Apj abdul kalam – डाॅ.अब्दुल कलाम
Apj abdul kalam – स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
मी मरेन त्या दिवशी सुट्टी जाहीर करु नका…
तर एक दिवस जास्त काम करा…
२७ जुलै दिनविशेष…
थोडे इतिहासाबद्दल…
मिसाइल मँन ,महान देशभक्त ,देशाचे माजी राष्ट्रपति,
भारत रत्न ,
सर्वांचे लाडके Apj abdul kalam – डॉ एपीजे अब्दुल कलाम
(२७जुलै २०१५) यांचा स्मृतिदिन ….
Apj abdul kalam – डॉ. एपीजे अब्दुल कलाम ज्यांना देशाचे ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखलं जातं. ते कायम आपल्या स्मरणात देशाला दिशा दाखवणारे राष्ट्रपती म्हणून राहतील.
विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने ‘पद्मभूषण’, ‘पद्यविभूषण’ व १९९८ मध्ये ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत होणार्या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत.
Apj abdul kalam – अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो.
शिलाँग इथं सोमवारी संध्याकाळी Apj abdul kalam – डॉ. कलाम यांचं निधन झालं. तेव्हा सुद्धा ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्याचं काम करत होते. डॉ. कलाम यांचं संपूर्ण जीवन राष्ट्राची सेवा करण्यातच व्यतित झाले .
शब्द अपुरे पडतात यांची महती सांगताना…
या महान विभुतीस सदैव चिरशांति लाभो हि
या जगाच्या विधात्या कडे प्रार्थना…
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर