LPG Gas Booking एलपीजी गॅस ग्राहकांचे हक्क ! माहिती करून घ्या.
25/11/2021,
LPG Gas Booking एलपीजी गॅस ग्राहकांचे हक्क !
LPG Gas Booking गॅस कनेक्शन घेताना शेगडी घेणे बंधनकारक नाही !
सिलेंडर घेताना ते वजनकाट्यावर तोलून घ्या कॅश अँड कॅरी केल्यास १५ रूपये रिबेट मागा दोन बुकींग दरम्यान २१ दिवस थांबण्याची गरज नाही . दोन वर्षातून एकदा शेगडी ट्युब रेग्युलेटर तपासणी करणे आवश्यक ती करून घ्या .
कोणतीही तक्रार असल्यास गॅसकंपनीच्या अधिकाऱ्यास संपर्क करा .
वेबसाईटवरुन ऑनलाईन तक्रार करा .
http://www.hindustanpetroleum.com/LPGHome
http://www.ebharatgas.com/
http://indane.co.in/
प्रश्न : नवीन गॅस कनेक्शन मिळणेकरिता काय प्रक्रिया आहे ?
उत्तर : आपल्या निवासाच्या जवळ असलेल्या घरगुती गॅस वितरकाकडे LPG Gas Booking नवीन गॅस कनेक्शनसाठी नोंदणी करता येईल . तसेच नवीन गॅस कनेक्शनकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध आहे .
भारत पेट्रोलियम कंपनीसाठी www.bharatpetroleum.com इंडियन ऑईल कंपनीसाठी spandan.indianoil.co.in व पेट्रोलियम कंपनीसाठी www.hindustanpetroleum.com या लिंकचा वापर करावा .
प्रश्न : नवीन घरगुती गॅस कनेक्शन मिळणेसाठी किती रक्कम भरावी लागेल ?
उत्तर : १ एका गॅस सिलेंडर करिता – रूपये १,४५० / – ( अनामत रक्कम ) २. दोन गॅस सिलेंडर करिता- रूपये १ , ४५० / – प्रती सिलेंडर याप्रमाणे २ , ९ ०० / – ( अनामत रक्कम ) – ३. रेग्युलेटरसाठी- रूपये १५० / – ( अनामत रक्कम ) या सर्व भरलेल्या पैशाची पावती मिळते . या किंमती जूलै २०१४ अखेरच्या आहेत . यापेक्षा अधिक रकमेची मागणी केली असल्यास गॅस कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन रक्कमेची खातर जमा करावी .
प्रश्न : के . वाय . सी . म्हणजे काय ?
उत्तर : के . वाय . सी . ( Know Your Consumer ) म्हणजे ग्राहकाचे निवासाचा व ओळखीबाबतची माहिती नमूद असलेला तसेच ग्राहकाचे वैयक्तिक माहितीचा तपशील असलेला फॉर्म आहे.
प्रश्न : के . वाय . सी . फॉर्म भरणे आवश्यक आहे का ?
उत्तर : आपणाकडे एकापेक्षा जास्त घरगुती गॅस कनेक्शन किंवा वेगवेगळया कंपनीची एकापेक्षा जास्त घरगुती गॅस कनेक्शन असल्यास आपणास के वाय . सी . फॉर्म भरणे आवश्यक आहे . त्यासाठी निवासाचे व ओळखपत्राचे पुराव्यासह फॉर्म भरणे आवश्यक आहे .
प्रश्न : के . वाय . सी . फॉर्म कोठे मिळेल ?
उत्तर : के . वाय . सी . फॉर्म आपले विभागातील वितरकाकडे मोफत उपलब्ध आहेत .
प्रश्न : घरगुती गॅस सिलेंडर वितरण व सिलेंडर काळया बाजाराशी संबंधित तक्रारीसाठी कोठे संपर्क साधावा ?
उत्तर : घरगुती गॅस सिलेंडर वितरण व सिलेंडर काळया बाजाराशी संबंधित तक्रारीसाठी एल.पी.जी. ग्राहक सहाय्यता केंद्र ( LPG Customer Service Cell ) किंवा जवळचे एल . पी . जी . कंपनीचे क्षेत्रिय कार्यालयात संपर्क साधावा . तसेच आपण तक्रार ऑनलाईन दाखल करू शकता किंवा कंपनीच्या हेल्पलाइन ऑइल इंडस्ट्री : 18002333555 ( टोल फ्री ) , भारत पेट्रोलियम : 020-26345141 / 42 , 26342176 , हिंदुस्थान पेट्रोलियम : 020-26213104 / 05 आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन : 020-26332661
प्रश्न : गॅस सिलेंडरमध्ये रात्री / सुट्टीचे दिवशी गळती झाल्यास संपर्क कोठे साधावा ?
