Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRA

Mumbai india – गिरणगाव

1 Mins read

Mumbai india – गिरणगाव

 

 

 

१९व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत लालबागचा परिसर आंबा, फणस, नारळ-सुपारींच्या बागांनी बहरलेला होता.

मात्र पुढे कापड गिरणी उद्योगाचा झालेला विकास, या गिरण्यांमध्ये भरती होण्यासाठी कोकण, 

घाट येथून आलेला कामगार वर्ग इ.मुळे अल्पावधीतच लालबाग परळचा हा भाग Mumbai india – ‘गिरणगाव’ म्हणून ओळखला जाऊ लागला.

रोजगारांच्या शोधात आलेला गिरणी कामागार चाळींमधून दाटीवाटीने राहू लागला.

यापैकी ८०-९० टक्के कामगारांची बि-हाडे गावी असल्याने त्यांच्या खाण्यापिण्याचा जो प्रश्न निर्माण झाला तो सोडवण्याचे काम ‘खाणावळ्यांनी व भोजनालयां’नी केले.

त्याकाळी Mumbai india – लालबाग मधील प्रत्येक चाळीतून एक-दोन तरी खानावळी असायच्या. 

अशा खानावळींमध्ये रोज चांगले शाकाहारी व आठवड्यातून एक दिवस (सहसा रविवारी किंवा बुधवारी) मांसाहारी जेवण मिळत असे.

या सुग्रास , सकस , स्वच्छ व पोटभर मिळणा-या जेवणाचा मासिक दर १९५६ -६० च्या काळात ३० रुपये होता. 

याच वेळी पाटावर बसून तांब्या पेल्यासहपाणी देणारे अस्सल ब्राह्मणी शाकाहारी जेवणाचे ‘श्रीकृष्ण भोजनालय’ द.ग.फणसे यांनी गणेश गल्लीतील पिलू बिल्डिंग येथे सुरु केले.

२ मूद भात, २ भाज्या, २ चपात्या, चिंचगुळाची आमटी, वाटीभर दही वा ग्लासभर ताक असे पोटभर जेवण येथे १० आण्यात मिळत असे.

नंतर हा दर वाढत्या महागाई मुळे अडीच ते तीन रुपयांपर्यंत गेला.

अर्थातच हे दर सर्वसामान्यांना व विशेषत: गिरणी कामगारांच्या खिशाला परवडणारे असल्याने हे भोजनालय लोकप्रिय झाले.

पुढे द.ग.फणसे यांनी बटाटावडा, अळूवडी, पीयूष, मसाला दूध, खरवस इ. पदार्थांची रेलचेल असणारे ‘श्री कृष्ण दुग्धालय’

हे लहान हॉटेल भारतमाता सिनेमासमोर असलेल्या जुन्या दोनमजली चाळीत सुरु केले. या हॉटेलचे मुख्य आकर्षण होते ते म्हणजे येथील ‘श्रीखंडाच्या गोळ्या’.

मात्र पुढे कौटुंबिक अडचणींमुळे हे हॉटेल बंद पडले.

१९५०च्या दशकात ‘आराम’नावाच्या उपहारगृहांची एक शृंखला Mumbai india – मुंबईत होती. या शृंखलेतील दोन हॉटेल्स लालबाग मध्ये होते.

त्यापैकी एक गणेश गल्लीच्या तोंडावर (सध्या गुरुकृपाचे रेडीमेड कपड्यांचे दुकान आहे) तर दुसरे रंगारी बदक चाळीच्या समोर (सध्या त्या जागेत कमानी क्लिनिक आहे ) होते.

ऐसपैस जागा, पुरेसा उजेड, खेळती हवा अशी रचना असणा-या या हॉटेल्सची खासियत होती ती म्हणजे गरमागरम बटाटाभजी.

रंगारी बदक चाळी समोरील आराम हॉटेलात वाटीभर उसळ, पाच पु-या व कांदा अवघ्या ४ आण्यात (२५पै) मिळत असे.

