Also Visit for Trending News & Article  Postbox Live

HISTORYINDIAMAHARASHTRA

first lady doctor of India – डाॅ.आनंदीबाई जोशी

1 Mins read

first lady doctor of India – डाॅ.आनंदीबाई जोशी

 

 

first lady doctor of India – डाॅ.आनंदीबाई जोशी यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 

 

 

 

आनंदीबाई जोशी यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी पुण्यात त्यांच्या आजोळी झाला. आनंदीबाईंचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते. जुन्या कल्याण परिसरातील पारनाका इथे

राहणाऱ्या गणपतराव अमृतेश्वर जोशी यांच्या ज्येष्ठ कन्या होत्या. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह वयाने २० वर्षांनी मोठे असणाऱ्या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला.

गोपाळराव जोशी हे मूळचे संगमनेर जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी होते.लग्नानंतर गोपाळरावांनी आपल्या पत्‍नीचे यमुना हे नाव बदलून आनंदीबाई असे ठेवले.

वयाच्या चौदाव्या वर्षी आनंदीबाईंनी एका मुलाला जन्म दिला, परंतु वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे मूल फक्त दहा दिवस जगले.आनंदीच्या जीवनात हा एक महत्त्वाचा

टप्पा ठरला आणि तिला डॉक्टर बनण्याची प्रेरणा मिळाली.

एकोणिसाव्या शतकात केवळ पतीच्या इच्छेसाठी साऱ्या समाजाचा रोश व विरोध पत्करून आनंदीबाई जोशी शिकल्या व पुढे अमेरिकेत जाऊन वैद्यकीय पदवी

मिळवून भारतातील स्त्रियांची सेवा करण्याचे व्रत घेऊन भारतात परत आल्या. first lady doctor of India भारतातील पहिली महिला वैद्यक एम. डी. डॉक्टर

म्हणून त्यांचा लौकिक आजही कायम आहे.

स्त्री शिक्षणाचा प्रसार करणे हा गोपाळरावांच्या ध्यास होता व त्याची सुरुवात स्वतःच्या कुटुंबातून करण्याचा त्यांचा मनोदय होता. आनंदीला शिक्षणात फारसा रस

नव्हता परंतु पतीच्या नजरेच्या धाकाने त्यांना अभ्यास करावा लागत असे. सुधारक विचारांच्या काहीसा विक्षिप्त व मनस्वी अशा पतीमुळे आनंदीच्या जीवनाला कलाटणी

मिळाली. सर्वसामान्य मुलींप्रमाणे केवळ संसार करू नये तर शिक्षण घेऊन काहीतरी वेगळे करावे असे गोपाळरावांना वाटत असे.

गोपाळरावांच्या आईला शिक्षणाचे महत्व मुळीच वाटत नव्हते. त्यामुळे त्या आनंदीचा अतिशय राग राग करीत असत. तिच्या मागे कामाचा सपाटा लावून तिला अभ्यासाला

वेळ मिळू देत नसत. तरीही आनंदीने अभ्यास नाही केला तर पतीचा मार खायचा व केला तर सासुचा मार खायचा असे घोर संकट first lady doctor of India आनंदीबाई

वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षी झेलत होत्या. एकदा सासुने जळक्या लाकडाने दिलेल्या माराणे शरीरावर झालेल्या जखमा गोपाळराव यांच्या निदर्शनास आल्या.

या घरात राहून तिचा अभ्यास होणार नाही या विचाराने त्यांनी आपली बदली अलिबाग येथे करून घेतली. अलिबाग मध्ये आनंदीबाईंच्या अभ्यासाला गती आली.

त्यांच्या भाषेचे ज्ञान वाढावे म्हणून मराठीबरोबरच संस्कृत भाषेचे शिक्षणही त्यांनी सुरू केले .आपल्या पती वरील विश्वास व त्यांची कार्यावरील निष्ठा यामुळे आनंदीने

शिक्षणाचे व्रत स्वीकारले व त्या दोघांमध्ये पती-पत्नी पेक्षा गुरू-शिष्याचे नाते अधिक दृढ झाले.

गोपाळरावांनी तिला मिशनरी शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न केला, कलकत्त्याला गेल्यावर तिने संस्कृत आणि इंग्रजी वाचणे आणि बोलणे शिकले.

गोपाळराव कल्याणला पोस्ट ऑफिसात कारकून होते. नंतर त्यांची अलिबाग येथे आणि नंतर कोलकाता  येथे बदली झाली. ते एक पुरोगामी विचारवंत होते आणि

त्या काळातही त्यांचा महिला शिक्षणाला पाठिंबा होता. आपल्या काळातील इतर पती आपल्या पत्नींना स्वयंपाक न केल्याबद्दल मारहाण करत, या उलट गोपाळराव

हे आपल्या तरुण पत्नीला अभ्यास न केल्याबद्दल मारहाण करत, कारण पत्नीने वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर बनावे असा त्यांचा आग्रह होता. ते स्वत: लोकहितवादींची

शतपत्रे वाचत. आपल्या पत्‍नीला शिक्षणात रस आहे हे गोपाळरावांनी जाणले. लोकहितवादींच्या शतःपत्रांमुळे ते प्रेरित झाले आणि आपल्या पत्‍नीस इंग्रजी शिकविण्याचा त्यांनी निश्चय केला.

आनंदीबाईंच्या वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीत गोपाळरावांनी अमेरिकेत काही पत्रव्यवहार केला. परंतु हे शिक्षण घेण्यासाठी ख्रिस्ती धर्मस्वीकारण्याची अट होती,

आणि धर्मांतर करणे तर यांना मान्य नव्हते. मात्र त्यांनी प्रयत्‍न सोडले नाहीत. पुढे आनंदीबाईंची तळमळ आणि गोपाळरावांची चिकाटी यांचे फलित म्हणजे

आनंदीबाईंना ख्रिस्ती धर्म न स्वीकारता १८८३मध्ये, वयाच्या एकोणिसाव्या वर्षी ‘विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हानिया’मध्ये प्रवेश मिळाला.

७ एप्रिल १८८३ हा दिवस आनंदीबाईंच्या अमेरिकेच्या प्रयोजनासाठी निश्चित झाला. मॅट्रिक परीक्षा ही पास न झालेली अवघ्या १८ वर्षाची नऊवारी साडी नेसलेली

नाकात नथ घालणारी ही भारतीय तरुणी ७ एप्रिल १८८६ रोजी कलकत्ता बंदरावरील ‘ सिटी ऑफ बर्लिन ‘ या बोटीत विराजमान झाली.

डोळ्यात दाटून आलेल्या अश्रूंच्या पडद्याआड गोपाळराव दिसेनासे झाले. बोटीत लोकांच्या विचित्र नजरा आनंदीबाईंना भेडसावत होत्या . मनाची अस्वस्थता व नैराश्य

घालविण्यासाठी त्यांनी बोटीतील ग्रंथालयाचा आधार घेतला.’ सिटीजन ऑफ द वर्ल्ड ‘ या पुस्तकाने त्यांना प्रफुल्लित केले व केवळ उकडलेले बटाटे खाऊन दोन महिन्याचा प्रवास आनंदीने पार पाडला.

तेथे गेल्यानंतर अमेरिकेतील नवीन वातावरण आणि प्रवासातील दगदग यामुळे आनंदीबाईंची प्रकृती खूप ढासळली होती. परंतु अमेरिकेतील कारपेंटर

जोडप्याचे साहाय्य त्यांना लाभले.
सुरुवातीला तत्कालीन भारतीय समाजाकडून आनंदीबाईंच्या डाॅक्टर होण्याला खूप विरोध झाला. त्यावेळी आनंदीबाईंनी कोलकाता येथे एक भाषण केले. तेव्हा त्यांनी