उत्तर : गॅस सिलेंडरमध्ये रात्री / सुट्टीचे दिवशी गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यास तुम्ही राहत असलेल्या ठिकाणचे तात्काळ मदत केंद्र ( Emergency Service Cell ( ESC ) ) येथे संपर्क साधावा . गॅस रिफील पावतीचे मागील बाजूस तात्काळ मदत केंद्राचे ( Emergency Service Cell ( ESC ) ) दूरध्वनी क्रमांक नमूद आहेत . यासाठी सिलेंडर भरून घेताना गॅस एजन्सीकडून मिळालेली एक पावती जपून ठेवावी .
प्रश्न : नवीन गॅस कनेक्शन घेतेवेळी गॅस शेगडी व गॅस विषयक इतर साहित्य वितरकाकडून घेणे बंधनकारक आहे का ?
उत्तर : नाही तुम्ही गॅस वितरकाव्यतिरिक्त अन्य दुकानातून ISI प्रमाणित गॅस शेगडी खरेदी करू शकता . तुम्ही बाहेरून शेगडी घेतल्यास गॅस एजन्सीचा कर्मचारी तुमच्या घरी येऊन व्हेरीफिकेशन करतो त्यांची योग्य ती फिस भरावी व पावती घ्यावी . गॅस एजन्सीकडून शेगडी घेणे बंधनकारक नाही असा फलक एजन्सीच्या कार्यालयात दर्शनी भागात मराठी भाषेतून लावला पाहिजे असा शासन आदेश आहे . गॅस एजन्सीच्या ऑफिसमध्ये गॅस वितरकांचे नाव पत्ता संपर्क क्रमांक गॅस / तेल कंपनीच्या अधिकाऱ्याचे नाव पत्ता संपर्क क्रमांक ई मेल अॅड्रेस इत्यादी तपशील दर्शनी भागावर लावणे बंधनकारक आहे .
Hindustanpetroleum
Hindustan Petroleum Corporation Ltd. | Oil and Gas Company in India | HPCL
HPCL is a Government of India Enterprise with a Maharatna Status, and a Fortune 500 and Forbes 2000 company.
LPG Gas Booking जर एजन्सी चालक तुम्हाला शेगडी घेण्याची सक्ती करीत असेल तर तुम्ही तेल कपंनीच्या अधिकाऱ्यांकडे तसेच कंपनीच्या बेवसाईटवर जाऊन ऑनलाईन तक्रार नोंदवावी . संपर्क साधू शकता . तसेच आपल्या तालुक्यातील शिधावाटप अधिकारी वा तहसील कार्यालयातील पूरवठा अधिकारी यांच्याकडेही तक्रार करू शकता . प्रश्न : घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा मोटार सायकल , गिझर इत्यादी करिता वापर करता येईल का ? उत्तर : एल . पी . जी . नियंत्रण कायदान्वये घरगुती वापराचे गॅस सिलेंडरचा मोटार सायकल , गिझर इत्यादी करिता वापर करण्यास प्रतिबंध करणेत आला आहे . मोटार सायकलमध्ये Auto LPG चा वापर करू शकता . तथापि , घरगुती सिलेंडरचा वापर स्वयंपाकाचे इंधन ( cooking fuel ) म्हणूनच मर्यादित आहे .
येथे दिलेली माहिती ही तेल / गॅस कंपन्यांनी नागरिकांच्या माहितीस्तव प्रकाशीत केलेल्या सीटीजन चार्टर चा आधार घेऊन संकलीत केलेली आहे . जर गॅस एजन्सी चालक असे काही कायदेशीर नियम आहेत हे मान्य करीत नसेल तर गॅस एजन्सी चालकांना तसे लेखी मागा . म्हणजे त्यांच्याविरोधात तेलकंपनीकडे कारवाई करण्यास एक पुरावा राहिल .
Also Visit : https://www.postboxlive.com
इकबाल शेख