या भोजनालयांव्यतिरिक्त जाम बिल्डिंगमधील मालविजय , आरसेवाला बिल्डींगमधील दयानंद आरोग्यभवन हॉटेल,

गणेश सिनेमागृहा समोरील लक्ष्मी विलास यांसारखी असंख्य हॉटेल्स Mumbai india – लालबाग मध्ये होती.

लाकडी चौकटीवर संगमरवरी लादी असलेले टेबल व दोन तीन माणसे बसू शकतील एवढ्या लांबीचे छोटे बाकडे,

दर्शनी बागात काचेची तावदाने असलेल्या कपाटात मालपुवा, भजी, वडे, शेव, खाजा इ.पदार्थांची ताटात केलेली मांडणी,

तर एका कोप-यात चार पाच पातेली असलेला स्टँड या सर्व पातेल्यातील पदार्थ गरम राहावेत म्हणून मधोमध ठेवलेला एक सामाईक स्टोव्ह

(या पातेल्यात शिरा सुकी भजी उसळ इ. पदार्थ ठेवलेले असतं), न पुसलेली काळपट झालेली ओलसर लादी,

अपुरा प्रकाश व दाटीवाटीमुळे आलेला कोंदटपणा अशी या हॉटेल्सची वैशिष्ट्ये होती.

मात्र या हॉटेलसमध्ये मिळणारे पदार्थ चविष्ट व माफक असायचे. शिरा भजी पोहे चहा १ आणा (६ पैसे) पुरीभाजी मिसळ स्पे.चहा २ आणे (१२पै).

रंगारी बदक चाळी शेजारी असलेले ‘आनंदभुवन’ हे हिंदू हॉटेल मिसळीसाठी पूर्वीपासून प्रसिद्ध होते. 

त्या काळचे लालबाग म्हणजे दुसरे कोकणच ! कारण गिरण्याबंद होईपर्यत Mumbai india – लालबाग मध्ये कोकणवासीयांची वस्ती ८०-८५ टक्के होती.

त्यापैकी ९० टक्के लोक गिरणी कामगार होते. त्यामुळे आपसुकच कोकणी संस्कृतीचा प्रभाव Mumbai india – लालबागवर पडत गेला.

स्थायिक कोकणवासीयांना अस्सल कोकणी मांसाहारी जेवण खाऊ घालणारे ‘क्षीरसागर’ हे भोजनालय श्री. गणपत गोरे यांनी सुरु केले.

एका छोटेखानी गाळ्यात सुरु केलेले हे भोजनालय लवकरच कोंबडी-वड्यांमुळे नावारूपास आले.

कोणत्याही प्रकारचा बाजारी मसाला न वापरता श्री.गोरे स्वत: मालवणी मसाला तयार करीत.

अगदी आजही येथे वडे पारंपरिक पद्धतीने पळसाच्या पानावर थापून तयार केले जातात.

सुरमई, पापलेट, बोंबील, कुर्ल्या, शिंपल्या आणि सोलकढी इ. कोकणी पदार्थांची मेजवानी देणारे लालबागमधील मुख्य आकर्षण म्हणून आजही ‘क्षीरसागर’कडे पाहिले जाते.

तर दुस-या बाजूला येथे स्थायिक झालेला हा ‘चाकरमनी’ सणावाराला विशेषत:

शिमगा, गौरी – गणपतीला गावी जाताना लालबागचा खाऊ चिवडा, कडकबुंदीचे लाडू, म्हैसुर, सुतारफेनी इ.स्वरूपात घेऊन जाई.

यातही कडक बुंदीचे लाडू आणि चिवडा विशेष प्रसिद्ध होते.

चाकरमान्यांची हीच मागणी समोर ठेवत १९६७ साली मारुती रक्षे यांनी ‘महाराष्ट्र लाडू सम्राट’ या नावाने एक उपहारगृह सुरु केले.

पण काही कारणास्तव १९८४ साली हे उपहारगृह बंद पडले. पुढे १९९२ च्या दरम्यान मारुती रक्षे यांचे सुपुत्र कमलाकर रक्षे यांनी ‘मुंबई लाडू सम्राट या नावाने हे उपहारगृह पुन्हा सुरु केले.

