Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGS

Police story रुक्मिणी बाल मैत्रीण ते लेडि सींघम

1 Mins read

 

रुक्मिणी या एका खेड्यातील ऊच्च शिक्षित कुटुंबातून आलेल्या आहेत. त्यांची इथपर्यंतची वाटचाल हा अविश्रांत धडपडीचा इतिहास आहे.पो.निरीक्षक ते सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून वेगळी वाट स्वीकारणारी, कर्तृत्ववान स्त्री अशी त्यांनी स्वत:ची ओळख स्वकर्तृत्वातून निर्माण केली आहे. मळलेल्या वाटेवर पावले न रुळवता आपली स्वतःची वाट त्यांनी निर्माण केली.कोणताही घराण्यातील वारसा नसताना हे अनोखे क्षेत्र आपलेसे करून रुक्मिणी यांनी घेतलेली भरारी Police story निश्चितच कौतुकास्पद आहे.

धडाडीने काम करत राहाणे त्यांच्या यशाचे खरे गमक आहे.तिचे धडाडीचे वागणे ,तेजस्वी व्यक्तिमत्व,जनतेबद्दल तळमळ, कार्याचा आवाका, समस्यांची जाण, तळागाळातल्या लोकांशी असलेले नाते, पोलीस अधिकाराच्या पलीकडे जाऊन सर्वांशी असलेली मैत्री, त्यांचा सहवास, त्यांचा संघर्ष, त्यांच्यामधील सकारात्मक उर्जा ..सगळेच विलक्षण…. रुक्मिणी आगलावे या माझ्या बहिणीची खास मैत्रीण .लहानपणी तिला आमच्या वाड्यात अभ्यासाला आलेली मला चांगले आठवते.मी बऱ्याच वेळेला या सर्वांना पाहात होते. मला वाटतं या मुलींचा ग्रुप अतिशय जिव्हाळ्याचा असा ग्रुप होता.

Police story रुक्मिणी ही ऊच्यशिक्षीत कुटुंबात गावापासून अगदी दूर असणाऱ्या आगलावे वस्ती येथे राहत होती. घरामध्ये वडील प्राथमिक शिक्षक, त्यामुळे घरात शैक्षणिक वातावरण होते. .घरापासून शाळा अत्यंत दूरच्या ठिकाणी म्हणजे गावात होती. ऊन ,वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता रुक्मिणी प्रामाणिकपणे आपली शाळा अभ्यास यामध्ये कार्यरत असत. रुक्मिणी अत्यंत धडाडीची आपण काहीतरी करून दाखवायचे यावर ती नेहमीच ठाम असे. तिला लहानपणापासून देशसेवा करण्याची फार आवड होती. खडतर प्रवास ,अवघड परीक्षा, खेड्यातील अनेक अनुभव रुक्मिणीच्या पाठीशी होते. पहिली ते चौथी शाळा जिल्हा परिषद शाळेत झाली होती. मला वाटते घरातून शिक्षणासाठीही बेताचाच पाठिंबा असेल असे मला वाटते.

कारण त्या काळात मुलींनी शिकले पाहिजे असे वातावरणच नव्हते ज्या वयात मुली बाहुल्या आणि खेळण्यांनी खेळत असत ,तेव्हा रुक्मिणी यांनी राष्ट्रध्वजाचा ध्यास घेतला होता. Police story लहानपणापासूनच जेव्हा जेव्हा तिरंगा फडकावला जायचा तेव्हा रुक्मिणीचा ऊर अभिमानाने भरून यायचा आणि अभिमानाची भावना तिच्यात जागृत व्हायची. तिला माहित नव्हते की ती केवळ पोलिस दलातच सामील होणार नव्हती तर तिच्या कारकिर्दीत ती अनेक वेळा आपला आवडता राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान मिळवणार होती. घरात सर्वात लहान ,लाडकी रुक्मिणी, तिला अभ्यासाची आवड होती आणि ती तिच्या कॉलेजमध्ये पोहोचण्यासाठी ५ कि.मी अंतर चालत असे. “ते दिवस कठीण तसेच आकर्षकही होते.

 

Also Visit : https://www.postboxlive.com

 

तिच्या घरापासून जवळपास ५ कि.मी अंतरावर असलेल्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी ती चिखलाच्या खड्ड्यांतून ,काट्याकुट्यातून चालत असे. या दैनंदिन व्यायामामुळे रुक्मिणीमधे आत्मविश्वास-शिस्त, धैर्य आणि दृढनिश्चय यांचा समावेश झाला होता. राष्ट्रध्वजाबद्दलचे तिचे आकर्षण आठवून ती म्हणते, “२६ जानेवारीला शाळेच्या आवारात तिरंगा फडकवताना मी फक्त ७ वर्षांची होती .तिला ध्वजारोहणाची संधी न मिळाल्याने ती खूप नाराज होती. मुख्याध्यापक हाके सर यांनी तिचा रडवेला चेहरा पाहून तिला स्टेजवर यायला सांगितले. त्यांनी तिचा हात धरला आणि सर्वांनी मिळून ध्वजारोहण केले.

तिच्याकडे पाहून त्या म्हणाल्या होत्या , मला खात्री आहे की तू एक दिवस देशाची सेवा करशील. त्याच्या बोलण्याने तिला खूप आनंद झाला होता. हे शब्द तिच्या मनावर खोलवर घर करून राहिले होते. आई-वडिलांनी मात्र तिच्यासाठी वेगवेगळे बेत आखले होते.तिचे एक मामा आर्मीत होते आणि पुण्यात राहत होते. त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने ती पुण्याला गेली. Police story पुण्यात असताना तिने एम.पी.एससी. परीक्षेची जाहिरात पाहिली.

आणि पहिल्याच प्रयत्नात ती उत्तीर्ण झाली. Police story पोलिस निरीक्षक ते सहाय्यक पोलीस आयुक्त हा प्रवास अत्यंत धडाडीचा व प्रेरणादायी ठरला.पोलीस दीदी हा उपक्रम चालवणाऱ्या त्या पहिल्या लेडी पी.आय होत्या. रुक्मिणीच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. आत्तापर्यंत १४४ पुरस्काराने रुक्मिणीला सन्मानित करण्यात आले आहे. खडतर प्रवास ,अवघड परीक्षा, खेड्यातील अनुभव या सर्व वाटचालीतून प्रवास करत रुक्मिणी या पदापर्यंत येऊन पोहोचली आहे. जानेवारी १९९० रोजी रुक्मिणी या विमानतळाच्या सुरक्षेवर तैनात झालेल्या महिला होत्या. आणि तेव्हापासून त्यांच्या कारकिर्दीत अशा अनेक ‘पहिल्या’ घटना घडल्या आहेत.

Also Read : https://www.postboxindia.com/sharad-pawar-पवारांच्या-जातीयवादाव/

Police story २००४-२००८ मध्ये ट्रॅफिक विभागात नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला PI होत्या, २०१०-२०१३ मध्ये हायवे ट्रॅफिकमध्ये पहिल्या महिला PI होत्या, स्पेशल प्रोटेक्शन युनिट (SPU) मधील पहिल्या महिला PI होत्या, ज्यांनी अल्पवयीन मुलांसाठी पोलीस दीदी कार्यक्रम आयोजित केला होता आणि POSCO बद्दल जनजागृती केली होती. (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (POCSO) कायदा २०१२), डीजी ऑफिसमधील फर्स्ट लेडी पीआरओ, एडीजी हायवे ट्रॅफिकसाठी फर्स्ट लेडी पीआरओ, फर्स्ट लेडी पीआरओ अतिरिक्त सीपी ईस्टर्न रिजन. मुंबई येथील नायगाव मुख्यालयात तिने २००९मध्ये भारतातील पहिला रेन हार्वेस्टिंग प्रकल्प सुरू केला आणि कर्करोगग्रस्त लोकांसाठी मनोरंजन कक्ष सुरू केला.

यांच्याकडे १50पेक्षा जास्त बक्षीस व पुरस्कार आहेत. कठोर पोलिस आणि आई या दुहेरी भूमिका अत्यंत चांगल्या रितीने त्यांनी निभावल्या आहेत. या भूमिका एकमेकांत मिसळणार नाहीत याची तिने अत्यंत काळजी घेतली आहे . “एक महिला म्हणून तिच्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत. तरीसुद्धा, तिचे राष्ट्राप्रती असलेल्या कर्तव्यात तीने कुटुंबाचा कधीच अडथळा येऊ दिला नाही. याचा अर्थ असा नाही की तिने कुटुंबाकडे दुर्लक्ष केले आहे.

समतोल राखणे हा मंत्र तिने तंतोतंत पाळला आहे. रुक्मिणीने एवढ्या सर्व व्यापातून आपल्या घराकडे कुटुंबाकडे कधीच दुर्लक्ष होऊ दिले नाही रुक्मिणी चे जावई कलेक्टर आहेत तर मुलगा डॉक्टर आहे या सर्व तिच्या यशामध्ये तिच्या पतीचा फार मोठा वाटा आहे कोणत्याही यशस्वी पुरुषामागे जसा पत्नीचा वाटा असतो तसेच यशस्वी स्त्री मागे सुद्धा एका पुरुषाचा वाटा असतो. रुक्मिणी माझी मैत्रीण, माझी लहान बहीण म्हणून मला तुझा खुप खुप अभिमान आहे.परवाचे तुझ्या सहवासातले चार तास मलाही खुप ऊर्जा देऊन गेले.तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो . तमाम स्रीवर्गाला तुझा अभिमान वाटो.

डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

 

Leave a Reply

error: Content is protected !!