भारतामधे  महिला डॉक्टरांची किती आवश्यकता आहे हे पटवून दिले, आणि हे स्पष्ट सांगितले की, मला यासाठी धर्मांतर वगैरे करण्याची काही गरज नाही. मी माझा

 हिंदु धर्म व संस्कृती यांचा कदापि त्याग करणार नाही. मला माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात येऊन महिलांसाठी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचे आहे.

first lady doctor of India आनंदीबाईंचे हे भाषण लोकांना खूप आवडले. त्यामुळे त्यांना होणारा विरोध तर कमी झालाच पण त्यांना या कार्यात हातभार म्हणून

सबंध भारतातून आर्थिक मदत जमा झाली. भारताचे तत्कालीन व्हाइसरॉय यांनी पण २०० रुपयांचा फंड जाहीर केला.

कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पुरा करून मार्च इ.स. १८८६ मध्ये आनंदीबाईंना  एम.डी.ची पदवी मिळाली. एम.डी.साठी त्यांनी

जो प्रबंध सादर केला त्याचा विषय होता, ‘हिंदू आर्यलोकांमधील प्रसूतिशास्त्र’. एम.डी. झाल्यावर व्हिक्टोरिया राणीकडूनसुद्धा त्यांचे अभिनंदन झाले.

हा खडतर प्रवास करताना त्यांना गोपाळरावांचा पाठिंबा होता. तिच्या पदवीदान समारंभाला गोपाळराव स्वतः उपस्थित राहिले.

‘भारतातील पहिली स्त्री डॉक्टर’ म्हणून सर्व उपस्थितांनी उभे राहून जोरदार टाळ्या वाजवून आनंदीबाईंची प्रशंसा केली.

एम.डी. झाल्यावर आनंदीबाई जेव्हा भारतात आल्या तेव्हा त्यांचे स्वागत व अभिनंदन झाले. त्यांना कोल्हापूरमधील अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमधील स्त्री-कक्षाचा ताबा देण्यात आला.
वयाच्या विशीतच त्यांना क्षयरोग  झाला होता. पुढे काही महिन्यातच म्हणजे २६ फेब्रुवारी, इ.स. १८८७ रोजी त्यांना पुण्यात मृत्यू आला.

केवळ २१ वर्षाच्या जीवनयात्रेत आनंदीबाईंनी भारतीय स्त्रियांसाठी प्रेरणादायी जीवन आदर्श उभा केला. दुदैवाने आनंदीबाईंच्या बुद्धिमत्तेचा आणि ज्ञानाचा फायदा जनतेला होऊ शकला नाही.
मात्र ‘चूल आणि मूल’ म्हणजेच आयुष्य असे समजणाऱ्या महिलांना त्या काळात first lady doctor of India आनंदीबाई जोशी यांनी आदर्श व मानदंड घालून दिला. एकीकडे सावित्रीबाई व ज्योतिबा स्त्रीशिक्षणासाठी प्रयत्न करत असतानाच आनंदी-गोपाळ हे जोडपे आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी झटत होते.

जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही मोठे काम अशक्य नाही हे या जोडप्याने समाजाला सिद्ध करून दाखवले आह असे म्हणता येऊ शकेल. समाजात राहून काम करायचे तर अडथळे येणारच.
स्वतः डॉक्टर होऊनही कुणा देशभगिनीवर उपचार करण्याची संधी आनंदीबाईंना मिळालीच नाही. तिकडे अमेरिकेत मात्र कारपेंटर यांनी आपल्या कुटुंबाच्या स्मशानात (Grave-yard) त्यांचे लहानसे थडगे बांधले. त्यावर ‘आनंदी जोशी, एक तरुण हिंदू ब्राह्मणकन्या. परदेशात शिक्षण घेऊन डॉक्टर पदवी मिळवणारी पहिली भारतीय स्त्री’ अशी अक्षरे कोरून तिचे स्मारक केले.

डाॅ. आनंदीबाई जोशी यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

लेखन 
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: