Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIALaw & OrderMAHARASHTRAReal Estate

Deemed Conveyance – डीम्ड कन्व्हेयन्स

1 Mins read
  • deemed conveyance - डीम्ड कन्व्हेयन्स

Deemed Conveyance – डीम्ड कन्व्हेयन्सचे महत्त्व काय असते ?

माहिती करून घ्या. 

 

 

 

30/10/2021,

deemed conveyance – डीम्ड कन्व्हेयन्सचे महत्त्व

सामान्य माणसाने बिल्डरकडून फ्लॅट खरेदी केल्यानंतर; फ्लॅटचा ताबा मिळाला म्हणजे सर्व झाले असे वाटते. पण सदर फ्लॅट असलेली इमारत म्हणजेच अपार्टमेंट अथवा हाऊसिंग सोसायटी यांचा मालकी हक्‍क प्रॉपर्टी कार्डावर हस्तांतरित झाला आहे किंवा नाही याबाबत बऱ्याच वेळी अज्ञान असते. याबाबत काय तरतुदी व कायदेशीर बाबी असतात आणि त्याचे महत्त्व काय? याबाबत थोडक्‍यात माहिती.


कायदेशीर बाबींचे अज्ञान व बिल्डर लोकांच्या तांत्रिक अडचणी यामुळे पुणे शहरामध्ये बऱ्याच सोसायटी अथवा अपार्टमेंट यांचे कन्व्हेयन्स (Deemed Conveyance) (खरेदीखत) अद्याप झालेले नाही. त्यामुळे फ्लॅटधारकांना याबाबत कायदेशीर कार्यवाहीला सामोरे जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने नवीन अभिहस्तांतर (Deemed Conveyance) विधेयक एप्रिल २००७ मध्ये मंजूर केले. याचे कायद्यात रूपांतर झाले आहे. यामध्ये मूळ मोफा कायदा १९६३ च्या कलम २, ५, १०, ११ व १३ मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे.

वर्ष २००७ मध्ये मंजूर झालेल्या विधेयकाच्या कार्यवाहीसाठी नियम तयार करण्यात आले असून शासनाने त्यास मान्यता दिली आहे. २७ सप्टेंबर २०१० या दिवशी याविषयी अधिसूचना जारी केली आहे. या (MOFA) कायद्यातील तरतुदीप्रमाणे ‘दुरुस्त कलम ११ अ’ अनुसार विहित मुदतीत म्हणजे सहकारी गृहसंस्थेच्या स्थापनेपासून व नोंदणीपासून चार महिन्यांच्या आत विकसकाने गृहसंस्थेच्या नावे अभिहस्तांतर करून न दिल्यास गृहसंस्थेला सक्षम अधिकाऱ्यांकडून मानीव हस्तांतरासाठी अर्ज करता येईल.


मानवी खरेदीखत (Deemed Conveyance) या प्रयोजनासाठी, महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाच्या दिनांक २५/२/२०११ च्या अधिसूचनेद्वारे सर्वसाधारणपणे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था (District Deputy Register, Co-operative Society म्हणजेच DDR) यांना त्या त्या जिल्ह्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केलेले आहे.
सिडकोकडून वाटप करण्यात आलेल्या ठाणे व रायगड जिल्ह्यातील जमीन क्षेत्रासाठी सह निबंधक, सहकारी संस्था, सिडको, नवी मुंबई (Joint Register Co-operative Society) यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.


सदरची अधिसूचना नोंदणी व मुद्रांक विभागाचे www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर publications या सदराखाली Notifications या ठिकाणी उपलब्ध आहे.
एकतर्फी अभिहस्तांतरण किंवा उद्‌घोषणचे नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठीच्या अर्जासोबत (नमुना ७) जोडावयाची कागदपत्रे (चेक लिस्ट)
विहित नमुना अर्जावर रु. २०००.०० चे कोर्ट फी स्टॅम्प अर्जासोबत नोटराईज्ड अथवा कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर केलेले सत्यापन सहकारी संस्था नोंदणी प्रमाणपत्राची सत्यप्रत अथवा अपार्टमेंट असल्यास डिड ऑफ डिक्‍लेरेशन व अपार्टमेंट डिडच्या प्रती.

जागेचा सात बारा उतारा अथवा मालमत्ता रजिस्टर कार्डचा उतारा (Recent) प्रतीपक्ष यांनी सदनिका/दुकान खरेदीदार यांच्याशी केलेल्या विक्री करारनाम्याची एक प्रत जागेचा मूळ मालक आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यातील विकास कराराची प्रत (डेव्हलपमेंट ॲग्रिमेंट) मूळ मालक व बिल्डर प्रमोटर यांच्यामध्ये झालेल्या कुलमुखत्यार पत्राची प्रत बांधकाम व्यावसायिक आणि सभासद यांच्यातील कराराची प्रत सोसायटीच्या सर्व सभासदांच्या स्टॅंप ड्यूटी भरलेल्या पावत्या किंवा इंडेक्‍स-२ महानगर पालिकेने मंजूर केलेला आराखडा बांधकाम पूर्णत्वाचा प्रत किंवा वास्तुविशारदाचा दाखला हस्तांतरण करणे विषयी संबंधित मूळ मालक अथवा बिल्डर प्रमोटर यांना दिलेली नोटिशीची प्रत पत्रव्यवहाराचा पत्ता व फोन नं. सदनिका खरेदी वेळीचा जागेचा सर्च अहवाल
बिगर शेती आदेश
कमाल जमिनी धारणा कायदा विषयीचा आदेश ulc Certificate असल्यास
संबंधित महापालिका अथवा सक्षम प्राधिकरण यांनी मंजूर केलेल्या बांधकाम नकाशाची प्रत
अभिहस्तांतरण करावयाच्या जागेच्या क्षेत्रफळाविषयी आर्किटेक्‍टचा दाखला.

(शासकीय पुणे म.न.पा. पिंपरी चिंचवड म.न.पा. शासकीय प्राधिकरण यांचेकडील पॅनलवरील आर्किटेक्‍ट)
भोगवटापत्र
मानवी खरेदीखत (Deemed Conveyance) च्या नोंदणीसाठी नोंदणी अधिनियम, १९०८ व महाराष्ट्र नोंदणी नियम, १९६१ मधील तरतुदी लागू होतात. त्यानुसार लक्षात घ्यावयाच्या प्रमुख बाबी खालीलप्रमाणे-
मानवी खरेदीखताच्या दस्तावर सक्षम प्राधिकाऱ्याच्या आदेशानंतर पक्षकारापैकी पहिल्यांदा सही झाल्याच्या दिनांकापासून चार महिन्यांच्या आत तो दस्त संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीसाठी सादर करता येतो.
मिळकत ज्या कार्यक्षेत्रात स्थित आहे, त्या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये, सदर दस्त नोंदणीसाठी सादर करणे आवश्‍यक आहे.

Also Visit : https://www.postboxlive.com

Postbox India

 

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Leave a Reply

×
BLOGSINDIAMAHARASHTRA

वा.रा.कांत - बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात

error: Content is protected !!