Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGS

RSS – 26/11 ताज होटल हमला

1 Mins read

RSS – 26/11 ताज होटल हमला 

 

 

RSS – Who killed Karkare? 

 

 

 

 

<

div id=”message3331″ class=”Message message-list-item first-in-group has-views open shown” data-message-id=”3331″>

रमेश देशमुख 

आज-काल देशात जे घडते, जे आपण ऐकतो, जे न्यूजवर बघतो त्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो. पण जे घडत असूनही आपल्याला समजत नाही , ऐकायला मिळत नाही, किंवा दिसत नाही त्यावर आपण विश्वास ठेवत नाही. काही घटना अशा आहेत की, आपण जे ऐकतो, वाचतो किंवा बघतो ते खरं आहे कि खोटं हे तपसायची आपली ऐपत नसते. जसं दिसत तसच आपण मानतो. पण जे आपल्याला दिसत नसत किंवा ते आपल्याला दाखवायचच नसत, समजू द्यायचं नसत अशा घटना मिडीयावाले लपवून टाकतात, त्यामुळे कोणालाही सत्य काय हे समजत नाही. अशीच च एक घटना…

      ‘दहशतवाद’ हा शब्द आपण हजारवेळा ऐकतो, बोलतो. ‘दहशतवाद’ म्हटलं की, आपल्या समोर एक चित्र उभं राहत, पाकिस्तानी दहशतवाद, अल-कायदा, लश्कर-ए-तोयबा, सिमी, मुस्लिम दहशतवाद किंवा देशांन्तर्गत नक्षलवाद , माओवाद इ. हा दहशतवाद गेल्या ५०-६० वर्षापासून सुरू आहे, पण आपण कधी ऐकल का या भारतात दहशतवाद हा गेल्या ४००० वर्षापासून सुरू आहे? … नाही ऐकलं … सदर लेखात वाचा. लेख थोडा मोठा आहे परंतु प्रत्येक भारतीयाने वाचावा इतका आवश्यक आहे.
     एक घटनाक्रम आहे, अगदी अलिकडचा, पण अशास्वरूपाचा दहशतवाद गेल्या ४००० वर्षापासून भारतात सुरू आहे. ते आपल्याला या एका घटनेमुळे लक्षात येईल.

त्यासाठी प्रथम एक प्रश्न आहे, हूॕ किल्ड करकरे?

या एका प्रश्नाचे उत्तर मिळाले कि अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात.

१. आपल्या समाजावर कोणाचे वर्चस्व आहे?
२. आपल्याला कोण गुलाम बनवू ईच्छीतो?
3. ते कोण लोक आहेत जे आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी अशाप्रकारे हत्या करतात.
४. भारतातील कोणत्या जातीतील लोक पाकिस्तानी आतंकवाद्यांच्या संपर्कात आहेत?
अशा अनेक प्रश्नांची उत्तरे समजतात, हू किल्ड करकरे या प्रश्नाचे उत्तर मिळाल्यावर.

     सध्या देशात एक घटना अस्तीत्वात आहे. जी २६ जानेवारी १९५० साली या देशात लागू झाली. हजारो वर्षापासून सुरू असलेली दादागीरी , गुलामगीरी नष्ट करण्यासाठी डॉ.बाबासाहेब अंबेडकरांनी ही घटना लिहीली. जगातील सर्वांत उत्कृष्ट घटनांचा मेळ म्हणजे आपली राज्यघटना आहे. पण या घटनेमुळे एका विशिष्ट उच्चवर्णिय लोकांचे वर्चस्व कमी झाले. त्या लोकांनी अनेक प्रयोग केले आपले वर्चस्व टिकवून ठेवण्याचे पण त्यात त्यांना हवं तसं यश येत नाही हे समजलं.

मग एक वेगळा प्रयोग केला गेला. तो म्हणजे हे संविधान बदलणे. २००२ ते २००३ या काळात फार मोठा कट केला. RSS वाल्यांचा मूळ उद्देशच असा होता की, हे संविधान लागूच होऊ देऊ नये , आणि स्वातंत्र्य , समता, बंधूता यांच्या विरूद्ध असे संविधान आणने परंतू कालांतराने राजकिय हेतुमुळे ते तसे करू शकले नाहीत.

         ब्राह्मणवादी विचारसरणीच्या प्रमुख लोकांनी एकत्र येवून २००२ साली एक संघटना निर्माण केली, तिचे नाव होते ‘अभिनव भारत’. हे कुणालाही माहीत नव्हतं. त्यांचा उद्देश असा होता, वेदांवर आणि श्रूतींवर आधारीत अशी घटना लिहून या देशावर लागू करणे आणि भारत नाही तर आर्यवृत्त(ब्राह्मण) हिंदूराष्ट्र निर्माण करणे. म्हणजे ब्राह्मणांचे वर्चस्व असलेले राष्ट्र.

त्यांचा हा उद्देश हेमंत करकरे यांनी उघडा केला. या अभिनव भारत च्या भाषणांचे व्हिडीओ करकरे यांनी जप्त करून २००८ साली त्यांच्याविरोधात चार्टशीट बनवीले. त्यांच्या २०-२५ मिटींग ज्या झाल्या त्यांचा व्हिडीओ ॲडिओ त्यांनी आपल्या लॕपटॉप मध्ये रेकॉर्ड केला होता.

त्यांना माहीत होत की हे व्हिडीओ कुणालाही सापडले तरी तपास करणारे सगळे अधिकारी हे आपलेच आहेत. परंतू करकरे हे खरे देशभक्त अधिकारी होते. त्यांनी त्यातील काही व्हिडीओंचे शब्दांकन केले. २००८ साली फरिदाबाद येथे झालेल्या मिटींगमध्ये ते काय बोलतात…

कर्नल पुरोहित नावाचा आर्मीतला एक अॉफिसर म्हणतो, आपल्याला या घटनेशी लढायचे आहे. या देशाशी लढायचे आहे. हा देश आपला नाहीच. या संविधानाला आपल्याला मानायचेच नाही. त्यासाठी एक उपाय आहे, तो म्हणजे याला तोडून टाकने. त्यानंतर उपाध्याय नावाचा दूसरा आर्मी अॉफिसर म्हणतो, हे संविधान आम्हाला मान्य नाही. दूसरे संविधान बनवून ब्राह्मणराष्ट्र निर्माण करायचे आहे.

दयानंद पांडे म्हणतो, आपली दूसरी घटना काय असणार ?? तर आमच्या ज्या स्मृती आहेत, सर्व १४ आहेत. त्यांना एकत्र करा. म्हणजे बाबासाहेबांनी जी मनुस्मृती होती तश्या १४ आहेत. त्यातली एक जाळली. पूरोहित म्हणतो वेदांमध्ये जो धर्म सांगीतला तो धर्म आणि तसे राष्ट्र आम्हाला पाहीजे.

RSS - 2611 ताज होटल हमला - Hemant karkare

RSS – 2611 ताज होटल हमला – Hemant karkare

हा उद्देश समोर ठेवून त्यांनी काम सुरू केलं होतं. त्यासाठी ते वेगवेगळ्या ठिकाणी मिटींग घेत होते. आणि त्यांचे रेकॉर्डींग करून ठेवत होते. आणि हिच सर्वात मोठी चूक त्यांनी गेल्या २००० वर्षापासून प्रथमच केली. त्यांना माहीत होत की हे काम सोप नाही, आपल्या एकट्यांना ते जमणार नाही त्यासाठी त्यांनी दुसऱ्या देशांची मदत घ्यायचेही ठरवले. त्यांनी इस्ज्र्ईल आणि नेपाळशी बोलणीही केली.

आर्मी अॉफिसर पुरोहित हा त्यांच्याशी बोलणी करायचा. तो दारूगोळा डेपोपासून RDX मिळवायचा आणि अभिनव भारत या संघटनेला द्यायचा. त्या RDX चा उपयोग करून देशात वेगवेगळ्या ठिकाणी स्फोट करून हिंदू-मुस्लीम दंगली घडवायच्या. हे काम २००५-२००८ च्या दरम्यान त्यांनी केलं.

एकूण १८ स्फोट हे या अभिनव भारत आणि RSS च्या आतंकवाद्यांनी घडवून आणले. मुंबई लोकल ट्रेन वर झालेला हमलासुद्धा यांनीच घडवला. मग त्यांना पकडण्यात का नाही आलं? त्याच कारण असं…. या देशात सर्वात मोठी गुप्तचर संघटना आहे ती म्हणाजे IB. ही IB सुरूवातीपासूनच ब्राह्मणांनी काबीज करून ठेवली आहे. हि IB पूर्णपणे त्यांना मदत करत होती. म्हणून अशी कामे सूरू होती.

आणि संपूर्ण देशाला असे वाटायचे की, हे सर्व स्फोट इस्लामिक आतंकवादी करत आहेत. प्रत्येक महिन्या दोन महिन्याला कुठेतरी स्फोट व्हायचा, दुसऱ्या दिवशी बातमी यायची की, कोणत्या संघटनेन केलं? कधी जैश-ए-महम्मद, तर कधी लष्कर-ए-तोयबा. आपल्या लोकांचा वर्तमान पत्र आणि टि.व्ही. वर भयंकर विश्वास, म्हणून आपल्याला या बातम्या अगदी खऱ्या वाटायच्या. ते एवढ्यावरच थांबले नाहीत.

IB ही संघटना केंद्रीय आहे. त्यांनी प्रत्येक स्टेटमध्ये आपल्या विचारांच्या अधिकाऱ्यांचे गृप बनवून ठेवले आहेत. ते कशासाठी तर दहशतवादाविरोधात जे गुन्हे आहेत ते त्यांनी तपासावेत. महाराष्ट्रात ATS आहे. UP मध्ये STP आहे, राजस्थानमध्ये SIP आहे. असे वेगवेगळ्या नावाने अधिकाऱ्यांचे गृप आहेत. IB च्या ईशाऱ्याने लोकांना अटक करायचं आणि RDX घरात ठेवून त्यांना फसवायचं.

याचा परिनाम लोकांवर झाला. जनता बोलत नसली तरी मनात कुठेतरी मुस्लीम विरोधी भावना निर्माण झाली. आणखी काही स्फोट झाले असते तर जनतेचा उद्रेक नक्कीच झाला असता. पण यातले सत्य हेमंत करकरे यांनी शोधून काढले. करकरे यांनी २००८ मध्ये ATS प्रमुख म्हणून ताबा घेतला.

त्यावेळी मालेगाव मध्ये मोठा स्फोट झाला. IB ने नेहमीप्रमाणे सांगीतले की, अमुक-अमुक संघटना जबाबदार आहे आणि या लोंकांना अटक करा. त्यावेळी करकरे यांनी सांगीतले की, मी माझ्या पोलीसी पद्धतीने तपास करणार, आणि जे लोक दोषी आहेत त्यांनाच अटक करणार.

तपास सुरू झाला. स्फोटात वापरलेली मोटरसायकल पकडली. ती मोटर सायकल प्रजादीन ठाकूर याच्या मालकिची होती. त्याला पकडले. विचारपूस केल्यावर एक नाव समोर आले, शामला सावंत, तिला पकडले. नंतर आणखी एक अटक झाली, तो म्हणजे शिवनारायण कलंग. तिघांना विचारपूस केल्यावर प्रज्ञा साध्वी, कर्नल पुरोहित , दयानंद पांडे, मेजर उपाध्याय , समिर कुलकर्णी आता जातीवर बोलत नाही पण सगळे ब्राह्मणच!! असे आकरा लोक अटक झाले.

त्यांना अटक केल्यावर करकरे यांनी सर्वात महत्वाचे काम केले ज्यामुळे करकरे आणि गोविंद पानसरे यांना जीव गमवावा लागला. ती गोष्ट म्हणजे ३ लॕपटॉप जप्त केले. दोन लॕपटॉप दयानंद पांडे याच्याकडून आणि एक लॕपटॉप कर्नल पुरोहितकडून. ते तिन लॕपटॉप म्हणजे काय तर जे आर्यवृत्त हिंदूराष्ट्र ते म्हणत होते त्याची ब्ल्यू प्रिंटच होती. संपूर्ण आराखडाच .

त्यांचा उद्देश पूर्ण करण्यासाठी काय-काय करायचं , त्यासाठी केलेल्या भाषणांचे व्हिडीओ , अभिनव भारत ची रिक्रूटमेंट कशी होती, हल्ले करण्यासाठी जे प्रशिक्षण दिले जायचे ते कसे होते? प्रशिक्षण कुठे दिले जायचे? दारूगोळा कुठून यायचा? हे सर्व त्या लॕपटॉप मध्ये होते.

२४ क्लिप व्हिडीओ २४ क्लिप ॲडिओ अशा ४८ क्लिप त्यात होत्या. करकरे यांनी त्या बघायला सुरूवात केली. त्यात जे चेहरे दिसतात त्यांना अटक करून विचारपूस सुरू केली. अटकसत्र सुरू झालं. अशाप्रकारे फक्त चारच व्हिडीओ त्यांनी बघीतले होते, पाचवा व्हिडीओ पुण्यातील मिटींग होती, हा व्हिडीओ बघण्याचे काम चालू होते.

ही घटना नोहेंबर २००८ ची आहे. २३ नोहेंबर २००८ च्या हिंदूस्थान टाईम्स मध्ये एक बातमी आली. अभिनव भारतच्या अध्यक्षा हिमानया सावरकर , कर्नल चितळे, मिलींद एकबोटे , वगैरे लोकांची विचारपूस होणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील दोन प्रसिद्ध इतिहासकार यांची देखिल विचारपूस होणार आहे. ते इतिहासकार कोण तर पहिला शिवद्रोही बाबा पुरंदरे आणि दुसरा निनाद बेडेकर , म्हणजे ज्यांना आपण इतिहासकार समजतो ते खऱ्या अर्थाने देशद्रोही, आतंकवादी कसे आहेत हे समजते. जर ४-५ व्हिडीओ मध्ये हि परिस्थिती तर ४८ मध्ये काय-काय असेल?

RSS - 2611 ताज होटल हमला - Media

RSS – 2611 ताज होटल हमला – Media

देशातील मोठ्या ब्राह्मण लोकांना आपण इतिहासकार , विचारवंत , नेते समजतो अशा सर्वांचे खरे चेहरे समोर आले असते आणि हेच त्यांना नको होते. त्यांनी करकरे यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी करकरेंवर राजकिय , धार्मिक , जातीय दबाव आणला. पैशाचे अमिष दाखवले. कुटूंबाला मारण्याची धमकी दिली. पण करकरे दबले नाहीत. आता अभिनव भारत, RSS आणि सनातन सारख्या संघटनेच्या समोर एकच पर्याय शिल्लक होता, तो म्हणजे करकरेंना मारणे. तसा त्यांचा ठराव झालाच होता. मिटींगमध्ये पुरोहित म्हणतो जो कोणी आमच्या आर्यवृत्त हिंदूराष्ट्राच्या निर्मीतीमध्ये बाधा आणेल त्याला नुसत वाळीत टाकून चालणार नाही तर त्याला मारायचच.

त्याप्रमाणेच IB आणि अभिनव भारत ने करकरेंना मारायचा निश्चय केला. पण मारायच कसं? कसं मारलं हे या देशात कुणालाच समजायला नाही पाहिजे. विचार करत असताना एक महत्वाची बातमी अमेरिकेच्या गुप्तचर एजंसींनी इंडियाच्या गुप्तचर संघटना रॉ ला सांगीतली. पाकिस्थानची LET ची बोट त्यांच्या आतंकवाद्यांना घेवून मुंबई मधील काही हॉटेलवर हमला करण्यासाठी येत आहेत.

तुम्ही दक्ष रहा. त्या बोटीचे अक्षांश , रेखांश(त्यावेळी) ३४-३० असे होते आणि आत्ता २०-१६ आणि ६७-2 आहेत. तारीख होती १८ नोहेंबर २००८. तेंव्हा IB ने प्रथम मुंबई पोलीसांना कळवायला पाहिजे होतं. ते त्यांनी कळवलचं नाही. दुसरं त्यांनी Western Nevy command ला कळवायला पाहीजे होतं. हि कमांड छत्रपती शिवरायांनी स्थापन केली आहे. (मराठा आरमार) जर या कमांड ला IB ने कळवलं असतं तर १० सेकंदामध्ये ती बोट उडवून टाकली असती.

एवढी पावरफूल कमांड आहे. त्यांनाही ही बातमी दिली नाही. मग दिली कुणाला? तर अभिनव भारत च्या लोकांना. तसेच आणखी एक गोष्ट अमेरिकन गुप्तचर एजंसींनी IB ला 35 मोबाईल नंबर दिले. परदेशी लोकांना आपल्याकडचे मोबाईल नंबर सहज मिळत नसतात. ते गुप्तचर एजंसींनी घुसवले आहेत, हे ३५ नंबर लष्कर-ए-तोयबाचे आतंकी, यातील काही नंबर वापरू शकतात, ते टॕप करा असेही सांगीतले.

त्यामुळे तुम्हाला त्यांची अक्षांश रेखांश माहिती मिळेल. IB ला त्यांची मिनिट-मिनिट माहीती मिळत होती. पण त्यांनी दिली कोणाला तर अभिनव भारतला . त्यांनी सांगीतलं आणखी त्यांना यायला ४-५ दिवस बाकी आहेत. ते जेंव्हा ॲटॕक करतील त्यात तुम्ही नकली लोक पाठवा. आणि करकरेंना तिकडे पाठवून मारा. अगदी तसचं झालं. CST, कामारंगभवन इथले जे आतंकवादी होते ते पाकिस्थानी नव्हते.

ते अभिनव भारत आणि RSS चे होते. IB ने राजकिय दबाव आणून करकरेंना नको त्या ठिकाणी पाठवले. आणि RSS च्या आतंकवाद्यांनी करकरेंना मारलं. आपल्या लोकांना टि. व्ही वर वेगळचं चित्र दाखवलं. हे सगळं दिड-दोन तासांत घडलं. त्यानंतर सात तास नरिमन हाऊस ताजवर आतंकवादी आणि NSG मधील चकमक टि. व्ही. वर दाखवली. पुरावे नष्ट करून आणि खोटे पुरावे तयार करून देशाचीच नव्हे तर सगळ्या जगाची फसवणूक केली.

आता तुम्ही असं म्हणाल की ही माहीती तुम्हाला दिली कोणी? एवढं डिटेलमध्ये कसं माहित झालं? हे एवढं झाल्यानंतर अमेरिकन एजंसींनी हंगामा केला. एवढी माहिती तुम्हाला दिल्यानंतर हमला होऊ कसा दिला? त्यांना शांत करण्यासाठी त्यावेळचे गृहमंत्री शिवराज पाटिल हे साधे गृहस्त होते, चौकशी तर केलीच पाहिजे म्हणून त्यांनी Inquiry नेमली. एक कॕबिनेट सेक्रेटरी नेमला.

तो एक प्रामाणिक होता. त्याने पंधरा दिवसांत रिपोर्ट तयार केला. सगळ्या खऱ्या बाजू मांडून अधिकाऱ्यांच्या नावासकट लिहीलं. तो रिपोर्ट होम मिनीस्ट्री कडे पाठवणार तोपर्यंत M K Narayan नावाचा एक कट्टर ब्राह्मण्यवादी पंतप्रधानांचा सुरक्षा सल्लागार होता. त्याच्या हातात तो रिपोर्ट पडला. तोच IB चा चिप होता. तो रिपोर्ट तिथेच दाबून टाकण्यात आला.

तो रिपोर्ट हिंदूस्थान टाईम्स आणि Indian Express या दोन वर्तमान पत्रांनी कुठूनतरी मिळवला आणि प्रमुख भाग छापून टाकला. डिसेंबर २००८ आणि जानेवारी २००९ मध्ये तो इंग्लिश मध्ये असल्यामुळे साधारण लोकांपर्यंत पोहोचला नाही.

         Who Killled Karakare? या पूस्तकात ही माहिती सविस्तर आहे. आणखी या पूस्तकावर कुणी चेलेंज केलं नाही. कारण तसं केलं तर सगळच सत्य बाहेर पडून ब्राह्मण्यवादाच पितळ जगासमोर उघडं पडू शकतं. म्हणूनच ते गप्प आहेत. आणि आपले लोक वाचन करतच नसल्यामुळे अशा घटना लोकांना समजत नाहीत. टि. व्ही. च्या न्यूजवर विश्वास ठेवतात आणि तेच खरं आहे असं मानतात.

      म्हणुन आज आपल्या देशातील जनतेची परिस्थीती शैक्षणिक, सुशिक्षित,, बेरोजगारी,शेतकरी आत्महत्या, अशा अनेक समस्यांनी खालावलेली आहे, याला आपणच जिमेंदार आहोत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021. Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company. Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement, News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World. Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Postbox India
Anytime Everything

Leave a Reply

error: Content is protected !!