My page - topic 1, topic 2, topic 3

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

NewsPostbox Marathi

Maleria – हिवतापाचा कर्दनकाळ ! – शास्त्रज्ञ सर रोनाल्ड रॅास

1 Mins read

Maleria – हिवतापाचा कर्दनकाळ ! – शास्त्रज्ञ सर रोनाल्ड रॅास

 

 

Maleria – भारतकुमार राऊत

हिवतापाचा कर्दनकाळ !


The Breast Cancer Site | Pink Ribbon Shop | Shop To Show Your Support

हिवताप (मलेरिया) हा एके काळचा जीवघेणा संसर्गजन्य रोग विशिष्ट जातीचा डास चावल्यामुळे होतो, हा क्रांतिकारक शोध लावणारे शास्त्रज्ञ सर रोनाल्ड रॅास यांचा आज जन्मदिन.

समस्त मानव जातीला उपकारक ठरणारा हा शोध लावणाऱ्या रॅास यांचा जन्म १८५७मध्ये आजच्या दिवशी भारतात उत्तरांचल राज्यातील अल्मोडा येथे झाला होता, हे विशेष.

त्यांचे वडिल जनरल रॅास ब्रिटिशांच्या सैन्यात वरीष्ठ अधिकारी होते. पुढे रेानाल्ड वयाच्या आठव्या वर्षीच शिक्षणासाठी इंग्लंडला परत गेले.

रॅास यांनी इतका महत्वाचा शोध लावला व त्यासाठी त्यांना १९०२ मध्ये वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिकही मिळाले हे खरे असले तरी त्यांचा मूळ पिंड साहित्य व कविता लेखनाचा होता. त्यांचे लेख शाळकरी जीवनातच प्रसिद्ध होऊ लागले.


The Breast Cancer Site | Pink Ribbon Shop | Shop To Show Your Support

रॅासना चित्रकलेचीही आवड होती. १८७३मध्ये आॅक्सफर्ड अॅन्ड केंब्रिज लोकल बोर्डाच्या परिक्षेत ते चित्रकलेत पहिले आले. रॅासना गणितज्ञ व्हायचे होते पण वडिलांच्या आग्रहामुळे ते वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले.

नंतर तब्बल २५ वर्षे त्यांनी इंडियन मेडिकल सर्विसमध्ये नोकरी केली. त्यांनी कोलकात्यात प्रेसिडेंन्सी मेडिकल काॅलेजातही काम केले. याच काळात सूक्ष्म निरीक्षण करून त्यांनी डासांच्या दंशामुळे Maleria हिवताप होतो व पसरतो हे अनुमान जगासमोर मांडले.

ज्या रात्री त्यांनी एका डासाच्या पोटात Maleria हिवतापाची लागण करणाऱ्या अतिसूक्ष्म जीवाणूंची अंडी पाहिली, तेव्हाच त्यांनी आपल्या पत्नीला एक कविता लिहून पाठवली.

The Breast Cancer Site | Pink Ribbon Shop | Shop To Show Your Support

This day relenting God
Hath placed within my hand
A wondrous thing; and God
Be praised. At His command,
Seeking His secret deeds
With tears and toiling breath,
I find thy cunning seeds,
O million-murdering Death.
I know this little thing
A myriad men will save.
O Death, where is thy sting?
Thy victory, O Grave?

असे सर रोनाल्ड रॅास. भारतातील कारकीर्द संपवून ते लंडनला परत गेले, त्यानंतरही त्यांचे संशोधन व साहित्य निर्मितीचे काम चालूच राहिले.

The Breast Cancer Site | Pink Ribbon Shop | Shop To Show Your Support

१६ सप्टेंबर १९३२ रोजी वयाच्या ७५वा वर्षी लंडनमध्ये जगाचा निरोप घेतला व ते आपल्या पत्नीच्या शेजारी कायमचे विसावले.

Maleria - हिवतापाचा कर्दनकाळ ! - भारतकुमार राऊत

Maleria – हिवतापाचा कर्दनकाळ ! – भारतकुमार राऊत

आजही भारतात त्यांची अनेक स्मारके कोलकाता, राजस्थान, अंदमानमध्ये दिसतात.

अंगमानमधील रॅाय आयलंड हे रॅास यांचेच स्मारक !

 

 

 

 

– भारतकुमार राऊत


The Breast Cancer Site | Pink Ribbon Shop | Shop To Show Your Support

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: