I LOVE MUMBAI – ‘मुंबई‘ माझी लाडकी !
i love mumbai – ‘मुंबई’ माझी लाडकी ! – भारतकुमार राऊत
मुंबई i love mumbai ही केवळ महाराष्ट्राची राजधानीच नव्हे, तर अखिल भारताची शान! पण तिचे
नाव काय, याबाबत मात्र भारतातच पराकोटीचे वाद. मुंबईतला मराठी व गुजराती माणूस या शहराचा
उल्लेख i love mumbai ‘मुंबई‘ असा करतो, तर उत्तर हिंदुस्तानी तिला ‘बम्बई’ म्हणतात. इंग्रजीने
तिला ‘बॉम्बे‘ करून टाकले. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली व मराठी भाषकांच्या
महाराष्ट्र राज्याची मुंबईच राजधानी बनली. मात्र तरीही या शहराचे नाव काय? हा वाद राहिलाच.
हा वाद १९९५ साली आजच्या दिवशी कायमचा निकालात निघाला. तेव्हाच्या शिवसेना-भारतीय
जनता पक्षाच्या युती सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत तसा ठरावच संमत करून या शहराचे नाव
कोणत्याही भाषेत i love mumbai ‘मुंबई‘ असेल, हे जाहीर केले. या घोषणेला आज २६ वर्षे लोटली.
मात्र तरीही केवळ अमराठीच नव्हे, तर मराठी भाषकही आपल्याच शहराला ‘बॉम्बे‘ असेच संबोधून
आपल्यातला ‘गुलाम’ अद्याप मेलेला नाही, याचेच दर्शन घडवत राहतात. हे दर्शन दु:खद आहे.

mumbai
या शहराचा इतिहास पाचशे वर्षांहूनही जुना. एके काळी केवळ कोळी, भंडारी, पाठारे प्रभू, सूर्यवंशी
क्षत्रिय व केरळातील मलबारातून आलेले मलबारी यांचीच वस्ती असलेल्या या सात बेटांच्या समुहात
गुजरात, कर्नाटक, आंध्र या आसपासच्या राज्यांतून लोक येत राहिले. गुजरातच्या नवसारीतून पारशी
कुटुंबे आली. त्यामुळे मुंबईचा व्यापारी टापू म्हणून विकास होऊ लागला. पुढे पोर्तुगीजांनी या प्रांतात
जम बसवलाच, शिवाय इंग्लंडच्या राजाला हा प्रांत विवाहात ‘बक्षीस’ म्हणून देऊनही टाकला.
टोपीकर इंग्रज या भागाला बॉम्बे म्हणू लागले व तेच नाव पुढे रुढ झाले.

mumbai
वास्तविक मुंबईची देवी मुंबादेवी. तिच्यावरूनच या भागाचे नाव i love mumbai मुंबई झाले होते. हा इतिहास ज्यांना ठाऊक नाही व ज्यांना जाणून घ्यायची इच्छा वा धमक नाही, अशी मंडळी शहराला बॉम्बे म्हणत राहिली व इंग्रजांचे अनुकरण करण्यातच धन्यता मानणारे समाजातील तथाकथित उच्चभ्रू व इंग्रजांच्याच इशाऱ्यावर राज्य करणारे राज्यकर्ते यांनी त्यांचीच री ओढली.
वास्तविक जेव्हा मुंबईला महाराष्ट्र राज्याची राजधानी म्हणून घोषित करण्याचे विधेयक मंजूर झाले, तेव्हाच ही गोष्ट स्पष्ट होऊ शकली असती. पण अमराठी जनतेच्या मतांवरच भिस्त ठेवणाऱ्या तेव्हाच्या काँग्रेसच्या राज्यकर्त्यांनी याबाबत संदिग्धता ठेवण्यातच राजकीय स्वार्थ पाहिला व मुंबईच्या नावाविषयीचा गोंधळ महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पुढील 35 वर्षे कायम राहिला. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, तेव्हा हा तिढा सुटला व i love mumbai मुंबईला ‘नाव’ मिळाले.

mumbai
आता मुंबईला मूळ नाव अधिकृतपणे मिळालेले असले, तरी मूळ i love mumbai मुंबईतील संस्कृती, समाज व भाषाच तडिपार होत असल्याचे दिसते. त्यामुळेच इंग्रज राजवटीच्या खुणा मिरवण्यातच धन्यता मानणाऱ्या संस्था आजही बदलायला तयार नाहीत. बॉम्बे स्कॉटिश स्कूल, बॉम्बे जिमखाना, बॉम्बे आयआयटी, बॉम्बे हायकोर्ट या आणि अशा अनेक संस्थांना आजही ‘तीच’ गुलामगिरीची आठवण हवीहवीशी वाटते.

mumbai
या मंडळींचे काय करायचे, याचा निर्णय राजकीय पक्षांनी, त्यांच्या सरकारांनी व ती निवडून देणाऱ्या जनतेने घ्यायचा आहे.
Also Read : https://www.postboxindia.com/strongest-man-in-regional-music-lyricist-jagdish-khebudkar/