My page - topic 1, topic 2, topic 3

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

NewsPostbox Marathi

National river of India – गंगा आणि यमुना या दोन नद्यांमध्ये प्रेतं

1 Mins read

National river of India – गंगा आणि यमुना या दोन नद्यांमध्ये प्रेतं

 

National river of India – गंगा आणि यमुना

13/5/2021,


गंगा आणि यमुना या दोन नद्यांमध्ये प्रेतं सोडून देणं हे आपल्या देशामध्ये काही शतकांपासून सुरु आहे.
फोटो आणि फिल्म्स सध्या व्हायरलं होतात एवढंच.
ही दृश्यं पाह्यल्यावर आपल्याला धक्का बसतो, चीड येते आणि ती स्वाभाविक आहे.
कारण नदीकडे पाहाण्याची आपली दृष्टी आधुनिक आहे. पाण्याकडे आपण नैसर्गिक संसाधन म्हणून पाहातो. विशेषतः ज्या प्रदेशात

बारमाही नद्या नाहीत त्यांच्यासाठी पाणी हे नैसर्गिक संसाधन असतं.


बारमाही नद्यांच्या प्रदेशात म्हणजे National river of India गंगा-यमुनेच्या दोआबात पाण्याबद्दलच्या समजुती वेगळ्या आहेत.

दोआबातील सुपीक गाळाच्या जमीनीमुळे तिथे शेती उत्पादन अधिक होतं. मानवी आणि पशूंच्या श्रमांवर ते पूर्वापार अवलंबून होतं म्हणून

तिथे लोकसंख्याही अधिक होती आणि कमालीची विषमता होती. सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा यांचं पराकोटीचं विषम वाटप जातिव्यवस्थेने केलं.

त्यामध्ये आजही फारसा बदल झालेला नाही.


कालपरवापर्यंत म्हणजे १९९० पर्यंत गंगेवरच्या पाण्यावर जलकर होता. हा जलकर देणार्‍यांचा गंगेच्या पाण्यावर हक्क होता.

हा हक्क बहुतांश मंदिरांकडे आहे. मंदिरं वा देवस्थानं मच्छिमारांकडून दररोज १०-१५ रुपये वसूल करायची. काही लाख मच्छिमारांकडून हा जलकर वसूल केला जायचा. आज जलकर रद्द झालेला असला तरीही गंगेच्या उपनद्यांमध्ये ही पद्धत सुरु आहे, अर्थातच बेकायदेशीरपणे.


त्यासाठी गुन्हेगारी टोळ्या कार्यरत असतात. नद्यांचे प्रवाह बदलतात, त्यामुळे नद्यांमध्ये बेटं तयार होतात. सुपीक जमीनीची धूप होते, एकाच्या मालकीची जमीनच एखाद्या वर्षी नाहीशी होते. या बेटांवरील जमिनीत शेती करायला काही लोक मजबूर होतात. त्यांच्याकडूनही जलकर वसूल करणार्‍या टोळ्या आहेत.

National river of India नदीच्या किनार्‍यांवरील जातीय विषमता नष्ट न करता, नद्या स्वच्छ करण्याचं कोणतंही अभियान मग ते राजीव गांधींचं असो की नरेंद्र मोदींचं, अपयशी ठरणार हे स्पष्ट आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने नद्या स्वच्छ करता येणं शक्य आहे, परंतु इथे प्रश्न तंत्रज्ञानाचा नाही तर विषमतेचा आहे. म्हणून तर आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कार करणारे कारखाने आणि शहरं, सर्व सांडपाणी निर्लज्जपणे नद्यांमध्ये विसर्जित करतात. नदीमध्ये स्नान केलं की सर्व पापं धुतली जातात आणि आपण पवित्र होतो, ही समजूत आपल्या देशात शतकानुशतके आहेच. म्हणून तर प्रेतंही गंगार्पण करण्याची प्रथा आहे. कारण गंगेत वा गंगेच्या किनार्‍यावर दहन झालं की केवळ पापांपासून मुक्ती नाही तर जन्मामरणाच्या फेर्‍य़ातून मुक्ती मिळते अशीही समजूत आहे. ही समजूत अर्थातच गोरगरीबांमध्ये म्हणजे जातिव्यवस्थेमुळे ज्यांचं शोषण होतं त्यांच्यामध्ये आहे.

सरकार जेव्हा अपेशी ठरतं त्यावेळी गोरगरीबांना प्रेतांची विल्हेवाट लावण्यासाठीही आवश्यक ती संसाधनं उपलब्ध होत नाहीत. साहजिकच ते गंगेकडे म्हणजे कोणत्याही नदीमध्ये प्रेत सोडून देतात.
जातिव्यवस्था, त्यामुळे होणारं शोषण, त्यावर जगणारी मंदिरं, त्यातून फोफावलेली गुन्हेगारी यांचं निराकरण केल्याशिवाय गंगा स्वच्छ होणार नाही.


 

Sunil Tambe

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: