Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIALaw & OrderMAHARASHTRAReal Estate

saat bara – सात बारा

1 Mins read

saat bara – सात बारा उताऱ्याचा नमुना बदलतो म्हणजे नेमके काय होते ? समजून घ्या 

1/11/2021,

saat bara – सात बारा उताऱ्याचा नमुना बदलतो म्हणजे नेमके काय होते ? समजून घ्या 

सातबारा saat bara उताऱ्याचा नमुना बदलणार म्हणजे नेमके काय होणार?
नविन सातबारा उताऱ्यात झालेले बदल आपण समजुन घेण्याआधी सातबारा उतारा म्हणजे नेमके काय ते थोडक्यात समजुन घेऊया.

सात म्हणजे जमीन मालकी (भोगवटादार) असलेल्यांची नावे आणि त्यांच्याकडे असलेले क्षेत्र.
तसेच बारा म्हणजे यात पिक पाण्याची असलेली नोंद.

यामुळेच त्याला सातबारा saat bara उतारा म्हटले जाते. आता यात बदल होणार असल्यामुळे तो समजण्यासाठी अधिक सोपा आणि माहितीपुर्ण होणार आहे.
आपल्या राज्यात जमीनीच्या मालकी हक्काचा पुरावा म्हणुन सातबारा उतारा वापरला जातो. पण अनेकदा खोटा saat bara सातबारा उतारा दाखवुन जमीनीची परस्पर खरेदीविक्री केल्याचे अथवा जमीनीवर कर्ज वगैरे घेऊन फसवणुकीचे प्रकार घडत असतात. सातबारा उतारा हा शासकिय भाषेत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्यातली माहिती समजत नाही व त्यामुळे अनेकदा फवसणुकीचे प्रकार घडतात. यामुळेच काही महिन्यांपुर्वी महसुल विभागाने सातबारा उतार्यात बदल करण्याचा निर्णय घेतला होता व त्याची आता अंमलबजावणी सुरु झालेली आहे.
आता यापुढे नविन नमुन्यामध्ये सातबारा मिळणार म्हटल्यावर त्यात झालेले बदल माहित करुन घेणे गरजेचे आहेच ना, तर चला काय बदल झालेत ते पाहुया.

1. गावनमुना, saat bara सातबारा उतारा व 8 (अ) वर मध्यभागी महाराष्ट्र शासनाचा आणि ई-महाभुमीचा लोगो वाॅटरमार्क स्वरुपात असणार आहे.
2. सातबारा उतार्यावर गावाच्या नावासोबतच लोकल गव्हर्मेंट डिरेक्टरी (LGD) चा कोड असणार आहे.
3. शेती आणि बिनशेती (NA) साठी वेगवेगळा सातबारा असणार आहे.
4. लागवडी योग्य क्षेत्र, पोट खराबा क्षेत्र यासोबतच एकुण क्षेत्र (अ+ब) स्वतंत्रपणे दाखवले जाणार आहे.
5. शेती क्षेत्रासाठी हे.आर.चौ.मी. आणि बिनशेती क्षेत्रासाठी आर.चौ.मी. हे एकक असणार आहे.
6. खाते क्रमांक यापुर्वी इतर हक्कांच्या रकान्यात कंसात नमुद केला जात असे तो आता खातेदारांच्या नावासोबतच दर्शवला जाणार आहे.
7. मयत खातेदार अथवा संपुर्ण क्षेत्र विक्री केलेले खातेदार व इतर हक्कातील कमी केलेले कर्ज, बोजा, इतर नोंदी कंस करुन दर्शवल्या जात होत्या त्या आता कंस करुन त्यावर एक आडवी रेश मारुन खोडुन दर्शवले जाणार आहे.
8. नमुना 7 वर नोंदवलेले परंतु निर्गत न झालेले प्रलंबित असेपर्यंत प्रलंबित फेरफार म्हणुन इतर हक्क रकान्याखाली विशेष रकान्यात दर्शवले जाणार आहे.
9. नमुना 7 वर नोंदवण्यात आलेला शेवटचा फेरफार क्रमांक व त्याचा दिनांक इतर हक्क रकान्याच्या खाली शेवटच्या विशेष रकान्यात दाखवला जाणार आहे. तसेच सर्व जुने फेरफार क्रमांक नविन रकान्यात एकत्र दर्शवले जाणार आहेत.
10. भुमापन क्रमांक व उपविभाग क्रमांकावर एकही फेरफार प्रलंबित नसल्यास प्रलंबित फेरफार नाही असे लिहुन दर्शवण्यात येणार आहे.
11. बिनशेती क्षेत्रासाठीच्या नमुन्यावर 12 छापला जाणार नाही कारण बिनशेती NA क्षेत्रावर त्याची गरज नसते. तो फक्त नमुना 7 असणार आहे.
12. क्षेत्र अकृषि क्षेत्रामध्ये रुपांतरीत झाले असल्यास या क्षेत्रासाठी गावनमुना नंबर 12 ची आवश्यकता नाही असे छापुन येणार आहे.

 प्लाॅट/शेतीचे saat bara सातबारा उतारे काढुन त्यात काय काय माहिती दिली आहे ती तपासुन पहा.

Also Visit : https://www.postboxlive.com

Postbox India

 

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Leave a Reply

×
BLOGSINDIAMAHARASHTRA

वा.रा.कांत - बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात

error: Content is protected !!