजीराजे सतत ९ वर्षे पराक्रमाचे उग्र रूप घेऊन रणतांडव करीत झुंज देत होते .ज्या शिवरायांच्या अनुपस्थितीत स्वराज्याचा कारभार माँसाहेब सांभाळत तसा छत्रपती संभाजी राजांच्या अनुपस्थितीत सर्व कारभार महाराणी येसूबाई राणीसाहेब सांभाळत असत.

Navratri 2022 - Color - Blue

Navratri 2022 – Color – Blue

त्याकरता त्यांच्या नावाचा शिक्काही ’स्त्री सखी राज्ञी जयती’ “असा छत्रपती संभाजी महाराजांनी करवून दिला होता. छत्रपती संभाजीराजे यांच्या सारख्या निखार्‍याला पदरात बांधून त्यांच्यावर मायेचे पांघरून घालणार्‍या त्या पतिव्रता होत्या. पायाला तुफान बांधून अवघ्या महाराष्ट्र व दक्षिणेत गरुड भरारी मारणार्‍या छत्रपती संभाजी महाराजांच्या माघारी रायगडावरून स्वराज्याचा कारभार चालवणार्‍या त्या कुशल राजनेत्या होत्या.

Navratri 2022 - Color - Yellow

Navratri 2022 – Color – Yellow

गडावर येणारे वाद आणि तंटे त्या स्वत: सदरेवर बसून कुशल रीतीने हाताळत. पुढे इ.स.१६८९ मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा कट कारस्थान करून औरंगजेबाने त्यांचा घात केला, आणि तुळापूर येथे त्यांना हाल हाल करून ठार केले. हिंदवी स्वराज्याचा दुसरा छत्रपती हरपल्या नंतर निर्माण झालेल्या परिस्थितीला आपले वैयक्तिक दुःख बाजुला सारून येसूबाई राणीसाहेबांनी मोठ्या निर्धाराने तोंड दिले व महत्वाचे निर्णय घेतले.

Navratri 2022 - Color - Green

Navratri 2022 – Color – Green

शहेनशहा औरंगजेब पाच लाख सैन्य घेऊन दक्षिणेत उतरला, आशा वेळी हाती समशेर घेऊन छत्रपती संभाजीराजे सतत ९ वर्षे पराक्रमाचे उग्र रूप घेऊन रणतांडव करीत झुंज देत होते .ज्या शिवरायांच्या अनुपस्थितीत स्वराज्याचा कारभार माँसाहेब सांभाळत तसा छत्रपती संभाजी राजांच्या अनुपस्थितीत सर्व कारभार महाराणी येसूबाई राणीसाहेब सांभाळत असत.
छत्रपती राजाराम महाराज व छत्रपती संभाजी पुत्र शाहू हे स्वराज्याचे दोन्ही वारस एकत्र शत्रुच्या हाती सापडू नयेत म्हणून येसूबाई राणीसाहेबांनी स्वतःच्या मुलाला म्हणजे शाहुला आपल्या जवळ ठेवून छत्रपती राजाराम महाराजांना रायगड सोडून जाण्यास भाग पाडले. बाहेरून रायगडला मदत करा, प्रसंगी जिंजीकडे जा,असे त्यांनी सुचवले ,येसूबाईं राणीसाहेब यांनी अत्यंत संयमाने आणि दुरदर्शीपणे घेतलेल्या या निर्णयामुळे मराठ्यांचा इतिहास त्यांच्याबद्दल कृतज्ञ आहे .

Navratri 2022 - Color - Grey

Navratri 2022 – Color – Grey

पण शेवटी राजमाता येसूबाई साहेब व स्वराज्याचे तिसरे छत्रपती मोगलांच्या जाळ्यात सापडल्याने हिंदुराष्ट्र संकटात आले. आयुष्यातील उमेदीची २९ वर्षे त्यांनी मोगल कैदेत घालवली. त्यांत अनेक अडचणी आल्या. त्या त्यांनी मोठ्या धैर्याने सोडविल्या. औरंगजेबाने युवराजांचे धर्मांतर करून त्यांना मुस्लिम बनवण्याचा प्रयत्न येसूबाईंनी राणीसाहेब यांनी सर्वशक्ती पणाला लावून हाणून पाडला .त्यांच्या आत्मबलिदानाला तोड़ नाही. सतत २९ वर्षे मोघलांच्या कैदेत राहून औरंगजेबाचे नीच इरादे उधळून लावत आपला मान,सन्मान,अभिमान आणि स्वाभिमान कायम त्यांनी जपला.

Navratri 2022 - Color - saffron

Navratri 2022 – Color – saffron

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर स्वराज्यात भांडणे लावण्याच्या हेतूने त्यांच्या वारसांनी युवराज शाहूची मुक्तता केली. शाहूंनी सातारा येथे राजधानी स्थापन करून छत्रपती पद धारण केले, परंतु मातोश्रींचा कारावास त्यांना बेचैन करत होता. त्या वेळचे स्वराज्याचे सेनापती खंडेराव दाभाडे आणि बाळाजी विश्वनाथ यांनी मोगल सरदार हुसेनअली आणि हसन अली या सय्यद बंधूंची मदत घेऊन मराठे सैन्य दिल्लीत दाखल झाले. औरंगजेबाचा नातू म्हणून एका तरुणाला पुढे करायला लावले, त्यामुळे दिल्लीचा बादशाह फरखं सिअर घाबरला, परंतु तो मागण्या मान्य करत नव्हता म्हणून त्याला तख्तावरून खाली काढले व राफीहुद्रातजत याला बादशहा बनवून मराठ्यांनी आपल्या सगळ्या मागण्या मान्य करून घेतल्या आणि राजमाता येसुबाई राणीसाहेब यांची सुटका करवून घेतली.

Navratri 2022 - Color - Peacock

Navratri 2022 – Color – Peacock

४ जुलै १७१९ ला राजमाता येसूबाई २९ वर्षें मोगलाच्या कैदेत राहून दिल्लीहून दक्षिणेत परत आल्या
व नंतर सातारा येथे त्यांचे निधन झाले .

Navratri 2022 - Color - Pink

Navratri 2022 – Color – Pink

जेष्ठ महादुर्गा म्हणून तिसरा मान महाराणी येसूबाई राणीसाहेब यांच्या कडे जातो.

Also Visit: https://www.postboxlive.com

लेखन

डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

# जागर – मराठेशाहीचा – जागर – स्त्रीशक्तीचा

 

 

Also Visit: https://www.postboxindia.com

Also Visit: https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral:

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel:

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform, which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services into Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website: https://www.postboxindia.com

Website: https://www.postboxlive.com

Facebook: https://www.facebook.com/indiapostbox

Instagram: http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn: https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler: https://postboxindia.tumblr.com/

Twitter: https://twitter.com/IndiaPostbox

Telegram: t.me/postboxindia

Postbox India

Leave a Reply

×
BLOGS

maharashtrian woman - सासुरवासापेक्षा भयानक असू शकतो माहेरवास

error: Content is protected !!