putalabai – छत्रपती शिवाजीमहाराज पुतळाबाई राणीसाहेब
putalabai – छत्रपती शिवाजीमहाराज पुतळाबाई राणीसाहेब यांचा विवाह
छत्रपती शिवरायांचा आणि पुतळाबाई राणीसाहेब यांचा विवाह १५ एप्रिल १६५३ मध्ये पुणे येथील शहाजी राजांच्या जहागिरीत थाटामाटात पार पडला. पुतळाबाई राणीसाहेब या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिसर्या पत्नी होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर पुतळाबाई राणीसाहेब एक निष्ठावंत पत्नी म्हणून राजांच्याबरोबर राहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर स्वराज्याच्या जडण-घडणीत putalabai पुतळाबाई राणीसाहेब यांचे मोठेच योगदान होते. सईबाई राणीसाहेब यांच्या मृत्यूनंतर राजांना आधार वाटत होता तो म्हणजे धाकल्या राणीसाहेब श्रीमंत सकल सौभाग्य संपन्न पुतळाबाई राणीसाहेब यांचा.
पुतळाबाई राणीसाहेब निपुत्रिक असूनही त्यांनी संभाजीराजांना आपल्या अगदी पोटच्या मुलाप्रमाणे वाढवले ,संस्कारी बनवले त्यांच्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची त्यांनी पुरेपुर काळजी घेतली .putalabai पुतळाबाई राणीसाहेब अत्यंत प्रेमळ, मायाळू आणि छत्रपती शिवाजीमहाराज आणि शंभूराजे यांच्यावर अतिशय प्रेम करणाऱ्या अशा राणीसाहेब होत्या .आयुष्यभर छत्रपती शिवरायांना मोठा आधार होता तो फक्त जिजाऊंचा त्यानंतर सईबाई राणीसाहेब यांचा व तद्नंतर राजांना आधार वाटत होता तो फक्त श्रीमंत सकल सौभाग्य संपन्न पुतळाबाई राणी साहेब यांचाच.
राजांनी आपल्या मनीच्या व्यथा काही काळ पुतळा राणी साहेबांकडे कथित केल्या होत्या. putalabai पुतळाबाई राणीसाहेब यांनी आपले आयुष्य राजांच्या नुसत्या चरणांकडे पाहून व्यतीत केले होते . कधीही खालची मान वर केली नाही . भोसले घराण्याची मान , मर्यादा, इब्रत त्यांनी प्राणापलीकडे जपली त्या योगदानामधे पुतळाबाई राणी साहेब यांचे अमूल्य योगदान आहे. ते अखेरपर्यंत महाराजांच्या इच्छेप्रमाणे वाजल्या शिवरायांच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी स्वराज्याचा कारभार छत्रपती संभाजी महाराजांच्या हाती सोपवला पुतळा राणी चा महाराजांमध्ये खूप जीव होता संभाजीराजांच्या मातोश्री सईसाहेब यांच्या मृत्यूनंतर शंभूराजांना पुतळा मातोश्रींनी मायेने जवळ केले होते . महाराजांच्या निधनानंतर पुतळा आणि अत्यंत शोकमग्न झाल्या राणीसाहेब एकाकी पडल्या त्यांना साथ दिली होती.
अनेक वेळा आजूबाजूला चाललेल्या गोष्टी पाहून त्या व्यथित झाल्या होत्या. मात्र शंभूराजांना त्यांनी कधीच अंतर दिले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर सोयराबाई राणीसाहेब आणि कारभाऱ्यांनी शंभूराजेंविरूद कटकारस्थान सुरू केले. सत्तेसाठी प्रत्यक्ष आईने आपल्यासोबत असे कटकारस्थान करावे हे पाहून छ.संभाजीराजे कासावीस झाले होते. जणू काही संपूर्ण रायगडच त्यांचा दुश्मन बनला आहे. या सर्वात गडावरील एकच व्यक्ती संभाजी महाराजांसोबत होती ती म्हणजे पुतळाबाईसाहेब.
सईबाई सोडून गेल्यानंतर आई म्हणून पुतळाबाईंनीच शंभूराजांना जवळ केले, मायेने त्यांना साथ दिली. अनेक वेळा आजूबाजूला चाललेल्या गोष्टी पाहून त्या हतबल झाल्या मात्र शंभूराजांना त्यांनी कधीच अंतर दिले नाही. म्हणूनच आज संभाजी महाराजांसाठी त्याच आई आणि त्याच वडील होत्या. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर ८५ दिवसांनी पुतळाबाई राणीसाहेब सती गेल्या . आज एक आई आणि एक पत्नी कशी असावी याचा दाखला देण्यासाठी पुतळाबाई साहेबांचे नाव घेतले जाते.
संभाजीराजांना अगदी आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे वाढवले, संस्कारी बनवले. शिवरायांच्या पुत्राकडून चूक होणार नाही, हे लक्षात घेऊन प्रत्येकवेळी त्यांना समजून घेतले, त्यांच्या चढ उतार काळात त्यांना साथ दिली. ममतेचा महामेरू, वात्सल्याची मूर्ती म्हणून पुतळाबाई साहेबांकडे पहिले जाते.
छत्रपती शिवरायांचे निधन झाल्यावर राजांचा अंत्यविधी घाई-घाईने उरकण्यात आला. राजांच्या निधनानंतर एकही पत्नी सती गेली नाही. कारण राजांनी सतीप्रथा बंद केली होती. पण पुढे पुतळाबाई राणीसाहेबी सती गेल्या. भारतातील सती प्रथेला प्रखर विरोध करणारे छत्रपती शिवाजीराजे हे पहिले राजे आहेत. राजांनी शहाजीराजांच्या अपघाती निधनानंतर सती चाललेल्या स्वत:च्या मातोश्री जिजाऊमाँसाहेब यांना सती जाण्यास विरोध केला व या क्रूर परंपरेला तिलांजली दिली.
शिवापुर शकावली व मराठा साम्राज्याची छोटी बखर सांगते की, शिवरायांच्या निधनानंतर संभाजीराजेंच्या परवानगीने आषाढ शुद्ध एकादशी शके १६०२ (२७ जुन १६८०) रोजी छत्रपती शिवरायांचे जोडे घेऊन पुतळाबाई राणीसाहेब गेल्या. शिवतिर्थ रायगडावर सती जाणाऱ्या पुतळाबाई या एकमेव राणी होत्या. त्यानंतरच्या काळात putalabai पुतळाराणीसाहेब यांचा कुठेही उल्लेख दिसत नाही व मृत्यूबाबतही पुरेशी खरी माहिती उपलब्ध होत नाही. छत्रपती शिवरायांच्या समाधीच्या बाजूला जी वाघ्या कुत्र्याची समाधी सांगितली जाते ती वाघ्याची नसून पुतळाराणीसाहेब यांची असल्याचे काही इतिहासकार सांगतात.
छत्रपती शिवाजी महाराज व पुतळाबाई राणीसाहेब यांना आमचा मानाचा मुजरा
लेखन
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे
संदर्भ
शिवपत्नी महाराणी सईबाई

पुस्तकाचे नाव :- शिवपत्नी महाराणी
सईबाई
लेखक :- डॅा. सुवर्णा नाईक
निंबाळकर
प्रकाशन :- संस्कृती प्रकाशन
किंमत :- ₹ २५०/-
पृष्ठे :- २०८
‘महाराणी सईबाई’ यांचे चरित्र म्हणजे नाईक निंबाळकर घराण्याची सुकन्या, भोसल्यांची सून, राजमाता जिजाऊ साहेबांची सून, छ.शिवाजी महाराजांची पत्नी व छ. संभाजी राजांच्या मातोश्री अशा विविध अंगाने लेखिकेने सईबाईंच्या व्यक्तिमत्वाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ २६ वर्षाचे आयुष्य त्यांच्या वाट्याला आले होते. त्यात १९ वर्ष त्या छत्रपती शिवाजी राजांसोबत होत्या पण इतिहासांत त्यांच्या विषयी फार नोंदी आल्या नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात त्यांचे स्थान मोठे होते. त्यांना तीन मुली व एक मुलगा अशी चार अपत्ये झाली. पण त्यांचा अकाली मृत्यू झाला.
या पुस्तकात सईबाईंचे माहेर, सासर भोसले घराणे, सईबाईंचे बालपण, छत्रपती शिवाजी महाराज व सईबाईंचे सहजीवन, जिजाऊ साहेब व सईबाई राणीसाहेब यांचे प्रेमळ संबंध, सईबाई राणीसाहेबांचा परिवार व मुलींचे विवाह, सईबाईंचे महानिर्वाण अशा प्रकरणात त्यांच्या चरित्र मांडणीला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न लेखिकेने उपलब्ध साधनसामग्रीवर दिलेला आहे.
डॅा. सुवर्णा निंबाळकर यांनी भोसले घराण्यातील राजमाता जिजाऊसाहेब, महाराणी सईबाई, महाराणी येसूबाई व महाराणी ताराराणी अशा चार कर्तृत्ववान महिलांवर संशोधनपर चरित्रपर लेखन केले आहे. आपण ते जरूर वाचायलाच हवे..!!!
आपल्या संग्रही हवीतच ही ऐतिहासिक चरित्र..!!
विशेष टीप :- शिवस्पर्श प्रकाशनाची आणि डॅा.आ.ह. साळुंखे व प्रा. मा.म.देशमुख तसेच पुरोगामी चळवळीच्या लोकांनी वाचायलाच हवीत अशी इतर अनेक पुस्तके आमच्याकडे उपलब्ध. जरूर मागवा
परस्परांना पुस्तके भेट द्या. वाचन चळवळ जोपासा
-ॲड.शैलजा मोळक
मी वाचक-लेखक # वाचन संस्कृती
शिवस्फूर्ती मीडिया सेंटर व शिवस्पर्श प्रकाशन पुणे
पुस्तके मागवण्यासाठी संपर्क :-
9823627244
The post putalabai – छत्रपती शिवाजीमहाराज पुतळाबाई राणीसाहेब appeared first on Postbox India.