Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIANewsPostbox Marathi

uttar pradesh election – भाजपात शह-काटशह

1 Mins read

uttar pradesh election – भाजपात शह-काटशह, गळती आणि पक्षाचा राष्ट्रीय विनोद. 

 

 

 

22/11/2021

uttar pradesh election – भाजपात शह-काटशह, गळती आणि पक्षाचा राष्ट्रीय विनोद. 

भारताचे पंतप्रधान मोदींनी देशाची आणि शेतकऱयांची माफी मागून तीन काळे कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली, पंतप्रधान मोदी माफीवीर ठरले. अनेक तर्क वितर्क सुरु झाले, अंधभक्तांनी काँग्रेसच्या विचारधारेचे समर्थक यांना गुलाम संबोधत मोदी यांनी मास्टरस्ट्रोक मारला हे तुम्हा गुलामांना कसे कळणार अशी वल्गना, भाषा सुरु झाली,  तर कोंडीत मोदी न्हवे तर गोदी मीडिया सापडली होती. मोदी यांनी हे काळे कायदे देशातील शेतकऱयांच्या हिताचे आहेत असे संबोधत जबरदस्तीने हे कायदे संसदेत मंजूर करून घेतले होते. त्यावेळी भाजपा शासित राज्याच्या सुद्धा मंत्र्याशी चर्चा न करताच हे घोडे दामटविण्यात आले होते. त्यामुळे नेहमी प्रमाणे मोदी शहा यांनी हि बिले काही ठराविक भांडवलदारांच्या फायद्यासाठी करत आहेत असाच सूर देशात निघाला होता. देशातील शेतकऱ्यांना त्यांचे चांगले वाईट सारासर समजते, त्यामुळे जर देशातील शेतकऱ्याना हे कायदे नकोच असतील तर त्यांच्या हितासाठी म्ह्णून कायदे सांगत लादणे  कितपत योग्य ठरते ? 

Also Visit : https://www.postboxlive.com

मोदींचा अहंकार सातव्या अस्मानावर असताना त्यांना जमीन दाखविण्याचे काम देशातील शेतकऱ्यानी केले हि खूपच अभिमानाची आणि ऐतिहासिक गोष्ट आहे. पण संपूर्ण घटनाक्रमाचे अवलोकन केले तर एक गोष्ट लक्षात येईल कि काहीतरी अनबन भाजपा गटात सध्या सुरु आहे. मोदींना अंतर्गत गटबाजीला सामोरे जावे लागत आहे. कारण जर आतल्या लोकांनी या बिलाच्या निर्णयाला बगल दिलीच असनार, कारण पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालानंतर मोदींना देशातील uttar pradesh election वातावरणाचा अंदाज आला असून त्यांनी आपला राजपाट टिकवणे यालाच प्राथमिकता दिली असणार, त्यामुळे ” शेर दो कदम पीछे आता हे बडी छलांग लेने के लिये ” वगैरे वगैरे याला कोणी देशात एक डायलॉग या पलीकडे काडीचे महत्व नाही. 

Also Visit : https://www.postboxlive.com

संपूर्ण घोषणा क्रमाआधी पासून चा घटना क्रम पाहिल्यानंतर भाजपाच्या राष्ट्रीय स्तरावरील राजकारणात शह काटशह मोठ्या प्रमाणात घडत आहे आणि संघ निर्णय अंतिम सत्य आहे. त्यामुळे मोदींना ही घोषणा करून झुकावेच लागले. 

उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना राज शिष्टाचाराच्या विरोधात जाऊन मोदींच्या ताफ्याच्या मागे चालत यावे लागले असा फोटो समाज माध्यमांवर वायरल झाला पण हा  मोदींच्या अहंकाराचा दर्पणच होता. मोदी आपल्यापेक्षा कोणी मोठे नाही, आपल्यामध्ये आणि कॅमेऱ्या मध्ये कोणी आलेले मोदींना आवडत नाही, प्रत्येक गोष्टीचे मार्केटिंग करताना अहंभाव मोदींच्या व्यक्तिमत्त्वातून प्रकट होतो, प्रत्येक गोष्टीतून फायदा शोधण्याची बनिया अर्थात व्यापारी वृत्ती मोदींच्या गुजराती असण्याचे इतर राज्यांना सामाजिक सांस्कृतिक अंतर होऊ पहात होती. मोदींच्या घोषणा आणि आश्वासने यावर आता सर्वसामान्य जनतेला विश्वास वाटत न्हवता. जाती धर्माशी लढून रोजच्या दैनंदिन जीवनातील मूलभूत प्रश्न सुटत न्हवते हे भारतीयांना समजायला लागले होते. हे आता सामान्यांप्रमाणे बरोबर काम करत असणाऱ्या  पक्षातील अनेक महत्त्वाकांक्षी सहयोग्यांना सुद्धा वाटायला लागले होते. मोदी यांचे वय पहाता भाजपमध्ये अनेक महत्वाकांक्षी नेतृत्वानां / कार्यकर्त्यांना पंतप्रधान होण्याची मनशा जागी झाली होती. त्यामुळे मोदीनंतर भाजपाचे मोठे नेते योगी आदित्यनाथ ज्या पद्धतीने uttar pradesh election संघाच्या हिंदुत्ववादाचा अजेंडा उत्तर प्रदेशात राबवत होते, त्यांना हळू हळू संघाची पसंती मिळायला लागली. संघाशी असलेले योगींचें संबंध आणि संघापासून दूर जाऊन उद्योगपतींच्या गळ्याचा हार बनलेल्या मोदींचे संबंध यात खूप अंतर पडत चालले होते. 

योगी आदित्यनाथ यांना आपल्या ताफ्या मागे चालायला लावून मोदींनी खूप मोठी चूक केली. संघाला आणि उत्तर प्रदेशाला हे आवडले नाही. साहजिकच uttar pradesh election उत्तर प्रदेशच्या निवडणुका समोर उभ्या असताना योगींची आणि उत्तर प्रदेश राज्याची अप्रत्यक्ष बदनामी मोदींकडून घडली होती. uttar pradesh election उत्तर प्रदेश हातातून जाने संघाला आवडणार नाही कारण uttar pradesh election हिंदुत्वाचा अड्डा म्हणजेच उत्तर प्रदेश अशी ओळख असलेले राज्य. अयोध्या, बाबरी मस्जिद ते गंगा नदी सर्वच धार्मिक वातावरणाला पोषक राज्य, त्यामुळे धार्मिक कट्टरतावाद इथे नव्याने तयार करायला लागत नाही इथे जन्माला आलेल्या मुलाला जातीच्या राजकारणातूनच तापून सुलाखुन मोठे व्हावे लागते, त्यामुळे मोदींना बॅकफूट वर आणणे संघाला महत्वाचे ठरले होते, त्यामुळे शेतकरयांच्या आंदोलनावरून भाजपाची जी तडा गेलेली प्रतिमा होती तिला थुक पट्टी लावून कमीत कमी उभी करणे आवश्यक ठरल्याने, मोदी यांच्याकडूनच शेतकऱयांची माफी मागवून घेणे हाच पर्याय सध्या भाजपा संघासमोर होता .


पण संसदेत पारित केलेले विधेयक मोदींच्या बोलण्यावर मागे घेतले असे होत नाही, हे एक मृगजळाचे गाजर आहे हे मोदी नंतर पुराव्यासह शाबीत करू शकतात हे सुद्धा जनतेला आणि आंदोलनकर्त्यांना चांगलेच ठाऊक आहे त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी आंदोलन गुंडाळले नाहीच. त्यामुळे एकूणच उत्तर प्रदेश च न्हवे तर देशातील इतर राज्यातील निवडणुकीतसुद्धा भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता अजून संपलेली नाही. गोदी मीडिया, कंगना राणावत ची स्वातंत्र्यावर बेताल वक्तव्ये, देशाच्या सैनिकांचा अपमान, किरीट सोमैय्या फेकंम्फफाक आरोप – प्रत्यारोप, ईडी, सीबीआय  – या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, दंगलीसाठी वातावरण आणि बेतालपणा, गोपीचंद पडळकराचा सोंगाड्या सारखा वापर हे उघड उघड दर्जाहीन राजकारण सध्या देश पाहत आहे, यामुळेच भाजपाच्या प्रतिमेला तडा गेला आहे. पश्चिम बंगाल चे उदाहरण संपूर्ण देशाला प्रेरणा देणारे ठरले. त्यामुळे मोदी शहा यांची लाटच काय भाजपाचा चा झगमगाट सुद्धा आता फेल होताना दिसत आहे. 

Also Visit : https://www.postboxlive.com

सध्या रोज भाजपच्या नगरसेवकांपासून, कार्यकारणी सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा देण्याचे सत्र चालूच असताना महाराष्ट्रात भाजपाची संपूर्ण नाकेबंदी झालेली पाहायला मिळत आहे. १०६ आमदार असून सुद्धा भाजप गलितगात्र झालेली दिसत आहे. देवेंद्र फडणवीस असो कि चंद्रकांत पाटील दर आठवड्याला चमत्कार होण्याच्या पुड्या सोडताना दिसत असले तरी त्यांना विरोधक म्हणून सुद्धा अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. उदाहरण – समीर वानखेडे प्रकरण. तर एकीकडे देवेंद्र फडणवीस यांची हुजरेगिरी करत काही पदे आपल्या पदरात पडतात का यासाठी पक्ष निष्टेला हरताळ फासून ज्यांनी भाजपात प्रवेश केला त्यांचे संपूर्ण राजकीय करियर संपण्याच्या मार्गावर आले आहे. एका बाजूला फडणवीस डॅमेज कंट्रोल करण्यात मग्न आहेत तर दुसरीकडे आपल्या गायकीच्या हट्टामुळे आपल्या छ्न्दामुळे अमृता वाहिनी जनतेच्या मध्ये जात साजूक तूप दाखवून भाजपाच्या प्रतिमेला डालडा फासत आहेत.

