Also Visit for Trending News & Article  Postbox Live

HISTORY

sambhaji maharaj death – छत्रपती संभाजी महाराज कैद

1 Mins read

sambhaji maharaj death – छत्रपती संभाजी महाराज कैद

sambhaji maharaj death – १ फेब्रुवारी छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वर येथे कैद व म्हाळोजीबाबा घोरपडे यांचे वीरमरण.

 

 

 

 

“लाख गेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जाता कामा नये.” म्हणून छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी शेवटच्या श्र्वासापर्यत गनिमाशी लढणारे स्वराज्यासाठी एक नव्हे, दोन नव्हे तिन पुत्र देणारे (सरसेनापती संताजी, बहिर्जी व मालोजी घोरपडे) महापराक्रमी सरलष्कर म्हाळोजी घोरपडे यांची आज 331 वी पुण्यतिथी. आपल्या या महापराक्रमी पुर्वजाच्या पवित्र स्मृतीस अभिवादन.

आपल्या ज्वलंत पराक्रमाने मराठ्यांच्या इतिहासात चमकणारे घोरपडे ते मूळचे भोसलेच होते. बहामनी काळात घोरपडीच्या साह्याने विशाळगड किल्ला जिंकल्यामुळे त्यांना ‘राजे घोरपडे बहाद्दर ही पदवी बहामणी सुलतानांनी दिली व त्यांचे आडनाव भोसले ऐवजी घोरपडे रूढ झाले.
१६५२ मधे शहाजीराजांचे थोरले पुत्र संभाजीराजे हे पन्हाळ्याची सुभेदारी सांभाळत असताना म्हाळोजी बाबा संभाजीराजांच्या तैनातीत होते.१६५४ मधे अफझलखानाच्या कारस्थानामुळे संभाजीराजे कनकगिरीच्या लढाईत मारले गेले. त्यानंतर म्हाळोजी बाबांनी आपली सेवा छत्रपती शिवरायांकडे रुजू केली. शिवरायांनी पन्हाळा जिंकल्यानंतर पूर्वीपासून या भागाचा अनुभव असल्याने म्हाळोजी बाबांना या भागात नेण्यात आले.

छ. शिवरायांच्या मृत्यूनंतर शंभूराजे छत्रपती झाले.म्हाळोजी बाबांनी आपली निष्ठा शंभूराजांच्या चरणी अर्पण केली.यावेळी म्हाळोजीबाबांचे पुत्र संताजी,बहिर्जी व मालोजी स्वराज्यात तलवार गाजवीत होते. छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने महाराष्ट्रात येऊन मराठ्यांच्या राज्यावर हल्ला केला. छत्रपती शंभूराजांनी अतिशय जिद्दीने ,चिकाटीने आणि दुर्दम्य इच्छाशक्ती ने आपल्याहून कैकपट मोठ्या मोगली सैन्याला प्रचंड धावपळीच्या लढाया मारून सुरुवातीच्या काळात यश मिळू दिले नाही. म्हाळोजीबाबांचे पुत्र पराक्रमी संताजीराव हेही या धामधुमीच्या काळात शत्रुंना आपल्या तलवारीचे पाणी पाजत होते. या सर्व काळात म्हाळोजीबाबा हे पन्हाळा सुभ्याचा बंदोबस्त चोख ठेवत होते.

शंभूराजाच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या प्रखर प्रतिकाराने नाउमेद होऊन औरंगजेबाने आपला मोर्चा विजापूरची आदिलशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही यांच्याकडे वळविला .प्रचंड सैन्यासह वेढा घालून औरंगजेबाने १६८७ पर्यंत या दोन्ही शाह्या नष्ट केल्या. त्यांचे सैन्य, खजिना, युद्धसामग्री यांच्या समावेशाने औरंगजेबाचे सामर्थ्य आणखीनच वाढले. या सामर्थ्यामुळे औरंगजेब आता मराठ्यांच्या वर तुटून पडला .अशातच मराठ्यांचे सेनापति हंबीरराव मोहिते हे आॅक्टोबर १६८७ मध्ये वाई येथे धारातिर्थी पडले. मोगल मराठा संघर्षाच्या या विलक्षण धामधुमीच्या काळात औरंगजेबाला हवी होती ती घटना घडली. छत्रपती शंभुराजे संगमेश्वर येथे मुघलांच्या हाती लागले.

१६८८ मध्ये विशाळगडावरून रायगडाकडे जाताना संगमेश्वर येथे थांबले. इथे रयतेच्या तक्रारींचा निपटारा करण्यात त्यांचे दोन दिवस गेले.१ फेब्रुवारीला रायगडाकडे निघण्याचे ठरवून काही राहिलेली कामे उरकत असतानाच त्यांच्या पाळतीवर असणारा शेख निजाम हा मोगली सरदार अचानक मोठे सैन्य घेऊन संगमेश्वरला धडकला. शंभूराजे बरोबर यावेळी फक्त ५०० सैन्य होते. म्हाळोजीबाबा ,संताजी व त्यांचे बंधू खंडोबल्लाळ हे सर्वजण शंभूराजे बरोबर होते.शेख निजामाने संगमेश्वर वेढून आक्रमण करताच सर्वांनी जमेल तसे वेढा फोडून रायगडाकडे जाण्याचे ठरवून प्रतिआक्रमण केले. संताजी राव व खंडोबल्लाळ मोगलांची फळी तोडून निसटले पण म्हाळोजीबाबा कवी कलश व शंभुराजांना मोगलांची फळी तोडून निसटले .पण म्हाळोजीबाबा ,कवीकलश व शंभूराजे यांना मोगलांनी पक्के घेरले .या अटीतटीच्या प्रसंगी म्हाळोजीबाबांनी लढाईचा भार पुढे होऊन आपल्या अंगावर घेतला. आपला राजा वाचला पाहिजे या विचाराने बेभान होऊन ते मोगलांशी लढू लागले. पण लढाईच्या धुमश्चक्रीत प्राणपणाने झुंजणारे म्हाळोजीबाबा प्राणांतिक जखमा होऊन रणांगणावर धारातीर्थी पडले.

छत्रपती शंभूराजांना वाचविण्यासाठी त्यांनी आपले प्राण दिले तेव्हा ते ६९ वर्षाचे होते. सतत बावन्न वर्ष स्वराज्याची सेवा बजावून म्हाळोजीबाबा धारातीर्थी पडले. म्हाळोजीबाबा पडल्यानंतर जखमी कवीकलशांना वाचवण्यासाठी मागे फिरलेल्या छ. शंभूराजांना मोगलांनी कवी कलशांसह कैद केले. स्वराज्याचे छत्रपती औरंगजेबाच्या अजगरी विळख्यात सापडले.

संगमेश्वरच्या पूर्वेला १३ किलोमीटर अंतरावर कारभाटले हे गाव आहे .या गावातील घोरपडे वाडीत ग्रामदैवत काळीसरी देवीच्या मंदिराच्या उजव्या बाजूला पाच शिवकालीन समाध्या आहेत. यापैकी सर्वात पुढे असलेली समाधी ही म्हाळोजीबाबांची समाधी म्हणून ओळखली जाते. घोरपडे मंडळी पुर्वापार चालत आलेल्या माहितीवरून या समाधीचे पूजन करतात.
अशा या प्रामाणीक, स्वराज्याचे निष्ठावंत म्हाळोजीबाबा घोरपडे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा.

Also Watch :

लेखन
डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: