Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

HISTORYINDIAMAHARASHTRA

Sambhaji shahaji Bhosale – बाजी लावणारे अप्पाशास्त्री दिक्षित 

1 Mins read

Sambhaji shahaji Bhosale – बाजी लावणारे अप्पाशास्त्री दिक्षित 

 

Sambhaji shahaji Bhosale – छत्रपती संभाजी महाराज यांना वाचवण्यासाठी जिवाची बाजी लावणारे अप्पाशास्त्री दिक्षित 

 

 

शिराळ्याच्या दीक्षित घराण्यातील दहाव्या पिढीचे पूर्वज कृष्णभट उर्फ आप्पाशास्त्री दीक्षित यांनी शेख निजामाच्या कैदेतून संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला .

शेख निजाम हा कुतुबशहाचा सरदार औरंगजेबाशी येऊन मिळाला होता.त्याला औरंगजेबाने लगेच सहा हजारी मनसब देऊन मुकर्रबखान हा किताब देऊन

छत्रपती संंभाजी महाराज यांना पकडण्यासाठी पाठवले होते. पण छत्रपती संभाजी महाराज यांना सोडवण्यासाठी गेलेल्या आप्पाजी दिक्षित यांनी शौर्याने लढूनही आपल्या सहकार्यांसह पकडले गेले.

खानाने त्यांचा व त्यांच्या सहकार्यांचा शिरच्छेद केला. सतराव्या शतकात शिवकालामध्ये भागानगर प्रांतातून काही ब्राह्मण कुटुंबे महाराष्ट्रात आपले नशीब काढण्यासाठी आली.

त्यापैकी दीक्षित, नवांगुळ ,हशमनीस अशी कुटुंब बत्तीस शिराळा येथे येऊन स्थायिक झाली .आजही ही कुटुंब येथे नांदत आहेत .अप्पाशास्त्री दीक्षित हे शिराळ्याच्या दीक्षित घराण्याचे मूळ पुरुष.
अप्पाशास्त्री हे मोठे वेदशास्त्रसंपन्न पंडित होते.

ज्योतिष विद्येचे ते चांगलेच जाणकार होते. ते मल्लविशारदही होते .आणि त्या काळामध्ये कर्तबगार पुरुषाच्या ठिकाणी आवश्यक असणारी

महत्त्वाची कला म्हणजे युद्धकला त्यामध्येही ते प्रवीण होते .
शिवाजी महाराजांनी अप्पाशास्त्रीस काही नेमणुका देऊन शिराळयावर ज्योतिषी वतनावर त्यांची स्थापना केली होती. महाराष्ट्रात स्थायिक झाल्यावर

अप्पाशास्त्री समर्थ रामदास स्वामीचे अनुयायी बनले. अप्पाशास्त्रीसारखे अनेक विद्या व कला यांचे जाणकार गृहस्थ या भागातील आपल्या कार्याच्या प्रसारासाठी उपयुक्त ठरल्यास नवल नव्हते.

समर्थांनी महाराष्ट्रात एकूण 11 प्रमुख मारूतीची स्थापना केली .त्यापैकी एका मारूतीची स्थापना शिराळ्यात केली आहे. आप्पाशास्रीने बांधलेले भवानी मंदिर

व मारूती मंदिर या दोन्ही वास्तू शिराळ्यात उभ्या आहेत.आप्पा शास्त्रींनी बांधलेली तालीम म्हणजे व्यायाम शाळा आजही दीक्षितांच्या वाड्याजवळ शिराळ्यात

अस्तित्वात आहे. कालांतराने ही वास्तू नष्ट झालेली आहे .अप्पाशास्त्री म्हणजे शिवकाळातील कोणी सामान्य भट भिक्षुक नव्हते ,तर ते स्वराज्य संस्थापनेच्या

कामात शिवछत्रपतींना साथ देणाऱ्या समर्थ संप्रदायाचा अनुयायी असणारा एक लढाऊ वृत्तीचे प्रतिष्ठित ब्राह्मण पंडित होते.

आप्पा शास्त्रींची खरी कामगिरी म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीतील आहे .छत्रपती संभाजी महाराजांच्या -काळात शिराळ्याच्या परिसरात

तुळाजी निकम देसाई व तुळाजी कडू देसाई या दोघात देशमुखीच्या वतनासंबंधी जेव्हा वाद लागला होता तेव्हा त्याचा न्यायनिवाडा करण्यासाठी खुद्द

छत्रपती संभाजी महाराज शिराळ्यास आले होते. या प्रसंगी शास्त्राधार सांगण्यास अप्पाशास्त्री दीक्षित तेथे हजर होते.

अशाप्रकारे शिवछत्रपती प्रमाणे आप्पाशास्त्री दीक्षित यांचे छत्रपतीं संभाजी महाराजांशीही एक निष्ठेचे संबंध होते .

या सर्व पार्श्वभूमीवर sambhaji shahaji bhosale छत्रपती संभाजी महाराजांना कैद करून शेख निजाम आपल्या सैन्यासह जात असता त्याने

एक रात्र शिराळ्याच्या कोटा जवळ मुक्काम केला. ही वार्ता शिराळ्यातील आप्पाशास्त्री दिक्षित यांना समजताच त्यांनी आपल्या तालीमखाण्यातील तगडे जवान.

गावातील लढावू लोक, आणि ठाण्यामध्ये असणारी मराठा शिबंदी एकत्र जमवून शेख निजामाच्या छावणीवर आपल्या राजास सोडविण्याच्या इराद्याने हल्ला केला .

पण मोगलांचे सैन्यबल अधिक ठरल्याने आप्पाशास्त्री शौर्याने लढूनही आपल्या सहकाऱ्यांसह पकडले गेले. खानाने त्यांचा व त्यांच्या सहकाऱ्यांचा शिरच्छेद केला.

पुढे छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत अप्पाशास्त्री दीक्षितांनी आणि स्वामीकार्यावर आपले प्राण अर्पण केल्याच्या कामगिरीबद्दल त्यांच्या वारसदारांना

मौजे कणदूर याठिकाणी इनामी जमीन मिळाली. हे इनाम परवापर्यंत कूळकायद्याने इनामदारांच्या जमिनी कुळांच्या ताब्यात जाईपर्यंत दीक्षितांकडे चालू होत्या.

संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी केलेल्या हल्ल्यात अप्पाशास्त्री मारले गेले व जोत्याजी केसरकर हतबल होऊन कसेबसे निसटले .मराठी फौजा एकत्र येऊन

शेख निजामाला अडविण्यास मराठ्यांना अवकाशच उरला नाही. अशा अवस्थेत हाती असलेल्या सैन्यानिशी शिवशाहीतील या योघ्द्यांनी असामान्य धाडसाने

शत्रूशी मुकाबला केला. दुर्दैवाने शत्रूचे बलाधिक्य जास्त झाल्याने तो अपयशी ठरला.

शेख निजामाच्या तावडीतून sambhaji shahaji bhosale छत्रपती संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न झालाच नाही असे सर्व इतिहासकार मानत आले आहेत ,

काहींना त्यामधे गूढही वाटते आहे.
असे निष्कर्ष काढणाऱ्या इतिहास -लेखकांसाठी,वाचकांसाठी हा लेखन प्रपंच.

स्वराज्यासाठी ,आपल्या राजासाठी प्राण देणार्या अप्पाशास्त्री यांना मानाचा मुजरा

 

डॉक्टर सौ. सुवर्णा नाईक-निंबाळकर

Leave a Reply

error: Content is protected !!