Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

INDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

Tv Journalism – विनोद दुआ

1 Mins read

Tv Journalism – टीव्ही पत्रकारितेचा आदर्श, विनोद दुआ

14/12/2021,

Tv Journalism टीव्ही पत्रकारितेचा आदर्श, विनोद दुआ

न्यूज चॅनेलच्या जमान्यात एखादा अपवाद वगळता सध्या जे काही चालले आहे. ते उबग आणणारे आहे. देशातील वास्तव आणि न्यूज चॅनेलवर होणारा कंठशोष याची नाळ कुठेही जुळत असल्याचे दिसत नाही. टीआरपी, सत्ताधाऱ्यांचा दबाव, मालक वर्गाची व्यावहारिक मानसिकता हे यास कारणीभूत असावे. अशा काळात विनोद दुआ यांच्यासारख्या संयमी, व्यासंगी Tv Journalism पत्रकाराने आपल्यातून एक्झीट घेतली आहे. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

सभ्यता, शालीनता, संयम आणि थेट वास्तवाला भिडण्याची त्यांची भाषा, वाणी होती. संवेदनशील मनाचे पण सत्याचा अडखळ मार्गाने वाटचाल करणारे विनोद दुआ हे संयमीपणाने संवाद करीत असत. त्यांनी निर्माण केलेल्या प्रश्नामुळे कोणाचे हितसंबंध दुखावले जात असतील त्याचा आपण जास्त विचार करु नये या मताचे होते. उघडे नागडे वास्तव लोकांसमोर आणताना त्यांनी एक तत्वाचा आब प्राणपणाने शेवटपर्यंत जपला होता.
टीव्हीच्या पडद्यासमोर प्रकट झाल्यानंतर त्यांची बोलण्याची लकब छाप पाडणारी होती. पाणीदार डोळ्यांची अदा आणि समोरच्या व्यक्तीच्या मनात थेट प्रवेश करण्याची लीला आगळीवेगळी होती. संवाद, शब्दफेक यात ते माहीर होते. त्यांनी आपल्या जीवनात हिंदीला महत्व दिली. हिंदी पत्रकारितेला वेगळा आयाम दिला. इंग्रजीवर त्यांचे प्रभुत्व होते. पण उर्दू, पंजाबी आणि हिंदी भाषेवर त्यांची कमांड होती. खवय्या असलेला माणूस हा विविध खाद्यपदार्थांच्या प्रांतात आवडीने सफर करुन त्यांनी खाद्यसंस्कृती लोकांसमोर आणण्याचे काम वेगळ्या अंदाजाने केले आहे.

लोकसभा, विधानसभा सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या की, मतदानपूर्व निकालाचा अंदाज, मतमोजणीच्या फेऱ्या, त्यातील मतदानाचा कल, प्रत्यक्ष निकाल आणि निकालाची कारणमीमांसा सहज मांडून निवडणुकांचे विश्लेषा टीव्ही माध्यमातून संपूर्ण देशभरात प्रभावीपणे करुन देणारे Tv Journalism ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचा आवाज आता कानावर पडणार नाही. तब्बल ४२ वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात वावरणारे विनोद दुआ यांनी सत्याची कास धरुन पत्रकारितेत शिखर गाठले. ते सतत सत्याच्या अवघड मार्गाने चालत राहिले.

गेल्या जून महिन्यात त्यांची पत्नी रेडियोलॉजिस्ट पद्मावती यांचे करोना संसर्गामुळे निधन झाले. त्याचवेळी प्रकृती व करोना संसर्गामुळे विनोद दुआ यांचा जीवनमरणाशी संघर्ष सुरु होता. पत्नीचे निधन झाल्यानंतर त्यांनी भावविवश होऊन लिहले होते की, माझी आई ही पत्नीसोबत स्वर्गात आनंदी जगत असेल. तेथे त्या दोघी गाणी गुणगुणने, उत्तम खाद्यपदार्थ तयार करणे, भटकंती करणे आणि परस्परांशी भांडण्यातही वेळ घालवित असतील. असे त्यांनी भावनिक होत लिहले होते.

एनडीटीव्ही न्यूज चॅनेलवर खबरदार इंडिया, विनोद दुआ लाईव्ह, जायका इंडिया का, दूरदर्शनवर जनवाणी असे त्यांनी अनेक कार्यक्रम सादर केले. निवडणूक व्यवस्थापन शास्त्र खासकरुन सार्वत्रिक निवडणुकांचे विश्लेषण करण्याचा त्यांचा हातखंडा होता. प्रणय रॉय आणि विनोद दुआ ही जोडगळी त्यांच्या व्यासंगपूर्ण विश्लेषणामुळे देशाच्या घराघरात पोहोचली होती. Tv Journalism न्यूज चॅनेलवरील बातम्या आणि अन्य स्वरुपातील कार्यक्रमात उत्तम सादरीकरण करण्याच्या क्षेत्रात ते ऑयडॉल होते.

चार दशकांच्या प्रवासात असंख्य दर्शकांच्या काही पिढ्या तयार झाल्या आहेत. टेलिव्हीजन यात होणारे बदल, Tv Journalism न्यूज चॅनेलचा प्रवास यात त्यांनी एक आदर्श घर तयार केलेले आहे. ते न्यूज चॅनेलच्या पत्रकारितेचे गाईडलाईन, मॅन्युअल होते. पत्रकारितेच्या प्रथमश्रेणीचा आब राखताना आपण कसे बोलावे, बोलण्याचा अंदाज काय असावा, सादरीकरणीत देहबोली आणि संवाद साधताना भाव काय असावा याचे ते उत्तम उदाहरण होते. संगीत हा त्यांचा आवडता प्रांत होता. न्यूज चॅनेलच्या कार्यालयात जातानाही ते सतत गाणे गुणगुणत जायचे. ते प्रसन्न व्यक्तीमत्व होते.
प्रश्न विचारतानाही त्यांनी त्याचा दर्जा राखला. समोरच्या बोलते करुन लोकांना हवी असलेली माहिती काढण्यात त्यांचा हातखंडा होता. प्रश्न विचारताना त्यांची खास लकब होती. आता हिंदी चॅनेलवर बहुतांश न्यूज अँकर कसे बोलतात याविषयी न बोललेले बरे. न्यूज चॅनेलवर समृद्ध विरासत अर्थात पत्रकारितेत त्यांनी निर्माण केली. ते ओल्ड स्कूलचे नव्हते. नेहमी काळाबरोबर असणारा हा माणूस होता. समाजजीवनाच्या विविध क्षेत्रातील माहितीचा खजाना त्यांच्याकडे होता. तल्लख विनोदबुद्धी आणि दांडगी स्मरणशक्ती याची त्यांनी दैवी देणगी होती.

मंत्र्यांना प्रश्न विचारणे आणि माहिती काढून घेणे हा त्यांचा वेगळा अंदाज होता. हिंदी, उर्दू पंजाबी भाषा त्यांना चांगल्या अवगत होत्या. इंग्रजीवर त्यांचे प्रभुत्व होते. खवय्ये आणि खाद्यपदार्थांचे शौकीन होते. ते स्वत उत्तम खाद्यपदार्थ तयार करीत असत. देशाच्या विविध प्रांतातून भटकंती करुन लोकांशी संवाद साधायचे. देशाच्या प्रत्येक प्रांतात ते गेले. दिल्लीत जुन्या चेहऱ्यातील एक अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या बोलण्यात दिल्ली झळकत असे.

इतके त्यांची दिल्लीवर निस्सीम प्रेम होते.

एनडीटीव्हीशी जुने नाते असलेले आणि न्यूज चॅनेल आणि हिंदी Tv Journalism पत्रकारितेच्या प्रांतात आपली वेगळी विरासत निर्माण करणारे चतुरस्त्र, बहुआयामी व्यकतीमत्व असलेल्या बुजूर्ग पत्रकार विनोद दुआ यांना ६७ वर्षांचे आयुष्य लाभले. ते समाधानी आणि परिपूर्ण जीवन जगले. त्यांच्या पश्चात मल्लिका आणि बकुल या दोन कन्या आहेत. विनोद दुआ अलविदा.

समीर मणियार

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Leave a Reply

error: Content is protected !!