Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRA

Road Maratha पानिपतचे युध्द आणि रोड मराठा 

1 Mins read

Road Maratha पानिपतचे युध्द आणि रोड मराठा 

 

 

पानिपतचे युध्द आणि Road Maratha रोड मराठा 

१७६१ मध्ये घडलेलं, पानिपतचे युद्ध म्हणजे संपूर्ण भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे आणि महत्वाचे युद्ध होते. युध्दाचे नेतृत्व करणारे सदाशिवराव भाऊ पेशवे हे अफगाणिस्तानच्या अब्दाली कडून पराभूत झाले. या युद्धात ४० ते ५० हजार सैनिक मारले गेले .

Road Maratha पानिपतचे युध्द आणि रोड मराठा 1

Road Maratha पानिपतचे युध्द आणि रोड मराठा


रोहिले आणि अफगाणांविरोधात सदाशिवराव भाऊंबरोबर नेटाने लढलेले कित्येक मराठा शूरवीर आणि सैनिक या युद्धात धारातीर्थी पडले, तर मोजता येणार नाही इतकेजण जायबंदी झाले.
युद्धात सहभागी झालेली अनेक मराठा कुटुंबे पराभवानंतर आपल्या मायभूमीत परत गेली, तर जवळपास २९८ कुटुंबे पानिपतमधेच राहिली. काहीजण युद्धभूमीच्या आजूबाजूला सुरक्षित वाटेल तिकडे निघून गेले तर काही सैनिकांनी आजूबाजूच्या परिसरात काही काळासाठी आश्रय घेतला आणि कायमचे तिथेच स्थायिक झाले. त्यांनी तेथेच आपले जीवन नव्याने सुरु केले.

Road Maratha पानिपतचे युध्द आणि रोड मराठा 2

Road Maratha पानिपतचे युध्द आणि रोड मराठा


स्थायिक लोकांपासून कसलाही धोका होऊ नये अडचणी येऊ नयेत म्हणून त्यांनी आपली मराठा ओळख लपवली आणि आम्ही एक राजारोडच्या समाजाचे आहोत असे सांगायला लागले. बऱ्याच लोकांनी तेथील स्थानिकांची नावे लावायला सुरुवात केली; तिथे पानिपत , सोनिपत करनाल ,रोहतक या जिल्ह्यांमध्ये रोड समाजाची बरीच मोठी संख्या आहे. तेथेच हा समाज विखुरला गेला आहे.आज युद्धाच्या २५४ वर्षांनतर त्यांची लोकसंख्या दहा लाखांच्यावर आहे. मुळचा मराठी मातीतला पण सध्या पानिपतामध्ये स्थायिक असलेला आणि Road Maratha ‘रोड मराठा’ या नावाने प्रसिद्ध असलेला आपला बांधव आज परमुलुखात मान उंचावून जगतो आहे यापेक्षा कौतुकास्पद गोष्ट दुसरी नाही.

Road Maratha पानिपतचे युध्द आणि रोड मराठा 3

Road Maratha पानिपतचे युध्द आणि रोड मराठा


युद्धाच्या जखमा मनावर आणि शरीरावर घेऊन त्या २९८ कुटुंबांनी काळानुसार पानीपताची भूमी स्वत:ची मानली आणि तेथील संस्कृतीचा प्रत्येक घटक अंगी बाणून घेतला.त्यांनी केवळ आपल्या देहबोली आणि पेहरावातचं बदल केला नाही तर आपल्या नावांमध्ये देखील बदल करून घेतले.
आज पानिपतामध्ये गेल्यावर Road Maratha रोडमराठा समाज हा एका नजरेत ओळखता येत नाही. बहुतेक जण तर अस्सल जाट असावे असे दिसतात. परंतु बाहेरील रूपातील हा लक्षणीय बदल त्यांच्या अंतरंगातील मराठी संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान मात्र बदलू शकला नाही.

Road Maratha पानिपतचे युध्द आणि रोड मराठा 4

Road Maratha पानिपतचे युध्द आणि रोड मराठा


अनेकजण स्वत:चा उल्लेख आवर्जून ‘मराठा चौधरी’ असा करतात आणि हा Road Maratha रोड मराठा समाज गर्वाने सांगतो की, आम्ही शूर मराठा सैनिकांचे वंशज आहोत. पानिपतमधे फिरताना मराठी नावांच्या दुकानाच्या पाट्या हमखास पाहायला मिळतात. आपली मराठा संस्कृती जपण्यासाठी एका मुलीचा रोड मराठा बाप आपली मुलगी फक्त Road Maratha रोड मराठा समाजाच्या मुलाघरीच देतो. हेच कारण आहे की Road Maratha रोड मराठा समाज आजही आपले अस्तित्व टिकवून आहे.
गावाच्या प्रत्येक फाट्यावर छत्रपती शिवरायांची प्रतिमा, गावातील प्रत्येक घरावर मराठा भवन चिन्हांकीत आणि डौलाने फडकणारा जरीपटका हे चित्र महाराष्ट्राच्या गावातील नसून, हरियाणा राज्यातील पाच जिल्ह्यातील अडिचशे गावात महाराष्ट्राचे दर्शन घडवनारे आहे. महाराष्ट्राच्या अंगावर आजही सरसरून काटा आणणारा शब्द म्हणजे पानिपत. हा शब्द प्रचंड पराभवाची व्याख्या ठरला. १७६१ मध्ये झालेल्या पानीपताच्या लढाईत महाराष्ट्राच्या प्रत्येक घरातील योद्धा धारातिर्थी पडला. या पराभवानंतर अहमदशहा अब्दालीने हजारो युध्दबंदी अफगाणीस्तानात सोडले तर उरलेले अडिचशे वीर पानीपताजवळ असलेल्या जंगलात आश्रयाला गेले. जंगलाच्या बाहेर निघावे तर मरणाची भीती होती अहमदशहाने तर मराठा सैनिकाच्या एक शिराच्या बदल्यात एक सुवर्ण मुद्रा देण्याची द्वाही फिरवली होती. या परिस्थितीत जंगलाच्या आश्रयाला गेलेल्या या विरांनी अख्खे एक-दीड शतक या जंगलात काढली. इग्रंजी राजवटीत प्रथम यांची जनगणना करण्यात आली त्यावेळी या मराठा बांधवांची लोकसंख्या अठ्ठाविस हजार होती.

Road Maratha पानिपतचे युध्द आणि रोड मराठा 5

Road Maratha पानिपतचे युध्द आणि रोड मराठा


छत्रपती की जय ही एकच ओळख. महाराष्ट्रामधे आपण शिंक आल्यानंतर हे राम म्हणतोच ते का म्हणतो, हे सांगता येत नाही तसेच हरियाणामधे Road Maratha रोड मराठा समाजात शिंक आल्यानंतर ‘छत्रपती की जय’ हा शब्द आपसूक बाहेर पडतो. हा शब्द का येतो हे विचारल्यानंतर आमच्या अनेक पिढ्या हाच शब्द वापरतात, म्हणून आम्हीही म्हणतो, असे उत्तर मिळते.गावागावात शिवरायांची प्रतिमा आहे. हरियाणातील तब्बल अडिचशे गावांची प्रवेशद्वारे शिवरायांच्या प्रतिमांनी उजळलेली आहेत.
राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा प्रत्येक घरात घरात लावलेली आहे. प्रत्येक घरावर मराठा भवन लिहलेले असून, छत्रपतींचा जरीपटका प्रत्येक घरावर डौलाने फडकतो.बोलीभाषेत मराठीचा वास हरियाणा राज्याची भाषा मुख्यतः हरियानवी आहे. मात्र Road Maratha रोड मराठा समाजाच्या बोलीभाषेत आजही बहुसंख्य मराठी शब्द आजही उच्चारले जातात. फेट्याला महाराष्ट्रात ग्रामीण भागात आजही पटका शब्द वापरला जातो. तो या Road Maratha रोडमराठा समाजातही वापरला जातो.

 

दरवाजाला कवाड, म्हैस, खाट, आईला माय, चुल,पुरणपोळी, होण मण, हे शब्द फक्त रोडमराठा समाजातच वापरले जातात.
या लोकांनी मराठी संस्कृतीशी नाळ कायम ठेवली आहे. लग्नसमारंभात मराठी संस्कृतीची झलक असतेच. या समाजाने हरियाणात प्रगतीचा मोठा पल्ला गाठला आहे. दरघरटी एक जण परदेशात आहे. हरियाणा राज्याची उपजावू जमीन या रोड मराठा समाजाच्या ताब्यात आहे. चार जिल्हे आणी बारा तालुक्यात Road Maratha रोड मराठा समाजाच्या धर्मशाळा आहेत.
गंमत अशी की महाराष्ट्रातील मराठ्यांना पानिपतच्या शौर्याचा विसर पडला आहे, पण या Road Maratha रोड मराठ्यांना अजूनही तो इतिहास सर्व तोंडपाठ आहे. त्यांच्या मते,युद्धातील पराभव हा कोणाच्याही हाती नसतो. मराठ्यांनी अखंड भारत जिंकण्याची जी महत्त्वकांक्षा बाळगली तिचा अभिमान प्रत्येक मराठी माणसाला असायलाच हवा. त्यांनी शेवटपर्यंत लढा दिला. म्हणजे त्यांच्या पराक्रमापेक्षा त्यांचे शौर्य कित्येक पटीने जास्त आहे.हा रोड मराठा समाज छत्रपती शिवाजी महाराजांना आपले दैवत मानतो.

Road Maratha पानिपतचे युध्द आणि रोड मराठा 6

Road Maratha पानिपतचे युध्द आणि रोड मराठा

येथे काही तरुणांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी सेवा संस्था स्थापन केली आहे. या संस्थेमार्फत अहमदशाह अब्दाली व रोहील्यांशी लढताना मराठ्यांना आलेल्या वीरमरणाच्या शौर्यगाथेचा प्रसार केला जातो.
परमुलखामधून आलेले असले तरी हरयाणाच्या राजकारणात देखील Road Maratha रोड मराठा समाजाचे बऱ्यापैकी वर्चस्व आहे. काही मतदारसंघ असे आहेत जेथे वर्षानुवर्षे केवळ रोड मराठा समाजाचा प्रतिनिधीचं निवडून येतो. हरयाणातील प्रत्येक स्तरावर त्यांनी आपल्या कामगिरीची छाप पाडली आहे
कधी पानिपताला भेट दिलीत तर आपल्या या बांधवांची भेट घ्यायला बिलकुल विसरू नका.

              डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर

 

Also Visit: https://www.postboxindia.com

Also Visit: https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral:

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel:

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform, which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services into Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website: https://www.postboxindia.com

Website: https://www.postboxlive.com

Facebook: https://www.facebook.com/indiapostbox

Instagram: http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn: https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler: https://postboxindia.tumblr.com/

Twitter: https://twitter.com/IndiaPostbox

Telegram: t.me/postboxindia

Postbox India

 

Leave a Reply

×
BLOGSHISTORYINDIA

M Visvesvaraya - विश्वकर्मा भारतरत्न विश्वेश्वरय्या

error: Content is protected !!