वडापाव, साबुदाणा वडा, पियुष, मिसळपाव, कोथिंबीर वडी इ. मराठमोळ्या पदार्थांना आपल्या मेन्यू कार्ड वर आणणा-या लाडू सम्राटने आपला स्वत:चा एक ग्राहकवर्ग तयार केला आहे.

लाडू सम्राट प्रमाणेच श्री. श्रीरंग कदम यांनी कामगारांमधील प्रसिद्ध चिवड्याला मध्यवर्ती ठेवत ‘चिवडा’ तयार करणारा एक छोटा कारखाना ‘टेस्टी चिवडा’ या नावाने सुरु केला.

१९६०-६२ च्या काळात लालबागमधील चिवड्याचे हे एकमेव दुकान असल्याने येथे कामगारांची मोठी गर्दी होत असे.

हळूहळू हा व्यवसाय वाढत जाऊन चिवडा तयार करणारे अनेक कारखाने येथे सुरु झाल्याने ही गल्ली ‘चिवडा गल्ली’ म्हणून ओळखली गेली.

एकेकाळी लालबागमधील सर्व प्रमुख कोपरे इराणी हॉटेल्सनी व्यापलेले होते. वीरमहल इमारती जवळ ड्युक रेस्तराँ अॅण्ड स्टोर्स’ हे मोठे इराणी हॉटेल होते.

त्याच्या शेजारीच एक सिंगल गाळ्याचे इराणी हॉटेल होते. हे हॉटेल म्हणजे त्याकाळी आईस्कीम मिळण्याचे Mumbai india – लालबाग मधील हे एकमेव ठिकाण होते.

त्यातही फक्त क्वालिटी कंपनीचेच आईस्क्रीम येथे मिळत असे. क्वालिटी आईस्क्रीमच्या छोट्या कपची किंमत ६ आणे (३७ पै) असायची.

मात्र Mumbai india – लालबागच्या विकासाच्या प्रक्रियेत इराणी हॉटेल नष्ट झाले.

१९८२च्या गिरणी संपांनंतर तर कामगारांची वाताहत होऊन हा कामगारवर्ग बाहेर फेकला गेला.

गिरण्यांच्या जागेवर मोठमोठाले टॉवर उभे राहिले. जागतिकीकरणाच्या, पुनर्विकासाच्या रेटयात गिरणगावानेही कात टाकली.

आज चिवडा घेणा-या ग्राहकांचे प्रमाण कमी झाल्याने केवळ चिवड्यावर अवलंबून न राहता त्याच्या जोडीला मिठाई,

बटाट्याचे वेफर, कचोरी, शेव, सरबते यांसारखे पदार्थही आज चिवडा गल्लीत पहावयास मिळतात.

लाडूसम्राटने तर अमराठी माणसांसाठी विशेषत: जैन ग्राहकांसाठी बटाट्याऐवजी कच्च्या केळ्याचा वापर करत जैन वडा

व जैन सामोसा हे दोन पदार्थ तयार करून आपणच येथील ‘सम्राट’ आहोत हे दाखवून दिले आहे.

शाकाहारी व मांसाहारी थाळी तसेच मोदक पुरणपोळी, आंबोळ्या, घावने, थालीपीठ इ. पदार्थांचा पुरवठा करणारी व कमलाताई विचारे यांनी स्थापन केलेली

‘घरोबा’ ही स्त्री हितवर्धिनी संस्था लालबाग मधील एक महत्वपूर्ण खाणावळ ठरली आहे.

‘दुर्गापरमेश्वरी लंच होम’, ‘सरदार हॉटेल’, ‘सुशीला विहार’, ‘दत्त बोर्डिंग हाऊस’, ‘मस्त मालवणी’,

जाम मिलला लागून असणारे ‘कामगार दुग्धालय’ यांसारख्या हॉटेल्सनी आपापला एक ग्राहकवर्ग तयार केला

असून सामान्य माणसांच्या खिशाला परवडणारे दर हीच या सर्वांच्या यशाची गुरुकिल्ली ठरली आहे.

 

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Leave a Reply

×
BLOGSINDIAMAHARASHTRA

वा.रा.कांत - बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात

error: Content is protected !!