देवेंद्र फडणवीस हे बोलके पोपट आहेत खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे हे करण्याचे काम धंदे त्यांनी सत्तेवर आणि विरोधात असताना महाराष्ट्रात केले आहे. चांगल्या संधीचा आणि आपल्या अभ्यासू वृत्तीचा वापर जनहितासाठी न करता विरोधकांवर वाया घालविल्या मुळे सत्ता उपभोगता आली नाहीच. त्यामुळे महाराष्ट्राच्या कारकिर्दीत मोदी लाटेवर महाराष्ट्रात मिळालेले मुख्यमंत्री पद आपल्या विधायक कामांची पूर्तता न करता फक्त घोषणेवरच वाया घालवले गेले. उदाहरण जल शिवार योजना फसली. अशा अनेक योजना महाराष्ट्राच्या तिजोरीवर घाला घालून बुडल्या. 

Also Visit : https://www.postboxlive.com

महाराष्ट्रात आपल्याला आपल्याच पक्षातून आव्हान उभे राहू नये तसेच मित्र पक्षाकडून त्रास होऊ नये व एकहाती सत्ता राहावी या हेतूने त्यांनी मित्र पक्ष शिवसेनेलाच संपवायचे राजकारण सुरु केले याचाच फटका आज महाराष्ट्रात भाजपाला झाला. देवेंद्र फडणवीस यांनी पक्षांतर्गत मोठ्या होणाऱ्या नेतृत्वामध्ये महिला नेतृत्वाला सुद्धा शितासारखे बाजूला केले.
भाजपा ओबीसी या मोठ्या वर्गातून येणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांचा वारसा सांगणाऱ्या पंकजा मुंडे यांची काही प्रकरणे आणि घोटाळ्यांचे पुरावे विरोधकांना आपसूकच लपून छपून पुरवले त्यामुळे त्यांचा पत्ता त्यांनी असा कट केला. तर पूनम महाजन याना युवा मोर्च्यात  व्यस्त करून हा सुद्धा अडसर त्यांनी आपोआप दूर केला.

एकनाथ खडसे सारखे भाजपाचे जेष्ठ नेते त्यांनी युक्त्या क्लुप्त्या वापरून पक्षातून बाहेर केले. तर बाकीचे हांजी हांजी करणारे आपल्या सोबत ठेवले म्हणजेच त्यांनी भाजपा महाराष्ट्रात गटबाजीला प्रोत्साहनच दिले. त्यांच्या या हरकती ज्या ज्या भाजपाच्या नेत्यांना कळायला लागल्या त्यांनी मौन आणि संयमावर विश्वास दाखवला याचेच एक जिवंत उदाहरण म्हणजे विनोद तावडे. बोगस डिग्री प्रकरण सुद्धा विनोद तावडे यांना का शेकले हे आता महाराष्ट्राला वेगळे सांगायला नको. मराठा समाजातून असलेले दुसरे मोठे नेतृत्व फडणवीसांनी संपवायचा प्रयत्न केला पण तो तितका यशस्वी झाला नाही. पण फडणवीसांच्या आजू बाजूला तयार होत गेलेली गिरीश महाजन, प्रवीण दरेकर,प्रसाद लाड, किरीट सोमैय्या,मंगलप्रभात लोढा, नरेंद्र पाटील ही शकुनी चौकडी पक्षाच्या एकनिष्ठ आणि जुन्या कार्यकर्त्याना सतत  बाधा निर्माण करणारी ठरत होती.


आशिष शेलार यांच्या सारखे जेष्ठ नेतृत्व सुद्धा या चौकडीमुळे त्रस्त होते त्यामुळे काहीच मदत मिळू न शकलेले विनोद तावडे हे योग्य वेळेची वाट पाहत आपली संघातली फिल्डिंग चांगली करण्यात व्यस्त होत संयमपणा ठेवत गेले. याचेच फळ त्यांना भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाच्या रूपाने मिळाला. या निमित्ताने का होईना महाराष्ट्राची विरोधी पक्षाच्या रूपात का असेना पण सकारात्मक कामांना योग्य नेतृत्वाने वेग देण्यात ते यशस्वी होतील अशी आशा बाळगू शकतो. एकूणच महाराष्ट्राचा राष्ट्रीय विनोद झाला. 

पण फडणवीसांनी महाराष्ट्र भाजपाची लागलेली किंवा लावलेली विल्हेवाट आता कोणत्याही प्रकारच्या डॅमेज कंट्रोल च्या प्रयत्नांनी होणार नाही हे त्रिवार सत्य आहे. सध्या भाजपा आपले उत्तर प्रदेशात ” नाक ” वाचविण्याच्या तयारीत आहे.  त्यामुळे आने वाला समय बहोत बलवान हे भैय्या, रावण कोण आणि शूर्पणखा कोण ? हे असे यांचे मुखवटे फाटत आहेत हे मात्र नक्की.  

Also Visit : https://www.postboxlive.com

Postbox India

 

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Leave a Reply

×
BLOGSINDIAMAHARASHTRA

वा.रा.कांत - बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात

error: Content is protected !!