वा.रा. कांत – बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात——- असे सर्वांच्या ओठी असलेले गीत लिहिणारे
कै. वा. रा. कांत तथा वामन रामराव कांत यांचाआज जन्मदिन (जन्म- ६ ऑक्टोबर १९१३८ निधन सप्टेंबर १९९१)
त्यांचा जन्म नांदेड येथे ६ ऑक्टोबर १९१३ रोजी झाला. वा.रा. कांत हे या नावाने लेखन करत. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नांदेड येथे झाले. इंटरपर्यंतचे शिक्षण १९३१ साली हैदराबाद येथे झाले. त्यानंतर शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यांचा विवाह सौ. लक्ष्मीबाई – पूर्वाश्रमीच्या गंगूबाई कुर्डूकर यांच्याशी १९३० मध्ये झाला.
त्यांची कारकीर्द
विहंगमाला’ या नियतकालिकाचे संपादक (१९२८) तसेच विहंग प्रेसचे व्यवस्थापन.
निजाम सरकारच्या शेतकी खात्यात लिपिक म्हणून नोकरी (१९३३-१९४५)
निजाम सरकारच्याच आकाशवाणी हैदराबाद व औरंगाबाद केंद्रांत मराठी विभागप्रमुख म्हणून काम पाहिले (१९४५- १९६०)
भारतीय आकाशवाणीच्या विविध केंद्रांवर मराठी विभागप्रमुख म्हणून काम पाहिले (१९६०-१९७०)
आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सेवानिवृत्त (१९७०)
त्यांची गाजलेली गीते
आज राणी पूर्विची ती ——–खळेना घडीभर ही बरसात———- त्या तरुतळी विसरले गीत —–बगळ्यांची माळ फुले —– राहिले ओठांतल्या ओठांत —–सखी शेजारिणी
त्यांचे काव्यसंग्रह
‘दोनुली’—-’पहाटतारा’—–’बगळ्यांची माळ’—-‘मरणगंध’ (नाट्यकाव्य)—–‘मावळते शब्द’—-‘रुद्रवीणा’—–‘वाजली विजेची टाळी’—-‘वेलांटी’—-’शततारका’ (१९५०)—-’सहज लिहिता लिहिता’
आज राणी, पूर्विची ती प्रीत तू मागू नको
कालचे वेड्या फुलांचे रंग तू मागू नको
सांजता चाफ्याकळीचे चुटपुटीचे भेटणे
पानजाळीतून झिरपे बावरेसे चांदणे
त्या क्षणांचे, चांदण्यांचे स्पर्श तू मागू नको
पाकळ्यांचे शब्द होती तू हळू निःश्वासता
वाजती गात्री सतारी नेत्रपाती झाकता
त्या फुलांचे, त्या स्वरांचे, गीत तू मागू नको
रोखुनी पलकांत पाणी घाव सारे साहिले
अन् सुखाच्या आसवांचे मीठ डोळा साचले
या घडीला मोतियाचा घास तू मागू नको
काय बोलू श्वासभारे चांदणे डहुळेल का?
उमलण्याचे सुख फिरुनी या फुला सोसेल का?
नीत् नवी मरणे मराया जन्म तू मागू नको”
MADHAV VIDWANS
Discover more from Postbox India
Subscribe to get the latest posts sent to your email.