karnataka – Ranibennur राणीबेन्नूर – पर्यटन करा आडवाटेने
27/11/2021,
karnataka – Ranibennur राणीबेन्नूर – पर्यटन करा आडवाटेने
karnataka – Ranibennur राणीबेन्नूर हे हावेरी कर्नाटक मध्ये विश्वप्रसिद्ध स्थापत्यशास्त्र विद्येचे Archaeological पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. पण, इथल्या या स्थापत्य शास्त्र कलेचा आणि पर्यटनाचा भारतीयांना फारशी माहिती नाही, म्हणजे जिथे पिकते तिथे त्याची किंमत ठरत नाही हे वैश्विक सत्यच.
राणीबेन्नूर तसे NH ४ या महामार्गावर आहे, या गावा पासून आजूबाजूला भटकंती आणि दर्शनीय स्थळे भरपूर बघण्यासारखी आहेत, दावणगिरी पासून ३७ km अंतरावर हे गाव आहे.
इथल्या आजूबाजूच्या प्रदेशात कापूस, ज्वारी,नारळ ,रेशीम,लाल मिरची यांचे आसपास उत्पादन घेतले जाते.
हे गाव सिल्क साड्यासाठीही प्रसिद्ध आहे,
खिरे मल्लापुरा (धारवाड- बेंगलोर रस्त्यावर काकोळ फाट्यापासून ८ कि.मी. अंतरावर आहे )
गुंटला ते राणी बेन्नूर रोडवर खिरे मल्लापुरा गाव आहे. तेथून पुढे देवरगुड्डा ( देवेगौडा ) गाव म्हणजे देवाचा डोंगर असून या डोंगरावर मालतेश मल्हारी म्हाळसाकांत हे देऊळ आहे . पौरिकथेप्रमाणे मणीमल्ल्या व मल्लीमासूर या दोन राक्षसांना तेथे मारले . त्यांची स्मारके १ मैलावर आहेत. त्यामुळे त्या देवस्थानांस त्या राक्षसांच्या नावावरून खालीलप्रमाणे नावे पडली. मल्लेश मल्हारी मार्तंड व भैरव मालतेश म्हणतात. हे देऊळ हेमाडपंथी १ हजार वर्षांपूर्वीचे आहे.
चौदैयादानापुर (Chaudayyadanapur) जरा मराठीत लिहिणे कठीण आहे, ४० km हावेरी पासून आहे.
इथेच वैष्णव परंपरेची हावेरी जिल्ह्यातच सुरवात झाली.
मुक्तेश्वर मंदिरामुळे हे गाव प्रसिद्ध आहे ११ व्या शतकात चालुक्य राजवटीत हे देऊन बांधले गेले . कलचुरी पद्धतीने हे देऊळ बांधलेले आहे.
अत्यंत सुंदर असे देऊळ पर्यटनापासून दुर्लक्षित आहे.
येथे कानडी शिलालेखही आहेत.
जवळच नरसापूर येथील नरससिह मंदिरही बह्ण्यासारखे आहे .
karnataka – Ranibennur राणीबेन्नूर पासून ८ km अंतरावर अभयारण्य असून कळविटांसाठी प्रसिद्ध आहे.
गलगनाथ
तुंगभद्रेच्या काठी गलगेश्वर मंदिर हे चालुक्य राजवटीत अकराव्या शतकात बांधले गेले . याला पल्लूनी या नावानेही ओळखले जाते
स्पर्शलिंगम असेही देवास संबोधले जाते . हे देखील हावेरी जवळच आहे.
Also Visit : https://www.postboxlive.com
Postbox India