Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSHISTORYINDIAMAHARASHTRA

bayajabai_shinde – इतिहासातील निसटलेले पान बायजाबाई शिंदे

1 Mins read

bayajabai_shinde – इतिहासातील निसटलेले पान बायजाबाई शिंदे

bayajabai_shinde – बायजाबाई साहेब यांची समाधी कन्हेरखेडला आहे.

 
मराठेशाहीमधे राजमाता जिजाऊ, येसूबाई राणीसाहेब, सोयराबाई राणीसाहेब, महाराणी ताराबाई यांच्यानंतर जे नाव इतिहासामध्ये आदराने घेतले जाते ते सर्वात सुंदर दक्षिण लावण्यवती व धुरंदर राजकारणी गाल्हेरच्या राणी bayajabai_shinde बायजाबाई shinde – शिंदे यांचे.. या राणीने मराठेशाहीच्या राजकारणात जो धुमाकूळ घातला त्याचा इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला गेला. पण मराठ्यांनी या bayajabai_shinde बायजाबाई shinde – शिंदे साहेब यांची साधी दखलही घेतली नाही. बायजाबाई shinde – शिंदे या गाॅल्हेरच्या राणीसाहेब . यांचा जन्म कागलकर घाडगे घराण्यातील . त्यांच्या वडिलांचे नाव सखाराम घाटगे सर्जेराव. बायजाबाई साहेब याा अत्यंत सुंदर व देखण्या होत्या. घोड्यावर बसण्यात त्या अत्यंत पटाईत होत्या.

bayajabai_shinde बायजाबाई shinde – शिंदे यांना कित्येक इतिहासकारांनी “दक्षिणची सौंदर्यलतिका ‘अशी संज्ञा दिली आहे.

राजस्थानातील कृष्णकुमारी इत्यादी लोकप्रसिद्ध लावण्यवतीच्या लग्नाचे प्रसंग ज्याप्रमाणे मोठमोठी राज्यकारस्थाने घडविण्यास कारणीभूत झाले,

त्याच प्रमाणे bayajabai_shinde बायजाबाईंचे लग्नसुद्धा महाराष्ट्रातील एक राजकारस्थान घडवून आणण्यास कारणीभूत झाले.

      अनेक सरदारांनी सर्जेरावांचे मन वळवून बायजाबाईंचे लग्न दौलतराव शिंदे यांच्याशी लावून दिले.

हे लग्न पुणे मुक्कामी मोठ्या थाटामाटात पार पडले होते. लग्न झाल्यानंतर बायजाबाई shinde – आपल्या पतीबरोबर लष्करात असत.

त्या सर्व राजकारण जातीने पाहात होत्या.

           दौलतराव यांच्या मृत्यूनंतर bayajabai_shinde बायजाबांईनी दत्तक न घेता सर्व कारभार आपल्या हातात घेतला .

परंतु त्यांनी संस्थानचा कारभार पाहण्यासाठी दत्तक पुत्र घ्यावा अशी सर्व नागरिकांची इच्छा होती . तशी इच्छा ब्रिटिश रेसिडेंट यांनीही व्यक्त केली होती.

नागरिकांच्या ईच्छेखातर bayajabai_shinde बायजाबाई यांनी पाटलोजी shinde – शिंदे यांचे पुत्र मुगुटराव यांना 12 व्या वर्षी दत्तक घेतले.

बायजाबाई यांची राजकीय कारकीर्द फक्त 6 वर्षे पर्यंत होती.

.सरासरी सहा वर्ष त्यांची राजकीय कारकीर्द गाजली होती .परंतु तेवढ्या अवधीमध्ये त्यांनी मोठ्या दक्षतेने व शहाणपणाने राज्यकारभार चालवला.

दुसऱ्या बाजीराव यांना जी मुलगी बहात्तराव्या वर्षी झाली तिचे नाव बयाबाई साहेब उर्फ सरस्वती साहेब.

पेशव्यांच्या मृत्यू बरोबर पेशवे घराण्याचे औरस पुरुष समाप्त झाले. मागे उरली ती एकमेव निशाणी दुर्दैवी बयाबाई साहेब .

वडिलांच्या मागे ती 66 वर्षे जिवंत होती . bayajabai_shinde बायजाबाई shinde – शिंदे यांनी मोठ्या कौतुकाने या लहान मुलीचे लग्न त्यांच्याच एका सरदार पुत्राबरोबर ठरवले.

व आपल्या राजवाड्यात मोठ्या थाटामाटात हे लग्न लावून दिले.

       पंढरपूर येथे महाद्वार घाटावर शिंदे सरकारचा मोठा भव्य असा वाडा आहे. या वाड्याच्या आत द्वारकाधिशाचे मंदिर बायजाबाई शिंदे या ग्वाल्हेरच्या राणीसाहेबांनी बांधलेले आहे .

              1857 च्या युद्धापूर्वी अनेक गावांमध्ये काही माणसे चपात्या किंवा पोळ्या घेऊन जायची व गावकऱ्यांना एकत्र करून या चपात्या खाण्याची पद्धत होती.

हजारो गावांमधून अशा चपात्या युद्धापूर्वी पोहोचवल्या गेल्या .

प्रत्यक्ष युद्ध सुरू झाले तर सैन्याला रसद पुरवठा कसा करायचा याची योजना या चपात्यांचा वाटपातूनच बायजाबाई यांच्या विचारातूनच साकारली गेली .

         बायजाबाई यांनी 1857 च्या युद्धाचा वेळी खुप मोठा यज्ञ केला होता. यज्ञाच्या निमित्ताने गोपनीय माहितीची देवाण-घेवाण सुकर झाली .

अनेक राजांचे राजगुरू संदेश घेऊन सगळीकडे संचार करु लागले. या यज्ञाचा हेतूच गोपनीय माहिती गोळा करण्याचा होता. .

1857 चे स्वातंत्र्यसमर फसले पण या राणीसाहेबांचा दबदबा मात्र चोहीकडे टिकून होता.

   .पुढे राज्यात जनकोजी शिंदे व bayajabai_shinde बायजाबाई यांचा बेबनाव होऊन राज्यात बंड झाले.

बंडाची परिसमाप्ती होऊन सर्वत्र शांतता झाल्यावर बायजाबाई जाऊन गाॅल्हेरमधे राहिल्या .तेथेच त्याचे निधन झाले .

            काही विद्वानांनी यांच्याबद्दल जे उद्गार काढले आहेत,ते त्यांची खरी योग्यता व्यक्त करतात .

तत्कालीन ‘मुंबई गॅझेटमध्ये,बायजाबाई यांचे जे मृत्यू वृत्त आले त्यात असे म्हटले होते की ,

” बेगम सुमरू ,नागपुरची राणी, झाशीची राणी ,लाहोरची चंदाराणी आणि

भोपाळची बेगम या सुप्रसिद्ध स्त्रियांमध्ये ही राजस्त्रीहि आपल्या परीने प्रख्यात असून हिने अनेक वेळा आपल्या देशाच्या शत्रूशी घोड्यावर बसून टक्कर दिली होती”

bayajabai_shinde बायजाबाई shinde – साहेब यांची समाधी कन्हेरखेडला आहे.

         अशा या शूर व धाडसी bayajabai_shinde बायजाबाई साहेब यांना आमचा मानाचा मुजरा 

        डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर 

 

 

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Postbox India

Leave a Reply

×
BLOGSINDIAMAHARASHTRA

वा.रा.कांत - बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात

error: Content is protected !!