Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGS

Authority and Responsibility – नोकरीचा राजीनामा आणि जबाबदाऱ्या !

1 Mins read

Authority and Responsibility – नोकरीचा राजीनामा आणि जबाबदाऱ्या !

 

 

Authority and Responsibility – नोकरीचा राजीनामा आणि जबाबदाऱ्या !

 

 

 

 


काही कामासाठी मी माझ्या एका मैत्रिणीला, प्राचीला फोन केला ,ती बरीच गडबडीत वाटली . म्हटलं काय झाल गं? मला म्हणाली लंचच ब्रेकला कॉल करते.

प्राची चांगल्या कंपनीत मानव संसाधन (Human Resource )मॅनेजर म्हणून काम करते. बरं म्हणतं मी बाकी कामाकडे वळले. तितक्यात फोन वाजला .

राधा ,माझी एक परिचित. मला म्हणाली वेळ आहे का जरा बोलायचं होतं . म्हटलं बोल गं . मला म्हणाली ,मी नवीन नोकरीवर रुजू होतेय. पण आताच्या

कंपनीतले सर म्हणताय कि तू तुझ्या जागी कोणाला तरी आण,मग जा. मला तर काही कळत नाही ,काय करावं ? काय करू शकतो हे तिला सांगणार

तर प्राचीचा फोन येतोय असं Indication आलं . राधा करते मी तुला जरा वेळात फोन म्हणतं मी पटकन प्राचीचा फोन घेतला.कसली इतकी गडबड म्हणायचा

अवकाश तर प्राचीने सांगायला सुरवात केली. आज दोन जणांनी नोकरीचे राजीनामे दिले. Authority and Responsibility १५ दिवसांपूर्वी एकाने

राजीनामा दिला ,त्याच्या जागेसाठी मुलाखती चालू आहे .आता कोणाला घेतलं तर तो आहे तोपर्यंत नवीन व्यक्तीला जरा प्रशिक्षणं तरी देईल .

आज ज्यांनी राजीनामे दिले त्याचं रिप्लेसमेंट ,हॅन्डओव्हर आणि इतर गोष्टी बघायच्या आहेत. म्हणजेचं काय जो नोकरी सोडतो त्याची आणि ज्या

कंपनीची नोकरी सोडतात त्या कंपनीच्या सुद्धा अशा काही जबाबदाऱ्या असतात . दोन्ही बाजूच्या मंडळीने जर एकमेकांच्या सहकार्याने ,समजुतीने आणि

सकारात्मकतेने हे सर्व केलं तर ती समस्या वाटणारं नाही. प्रथम बघूया जी व्यक्ती राजीनामा (Resignation) देते त्याने कसं हे सर्व हाताळावे. आपल्या नियुक्ती

पत्राप्रमाणे (Appointment letter) जर आपल्याला नोकरी सोडायची असते तर आपल्याला राजीनामा पत्र कंपनीत द्यावं लागत . राजीनामा हा लिखित

दिलेला चांगला. बऱ्याच कंपन्या ई-मेल राजीनामा पण स्विकारतात आज नवीन नोकरीची संधी आली आणि मी उद्या जॉब सोडतोय असं होत नाही.

नोकरी सोडण्यासाठी जो सूचना काळ (Notice period ) आहे तो किती ते आपल्या नियुक्ती पत्रात बघा . जर तो १ महिना आहे तर आज तुम्ही

राजीनामा दिला तर पुढचा १ महिना तुम्हाला आताच्या कंपनीत काम करावं लागेल. त्यानंतरचं तुम्ही नवीन नोकरीत रुजू होऊ शकता. सूचना काळ हा

प्रत्येक कंपनीसाठी आणि कर्मचार्यासाठी वेगवेगळा असू शकतो . ह्या काळात तुम्हाला तुमची जी काही राहिलेली कामं आहेत ती पूर्ण करायची असतात ,

तुमच्या जागी जी नवीन व्यक्ती येते त्यानां काम समजवून सांगायचं असतं .कामाच्या महत्वाच्या गोष्टी ,इतर काही संबंधित माहिती हि नव्या कर्मचाऱ्याला

जाणाऱ्या कर्मचाऱ्याने देणे अपेक्षित आहे . शेवटच्या दिवशी ऑफिसने आपल्याला वापरायला दिलेल्या वस्तू परत द्या. आपलं ID कार्ड सुद्धा जमा करा.

 

Also Visit : https ://wwwpostboxlive.com 

 

जर तुम्ही नोटीस पिरियड पूर्ण जबाबदारी घेऊन चांगल्याप्रमाणे व्यतीत केला तर तुम्ही नोकरी सोडल्यावर पण एक चांगला कर्मचारी म्हणुन तुमची नेहमीसाठी

ओळख राहिलं. आता दुसरी बाजू बघूया -कंपनीची . Authority and Responsibility रुजू झालेले कर्मचारी सुद्धा कधी तरी आपल्या भविष्यासाठी ,

प्रगतीसाठी किंवा अन्य कारणासाठी नोकरी सोडतील ही सत्यस्थिती आपण नाकारू तर नाही शकत. त्यामुळे जेव्हा एखादा कर्मचारी राजीनामा देतो

तेव्हा त्याला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देणं आणि त्याच्या जागी दुसरी व्यक्ती शोधणं महत्वाचं ! त्याला तुझ्या ओळखीचं ,माहितीतलं ह्या कामासाठी

आहे का हे कंपनी विचारू शकते .पण तू पहिले कोणाला तुझ्या जागी आणं आणि मग जा असं नाही सांगू शकतं .जाणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याचे अनुभव पत्र

(Experience Certificate ) ,त्याचा पगार देणं हे सर्व HR विभागाने (department ) व्यवस्थितपणे हाताळलं पाहिजे.त्या व्यक्तीसाठी बदली व्यक्ती

(Replacement )शोधणं हे HR ( Human Recourse’s) चं काम असतं . नोकरी सोडून जातांनाची मुलाखत (Exit interview) घेऊन राजीनामा

दिलेल्या कर्मचाऱ्याकडून त्यांचे काही अभिप्राय (Feedback), सूचना ,तक्रारी आहेत का हे जाणून घेऊ शकता. कंपनीच्या वाढीसाठी आणी नव्या येणाऱ्या

व्यक्तीसाठी त्याचा नक्कीचं फायदा होऊ शकतो.जाणाऱ्याने आनंदी मनाने जावं आणि कंपनीने पण त्याचं जाणं चांगल्या प्रकारे घ्यावं.

मग राजीनामा हि समस्या न वाटता नवीन सुरवात ठरू शकते .

 

 

 

 

मेघना धर्मेश
9321314782 | [email protected]

 

Leave a Reply

%d bloggers like this: