Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIANewsPostbox Marathi

isis – आय.एस.आय.एस. वहाब्बी आतंकवाद ( भाग – १ ) 

1 Mins read

isis – आय.एस.आय.एस. वहाब्बी आतंकवाद ( भाग – १ ) 

2/12/2021,

आय.एस.आय.एस. (  isis )  वहाब्बी आतंकवाद  ( भाग – १ )

       isis आय.एस.आय.एस.(इसीस) ची क्रुरता मानवी विकृतपणाची परिसिमा गटात आहे. मेकिंग ऑफ इल्लूझन हा विडियो

आय.एस.आय.एस. ने नुकताच प्रकाशित केला. मानवाची बकरीसारखी हत्या हिटलर नंतर पहिल्यांदाच दिसत आहे.

इस्लामचा विकृत वापर वाहब्बी इस्लामचा आधार घेवून इसीस करत आहे. शत्रूच्या हृदयात आणि मनात प्रचंड दहशत

निर्माण करणे हा इसीसच्या युद्ध तंत्राचा भाग आहे. त्यामुळे इसीसला  अणु अस्त्र हातात मिळाले तर ते वापरायला मागे पुढे बघणार नाही हे स्पष्ट होते.

 इसीस हे अमेरिकेने व सौदी अरेबियाने सिरिया विरुद्ध वापरण्यासाठीच निर्माण केले. आता तेच उलटले.   हे इसीस म्हणजे काय? 

जगातील अनेक भागात तरुणांना आत्मघात करून विध्वंस माजवायला कसे लावतात? ईसीसचे मूळ २००३च्या इराकवरील

अमेरिकन हल्ल्यात शोधले पाहिजे. तिचा मूळ संस्थापक हा अल-कायदा-इन-इराक (AQI) चा म्होरक्या अल-झरकवि होता.

झरकवि हा जॉर्डनचा दारुड्या. त्याला चोरीसाठी,ड्रग तस्करीसाठी, चाकूच्या हल्ल्यासाठी अनेकदा अटक झाली होती.

तुरुंगात त्याने अनेक दहशतवाद्यांशी संबंध जोडले. १९९९ ला त्याला सोडण्यात आले.

तेव्हा त्याने चर्चवर आणि इस्रायिली सैनिक असलेल्या हॉटेलवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

हल्ला फसला व झरकवि पाकिस्तानला पळाला. तिथून तो अफगाणीस्तानला गेला व ओसामा बिन लादेनला भेटला. 


बिन लादेनला तो अजिबात आवडला नाही. कारण झरकवि कट्टर शिय्या विरोधी होता व शिय्या मुस्लिमांना मारले पाहिजे असा त्याचा आग्रह होता.

पण त्याला दहशतवादी प्रशिक्षण केंद्र स्थापन करायाला  परवानगी देण्यात आली. झरकाविणे बायह (बिन लादेनला निष्ठेची शपथ) घेण्यास नकार दिला.

तरी अमेरिकेने अफगाणीस्तानवर  हल्ला केल्यानंतर तो तालिबान आणि बिन लादेनसाठी लढला. जखमी होऊन तो इराण मार्गे इराकला गेला.

२००३ ला अमेरिकेने इराकवर हल्ला केला. जगातील बेकार दहशतवाद्यांना ही परवणीच होती.

जगभरातून ते अमेरिकेविरुद्ध युद्ध करण्यासाठी इराक मध्ये आले. त्यातच अमेरिकेने सद्दामचे सैन्य बरखास्त केले.

हे आयते झरकवि ला मिळाले. निरपराध लोकांची अमेरिकेमुळे हत्या झाली व अमेरिका विरोधाची लाट उसळली. झरकवि कट्टर शिय्या द्वेष्टा होता.

प्राप्त परिस्थितीचा  फायदा घेवून ऑगस्ट २००३ ला त्याने हल्ले  सुरू केले. शिय्या मस्जिदीवर हल्ला करून ९५ लोक मारले.

झरकविने २००४ मध्ये, ओसामाला बाया म्हणजे निष्ठेची शपथ घेतली व AQI स्थापन केली. परदेशी लढवय्ये  मोठया संखेने त्यात सहभागी झाले.

जून २००६ ला झरकविला विमान हल्ल्यात मारण्यात आले. झरकवि अत्यंत क्रूर होता. शिरच्छेदाचे तंत्र त्याने लागू केले.

शिय्या मुस्लिम आणि इतरांची कत्तल करणे हे त्याच्या वाहबी इस्लामला मान्य असल्याचे धोरण राबविले.

      अल-क्वेडाचे डेप्युटी लीडर जवाहीरीने झरकविचे कौतुक करत AQI ला इस्लामिक राष्ट्र निर्माण कारण्याचा आदेश दिला.

AQI सकट अनेक संघटनांनी एकत्र येवून इराक मध्ये इस्लामिक स्टेट इन इराक (ISI) बनविले. नेता अबु ओमर अल बागदादीला नेमण्यात आले.

दरम्यान शिय्या इराणच्या दबावामुळे इराक प्रधानमंत्री मालिकीने अमेरिकन सैन्याला चले जाओचा आदेश दिला.

मालिकीने सुन्नी नेत्या विरुद्ध आसूड उगारले. इराकचे सुन्नी उपाध्यक्ष तारिक हशमीला अटक करण्यात आली.

मालिकीने सुन्नी जमातीला इसीसच्या गोटात ढकलले. इराकमधील आणि नंतर सिरिया मधील यादवी युद्धात सौदी अरबीया /तुर्कीने सुन्नी इसीसला पूर्ण मदत केली.

इराक मध्ये ६०% लोक शिय्या आहेत. ४०% सुन्नी आहेत. अमेरिकन हल्ल्यानंतर तोडा आणि फोडाचे राजकारण करून शिय्या सुन्नी मध्ये यादवी युद्ध घडविले.

ज्याप्रमाणे वाहब्बी इस्लामवर आधारीत, सौदीने पाकमध्ये दहशतवादी टोळ्या निर्माण केल्या. ज्याप्रमाणे अमेरिका पाक,

सौदी आता कश्मीरमध्ये वाहब्बी इस्लामचा प्रसार करत आहेत. त्याचप्रमाणे वाहब्बी इस्लामचे सुन्नी सैन्य इसीसच्या स्वरूपात, सौदी अरेबीया, अमेरिकेने बनविले.

      बगदादी यांची हत्या २०१० मध्ये झाली व अबु बकर-अल-बगदादी इसीसचा प्रमुख झाला. प्रेषित मोहम्मदचा वंशज असल्याचा त्यांचा दावा आहे.

२००३ ला अमेरिकेच्या हल्ल्यानंतर बगदादी सह अनेक लोक इराकी स्वतंत्र युद्धात सामिल झाले.

२००५ ला फल्लूजहा येथील अमेरिकन हल्ल्यामध्ये बगदादीसह अनेक लोक पकडले गेले व केंप बुक्का येथे बंदिस्त झाले.

तुरुंगात बगदादीला अनेक सहकारी मिळाले. सद्दामच्या सैन्यातील अनेक सैनिक इसीसचे शिलेदार झाले.

तुरुंगातून सुटल्यावर बगदादी आतंकवादी झाला व ISI चा  मे २०१० ला प्रमुख झाला.

त्याने ८ तुरुंगावर हल्ला करून सर्व कैद्यांना मुक्त केले व इसीस  isis मध्ये सामिल केले. सिरियाच्या बंडात अल-कायदाच्या नुसरा फ्रंट बरोबर

भागीदारी करून इराक आणि सिरिया मध्ये इंग्लंड एवढा प्रदेश काबिज करून २ फेब्रुवारी २०१४ ला अल-कायदा पासून वेगळा झाला.

जून २०१४ ला  isis इसीसने १५ लाख लोक असलेल्या मोसुल वर कब्जा केला.

त्यानंतर सद्दामचे शहर टिकरितवर कब्जा केला. इराकी सैनिक पळून जायचे. कारण ते इसीसच्या क्रूरतेला प्रचंड घाबरायचे.

२९ जून ला बगदादीला ‘खालीफ इब्राहीम’ म्हणून घोषित करण्यात आले. नविन खलीफत फक्त इस्लामिक स्टेट(IS) म्हणून संबोधण्यात आले.

कारण बगदादीने आता खालीफ म्हणून पुर्ण मुस्लिम समुदायचे नेतृत्व स्विकारले. त्यांना जे मानणार नाहीत त्यांना काफिर घोषित करण्यात येईल

व त्यांची कत्तल करण्यात येईल. इथून दहशतवादाचे नविन हिंस्र व भयानक पर्व सुरू झाले आहे.

भारतापासून पूर्ण जगभर त्याचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. त्याच्याशी कसे लढावे हे अजून कुणालाच समजत नाही.

      उर्वरित भाग – २

लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत

 

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Leave a Reply

error: Content is protected !!