karjat – कर्जत पोलिसांची धडाकेबाज कारवाई
karjat – कर्जत पोलिसांची धडाकेबाज कारवाई
30/9/2021
कर्जत पोलिसांची धडाकेबाज कारवाई
दिनांक 23/09/2021, रोजी छोटे वेणगाव ता.कर्जत येथील राहणारे 02 आरोपित गणपत भागा
वाडेकर व त्याची पत्नी महिला आरोपित उज्ज्वला गणपत वाडेकर हे गांजा या अंमली पदार्थाची मोठ्या प्रमाणात
विक्री करीत असून त्यांनी मोठ्या प्रमाणात गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्याकरिता त्यांचे घरी आणला
असल्याची गोपनीय माहिती बातमी कर्जत पोलिसांना मिळाली. त्याप्रमाणे कर्जत पोलीस ठाणेच्या पोलीस
निरीक्षक श्रीमती.सुवर्णा पत्की यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत श्री.संजय शुक्ला यांना सविस्तर माहिती
देवून त्यांनी पोलीस निरीक्षक श्रीमती.सुवर्णा पत्की यांचे मार्गदर्शनाखाली कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश
दिले.
त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी व पोलीस स्टाफ मिळून छोटे वेणगाव ता.कर्जत
येथील राहणारा गणपत भागा वाडेकर यांचे एन.डी.पी.एस कायदाअंतर्गत योग्य नियमांचे पालन करून राहते घरी
छापा टाकला असता त्यांचे घरामध्ये लपवून ठेवलेला एकूण 3,29,600/-रुपये किमतीचा 20 किलो 600 ग्रॅम
वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला. सदर प्रकरणी कर्जत पोलीस ठाणे येथे सरकारतर्फे सुभाष पाटील
पोह/2101 यांचे खबरेवरून कर्जत पोलीस ठाणे गु.र.नं.255/2021 एन.डी.पी.एस कायदा 1985 चे कलम 8 (क)
20,29 अन्वये दिनांक 23/09/2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर गुन्ह्यांचा तपास
सहा.पोलीस निरीक्षक श्री.राजु आल्हाट हे करीत आहेत.
सदर आरोपित यांना गुन्ह्याचे काम अटक मा.न्यायालयाकडून दिनांक 29/09/2021 रोजी पर्यंत
पोलीस कोठडी घेवून सदर विक्री करण्याकरिता आणलेला गांजा हा आरोपितांनी संगमनेर येथून मुख्तार शेख
पाचेक्डून विकत आणल्याचे तपासात कबूल केले त्याप्रमाणे कर्जत पोलीस हे संगमनेर येथे जावून मुख्तार शेख
याचा शोध घेतला असता सदरचा आरोपी हा त्याचे राहते घरी मिळून आला नसून फरार झालेला आहे. गुन्ह्यामध्ये
तपासादरम्यान एकूण 3,29,600/-रुपये किमतीचा 20 किलो 600 ग्रॅम वजनाचा गांजा व गुन्हा करताना
वापरण्यात आलेली 40,000/-रुपये किमतीची चारचाकी वाहन असा एकूण 3,63,000/-रुपये किमतीचा मुद्देमाल
जप्त करण्यात आला असून अधिक तपास karjat कर्जत पोलीस करीत आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.अशोक दुधे, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.अतुल झेंडे,
मा.उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत श्री.संजय शुक्ला, मा.पोलीस निरीक्षक कर्जत पोलीस ठाणे श्रीमती.सुवर्णा
पत्की यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस सपोनि/श्री.राजु
आल्हाट,अंमलदार/2101 सुभाष पाटील,पोलीस हवालदार/1088 स्वप्नील येरुणकर,मपोना/179 दीपा
खाडे,पोलीस अंमलदार /2281 भूषण चौधरी, पोलीस अंमलदार/509 गणेश पाटील, पोलीस अंमलदार/467
अश्रुबा बेद्रे यांनी केलेली आहे.
Also Visit : https://www.postboxlive.com
Postbox India