Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRA

Maharashtra जिल्ह्यांची प्राचीन ओळख

1 Mins read

Maharashtra महाराष्ट्रातील जिल्ह्यांची प्राचीन ओळख ! 

प्रथम राज्याचे नाव Maharashtra ” महाराष्ट्र ‘ कसे पडले ? , वेरुळ येथून ४५० वर्षे अधिकार गाजवणाऱ्या राष्ट्रकुट घराण्याचा मुळ पुरुष Maharashtra महाराष्ट्र हा चंद्र वंशी बुधाचा पुत्र पुरुरवाचा पुत्र होता त्याचे महत्त्व विषद करणारे हे घराणे होते .
१ अमरावती जिल्हा – देवांचा राजा इंद्र याचे दुसरे नाव अमरपती , त्याचे प्रतिस्थान असणारे ठिकाण म्हणजे “अमरावती ‘
२ अहमदनगर – प्रथम निजाम अहमद याच्या नावावरुन ओळखले जात असले तरी पुरातन नाव ” अंबाला नगर ‘ असे होते ज्याचा पुरावा नगर – पुणे सरहद्दीवरील ” अंबाला टेकड्या ‘ डोंगररांग होय !
३ अकोला – पांडव वंशीय अभिमन्यू कुळात आपल्या पुर्वज अर्जुन याला लावल्या गेलेल्या उपाध्या श्रेष्ठ , थोर तसेच अक्कल वाला शब्दापासून उत्पत्ती झालेला शब्द म्हणजे ” अकोला ‘ व संबंधित ठिकाणे अक्कलकोट , अकलूज इत्यादी.
४ उस्मानाबाद – हैदराबाद च्या निजामाचा नातलग प्रांताधिकारी उस्मान याच्या अधिकार क्षेत्रामुळे निर्माण झालेली ओळख पण प्राचीन नाव ” धाराशिव ‘
५ औरंगाबाद – औरंगजेबाच्या सुभेदारांनी निर्माण केलेली आधुनिक ओळख पण खरे प्राचीन नाव – अश्मक अर्थात खडकी !
६ कोल्हापूर – महिषासुरमर्दिनी कात्यायनी देवीने मारलेला दैत्य कोल्हाषुर याच्यामुळे नाव पडले असे म्हटले जाते पण कैवल्य पुर असाही उच्चार असू शकतो. प्राचीन ओळख काशीपतींची ओळख असणारे करवीर , तसेच मौर्य साम्राज्याचा भाग असणारे ब्रम्हपूर , तसेच शौणक गोत्रियांचे ” पर्णालक्षेत्र ‘
७ गडचिरोली – चिरोली शब्दाचे संस्कृत उच्चारण चिरोंजी किंवा राजदाणा म्हणजे चारोळी फळ , संदर्भाने ४ संखेशी संबंधित प्रथम राज्य कारभार अंमलात आणणाऱ्या राष्ट्रकुट राजांचा गड.
८ गोंदिया – गोंड समाजाचा अधिकार असणारा परिसर म्हणजे गोंडिया .
९ चंद्रपूर – चंद्र वंशिय लोकांचा परिसर , ठिकाण ते चंद्रपूर
१० जळगाव – पांडवांना लक्षागृहात जाळण्याचा प्रयत्न झालेल्या ठिकाणाचे प्रतिक स्थान म्हणजे – जळगाव !
११ जालना – वनवा या मराठी शब्दाचा हिंदी उच्चार , संबंध सिध्द करणारे पुरातन अधिकार क्षेत्र म्हणजे परिसरातील – जंजाळा ( वनवा ) किल्ला !
१२ ठाणे – नाथपंथाचे जनक उपरिचर वसु यांच्या परिसराला स्थान किंवा ठाण म्हणून उल्लेखले जाते. या उपरिचरांचे पुत्र मच्छिंद्रनाथ यांचा मलंगगड व शिष्य गोरक्षनाथ यांचा गोरखगडाचे विशेष महत्त्व त्यामुळेच.
१३ धुळे – धुळप या किस्किंदा क्षेत्रातील राज्य कर्त्यांनी ओळख निर्माण केलेले ठिकाण किंवा राजधानी.
१४ नंदुरबार – अहिरवंशी नंद राजाचे अधिकार क्षेत्र म्हणजे नंद दरबारचा अपभ्रंश झालेले ठिकाण.
१५ नागपूर – सुर्यवंशी लोकांचे कुलदैवत जेजुरीचा अयोध्येचे ग्रामदैवत नागेश्वर किंवा नागनाथाचे प्रतिस्थान – नागपूर .
१६ नांदेड – अयोध्या नरेश श्रीरामाचा बंधू भरताने वास्तव्य केलेल्या नंदीग्राम चे प्रति स्थान .
१७ नाशिक – गौतमीपुत्र सातकर्णी याने शक नरेश नृपती याचे शिर धडावेगळे केलेले ठिकाण म्हणजे नरशक चा अपभ्रंश शुर्पनखेचे नाक कापलेले ठिकाण नाशिक बनवून टाकले !
१८ परभणी – केशवराज सहचारिणी ” प्रभावती ‘ देवीचे ठिकाणाचा झालेला अपभ्रंश.
१९ पालघर – मगध परिसरात उल्लेख आढळणाऱ्या ” पाल ‘ राजवंशाचे ठिकाण अर्थात घर .
२० पुणे – पुण्य क्षेत्र अशी प्राचीन ओळख .
२१ बिड – खरा उच्चार बिडाल म्हणजे मार्जार म्हणजेच शौणक गोत्रिय मांजर कुळाचे अधिकार क्षेत्र सिध्द करणारी ठिकाणे मांजरसुभा , मांजरा नदी व मांजरथड ( मंजरथ ) परिसर . त्या अगोदरची ओळख चंपावती व काही शतकांपूर्वी कलिंद .
२२ बुलढाणा – उज्जैन नरेश राजा विक्रमादित्य हा वामनाशी संबंधित दानशूर राजा ” बळी ‘ चा वंशज , त्याचा परिसर म्हणजे बलस्थान / बलसाड / बलठाण चा अपभ्रंश म्हणजे बुलढाणा .
२३ भंडारा – सुर्याचे एक नाव कनक म्हणजे सोने त्या स्वरुपातील लेणे म्हणजे हळदीचा भंडारा त्या नावाचा परिसर ‌.
२४ मुंबई – बिहार राज्यात प्रसिद्ध असणाऱ्या देवी ” मुंडेश्वरी ‘ चे प्रतिस्थान म्हणजे देवी मुंडाई चा अपभ्रंश झालेले राष्ट्रकुट राजांचे अधिकार क्षेत्र!

२५ यवतमाळ – संस्कृत अंक यवत म्हणजे प्राकृत ७ माळ किंवा टेकड्या असणारा परिसर !
२६ रत्नागिरी – मगध परिसरात असणाऱ्या वैशाली क्षेत्रातील वैशालीगड ( विशाळगड ) , रत्नावती ची प्रतिस्थाने म्हणून निर्माण झालेला ज्योतिबा डोंगर हा खरा रत्ना गिरी यावरुन ठिकाणाची ओळख झालेले शहर .
२७ रायगड – दंडकारण्य म्हणजे एकच शब्द असा बहूतांश जणांचा समज पण दंडक आणि अरण्य ही वेगवेगळी ठिकाणे असून पुण्याच्या उत्तर दिशेचा नाशिक पर्यंतचा भाग हा दंडक क्षेत्र तर दक्षिण व नैऋत्य परिसर हे अरण्यक्षेत्र ! अरण्य ऋषीलाच दुसरी ओळख रायरेश्वर हे राष्ट्रकुट राजांचे आराध्य दैवत त्यामुळे रायरी नावाने गडाचे प्रथम निर्माण , शिवछत्रपतींनी नवी ओळख रायगड केली.
२८ लातूर – ऐतिहासिक ओळख लटृलूर अशी ज्याचा अर्थ सतत लाटा उचंबळतात तो समुद्र ज्याचे मंथन करुन चौदा रत्न प्राप्त झाली त्या रत्नेश्वर (समुद्र ) ठिकाण !
२९ वर्धा – चंद्र कले कलेने वाढत जातो अर्थात वर्धन होत जातो तो परिसर.
३० वाशिम – ऐतिहासिक वत्सगुल्म म्हणजे वत्स चा अर्थ गोल्हार ( गोऱ्हा ) व गुल्म म्हणजे झाडी / वनप्रदेश .
३१ सांगली – बिडाल अर्थात मार्जार कुळी सांगळ / सिंघल लोकांचे वस्तीस्थान.
३२ सातारा – सातवाहनांच्या वाहनांना चाकांना असणाऱ्या सात आरे ( पुठ्ठे ) हा गौतम ऋषी गोत्रीयांचे अधिकार व वस्ती क्षेत्र !
३३ सिंधुदुर्ग – सुर्यवंशी राजा सिंधूद्वीप याच्या पराक्रमाने निर्माण झालेली सिंधू नदी तसेच संस्कृती बुडाली असा वारंवार उल्लेख केला जातो पण दक्षिणेत स्थलांतरित झालेल्या लोकांनी स्थापना केलेले प्रतिस्थान !
३४ सोलापूर – माझ्या मते प्राचीन शिवालयपूर , कारण एवढी शिवमंदिरे कोठेच आढळणार नाहीत असे ठिकाण पण काहींच्या मते १६ गावांना मिसळून झालेले नगर .
३५ हिंगोली – हिंगवली शब्दाचा अपभ्रंश , हिंगलाज संबंधित असू शकते !

ऐतिहासिक संशोधन व शब्दांकन –
रविंद्र वैजनाथ मुंडे

www.postboxindia.com

www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Leave a Reply

error: Content is protected !!