Also Visit for Trending News & Article  Postbox Live

HISTORY

shivaji maharaj wife – छत्रपती शिवपत्नी सकवारबाई राणीसाहेब

1 Mins read

shivaji maharaj wife – छत्रपती शिवपत्नी सकवारबाई राणीसाहेब

 

shivaji maharaj wife – छत्रपती शिवपत्नी सकवारबाई राणीसाहेब यांना आमचा मानाचा मुजरा 

 

 

 

छत्रपती शिवाजी महाराज व सकवारबाई राणीसाहेब यांचा विवाह ९ जानेवारी इ.स. १६५६ रोजी राजगडावर जिजाऊ साहेबांनी मोठ्या थाटामाटात लाऊन दिला. शोर्यशाली घराण्यांचा छत्रपती शिवरायांना स्वराज्याच्या कार्याला पाठिंबा मिळवण्यासाठी जिजाऊ साहेबांनी शिवरायांची आठ लग्न करून दिली होती.  सकवारबाई राणीसाहेब या छत्रपती शिवाजीराजांच्या सहाव्या पत्नी असून, त्या गायकवाड घराण्यातील होत्या. छत्रपती शिवरायांचे अंगरक्षक कृष्णाजी गायकवाड हे सकवारबाई राणीसाहेबांचे बंधु होत. सकवारबाई राणीसाहेबांच्या पोटी कमळजा नावाच्या एक कन्या होत्या.
कमळजाबाई यांचा विवाह नेताजी पालकर यांचे पुत्र जानोजी पालकर यांच्यासोबत करून दिला होता. आपल्या हयातीतच प्रतिशिवाजी म्हणून ख्याती पावलेले व परकीयांनी गौरवलेले मराठ्यांचे महान सेनापती नेताजी पालकर. नेताजी पालकर हे पुणे जिल्ह्या ता. शिरूर .अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर ,नदीच्या दक्षिणेस असलेले मौजे तांदळी या गावचे.नेताजी पालकर हे वयाने मोठे होते म्हणूनच छ.शिवराय नेताजी पालकरांना काका या नावाने हाक मारत. नेताजी पालकरांच्या प्रेमापोटी छ.शिवरायांनी आपली मुलगी कमळजा यांचा विवाह नेताजींचे पुत्र जानोजी पालकर यांच्याशी लावून दिला.हा विवाह राजगडावर जिजाऊ व छ.शिवरायांच्या उपस्थितीत पार पडला.विवाहानंतर छ.शिवरायांनी वाई घराण्यातील मौजे पसर्णीची मोकासदारी त्यांना बहाल केली.
पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर २६ मार्च १६८९ रोजी रायगडाला झुल्फिकारखानाने वेढा घातला. रायगडाला सुमारे ४० हजार मोगली सैन्य तळ ठोकून होते .रायगडाचा घेर इतका मोठा होता की ४० हजार सैन्यदेखील वेढा देण्यासाठी अपूर्ण पडत होते.अखेर रायगडचा पाडाव झाला. महाराणी येसूबाईनी मोगलांशी तह केला. त्या तहानुसार येसूबाई राणीसाहेब यांच्यासह रायगडावरील सर्वजण राजकैदी म्हणून मोगलांच्या कैदेत गेले. त्यावेळी shivaji maharaj wife सकवारबाई राणीसाहेब यांना येसूबाई राणीसाहेब, छोटे शाहू यांच्याबरोबर औरंगजेबाच्या छावणीत राजकैदी म्हणून जावे लागले.
स्वराज्याच्या धन्याच्या कुटुंबाला असे काही दुःख भोगावे लागेल याची कल्पना देखील कोणी करू शकत नव्हते. आपला पुत्र छत्रपती संभाजी महाराज मोगलांच्या जाळ्यात अडकले तेव्हा सकवार मातोश्रींना खूप धक्का बसलेला होता. पापी औरंग्याने क्रूरपणे आपल्या लाडक्या शंभूराजांना मारले तेव्हा शंभूराजांच्या बलिदानाची बातमी सकवार मातोश्रींनी ऐकली, तेव्हा त्या फक्त शरीराने जिवंत राहिलेल्या होत्या. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत मातोश्रींना औरंगजेबाच्या छावणीत येसूबाई राणीसाहेब व लहानग्या शाहूराजांबरोबर कैदी म्हणून दिवस काढावे लागले होते.
काय अवस्था झाली असेल शिवरायांच्या पत्नीची. औरंगजेबाची छावणी जिथे जाईल तिथे त्यांना जावे लागत होते. जेव्हा औरंगजेबाची छावणी अहमदनगरमध्ये होती. तेव्हा तेथे त्या माउलीने आपले प्राण सोडले. आपल्या शंभूराजांना, शिवरायांना भेटण्यासाठी त्या अनंतात विलीन झाल्या.
आपले सर्वांचे दुर्दैव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या shivaji maharaj wife पत्नीची सकवारबाई राणीसाहेबांची समाधी कोठे आहे हेदेखील इतिहासाला ज्ञात नाही.

अशा या पुण्यशील ,धिरोदत्त सकवारबाई राणीसाहेब यांना आमचा मानाचा मुजरा

लेखन 
डाॅ.सुवर्णा नाईक निंबाळकर

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: