Also Visit for Trending News & Article  Postbox Live

INDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

Essentials of Hindutva ? – जानव्याचे हिंदुत्व राष्ट्रीयत्वाची शेंडी

1 Mins read

Essentials of Hindutva ? – जानव्याचे हिंदुत्व राष्ट्रीयत्वाची शेंडी

Essentials of Hindutva ? – जानव्याचे हिंदुत्व राष्ट्रीयत्वाची शेंडी – ज्ञानेश महाराव

 

 

1/9/2021,

महाराष्ट्रात ‘काँग्रेस’ आणि ‘राष्ट्रवादी काँग्रेस’च्या साथीने उद्धव ठाकरे यांनी ‘महाविकास आघाडी’चं सरकार स्थापन केल्यापासून ‘आता हिंदुत्वाचं काय?’ असा

प्रश्न ‘भाजप’ नेते ‘शिवसेना’ला खिजवण्यासाठी आणि ‘हिंदुमत’ आपल्या बाजूला वळवण्यासाठी विचारत असतात. तेच नुकत्याच संपलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय

अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ”शिवसेनेचे हिंदुत्व हे शेंडी-जानव्याचे नाही,”

असं ठणकावून सांगतानाच ”बाबरी मशीद पाडल्यावर पळून जाणारे, त्याची जबाबदारी झटकणारे आता राम मंदिर बांधण्यासाठी देशभर दान- देणग्या गोळा करीत आहेत,” अशी थप्पडही लगावलीय.

ह्याचा अर्थ, ‘शिवसेना’ शेंडी- जानव्याच्या उद्योगापासून चार हात दूर आहे, असा होत नाही. तसं असतं तर स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन ह्या राष्ट्रीय

व राज्यीय उत्सवांच्या दिवशी ‘शिवसेना’च्या शाखा कार्यालयात भट-भिक्षुकांच्या हुकमी दक्षिणेचं ‘एटीएम कार्ड’ असणाऱ्या थोतांडी सत्यनारायणाच्या महापूजेचं

आयोजन झालं नसतं! नवरात्रात देवीचा गोंधळ घातला गेला नसता ! हे वास्तव दाखवून देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांना ते ऐकवून त्यांची ‘शेंडी-जानवं

विरोधी बोलती’ बंद करता आली असती. पण जातीसाठी माती कशासाठी खायची, हा प्रश्न आडवा आला असावा.

Essentials of Hindutva ? – असो.

यानिमित्ताने ‘भाजप’ला देशाची सत्ता मिळवून देणाऱ्या हिंदुत्वाचे प्रकार किती ? उद्धव ठाकरे म्हणतात, ते शेंडी-जानव्याचं हिंदुत्व म्हणजे काय व ते कसं आहे ?

याची चर्चा प्रसारमाध्यमातून व्हायला पाहिजे होती. तसं झालं नाही. कारण भारतीय ‘मीडिया’ आजही शेठजीला शेंडी लावणाऱ्या भटजीच्या जानवं-पाशात गुंतलेला आहे.

म्हणूनच पाकव्याप्त काश्मीरचं समर्थन आणि फुटीरतावाद्यांचं गुणगान करणार्‍या ‘पीडीपी’च्या मेहबूबा मुक्ती यांच्याबरोबर सत्तेसाठी युती करणाऱ्या ‘भाजप’बद्दल

अवाक्षर काढलं जात नाही. परंतु, ‘काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस’सह ‘महाविकास आघाडी’ची जुळवणूक झाल्यापासून ‘शिवसेनाची सुंता’ झाल्याचा शिमगा केला जातो.

तो ‘महाविकास आघाडी’ची सत्ता असेपर्यंत होतच राहणार ! कारण मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आणि सत्ताधारी पक्ष म्हणून ‘शिवसेना’ आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत आहे.

या जबाबदारीतूनच मुख्यमंत्र्यांनी ‘कोरोना लॉकडाऊन’च्या काळात देवळांसह सर्व धर्मांच्या प्रार्थनालयांना ‘कुलूप-बंद’ केलं होतं. गणेशोत्सव, नवरात्र उत्सव,

शिवजयंतीसह अन्य धर्मांच्या सार्वजनिक उत्सव- कार्यक्रमांनाही आवर घातला. Essentials of Hindutva ?

कथित- जागृत ‘लालबागचा राजा’च्या गणेशसेवकांना ‘प्लाझ्मा’ गोळा करण्याच्या कामाला लावलं. इतकं समाजोपयोगी काम करूनही त्यांच्या आणि ‘शिवसेना’च्या

हिंदुत्वाची तपासणी करण्याचा नादानपणा झाला.

‘मोदी सरकार’ने नेमलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तर मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे ‘आपण सेक्युलर झालात काय ?’ अशी विचारणा करणारा बेजबाबदारपणा केला.

यातून शेंडी-जानव्याचं हित पाहणारं हिंदुत्व हे लोकांसाठी किती आणि कसं घातक आहे, याचं प्रदर्शनच ह्या मंडळींच्या हलकटपणातून घडलं. अशा घातक हिंदुत्वाचा

स्वीकार आणि समर्थन करणारेही तितकेच नालायक असतात; आणि अशा नालायकीचा सत्तासंपादनासाठी वापर करणारे ‘महानालायक’ असतात.

अशांच्या ताब्यात आज देश असावा, ही तर शेंडी-जानव्याची कमाल आहे ! ती टिच्चून दाखवण्यासाठी ३,६०० कोटी रुपयांच्या लष्करी ‘राफेल’ विमानाचं स्वागत देशाचे

संरक्षणमंत्री विमानाची पूजा करून, चाकाला लिंबू-मिरची बांधून करताना दिसतात. प्रधानमंत्री गणपतीचं हत्तीचं डोकं ही ‘जगातील पहिली प्लास्टिक सर्जरी’ असल्याचं

‘सायन्स काँग्रेस’मध्ये सांगतात. ही सारी बेवकुफी जाणीवपूर्वक केली जाते. ती शेंडी-जानव्याच्या हिंदुत्वाला बळ देणारी आणि भट- भिक्षुकशाहीला माजवत; ब्राह्मणेतरांची

बुद्धी- उमेद नासवत खिसे-पाकीट कापणारी आहे. Essentials of Hindutva ?

असल्या हिंदुत्वाचा धर्माशी काडीचाही संबंध नाही. धर्म आत्मशक्ती देतो. भट-ब्राह्मण आत्मनाश करतो. दगडासमोर माणसाला नमवताना तो धर्माचीही माती करतो.

शेंडी-जानव्याची ही भटबाधा भुतापेक्षा भारी-भयानक आहे. कारण भूत एकावेळी एकालाच झपाटतं. भट एकाच वेळी अवघ्या कुटुंब-परिवाराला, समाजाला झपाटतो.

भूत आपल्या लीला रात्री दाखवतं. भट आपल्या करामती भरदिवसा दाखवतो. भूतं जिवंत माणसाला झपाटतात. भटं मेलेल्या माणसालाही सोडत नाही. पिठाच्या

गोळ्यांचे पिंड बनवून ते मृतांच्या आप्तांच्या अकलेचं श्राद्ध घालतात. भूत हा कल्पनेचा रोग आहे. तो डॉक्टरी उपचाराने दूर होतो. भट हा देव-देवळाच्या आधाराने

धर्माला बदनाम करणारा ‘राष्ट्रीय रोग’ आहे. तो निश्चयाने संपवला तरच संपेल.

यासाठी धार्मिक म्हणून मिरवणाऱ्या नामट्यांना शेंडी- जानव्याच्या गुलामीची जाणीव करून द्यायला हवी. सर्वच धर्मातले कट्टरपंथीय हेच त्यांच्या समाजाचे शत्रू असतात.

कारण त्यांची जगाबरोबर बदलण्याची तयारी नसते. अशांना आपल्या जोखडाचे बैल करण्याचं काम ‘शेंडी-जानवेधारी’ हिंदुत्व करते. ह्याची जाणीव ‘प्रबोधन’कार केशव सिताराम ठाकरे यांनी १०० वर्षांपूर्वी करून दिली आहे.

‘देवळांचा धर्म, धर्माची देवळे’ ह्या पुस्तिकेत ‘प्रबोधन’कार लिहितात,”हे भटबंगाल हिंदुस्थानच्या नकाशात सापडणारे नसून, ते थेट भटाच्या पोटात आहे. देवळांचा धर्म भटाच्या पोटापाण्याचे गुप्त मर्म आहे. या मर्माचे वर्म अफाट भटेतरांना कधीच उमगू नये, म्हणून भटांनी अठरा पुराणांची पैदास करून ठेवली आहे.” या पुराणांना ‘प्रबोधन’कारांनी ‘शौचकूप’ म्हटलंय. आजोबांच्या ह्या विचाराने उद्धव ठाकरे ‘संघ- भाजप’ परिवाराचं ‘शेंडी-जानव्या’चं हिंदुत्व नाकारीत असतील तर त्यांचं अभिनंदन
केलं पाहिजे !

स्वामीजींचे विचार, तुकोबांचा उपदेश –

Essentials of Hindutva ?

लोकशाहीत सत्ता हा धर्मशाही, राजेशाही, हुकूमशाही वा लष्करशाही यासारखा मनमानी प्रकार नाही. ‘लोकशाही’ ही सामाजिक सहजीवनाची व्यवस्था आहे. या व्यवस्थेला डळमळीत करणारा निर्णय सरकार घेऊ शकत नाही. म्हणूनच ”केंद्र सत्ता मिळताच अयोध्येत राम जन्मभूमी निर्माणासाठी कायदा बनवला जाईल,” अशा बाता ठोकणाऱ्या ‘भाजप’ला ‘मोदी सरकार’कडे बहुमत असूनही तसा कायदा बनवता आला नाही. मंदिर-मशीद जमीन हक्काचा न्यायनिवाडा सर्वोच्च न्यायालयाला करावा लागला. १५-२० वर्षांपूर्वीपर्यंत ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,’ व ‘भाजप’ची धार्मिक शाखा असलेल्या ‘विश्व हिंदू परिषद’चे नेते व साधू-महंत हे ”धार्मिक स्थळांबाबत सरकारचा व न्यायालयाचा हस्तक्षेप नको. त्याबाबतचा अंतिम निर्णय धर्मसभांचाच असल्याने अयोध्येतील राम मंदिर निर्माणाच्या प्रतिज्ञेशी आम्ही ठाम आहोत,”असं म्हणत.

तथापि, ह्या मंदिर-मशीद वादाची अखेर न्यायालयाच्या निर्णयानुसारच झाली. ह्या राम जन्मभूमी मंदिरासाठी देशाला वेठीस धरणाऱ्या आणि त्यासाठी सत्तेच्या बळावर करोडो रुपयांची दान-देणग्या जमवणाऱ्या व्यवहाराबद्दल स्वामी विवेकानंद काय म्हणतात, ते समजून घेणं जरुरीचं आहे.

स्वामीजी म्हणतात, “जुन्या रूढींचं, इतिहासाचं समर्थन करणं हे अत्यंत लज्जास्पद आहे. असे भोळसट होण्यापेक्षा तुम्ही नास्तिक झालात तरी चालेल! कारण नास्तिक हा खरा जिवंत मनुष्य असतो. निरीश्वरवादात एक प्रकारचं सामर्थ्य असतं. अंधश्रद्धा हा मृत्यू आहे. नास्तिकतेनेच राष्ट्र वर येण्याचा जास्त संभव आहे!” स्वामी विवेकानंद हे हिंदुत्ववादी विचाराचे पुरस्कर्ते होते. पण त्यांचं हिंदुत्व हे देव-दैव, शेंडी-जानवे ह्यात गुंतलेलं नव्हतं. ते ‘राष्ट्रीय’ होतं. त्यांचा हिंदुत्व आणि हिंदूराष्ट्राचा विचार स्वच्छ होता. त्यात बनवेगिरी नव्हती की, भगव्या-नागव्या सत्तेचा स्वार्थ नव्हता.

साधू-संन्याशांची मिरासदारी किती खोटी आहे, ते सांगताना‌ स्वामीजी म्हणतात, ”हिंदुस्थानातील साधू-संन्याशांनी गरिबांसाठी काय केलं ? तर, त्यांना अध्यात्म शिकवलं ! भुकेल्या माणसाला परमार्थ सांगणं ही धर्माची शुद्ध चेष्टा आहे. आज लक्षावधी लोक अन्नान्न करीत आहेत. ही जनता परमेश्वर नाही का ? भारताचं भवितव्य या जनतेवर आहे !” स्वामीजींचा हा विचार, “राम मंदिरासाठी रक्ताचे पाट वाहतील,” अशी भाषा वापरणाऱ्यांना ‘विवेकानंद केंद्रा’ची दुकानं चालवणाऱ्या कुणी ऐकवला नाही. कारण ह्या केंद्रांना ताब्यात ठेवणाऱ्या ‘शेंडी-जानवं’धारी हिंदुत्ववाद्यांनी विवेकानंदांच्या विचारांचीही पोथी केलीय ; आणि ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ अशी मांडणी करीत हिंदू-अहिंदूत भेद पाडलाय. ही दुफळी सत्ता स्वार्थासाठी आहे. त्यासाठी लोकांना भ्रमिष्ट करणारं ‘शेंडी-जानवं’धारी हिंदुत्व वापरलं जातं, म्हणून त्याचा धिक्कार करायचा ; राष्ट्रहितासाठी त्याला दूर ठेवायचं.

जगद्गुरू संत तुकाराम महाराज गाथेच्या अभंग क्रमांक ३९२५ मधून हेच सांगतात-
*शिखा सूत्र याचा, तोडी तू संबंध।*
*मग तुज बाध, नाही नाही॥*
*तुका म्हणे तरि, वर्तूनि निराळा।*
*उमटती कळा, ब्रह्मीचिया॥*
अर्थात, ”शिखा (शेंडी) आणि सूत्र(जानवं)धारींच्या अधीन असलेला संबंध तोडून टाकलास, तर तुला कशाचीही बाधा होणार नाही. तुका म्हणे, तू तुझं वर्तन बदल; म्हणजे ब्रह्मरूपाच्या कळा तुझ्या अंगी आपोआप प्रकट होतील!” ह्या बदलाची सुरुवात व्हावी.

बिबट्या छत्रपती, औरंगजेब देव –

Essentials of Hindutva ?

कोल्हापूरच्या ‘छत्रपती शिवाजीराजे विद्यापीठा’च्या पदवी परीक्षेच्या ‘इतिहास’ या विषयाच्या ‘लिमये-देसाई’ गाईडमध्ये औरंगजेबने संभाजीराजांची हत्या केली असताना, ‘वध’ केल्याचा उल्लेख असल्याचं नुकतंच ‘संभाजी बिग्रेड’च्या रूपेश पाटील यांनी उघडकीस आणलं. या प्रकरणी त्यांनी या गाईडचे प्रकाशक फडके यांना कान पकडून माफी मागायला लावून आवश्यक तो बदल करण्यास भाग पाडलं आहे. ‘वध’ हा शब्द पुराणकथात राक्षसासाठी वापरला जातो. दुष्ट,असुर शक्तीचा सूर-म्हणजे देवलोकांनी केलेला नाश म्हणजे ‘वध’! ‘रा.स्व.संघ- भाजप’चे ‘श्रद्धेय’ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचं म्हटलं जातं. तथापि, त्यासाठी ‘वध’ ह्या शब्दाचा वापर कुणी करीत नाही. पण महात्मा गांधी यांची हत्या झाली असताना खुनी नथुरामला देवपण देण्यासाठी ‘वध’ हा शब्द वापरला जातो. त्यावर आक्षेप घेतला जात असताना; संभाजीराजांच्या शेवटाला ‘वध’ म्हणून औरंगजेबला देवपण देण्याचं कारण काय? आणि ते छापणारे ‘फडके’ कसे? यापूर्वीही संत तुकाराम यांच्या संबंधाने बारावीच्या ‘अपेक्षित’ प्रश्नसंचात आक्षेपार्ह प्रश्न विचारणाऱ्या ‘जोग’ नावाच्या बाई असाव्यात आणि परधर्मीयांशी सौहार्दाने वागणाऱ्या शिवरायांना चापट्या मारायला हव्यात, अशी भाषा करणारा योगेश उपासनी असावा, हा योगायोग नाही.

तो जातिनिशी केलेला खोडसाळपणा आहे. तो मराठा-बहुजनांच्या जाणिवा किती तीव्र आहेत, ह्याचा अंदाज घेण्यासाठी वरचेवर केला जातो.
‘लोकशाहीर’ अमर शेख यांनी मराठी भाषेचा वापर योग्य प्रकारे व्हावा, यासाठी ‘माझी माय मरहट्टी’ ह्या कवितेतून विनवणी केलीय की,

श्वान मांजरीला रे कोणी।नका बोलवू मराठीतूनी
श्वान मांजरासाठी काही।माझी माय मराठी नाही.

तथापि, ‘इसापनीती’ आणि ‘पंचतंत्र’मधील बोलक्या पशू-पक्ष्यांच्या गोष्टी वाचून माणसातलं जनावर शोधणारे- दाखवणारे; पाळीव पशू-पक्ष्यांना थोरा-मोठ्यांची नावं देण्याची खोड सोडत नाहीत. ‘कुटुंब नियोजन’ ह्या उपक्रमाची देशात अभ्यासपूर्ण सुरुवात करणाऱ्या शकुंतला परांजपे ह्या विद्वान होत्या. १९८९ मध्ये देशात ‘जनता दल’ आणि ‘डाव्या आघाडी’चे सरकार आले. विश्वनाथ प्रताप सिंग देशाचे प्रधानमंत्री झाले. पुण्यात राहणाऱ्या शकुंतलाबाई तेव्हा ८४ वर्षांच्या होत्या. घरात एकट्याच राहायच्या. त्यांच्या घरात तीन मांजरं होती. तीनही बोके असल्याने त्यांची नावं त्यांनी ‘विश्वनाथ, प्रताप, सिंग’ अशी ठेवली होती. ह्यात खट्याळपणा होता. पण ‘मीडिया’तून त्याचंही खूप कौतुक झालं.

अलीकडेच, मुंबईतील बोरीवली येथील ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’मधील बिबट्यांच्या सहजीवनाचा आणि मानवी जीवनाशी होत असलेल्या संघर्षाचा अभ्यास करण्यासाठी बिबट्यांना GPS-GAS कॉलर बसवण्याचा उपक्रम झाला. त्याची बातमी झाली. तीत संतापकारी माहिती आहे. या बातमीनुसार, ‘कॉलर’ बसवण्यासाठी पकडलेल्या एका नर बिबट्यास ‘शिवजयंती’चं निमित्त साधून ‘महाराज’ असं नाव देण्यात आलं. तर मादी बिबट्याला ‘समाज सुधारक’ सावित्रीबाई फुले यांच्या स्मरणार्थ ‘सावित्री’ असं नाव दिलं. ”ही सावित्री मुंबईतील बिबट्यांविषयीचे आमचे अज्ञान दूर करील,” अशी आशा वनाधिकारींनी व्यक्त केल्याचं बातमीत म्हटलंय.

आधी थोरा-मोठ्यांची नावं प्राण्यांना ठेवण्याचा मूर्खपणा करायचा आणि वर आपलं अज्ञान दूर करण्याची अपेक्षा ठेवायची, हा अतिमूर्खपणा आहे. हा बिडीला ‘शिवाजी-संभाजी’ ह्या छत्रपतींची नावं देण्यासारखाच प्रकार आहे. तो छत्रपतींच्या आणि सावित्रीबाईंच्या विचार पाईकांनी तातडीने दूर केला पाहिजे.
पशू-पक्ष्यांच्या मोजणी- अभ्यासासाठी अक्षरं आणि आकडे ‘कोडिंग’साठी वापरतात. तीच वापरावीत. प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांनाही नट-नट्यांची नावं ठेवतात. तेही चुकीचं आहे. अन्यथा मिशाळ बिबट्याला ‘टिळक’, उड्या मारणाऱ्या बिबट्याला ‘सावरकर’ अशी नावं दिली जातील. हे योग्य नाही.

-ज्ञानेश महाराव

Leave a Reply

%d bloggers like this: