Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSEntertainment

tamasha dance – तमाशा सम्राट काळू – बाळू

1 Mins read

 

 

Tamasha dance – एक रूपयाची करमणूक इतिहास जमा झाली –

कवलापुरचे तमाशा सम्राट काळू – बाळू

 

 

महाराष्ट्रातील परंपरागत लोकनाट्यप्रकार. यामध्ये गायन, वादन, नृत्य व नाट्य यांचा अंतर्भाव असतो.

तमाशा हा शब्द उर्दूतून मराठीत आला असून, उघडा देखावा असा त्याचा अर्थ आहे. काही अभ्यासक

तमाशा या शब्दाची फोड करून तम + आशा = तमातून म्हणजेच अंधारातून आशेचा प्रकाश दाखविणारा

प्रकार, असेही त्याचे वर्णन करतात. Tamasha dance हा प्रकार लोकभाषेतून लोकरंजनाद्वारे लोकशिक्षण

देण्याचे काम करतो. महाराष्ट्रातील प्रचलित तमाशा हा लोकरंगभूमीवरील एक अत्यंत लोकप्रिय कलात्मक

आविष्कार आहे. प्रामुख्याने खेडेगावी भरणाऱ्या यात्रांमध्ये तमाशा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

अलीकडे बंदिस्त नाट्यगृहातही तमाशा लोकनाट्याचे प्रयोग होत असतात.

Maharashtra’s folk art spectacle emperor Kalu Balu

सतराव्या शतकात उदयाला आलेला tamasha dance तमाशा हा मूळ रंजनासाठीच उदयाला आल्याने

त्यातील शाब्दिक विनोद, द्विअर्थी संवाद, आध्यात्मिक रचना आणि शृंगार हा प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा

असतो. तमाशा रंगभूमीला अनेक शाहिरांनी आपले योगदान दिले. भाऊ फक्कड, परशराम, होनाजी बाळा,

हैबती घाटगे, रामजोशी, सगनभाऊ, अनंत फंदी, पठ्ठे बापुराव अशा अनेक शाहिरांनी रचना केलेल्या आहेत.

वरील सर्व शाहीर स्वातंत्र्यपूर्व काळातील आहेत. पूर्वी तमाशात फक्त आख्यानक लावण्या गायल्या जायच्या;

पण पुढे उमा सावळजकर याने बाबा मांग याच्या साहाय्याने रचलेला मोहना बटाव सारखा वग तमाशा

रंगभूमीवर १८६५साली आला आणि तमाशाचा आकृतिबंध तयार झाला.

खेळाच्या आरंभी सरदार हातात डफ घेऊन सुरते आणि झीलकारी या साथीदारांच्या मदतीने गणाने सुरुवात

करतो, गणेशाचे स्तुतिपर गीत गाऊन झाल्यानंतरच सरदार नाच्या पोऱ्यासमवेत रंगमंचावर येऊन इतर

साथीदारांची आणि स्वत:ची ओळख प्रेक्षकांना करून देतो. नंतर काही स्वरचित आणि संतांच्या गौळणी

सादर होतात. कृष्ण, पेंद्या, गौळणी,दहया-दुधाचे माठ घेऊन मथुरेच्या बाजाराला निघत तेव्हा त्यांच्या चटकदार

आणि खुमासदार विनोदाच्या झडती होतात. यात भरपूर नाटय असल्याने विनोदालाही वाव मिळतो. यानंतर

लावण्यांचा कार्यक्रम सादर होतो. लावण्यांचे विषय वेगवेगळे असतात. यात काही शृंगारिक लावण्या असतात,

तर काही भेदिक, कूटात्मक, स्तुतिपर, विरहात्मक लावण्याही असतात.काही नीतिपर व धार्मिक विषयांवरच्या

लावण्याही असतात.

पेशवेकाळापासून उपरोक्त पद्धतीने tamasha dance तमाशाचे सादरीकरण केले जात आहे.कालौघात त्यात

निरंतर बदल होत आले आहेत. तमाशा रंगभूमीवरील एकूण कलाघटकांच्या बाजूंचा विचार करता आपणास

असे आढळून येईल की, इतर कलांच्या सादरीकरणाच्या तुलनेत तमाशातील कलाघटकांच्या सादरीकरणाची

शैलीसुध्दा भिन्न असते. तमाशात हलगी, ढोलकी जुगलबंदी, गण, मुजरा, बतावणी, रंगबाजी, लावणी आणि

उत्तररंगात पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय विषयांवर वग लावण्याची परंपरा आहे.

काळू-बाळू घरंदाज तमाशा कलावंत होते. कवलापूर (ता. मिरज, जि. सांगली) सारख्या छोटा गावात जन्म

घेतलेल्या या कलावंतांची ही तिसरी पिढी. सातू-हिरू या जोडीने प्रथम तमाशा घरात सुरू केला. त्यानंतर तोच

वारसा सातू यांची मुले शिवा-संभा यांनी चालवला. त्यानंतर संभाजी यांच्या काळू-बाळू या दोघा जुळ्या मुलांनी

घरातील सर्व बंधूंना बरोबर घेऊन tamasha dance तमाशा शिखरावर नेला. आता त्यांची मुले चौथ्या पिढीतही

हा तमाशाचा वारसा पुढे चालवत आहेत.

 

कवलापुरकर, शिवा-संभा :

महाराष्ट्रात्तील नामवंत tamasha dance तमाशा कलावंत. शिवा-संभा हे दोन भाऊ. अत्यंत हजरजबाबी आणि

उत्स्फूर्त अभिनय हे त्यांचे वैशिष्ट्य. शिवा-संभाचा जन्म सातु खाडे कवलापूरकर यांच्या घराण्यात कवलापूर

ता. मिरज, जिल्हा सांगली येथे झाला. त्यांना वडिलोपार्जित तमाशाची परंपरा लाभलेली होती. शिवा-संभाचे

वडील सातु खाडे यांनी त्यांचे बंधू हिरू यांच्या सोबतीने तमाशाचा फड उभा केला होता. तीच परंपरा शिवा-संभा

नंतर काळू-बाळू यांच्या रूपाने कार्यरत राहिली. शिवा-संभाचे समकालीन भाऊ फक्कड उर्फ भाऊ

मालोजी भंडारे, सुंडाप्पा, पट्ठे बापूराव हे होत. शिवा-संभाच्या तमाशात सुंडाप्पा हे हलगी (कडे) वाजवण्याची

जबाबदारी पार पाडायचे तर भाऊ फक्कड नाच्या पोराची भुमिका निभावायचे.शिवा-संभाकडे सरदाराची

भूमिका असायची.

काळू बाळू यांचा जन्म १६ मे १९३३ रोजी झाला. त्याची कथाही रंजक आणि तितकीच अंगावर शहारा

आणणारी आहे. तेव्हा दवाखाने फक्त शहरातच असायचे. बाळंतपण घरातच व्हायची. गावा- गावात सुईनी

असायच्या. त्या अनुभवातून बाळंतपण करायच्या. अडलेल्या बायका पुरेसं उपचार नसल्यानं काही वेळा

दगावायच्या. त्यांच्या आईचं बाळंतपण घरातच झालं. मुलगा झाला. घरादाराला आनंद झाला. त्या वेळी

वार उकिरड्यात खड्डा काढून पुरायची पद्धत होती. काळू बाळू यांची चुलती वार पाटीत घेऊन उकिरड्याकड गेली.

तिथं तिनं खड्डा काढला.

वार उचलताना तिला एक गाठ हालत असल्याची दिसली. तीनं त्याचं वरचं कवच फोडलं. आत एक मूल हालत होतं.

चुलती त्याला घेऊन घरी आली. बाळाची तब्बेत अगदी लहान व अशक्त होती. सर्व जण आश्चर्य चकित झाली.

एकाचा उकिरड्यावर जन्म झाल्याची बातमी गावभर झाली. बायकांची घराकडे वर्दळ वाढली. असं कसं झालं

म्हणून त्या एकमेकींना विचारत होत्या. आमच्या घरातल्या अन्य माणसांच्या अंगावर काटा उभा राहिला.

अशी बेफिकिरी कशी झाली? चुलतिच्या लक्षात जर हा प्रकार आला नसता तर? काळू बाळू पैकी लहान

म्हणजे काळू नीं हे जग बघितलच नसतं.

