Also Visit for Trending News & Article  Postbox Live

NewsPostbox Marathi

Maharashtra home minister – गृहमंत्रीपदी दिलीप वळसे पाटील

1 Mins read

Maharashtra home minister – गृहमंत्रीपदी दिलीप वळसे पाटील

 

Maharashtra home minister – महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल.

दिलीप वळसे पाटील यांना हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन. 

अभिनंदन
अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर राज्याचे नवे गृहमंत्री ठरले ;
पवार साहेबांनी सगळ्यात विश्वासू शिलेदाराला निवडले
मा.ना.श्री.दिलीपरावजी वळसे पाटील साहेब
आपली महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल.

Postbox India Team / परिवारातर्फे तर्फे हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन.

साहेब,
राज्याच्या Maharashtra home minister  गृह खात्याची अत्यंत महत्वाची जबाबदारी आपल्या खांद्यावर आली आहे. सर्वप्रथम आपल्याला खूप शुभेच्छा.कारण आपण आपल्या ज्ञान व कौशल्याच्या बळावर प्रगत महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी निश्चित अधोरेखित असे योगदान द्याल,अशी खात्री वाटते.

साहेब,
हे सर्वांना ज्ञात आहे की,जेव्हा आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे,तेव्हा ती परिस्थिती यशस्वीपणे हाताळण्यासाठी आपली नेमणूक झाली आहे.

आताही कोरोना महामारीच्या काळात महाराष्ट्रात पोलीस यंत्रणेवर मोठा ताण आहे.महाराष्ट्राचे गृहमंत्री या नात्याने आता आपली भूमिका मोठी आहे. कोरोना संकटात आपल्यासाठी हे मोठे आव्हान आहे.

साहेब,
एखादे पद,क्षेत्र किंवा विभाग(खाते)ह्याला उंची कशी प्राप्त करून द्यावी. हे आपल्याकडून शिकण्यासारखे आहे.

एखाद्या खात्यामुळे माणसाला उंची प्राप्त होते की, एखाद्या माणसामुळे खात्याला उंची प्राप्त होते. हे नाही माहीत.

पण एक मात्र नक्की.

प्रामाणिक कर्तृत्वामुळे माणसाला उंची व संबंधित क्षेत्राचे वेगळेपण मात्र नक्कीच अधोरेखित होत असते.

साहेब,
उच्च व तंत्र शिक्षण खाते, उर्जा खाते सांभाळत असताना आपण जे कार्य केले,त्याची दखल जाणकार महाराष्ट्र नेहमीच घेईल.

संकटात असलेल्या उर्जा विभागाला उर्जा देण्याचे काम आपण केलेत.वीज कंपनी चार विभागात विकेंद्रित केलीत.नियोजन व व्यवस्थापनात सुरळीतपणा आणलात.

खूप धाडसी पाऊल होते हे. आपण हा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेण्यासाठी अभ्यासपूर्ण सादरीकरण केले होते.आम्ही साक्षीदार आहोत त्या घटनेचे.

मग साहेब,
तेव्हाच आम्हाला प्रश्न पडला होता. आपण राजकारणी आहात की आय.आय. टी.मधून शिक्षण घेऊन. पुढे भारतीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन नियुक्त झालेले एक सर्वज्ञ प्रशासक आहात !!!

www.postboxindia.com

Diliprao valase Patil

उच्च व तंत्रशिक्षण खात्याची जबाबदारी सांभाळत असताना महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एम के सी एल)स्थापन केलेत.

महाराष्ट्रात संगणक साक्षरतेची मुहूर्तमेढ आपण रोवलीत.

खरंच साहेब,
आपण राजकारणी की कुशल प्रशासक !!!

एक काळ असा होता की,
विधानसभा अध्यक्षपद घ्यायला कोणी इच्छुक नसे.आपण या पदाची महती आपल्या कार्य शैलीतून वाढवलीत. त्यानिमित्ताने आपल्यातील कायदेतज्ज्ञ उभ्या महाराष्ट्राने पाहिला.

महाविकास आघाडीच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी आपण एक दिवसासाठी अध्यक्ष झालात;पण त्याची परिणीती अशी की,आज कोरोना महामारीच्या काळात मा. उध्दवजी व मा.अजितदादांच्या नेतृत्वात स्थिर सरकार कार्यरत आहे.

साहेब,
कायदेशीर भूमिका मांडून स्थिर सरकार देणे हे काम उत्कृष्ट प्रशासकाच्या भूमिकेतून आपण केलेत.

साहेब,
आपण राज्य उत्पादन शुल्क व कामगार अशी खाती सांभाळली,असे म्हणण्यापेक्षा त्या खात्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली आहे.

कोविड १९ चे संकट असताना आणि त्याअनुषंगाने राज्य आर्थिक खाईत असताना साधारणपणे २५,००० कोटींचे उत्पादन शुल्क/महसूल राज्याला कसे मिळेल.याची काळजी आपण कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात ठेऊन घेतलीत.

साहेब,
अर्थ खात्याचा कारभार पाहत असताना महाराष्ट्रात शेतकऱ्यांना सुमारे ३१,००० कोटींची कर्जमाफी आपण दिली होती,तेही नियोजनपूर्वक.

 

Also Read : https://www.postboxindia.com/rihanna-incredible-speech-at-harvard-university-memorable-speech/

 

साहेब,
एखाद्या खात्याचा मंत्री हा नाममात्र नसतो,हे आपण आपल्या कार्यातून दाखवले आहे.

एखादी दुर्लक्षित पण भविष्याचा वेध घेणारी योजना मंत्रिमंडळासमोर मांडणे., ती मंत्रिमंडळाच्या गळी उतरवणे आणि प्रशासनाकडून त्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे सोपे नसते. हे आपण करून दाखवले आहे.

साहेब,
राष्ट्रवादीच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्षपदी आपण होतात.

साहेब,
राष्ट्रवादीची स्थापना हीच मुळी मोठ्या साहेबांनी ज्या अनेक हेतूंनी केली होती; त्यातील एक हेतू हाच की,नव्या दमाच्या तरुणांना त्यांच्या उमेदीच्या काळात कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळावी. कारण आपल्याकडे उतारवयात राजकारणात संधी व पदे मिळण्याची रीत होती..

या गोष्टीला छेद दिला जावा व पर्यायाने मा.अजितदादा पवार साहेब, मा.आर.आर.पाटील साहेब, मा.जयंतराव पाटील साहेब,…आणि Maharashtra home minister मा.दिलीपराव वळसे पाटील साहेब या चौघाकडे पाहून मोठ्या साहेबांनी राष्ट्रवादीची स्थापना केली की काय असा प्रश्न तेव्हा नक्कीच सर्वांना पडायचा.

साहेब,
माळीन घटना, मांढरदेव घटना आपण ज्या आत्मीयतेने हाताळल्या,त्या आजही आठवल्या की,आपल्यातील माणुसकीचे दर्शन होते. कळत नकळत आपल्याप्रती हात जोडले जातात.

साहेब,
आपल्या चौघांच्या माध्यमातून प्रगत महाराष्ट्रासाठी निश्चित अधोरेखित असे कार्य झाले आहे.

 

Also Read : https://www.postboxindia.com/maharashtra-govt-ready-for-strict-restrictions-on-corona-pandemic-situation/

 

साहेब,
राष्ट्रीय साखर महासंघाचे आपण अध्यक्ष आहात.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट चे उपाध्यक्ष आहात.
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आहात.
रयत शिक्षण संस्थेचे कौन्सिल सदस्य आहात.
राज्य व जिल्हा सहकारी बँकेत आपण कार्यरत आहात.
भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट आपण सांभाळलेत.

कृषीमाल,दूध,कांदा, बटाटा,बाजार समित्या,सहकार या साऱ्या गोष्टींवर प्राधान्यक्रमाने आपण नेहमीच अभ्यासपूर्वक शासनाकडे पाठपुरावा केला आहे.

साहेब,
राजकारणी हा आपल्यासारखा उत्कृष्ट प्रशासक असेल तर मंत्रालय की सचिवालय असा वादच उभा राहणार नाही.विकसित व आधुनिक राज्याच्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल होईल. हे नक्की.

साहेब,
सामान्यपणे आमदार आपल्याला कोणते खाते मिळेल,याची वाट पाहत असतात.याउलट मंत्रिमंडळातील विविध खात्यांची कार्यालयं आपली वाट पाहत आहेत,असे वाटते.

उच्च व तंत्रशिक्षण,
वैद्यकीय शिक्षण,
ऊर्जा,
अर्थ,
विधानसभा अध्यक्ष,
राज्य उत्पादन शुल्क,
कामगार
आणि आता गृह.

राजकारणातील, समाजकारणातील आपली उंची किती यापेक्षा आपण जेथे काम करता त्या क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व/उंची प्राप्त होते,हे मात्र नक्की.

आपल्या कारकीर्दीत महाराष्ट्र पोलीस पुन्हा एकदा देशात नंबर एकचा बनेल.
महाराष्ट्र आपल्या हाती सुरक्षित राहील, अशी खात्री आहे.

www.postboxindia.com

Diliprao valase Patil

या कार्यासाठी आपल्याला शुभेच्छा.आणि Maharashtra home minister  गृहमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल Postbox India परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन.

Leave a Reply

%d bloggers like this: