Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIA

Marathi – शिवसेना मराठींची आई! संपवण्याची कुणास घाई ?

1 Mins read

Marathi – शिवसेना मराठींची आई ! संपवण्याची कुणास घाई ?

 

 

Marathi – आपल्या खांद्यावरून ‘भाजप’ला महाराष्ट्रभर नेण्यात मोठे योगदान ‘शिवसेना’च्या नावे नोंदले गेलेय.

 

लेखक : ज्ञानेश महाराव

आपल्याकडे म्हणजे भारतीय भाषांमध्ये विशेषत; प्रसार माध्यमांमध्ये कशालाही ‘ऐतिहासिक’ म्हणायची सवय रूढ झाली आहे.

असे असले तरी महाराष्ट्रात सध्या जे राजकारण घडते आहे, ज्या वळणावर राजकारण आलेय, तो टप्पा ‘ऐतिहासिक’ म्हणावा असाच आहे.

ही घटना ऐतिहासिक परिप्रेक्ष्यातूनच पहावी लागेल. त्याशिवाय आजचे समकालीन राजकारण या टप्प्यावर का आले आणि त्याचा वर्तमानावर काय परिणाम होणार आहे,

हे आपल्या लक्षात येणार नाही. भारतीय राजकारणाच्या लोकशाहीच्या इतिहासाला आता सव्वाशे ते दीडशे वर्षं होतील.

त्यातील सुरुवातीचा ५०-६० वर्षांचा स्वातंत्र्यलढ्याचा काळ हा मध्यममार्गी व प्रागतिकतेकडे झुकलेला होता.

देशाला स्वातंत्र्य मिळण्याअगोदर आणि ते मिळाले त्यानंतरही अनेक वर्षे ‘काँग्रेस’ पक्ष हा समाजजीवनाच्या केंद्रस्थानी होता.

महाराष्ट्राचा संदर्भात विचार केला तर ‘संयुक्त महाराष्ट्र’ निर्माण होण्याअगोदर ‘काँग्रेस’ पक्षाचाच प्रभाव आपल्याकडे होता. विरोधी पक्षाची जागा डाव्या पक्षांनी व्यापली होती.

अगदी १९८० चे दशक उजाडले तरी सत्तेत ‘काँग्रेस’ आणि विरोधात डावे किंवा फारतर समाजवादी पक्षीय होते.

१९८० चे दशक संपल्यानंतर किंवा ते संपताना लोकशाहीवादी मध्यममार्गी, साम्यवादी, समाजवादी असे सारे प्रवाह एका बाजूला गेले आणि तथाकथित हिंदुत्ववादी म्हणजे ‘ब्राह्मणवादी’ प्रवाह हा पर्याय बनला.

गेली ४० वर्षे महाराष्ट्राचे राजकारण सगळे लोकशाहीवादी, मध्यममार्गी एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला हिंदुत्ववादी अशा फळ्या पडल्या आहेत.

ह्यातील दुसऱ्या बाजूची गर्दी वाढविण्यात, आपल्या खांद्यावरून ‘भाजप’ला महाराष्ट्रभर नेण्यात मोठे योगदान Marathi – ‘शिवसेना’च्या नावे नोंदले गेलेय.

अगदी २०१९ पर्यंत Marathi – महाराष्ट्रात हिंदुत्ववादी विरुद्ध इतर राजकीय विचारांचे प्रवाह अशा छावण्या होत्या. ह्यात तब्बल ३० वर्षे गेली. नोव्हेंबर २०१९ नंतर आणि आजच्या घडीला जे वातावरण आहे,

ते ऐतिहासिक याच कारणामुळे की Marathi – ‘शिवसेना’, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी १९८७ ते २०१९ पर्यंतचा महाराष्ट्राच्या राजकारणाचा पटच बदलून टाकलाय.

गेली ३० वर्षे महाराष्ट्राचे जे राजकारण आपण बघत आहोत, तो चष्माच ‘आऊटडेटेड’ झालाय. आता यापुढे आपणाला वर्गीकरण किंवा फरकच करायचा असेल

तर ‘देशी हिंदुत्ववाद’ विरुद्ध ‘परदेशी हिंदुत्ववाद’, ‘बहुजन हिंदुत्ववाद विरुद्ध अभिजन हिंदुत्ववाद’, किंवा समाजशास्त्राच्या भाषेत ‘हिंदू विरुद्ध वैदिक’, धार्मिक भाषेत ‘हिंदू धर्म विरुद्ध सनातन धर्म’ अशा प्रकारे बघावे लागणार आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात उद्धव ठाकरे यांनी घेतलेली ही भूमिका अगोदर म्हटल्याप्रमाणे ऐतिहासिक स्वरूपाची ठरेलच. परंतु ठाकरे यांच्या संघटनेचे राजकारण,

Marathi – महाराष्ट्राची गरज यासाठी ही भूमिका आवश्यक, प्रासंगिक आणि अपरिहार्यसुद्धा बनली होती. हे असे म्हणायची वेळ काळानेच आजच्या परिस्थितीने समोर आणली आहे.

Marathi – ‘शिवसेना’चा जन्मच झाला तो मुळी देशी व भाषिक अस्मितेमुळे! तीच त्यांची ओळख. ती त्यांनी सुरुवातीची सुमारे २० वर्षे जपली.

ह्या काळात छत्रपती शिवाजी महाराज हे प्रतीक अधिक व्यापक केले. ह्या दरम्यानची वाटचाल मूळ मुद्याबरहुकूम होती. मराठी माणसांचे न्याय आणि हक्क यांचे रक्षण यावर प्रचंड जोर होता.

१९८५ नंतर देशाचे राजकीय वातावरण बदलू लागले. उजव्या विचारांचे, हिंदुत्वाचे वादळ समाजात घोंघावू लागले. त्यावेळी काय परिस्थिती उद्‌भवली हे माहीत नाही,

पण Marathi – बाळासाहेब ठाकरे यांनी भाषेपेक्षा धर्म आणि प्रदेशापेक्षा देश याला प्राधान्य देऊन ‘भाजप’बरोबर युती केली. केवळ या एका भूमिकेमुळे Marathi – महाराष्ट्राचे राजकारण गेली ३० वर्षे मध्यममार्गी विरुद्ध दक्षिणपंथी बनले.

डावे, समाजवादी पक्ष नावापुरते उरले. या भूमिकेचा ‘शिवसेना’ला राजकीय फायदा झाला. दोन वेळा राज्याच्या सत्तेत सामील होता आले. पाच वेळा केंद्रात सत्ता मिळाली.

एखाद-दुसरा आमदार असणार्‍या ‘शिवसेना’ला ७४ आमदारांपर्यंत आपले कार्यकर्ते सत्तेत प्रतिष्ठित करता आले. पण एकाच्या जोडीने दुसरा मोठा होत असतो.

त्या न्यायाने ‘भाजप’ १४ आमदारांवरून १२४ आमदारांपर्यंत पोहोचला. महाराष्ट्रात ‘भाजप’चा मुख्यमंत्री झाला. १९८७ साली ‘शिवसेना-भाजप’ यांच्यात युती होत असताना ‘तुम्ही राज्यात मोठे भाऊ,

आम्हाला केंद्रातच रस आहे, देशाचे राजकारण हेच आमचे प्राधान्य,’ असे ‘भाजप’चे नेते म्हणाले खरे. पण प्रत्यक्षात त्यांना देशही हवा होता आणि राज्यसुद्धा!

म्हणजे राज्यात हातपाय मजबूत असतील तरच देशात दबाव वाढणार होता. तो तसा वाढलाही, हे Marathi – ‘शिवसेना’च्या लक्षात आले तेव्हा खूप उशीर झाला होता.

साधारणत: २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांची प्रधानमंत्रीपदाकडे जेव्हा वाटचाल सुरू झाली, तेव्हाच ‘शिवसेना’ला दाबण्याची, गाडण्याची संहिता ‘रा.स्व. संघा’च्या मुख्यालयात आणि ‘भाजप’च्या कार्यालयात लिहिली जात होती.

पूर्वी या दोन पक्षांत लोकसभेसाठी जे जागावाटपाचे सूत्र होते, ते किंचित बदलले गेले, त्याचवेळी ‘भाजप’ने Marathi – महाराष्ट्रात प्रथमच लोकसभेच्या २३ जागा काबीज केल्या.

या दोन पक्षांत जेव्हा युती झाली तेव्हा त्यांचा राज्यात एकही खासदार नव्हता. युती होताच १० खासदार निवडून आले आणि युती सर्वोच्च स्थानी पोहोचली तेव्हा

‘भाजप’च्या खासदारांची संख्या ‘शिवसेना’ खासदारांच्या खूप पुढे गेली. २०१४ सालची लोकसभा निवडणूक देश आणि Marathi – महाराष्ट्रासाठी महत्त्वाची ठरली.

तशी ती ‘शिवसेना’च्या पोटात खड्डा पडावा अशी ठरली. २३ जागा जिंकलेल्या ‘भाजप’ने एकहाती महाराष्ट्र काबीज करायचं ठरवून आपला ‘शत-प्रतिशत भाजप’ हा अजेंडा पुढे, रेटण्याचे ठरविलं.

विधानसभेला अत्यंत किरकोळ कारण पुढं करत म्हणजे पूर्वीचं १७१ आणि ११७ हे समीकरण रद्द करून ‘शिवसेना’ फिफ्टी-फिफ्टी जागांवर लढायला कबूल झाली

असतानाही २५ वर्षांची युती ‘भाजप’ने पुढाकार घेऊन मोडली. विधानसभेच्या निवडणुका दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले. ‘भाजप’ला असे वाटले की,

आता देशात आणि Marathi – महाराष्ट्रात ‘भाजप’चीच हवा आहे. आपली राज्यात बहुमताची सत्ता येणार. कारण २५० मतदारसंघात ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’विरोधी वातावरण लोकसभेच्या निकालात प्रतिबिंबित झाले होते.

Marathi – ‘शिवसेना’साठी, बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासाठी जबरदस्त धक्का होता. विधानसभेचे निवडणूक निकाल लागले.

‘शिवसेना’ने ‘भाजप’च्या मदतीशिवाय विधानसभेत ६३ जागा मिळवल्या. हे यश मोठे होते. तर दुसऱ्या बाजूला ‘भाजप’ने ११२ जागा मिळविल्या. सर्वात मोठा पक्ष म्हणून ‘भाजप’ने सत्ता स्थापन केली.

मात्र बहुमत नव्हते. पण केंद्र सत्तेच्या बळावर ‘भाजप’ने ‘शिवसेना’ला दाती तृण धरून शरणांगतासारखे सत्तेत सहभागी व्हायला लावले. तसे जर उद्धव ठाकरे यांनी केले नसते,

तर ‘भाजप’ने त्याचवेळी ‘शिवसेना’ फोडली असती. १५ ते २० आमदारांना राजीनामा द्यायला लावून निवडून आणले असते. तो धोका नको म्हणून उद्धव ठाकरे यांनी तडजोड स्वीकारली.

मिळेल ती मंत्रिपदे घेतली. त्यानंतर ‘भाजप’ने आपल्या २५ वर्षांच्या जुन्या मित्राचा जमेल तेवढा पाणउतारा केला. २०१४ ते २०१९ हा काळ ‘शिवसेना’ केंद्रात आणि सत्तेत असताना

‘शिवसेना’साठी अत्यंत वाईट असाच गेला. केंद्रात एखादं दुसरं मंत्रिपद आणि राज्यात अतिदुय्यम स्थान; त्यामुळे उद्धव ठाकरे घुसमटून गेले होते. संधीच्या शोधात होते.

२०१९ मध्ये ही संधी त्यांना मिळाली. ‘भाजप’च्या देशभरातील मित्रांची जी अवस्था झाली, ती आपली होऊ नये म्हणून त्यांनी विधानसभेच्या निवडणूकचा निकाल लागल्यावर

‘भाजप’बरोबर जाण्यास ठाम नकार दिला. अविश्वसनीय व अतर्क्य वाटेल अशी भूमिका घेऊन दोन्ही ‘काँग्रेस’ पक्षांबरोबर आघाडी केली आणि मुख्यमंत्रीपद स्वतः‌कडे घेतले.

 

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Postbox India

Leave a Reply

error: Content is protected !!