Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIALaw & OrderMAHARASHTRA

Define scrutiny छानणीचा अधिकार

1 Mins read

Define scrutiny छानणीचा अधिकार म्हणजे काय ? समजून घ्या तुमचे अधिकार 

 

24/11/2021,

छानणीचा अधिकार – define scrutiny

 मानवी हक्कांच्या पायमल्लीविषयक तक्रारींची चौकशी करण्यासाठी आयोगाकडे पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली स्वतःची तपास यंत्रणा आहे . १९९३ च्या कायद्याने एखादा शासकीय अधिकारी अथवा केंद्र वा राज्यशासनाच्या अन्वेषण शाखेच्या सेवेचा उपयोग करण्यासंबंधीचे अधिकारही आयोगास दिले आहेत . प्रसंगी आयोग बिगर शासकीय संस्थांचे साहाय्यदेखील घेत असतो .

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या कार्याचे मूल्यमापन

define scrutiny विविध कारणांमुळे ज्या व्यक्तीच्या , गटाच्या अथवा समूहांच्या मानवी हक्कांचा भंग झाला आहे त्यांना नुकसान भरपाई उपलब्ध करून देण्यासाठी शासनावर दबाव आणण्यात आयोग बऱ्याच अंशी यशस्वी ठरला आहे . अनेक प्रकरणात स्वयं आदेश देण्याचा अधिकारही आयोगाने कार्यक्षमपणे वापरला आहे . पोलीस कोठडीतील मृत्यू , खोट्या पोलीस चकमकी , पोलीस यंत्रणेकडून होणारे अत्याचार , स्त्री विरोधी हिंसा , बालमजुरी अशा मानवी हक्कासंदर्भातील महत्त्वपूर्ण व कळीच्या मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकला आहे . समाजातील ज्या घटकांकडे तक्रारी दाखल करण्यासाठी पर्याप्त आर्थिक व सामाजिक संसाधने उपलब्ध नाहीत अशा दुर्बलघटकांच्या मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आयोगाने आपल्या स्वतंत्र चौकशी अधिकारक्षेत्राचा प्रभावी वापर केला आहे .

अशारीतीने आयोगाने मानवी हक्क उल्लंघनाच्या अनेक प्रकरणांविषयी अहवाल तयार करणे व संबंधित यंत्रणेस त्यांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक कारवाई करण्यास भाग पाडले आहे . काश्मीरमधील परिस्थिती , ईशान्येकडील अशांतता , महाराष्ट्रा तील एन्रॉनविरोधी लढा , गुजरातमधील गोध्रा घटनेनंतर झालेला नरसंहार या घटनांच्या संदर्भात राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने केंद्र वा संबंधित राज्य शासन यंत्रणेकडून झालेले दुर्लक्ष अधोरेखित करून सक्रिय रस घेतला . या प्रकारणातील मानवी हक्क उल्लंघनाविषयीचे अहवालही सादर केले . गुजरातमध्ये गोध्रा दंगलीनंतर झालेल्या मानवी हक्क उल्लंघनाची परिस्थिती राज्यशासनाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळेच उद्भवली असे स्पष्ट मत व्यक्त करून शासकीय यंत्रणा मानवी हक्कांचे संरक्षण करण्यात पूर्णतः अपयशी ठरली असा निष्कर्ष काढला . विशेषतः बेस्ट बेकरी प्रकरणातील मानवी हक्क आयोगाची भूमिका महत्त्वपूर्ण मानावी लागते .

प्रचलित शासकीय यंत्रणेतील उणिवांमुळे होणाऱ्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाबाबत चौकशी करून आयोगाने प्रशासकीय यंत्रणेच्या सुधारणा प्रक्रियेस महत्त्वपूर्ण हातभार लावला आहे . तुरुंग , पोलीस कोठड्यातील अमानवी परिस्थिती सुधारण्यात आयोगाचे कार्य महत्त्वपूर्ण ठरले आहे . परिणामी पोलीस वा लष्करी दलांना ‘ मानवाधिकार आयोगा ‘ च्या पर्यवेक्षण यंत्रणेमुळे मनमानी प्रकारे कारभार करणे अवघड बनले आहे . तिहार जेलमधील सुधारणामागे मानवाधिकार आयोगाने सुपूर्द केलेल्या अहवालाचा सिंहाचा वाटा आहे . फौजदारी न्याय प्रक्रिया सधारणेबाबतही आयोगाने घेतलेला पुढाकार महत्त्वाचा ठरतो .

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने प्रचलित कायद्याचे पुनरावलोकन करून त्याद्वारे केल्या जाणाऱ्या मानवी हक्क उल्लंघनाची दखल घेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे . आयोगाने ‘ टाडा ‘ कायद्याच्या दमनकारी स्वरूपाचा सखोल अभ्यास करून विधी आयोगाला दुसरा मानवी कायदा स्वीकारण्याची शिफारस केली . विविध राज्ये व केंद्रपातळीवर ‘ टाडा ‘ चा गैरवापर कशाप्रकारे करण्यात आला याचे परीक्षण केल्यामुळे ‘ टाडा ‘ विषयी राष्ट्रीय स्तरावर चर्चाविश्व ढवळून निघाले . परिणामी १९९५ मध्ये दमनकारी स्वरूपाचा ‘ टाडा ‘ रद्द झाला . मानवी हक्कांविषयी | जाणीव सर्वदूर पसरावी यासाठी आयोगाने मानवाधिकार शिक्षण व प्रशिक्षणाच्या कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे . define scrutiny यासंदर्भात आयोगाने त्रिस्तरीय व्यूहरचना स्वीकारली आहे .

( १ ) राष्ट्रीय व राज्य पातळीवर राजकीय पक्षांनी मानवी | हक्कांचे संरक्षण व संवर्धन करावे यासाठी प्रोत्साहन देणे .

( २ ) सर्व राज्यांचे मुख्यमंत्री व उच्चाधिकारी यांच्या बैठका | आयोजित करणे .

( ३ ) केंद्रपातळीवर मानवी संसाधन विकास मंत्रालय आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण केंद्र ( एन . सी . इ . आर . टी . ) आणि घटकराज्य पातळीवरील अधिकृत शैक्षणिक यंत्रणेशी संवाद साधून शैक्षणिक अभ्यासक्रमात मानवी हक्कांचा समावेश करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे . आयोगाच्या सूचनांमुळेच अनेक विद्यापीठात मानवी हक्क विषयक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत .

define scrutiny पोलीस , लष्कर , निमलष्करी दले व इतर संबंधित शासकीय यंत्रणांना मानवी हक्कांविषयी संवेदनशील करण्यात आयोगाने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे . राज्याच्या पोलीस महासंचालकांबरोबर अनेक बैठका आयोजित करून पोलीस प्रशासनाच्या प्रशिक्षण प्रक्रियेत मानवी हक्कांचा अंतर्भाव केला आहे . सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सर्व शिक्षण संस्था १० डिसेंबर हा दिवस ‘ मानवी हक्क दिन ‘ म्हणून साजरा करतील यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत . एकंदर स्थापनेपासूनच आयोगाने मानवी हक्क संकल्पनेची जाणीव विस्तारण्याच्या कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे . एप्रिल २०१५ पर्यंत आयोगाकडे नव्याने ८ , ४८५ तक्रारी दाखल झाल्या तर नव्या व जुन्या मिळून ६ , ३२३ तक्रारी निकालात काढल्या . सध्या आयोगाकडे नव्या व जुन्या अशा एकूण ४५ , ९७६ तक्रारी प्रलंबित आहेत . यावरून मानवी हक्कविषयक वाढती | जाणीव लक्षात घेता येते .

टीका ( १ ) भारताने मानवी हक्कविषयक बांधीलकीमुळे नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील दबावामुळेच मानवी हक्क आयोगाची स्थापना केली , अशी तक्रार केली जाते . म्हणजे जागतिक व्यवस्थेतील आपले स्थान उंचावण्यासाठी व संभाव्य टीका टाळता यावी या हेतूनेच राष्ट्रीय आयोग नेमला . १९९९ मध्ये आशियाई विधी संसाधन केंद्राने संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मानवी हक्क आयोगापुढे असे प्रतिपादन केले की आशियाई जगतातील राष्ट्रे आपली राष्ट्रीय प्रतिमा सुधारावी आणि आंतरराष्ट्रीय दबाव , टीका वा छाननीचा बिमोड करता यावा यासाठीच मानवाधिकार आयोगाच्या यंत्रणेचा वापर करतात .

( २ ) भारताच्या संदर्भात पंजाब , ईशान्य व काश्मीरमधील अतिरेकीविरोधी कारवायांतील मानवी हक्क उल्लंघनासाठी भारतावर टीका केली जाते . ‘ अॅमनेस्टी इंटरनॅशनल ‘ व ‘ आशिया वॉच ‘ या मानवी हक्क क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांच्या टीकेमुळेच भारताने राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या स्थापनेसाठी पावले उचलली अशी टीका केली जाते .

( ३ ) त्याचप्रमाणे , भारताने आयोगाची स्थापना केली असली तरी आयोगास केवळ चौकशीचे अधिकार दिले , अशीही टीका केली जाते . आयोगास अंमलबजावणीविषयक अधिकार दिलेले नसल्यामुळे आयोगास केवळ एक सल्ला देणाऱ्या यंत्रणेचे स्वरूप प्राप्त झाले .

( ४ ) मानवी हक्क आयोगावर केली जाणारी आणखी एक मूलगामी टीका म्हणजे भारतीय मानवी हक्क संकल्पनेत समाविष्ट केलेले अधिकार हे प्रायः विधिवत , नागरी – राजकीय स्वरूपाचेच आहेत . म्हणजेच सामाजिक – आर्थिक स्वरूपाच्या मूलभूत मानवी हक्कांकडे दुर्लक्ष केले आहे . 

( ५ ) मानवाधिकार आयोगास लष्करी दलांकडून होणाऱ्या मानवी हक्क उल्लंघनाची छाननी करण्याचा अधिकार उपलब्ध नाही . त्यामुळे आयोगाचे कार्य मर्यादित होते अशी टीका केली जाते .

( ६ ) राष्ट्रीय मानवी हक्क आयोग व राज्य मानवी हक्क आयोगांचे कार्यक्षेत्र स्पष्टपणे नमूद केलेले नाही . त्यामुळे दोहोंच्या कार्यावर विपरीत परिणाम घडून येतो . _ _ _ भारतीय समाजात मानवी हक्क विषयक जाणीव उत्तरोत्तर वृद्धिंगत होत असल्यामुळे अनेक प्रकरणे आयोगापुढे येत आहेत . तथापि आयोगाकडे संदर्भित सर्वच खटल्यांची चौकशी करणे पर्याप्त यंत्रणेच्या अभावामुळे अशक्य बनते . त्यामुळे २००५ | मध्ये आयोगापुढे ५० , 000 तक्रारी प्रलंबित अवस्थेत होत्या . _ _ _ तसेच भारताने नागरी व राजकीय हक्कांवरील आंतरराष्ट्रीय करारास हातचा राखूनच मान्यता दिली आहे . उदा . मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्यास द्यावी लागणारी नुकसान भरपाई ठरवण्याचा अधिकार भारताने स्वतःकडेच ठेवला आहे . भारताने आजदेखील स्थलांतरित कामगारांचा हक्क ‘ , ‘ निर्वासितांच्या स्थानाबाबत ठराव ‘ , ‘ नागरी व राजकीय हक्कांच्या आंतरराष्ट्रीय करारनाम्यातील वैकल्पिक ठराव ‘ इ . महत्त्वपूर्ण करारांस अजूनही मान्यता दिलेली नाही . 

Also Visit : https://www.postboxlive.com

इकबाल शेख

 

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Leave a Reply

×
BLOGSINDIAMAHARASHTRA

वा.रा.कांत - बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात

error: Content is protected !!