builder floor – फ्लॅट घेण्यापूर्वी हि चौकशी करा
30/10/2021
फ्लॅट घेण्यापूर्वी हि चौकशी कराच अन्यथा रेरा, निबंधक कार्यालय, ग्राहक न्यायालय ई ठिकाणी भेटी द्यायची तयारी ठेवा..
नवीन प्रकल्पात घर घेत असाल तर:-
1. पहिले अग्रीमेंट कधी झाले आणि त्यात प्रकल्प पूर्ण करण्याचा दिनांक काय दिला आहे
2. त्या प्रकल्पात ज्यांनी तुमच्या पूर्वी फ्लॅट खरेदी केला त्यांच्याशी एकदा बोलून घ्या. बिल्डरलाच त्यांचे नंबर मागा. बिल्डर देत नसेल तर अशा ठिकाणी फ्लॅट घेऊच नका, सोन्याचा असला तरी..
3. पाण्याचा स्रोत काय आहे. त्याबाबत खरेदीखतात नोंद केली जाणार आहे का? पाणी कमी पडल्यास जबाबदारी बिल्डर घेणार आहे का? नाही तर पाण्यासाठी तुमच्या खिशाला पैशाची गळती लागेल.
4. ड्रेनेज, STP ची काय व्यवस्था आहे. अंदाजे खर्च किती येईल. अन्यथा शेजारी हागणदारी गंध सकाळ संध्याकाळी घ्यावा लागेल.
5. बांधकाम आराखडा मंजूर करण्यासाठी बिल्डरने कोणकोणती कागदपत्र तसेच शपथ पत्र बांधकाम विभागात जमा केले आहेत?
6. मंजूर बांधकाम आराखड्यात बदल करायचा झाल्यास, तुमची परवानगी घेतली जाणार आहे का? सर्व ग्राहकांची परवानगी घेणे कायद्याने बंधनकारक आहे.
7. सोसायटी की अपार्टमेंट केले जाणार आहे?
सोसायटी असेल तरच फ्लॅट घ्या. अपार्टमेंट म्हणजे लाॅज चा दुसरा प्रकार.. अपार्टमेंटमधे फ्लॅट घेणे टाळा.
8. तीन बाजूने बंदिस्त आणि छप्पर असेल जिला कव्हर्ड पार्किंग म्हणतात तीच खरेदी करा. इतर पार्किंग कोणत्याही परिस्थतीत खरेदी करू नका. आयुष्यभर पश्चाताप होईल.
9. आधीच सोसायटी की अपार्टमेंट नोंद असल्यास तेथील रहिवास्यांशी चर्चा करा. महिन्याला कोणत्या गोष्टीसाठी किती खर्च येतो याची माहिती घ्या. अन्यथा भाड्याचे घर परवडले अशी गत होईल.
10. सोसायटीची काही थकबाकी आहे का, याची चौकशी करा नाही तर सोसायटी सोबत भांडत बसावे लागेल..
11. IoD, CC, OC, PLINTH CERTIFICATE, BCC व इतर प्रमाण पत्र वेळोवेळी घेतले आहेत का. नसतील तर का नाही घेतले?
12. जे जे माहिती पुस्तकात/पत्रकात दिसत आहे ते तुमच्या करारात/खरेदी खतात लिहिले आहे का?
builder floor – आणि जर वरील बाबी पूर्ण करण्यास बिल्डर तयार नसेल तर त्याच्या फ्लॅटला लाथ मारा..
म्हणा “चल फूट, नको तुझा फ्लॅट, घाल तुझ्याच …खिशात, मी चाललो।”
फ्लॅट ची खरेदी राजा सारखी करा, उशीर झाला तरी चालेल..
फ्लॅट खरेदी करण्याची गरज/घाई जितकी तुमची आहे त्यापेक्षा जास्त गरज/घाई त्या बिल्डरची आहे.
या हावरट, लालची आणि भिकार बिल्डरांनी अनेकांचे आयुष्याचे वाटोळे केले आहे..
वाईट बिल्डरांना जितक्या शिव्या शाप आजकाल मिळत आहेत तितक्या कोणालाही मिळत नाहीत..
“ग्राहकांना फसवणारा बिल्डर आणि त्याच कुटुंब कधीही सुखासमाधानाने जगू शकत नाही, त्यांचं वाटोळं होवो”
असा शाप अनेक गृहप्रकल्पातील रहिवासी देत आहेत. स्वतः सावध व्हा.. इतरांना सावध करा
Also Visit : https://www.postboxlive.com
Postbox India