सगळ्या गावभर टवाळी करत, हसत त्यांच्या जन्माची चर्चा सुरू झाली. लोकांना हसवण्याच्या धंद्याची

सुरवात खऱ्या अर्थानं इथूनच सुरू झाली. त्यांचं बारसं जोरात झालं. उकिरड्यावर जन्मलेल्याचं नाव

लहू ( काळू ) व पहिला जन्मले त्याचं नाव अंकुश ( बाळू ) ठेवलं. जहरी प्याला या वगनाट्यातील

हवालदारांच्या भूमिके मुळे त्यांना काळू बाळू ही नावे मिळाली आणि रसिक वर्ग याच नावाने ओळखु लागले.

शिवा-संभाच्या ऐन उमेदीच्या काळात संगीत रंगभूमी बहराला आली होती. तेव्हा संगीत रंगभूमीवर

बालगंधर्व आपल्या प्रतिभेच्या जोरावर एक अनोखी छाप पाडत होते. तर शिवा-संभा tamasha dance

तमाशाच्या बोर्डावर ग्रामजनांच्या मनावर अधिराज्य गाजवत होते. शिवा ऐतिहासीक पौराणिक रजवाडी

वगातील भूमिका हुबेहूब वठवायचे. एकदा शिवा-संभाच्या तमाशात शिवाने गण गवळण-बतावणी

झाल्यावर मणीमराठा नावाचा वग लावला. त्यात शिवाने मराठमोळ्या मराठी रांगड्या सरदाराची भूमिका

बजावली, त्याची वेषभूशा मिशिचा पिळ आणि फेट्याची बांधणी अशी वैशिष्ट्यपूर्ण होती की, जणू काही

छत्रपती शाहुमहाराज प्रत्यक्षात बोर्डावर उतरले. प्रेक्षकाना आश्चर्याचा धक्का बसला आणि सर्व प्रेक्षक

शिवाला पाहून उभे राहीले व छत्रपती शाहूना मानवंदना देऊ लागले. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

खेळ संपला ज्याच्या त्याच्या मुखावर शिवाच्या अभिनयाची चर्चा चालू होती. शिवाने वठवलेल्या भूमिकेची

बातमी छत्रपती शाहूंना कळाली त्यांनी आपल्या संस्थानात बोलांवून शिवा संभाच्या तमाशाचे आयोजन केले.

तेथे महाराजांनी जरीचा फेटा देवून त्यांचा सन्मान केला.

आपली प्रतिभा आणि गायकीच्या जोरावर ग्रामीण महाराष्ट्रासह शिवा-संभाने मुंबई गाजवली. त्याकाळी

मुंबईत tamasha dance तमाशाचे बंदीस्त थिएटर नव्हते. महाराष्ट्रातील अनेक छोटे मोठे तमाशे मुंबई

मध्ये यायला सुरुवात झाली. चाळीमधून तमाशाच्या सादरीकरणाचे फड उभे रहायला लागले. इथे तमाशाच्या

अनेक झडती होवू लागल्या. शिवा-संभाचे समकालीन पट्ठे बापूराव, भाऊ फक्कड, उमा-आनंदा चांदोलीकर

यांचे उघड्यावर तमाशे होवू लागले. शिवा-संभा आणि उमा-आनंदा चांदोलीकर यांच्या लढती पाहून प्रेक्षकांचे

लोंढेचे लोंढे चाळीकडे ओढले जावू लागले. तमाशाला प्रेक्षक गर्दी करत आहेत. हे पाहून मुंबई मधील छोटूभाई

यांनी डिलाइल रोड, शिवडी, नायगाव येथे पत्र्याचे बंदीस्त थिएटर निर्माण केले.

पिला हाऊस थिएटर मध्ये तमाशा कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळाले. त्यातून पैसा मिळू लागला.

तमाशाची तिकिट विक्री झाल्यानंतर तमासगीरांना छोटूभाई यांना मानधन द्यावे लागत असे. सुपारी देऊन

यात्रे-जत्रे निमित्ताने बोलावला जाणारा तमाशा आता करार पद्धतीने सादर करू लागला. शिवा-संभाने गण,

हाळीची गवळण, तक्रारीची गवळण, विणवणीची गवळण, कटाव, धिलकार आणि टाकण्या असे तमाशातील

अभिव्यक्ती प्रकार विपूल प्रमाणात लिहिले. शिवा-संभाचे वग हे तमाशाच्या उत्कर्ष काळातील रजवाडी बाजाचे

होते. शिवा-संभा हे तुर्रा पक्षाचे होते.

कलगी तुऱ्याच्या झडतीत उमा-आनंदा चांदीवलीकर व शिवा-संभा कवलापूरकर हे आध्यात्मिक भेदीक रचनांमध्ये

लढती खेळायचे. आपल्या तमाशाला सुरवात करताना शिवा-संभा यांनी गणांच्या अल्प प्रमाणात रचना केलेल्या

आढळतात.

 

शिवा-संभांच्या गणांबरोबर गोपी कृष्णावर आधारीत गौळणी कलात्मक दृष्ट्या रचलेल्या आढळतात.

या प्रयोगसिद्ध गौळणीला शिवा-संभा कवलापूरकरानी खऱ्या अर्थाने न्याय दिलेला दिसतो. त्यांनी गवळणीची

हाळीची गवळण, तक्रारीची गवळण, विणवणीची गवळण या तीन प्रकारांत विभागणी केलेली आढळते.

त्यांनी आपल्या हाळीच्या, तक्रारीच्या (खुळीच्या), विनवणीच्या गवळणीतून राधा कृष्णाच्या श्रृंगाराचे दर्शन

घडविले आहे. त्यात नाविन्यता, सहजस्फुर्तता, रसनिष्पत्ती, अलंकार, उपमा इत्यादी पहावयास मिळतात.

मुलाखत :

लाखो रसिकांचे चाहते, मनाचे मानकरी, तमाशाचे मुकुटमणी. दिल्ली संगीत नाट्य अकादमी तसेच महाराष्ट्र

राज्य पुरस्कार विजेते तमाशा सम्राट, वग सम्राट, विनोद सम्राट लहू अंकुश उर्फ काळू बाळू यांची सह्याद्री

वाहिनी वरील १९८५ सली घेतलेली तमाशा रसिकांना भुरळ घालणारी मुलाखत
मरावे परी किर्तिरुपी उरवे
जगाच्या रंगमंचावर असे वावरा की,
तुमची भूमिका संपल्यावर सुद्धा
टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत.

एक रूपयाची करमणूक इतिहास जमा झाली
कुलगुरू पि. जि. पाटील अभिमानाने म्हणत ” आम्हीं काळू बाळू च्या गावचे ” म्हणजेच कौलापुरचे.

आजच्या दिवशी काळूबाळू पैकी बाळू गेला. (२६ एप्रिल २०१४) त्या अगोदर २ वर्षा पूर्वीच काळूने निरोप

घेतला होता. आम्ही मित्र मित्र तमाशाची कनात लागली कि १ रुपया देऊन काळू बाळू च्या फडावर जायचो .

२-३ तासाची निखळ करमणूक म्हणजे काळू बाळू त्यांचे सवाल जबाब खूप रंगत

३०-४० वर्षापूर्वीचा काळ होता तमाशा बघणे म्हणजे पांढरपेशा वर्गात नाक मुरडले जायचे . पण आजचे चित्रपट,

नाटके पाहिल्यावर असे वाटते कि त्यावेळचे तमाशेच श्रेष्ठ होते . त्यातील खुसखुशीत ” इनोद ” निखळ

आनंद देत होता
महाराष्ट्र शासनानं tamasha dance तमाशासम्राट अंकुश संभाजी खाडे ऊर्फ बाळू यांना ” विठाबाई

भाऊ मांग-नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरवण्याचं ठरवलं आहे. हे समजल्यावर

बाळू यांच्या डोळ्यात पाणी तरळलं. त्यांच्या मनात आनंद आणि दुःख या भावनांची कालवाकालव झाली.

“”ह्यो क्षण आनंदाचा हाय, पर माझा काळू पाइजे हुता हो..’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

‘तमाशातनं आमी महाराष्ट्राचं मनोरंजन केलं. सगळीकडं फिरलु. सगळ्यांना मान दिला. तमाशा ही कला हाय,

हे मानायला काही लोक तयार व्हायचे न्हाईत. कलावंताच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात लई तरास हुतुय हे खराय.

आमीपण ते भोगलं, मातुर कलेची प्रामाणिकपणे सेवा केल्याचं फळ आज मिळाल्यासारखं वाटतंय.

नव्या पिढीनं अशीच सेवा करावी, कष्ट करावं. त्याची चीज होतं, हे ध्यानात ठेवावं.”

शिवा-संभाने आपल्या तमाशा फडाच्या माध्यामातून नवीन काव्यरचना करून त्याला गोड चाली लावलेल्या आहेत.

जुन्या पद्धतीची शिवा-संभाची गायकी आजही काळू-बाळूंच्या तमाशातून ऐकण्यास मिळते इतर तमासगीरांपेक्षा

शिव-संभाचा तमाशा हा सामाजिक बांधिलकी आणि रसिकांचे ऋण व्यक्त करताना दिसतो. शिवा कवलापूरकर

यांचा ५७ व्या वर्षी निधन झाले तर शाहीर संभा कवलापूरकरचा ८६ व्या वर्षी निघन झाले.

लोकनाट्यातील या कलाकार द्वयींच्या आयुष्यावर सोपान खुडे यांनी लिहिलेले ‘विनोदसम्राट काळू-बाळू’ हे

चरित्रपर पुस्तक प्रसिद्ध आहे.

 

चरित्रपर पुस्तक 2 :

https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=4769968308848387462&PreviewType=books

काळू बाळू यांनी सादर केलेली “वगनाट्य”

१) मित्रप्रेम अर्थात प्रेमाची फाशी.
२) सत्वशिल राजा हरिश्चंद्र.
३) पतीव्रतेचा पोलादी किल्ला.
४) संशयाचा घोटाळा.
५) वेडा झालो मी तुझ्या साठी अर्थात रक्तात न्हाली अब्रू.
६) कुणा म्हणावे छत्रपती.
७) इंदिरा काय भानगड.
८) इश्क पाखरू.
९) भिल्लाची टोळी.
१०) झुंजार माणसा झुंज दे.
११) रक्तात रंगली दिवाळी.
१२) रक्तात भिजली हिरवी साडी.
१३) सगळ चाललंय खुर्ची साठी.
१४) कोठे लपवाल हे पाप.
१५) भाग्यलक्ष्मी तू या घरची.
१६) जिवंत हाडाचा सैतान.
१७) सत्ता गेली सुनेच्या हाती.
१८) सुखी होते मी या संसारी.
या सर्व वगनाट्या शिवाय त्यांनी सादर केलेले तुफानी विनोदी वगनाट्य (रजवाडी)
१९) “जहरी प्याला” अर्थात “काळू बाळू” या वगनाट्या मुळेच लहू अंकुश या नावाचे “काळू बाळू” असे रूपांतर झाले. या वगनाट्याचे आज पर्यंत अंदाजे २२ हजारांचे वर प्रयोग केले. तमाशा सृष्टीत वगनाट्यामधील हा एक उच्चांकच असेल.
तसेच काळू बाळू यांच्या निधनानंतर काळू बाळू यांच्या चवथ्या आणि पाचव्या पिढीने मिळून “जहरी प्याला” हेच वगनाट्य पुन्हा रसिक मायबाप समोर सादर केले.
मूळ संस्थापक
सातुजी खाडे आणि हिरूजी या मित्रबंधूनी १)”सातु हिरू कवलापूरकर” या नावानी तमाशा फड रंगवला,
दुसरी पिढी म्हणजे सातूजी खाडे यांची मुल
२)”शिवा संभा कवलापूरकर”
३) तिसरी पिढी शिवा यांचे सुपुत्र भिमराव (खलनायक). संभा यांची चार मुल रामचंद्र (सरदार), शामराव (अष्टपैलू कलावंत), लहू अंकुश उर्फ काळू बाळू (विनोदसम्राट).
४)चवथी पिढी काळू बाळू यांचे चिरंजव आणि पुतणे.
५)पाचवी पिढी काळू बाळू यांचे नातू.
अशी ही मनोरंजनातून समाज प्रबोधन करणारी पाच पिढ्यांची कला जोपासणारी घराणेशाही

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

 

लेखक : माधव विद्वांस  संग्रह / संकलन : वैभव जगताप

Leave a Reply

error: Content is protected !!