Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSHISTORYINDIAMAHARASHTRA

veer shiva kashid – वीर शिवा काशीद

1 Mins read

veer shiva kashid –  “वीर शिवा काशीद “

veer shiva kashid – १२ जुलै १६६० शिवा काशीद यांचा स्मृतिदिन

Download Unlimited 3d Games  

मराठ्यांच्या इतिहासातील एक तेजस्वी पान जौहरला गुंगारा देण्यासाठी शिवछत्रपतींचे हुबेहुब सोंग घेऊन जौहरच्या छावणीत बिनधोक जाणारे व सोंग उघडकीस आल्यावर हसत हसत मरणाला कवटाळणारे मर्द!साडे तीनशे वर्षांपेक्षा अधिक काळ लोटून गेला आहे ,veer shiva kashid – शिवा काशीद यांच्या आत्मबलिदानाला .तरीही जनमाणसांच्या मनात अजूनही एक प्रश्न रूंजी घालत आहे कोण होते हे veer shiva kashid – शिवा काशीद ? शिवा काशीद हे मूळचे पन्हाळ्याच्या पूर्वेस असलेल्या नेबापूर या गावचे रहिवासी.जन्म पन्हाळ गडाच्या पायथ्याशी असणार्या नेबापूर या गावातील नाभिक कुटुंबात झाला.

दुसर्याच्या अंत:करणातील गुपित बाहेर काढण्यात अत्यंत चलाख व निष्णात अशी ही जात असल्यामुळे शिवरायांनी यांस आपल्या पदरी ठेवून घेतले होते.शिवा काशीद बराचसे शिवरायांसारखे दिसत होते .मजबूत बांधा ,सरळ नाक, तेजस्वी नजर, शत्रूच्या गोटातून माहिती काढण्यात ते अत्यंत पटाईत होते .दिनांक २ मार्च १६६० रोजी आदिलशहाने अफजलखानाच्या वधानंतर सिद्दीजोहरला विजापूरहून स्वराज्यावर आक्रमणास धाडले तर, दुसरीकडे मुघल सैन्य औरंगजेब बादशहाचा मामा शाहिस्तेखान याच्या नेतृत्वाखाली पुण्यातील लाल महालात तळ ठोकून होते. स्वराज्यावर दुहेरी संकट आले होते. त्यावेळी शिवराय पन्हाळा किल्ल्यावर होते. ३५ हजार पायदळ ,वीस हजार घोडदळ अशा प्रचंड सैन्यानिशी जौहरने पन्हाळगडाला वेढा दिला.महाराज गडावर अडकून पडले होते.

पावसाळ्याचे दिवस होते. पन्हाळा किल्ल्यावर जास्त दिवस थांबणे महाराजांसाठी धोक्याचे होते. वेढ्यातून बाहेर पडण्याची छत्रपती शिवाजी महाराजांनी एक युक्ती केली. हा वेढा फोडून विशाळगडाकडे जाण्याचे ठरवले .विशाळगडाकडे कूच करणार त्या दिवशी शिवा काशिद यांना शिवरायांचा पोशाख चढविला. veer shiva kashid – शिवा काशीद हे हुबेहुब शिवरायांसारखे दिसू लागले. खरे शिवराय कोण हेच कळणे थोडे अवघड झाले.

दिनांक १२ जुलै १६६० रोजी पौर्णिमेची रात्र, रात्री दहाचा सुमार होता .छत्रपती शिवराय पन्हाळगडावरून निघाले. पालखीत बसले. पालखी मावळ्यांनी उचलली. फुलाजीप्रभू आणि बाजीप्रभू देशपांडे सोबत ६०० निवडक मावळेही निघाले, आणि सोबत आणखी एका पालखीत शिवाकाशीद निघाले.

Download Unlimited 3d Games  

पाऊस ,वादळ ,विजा अखंड चालूच होत्या. पालखी जरा आडवाटेने गडाखाली उतरत होती. रस्ता दाखवायला पुढे हेर चालत होते. छत्रपती शिवाजीमहाराज उद्याच शरण येणार आहेत !मग कशाला या वादळी पावसापाण्यात मोर्चावर ऊभे राहा ? करा उबदार आराम ! अगदी असाच गाफील विचार करून शाही मोर्चे वाले ढिले पडले होते .झाडाझुडपातून आणि खाचखळग्यातून महाराजांची पालखी विशाळगडाच्या दिशेने धावत होती .पाऊस पडत होता, आभाळ गडगड होते , विजा लखलखत होत्या, पालखी धावतच होती. नजरा धास्तीने भिरभिरत होत्या. पालखी बेमालूमपणे वेढा भेदून गेली .वेढ्या पासून पालखी पुष्कळच दूर गेली. एवढ्यात घात झाला! जौहरच्या हेरांनी पालखी ओळखली. आता? ठरल्याप्रमाणे हेरलेली पालखी घेऊन १५ -२० लोक मुख्य रस्त्याने धावू लागले आणि महाराजांची पालखी आडमार्गाने तोपर्यंत विशाळगडाकडे मार्गस्थ झाली.

शत्रुचा पाठलाग अटळ होता .अन् खरोखरच जौहरची फौज सिद्दी मसाऊदच्या बरोबर पाठलागावर निघाली .थोड्याच वेळात त्यांनी पालखीला गराडा घातला.त्यांनी मावळ्यांना विचारले,आत कोण आहे? उत्तर मिळाले की पालखीत छत्रपती शिवाजी राजे आहेत.पालखी सकट महाराज कैद झाले अन् सिद्दीच्या छावणीत दाखल झाले .सिध्दी समोर सर्वांना उभे केले, पण जाणकारांनी ओळखले! काहीतरी गडबड आहे. चौकशी झाली आणि कळले की हे तर शिवा न्हावी आहेत.

शिवा काशीद निर्धाराने एका पालखीत आणि शिवराय दुसऱ्या पालखीत बसले. शिवरायांची पालखी अडचणीच्या वाटेने निघाली आणि veer shiva kashid – शिवा काशीदची पालखी पन्हाळगडाच्या मुख्य दाराने निघाली. शिवराय निसटले, अशी ओरड होताच जौहरच्या सैनिकांनी रातोरात शोधाशोध सुरू केली. त्यांना एक पालखी पळविताना दिसली. त्या पालखीला पकडले व पडदा बाजूला केला..veer shiva kashid –  शिवा काशीद हा हुबेहुब शिवरायासारखा दिसत होता. त्यामुळे सिद्दि जोहरला वाटले कि हाच शिवाजी ! म्हणुन त्याने व त्याच्या सरदारांनी शिवा काशीदला पकडले व हे शिवराय नाहीत असे कळताच जोहर म्हणतो कसा veer shiva kashid – ‘शिवा काशीद आता तु मरणाला तयार हो’.ते ऐकुन शिवा काशीद म्हणाला ‘शिवाजीराजे आता सुखरुप् वेढयातुन सुटले असतील. आता मी सुखाने मरण्यास तयार आहे’.तसेच शिवरायासाठी हजारदा मरण्यास मी सुखाने तयार आहे’. हे ऐकुन जोहरने त्याचे शिर कापुन टाकले .

Download Unlimited 3d Games  

आत शिवा काशीद पालखीचा गोंडा धरून रुबाबात बसलेला. मात्र, ते शिवराय नसून शिवा काशीद आहे हे लक्षात येताच सिद्दी जौहरने शिवा काशीदच्या छातीत समशेर खुपसली. स्वराज्यासाठी शिवा काशीद यांनी असे अतुलनीय बलिदान केले.सिद्धीने त्यांना विचारले की त्यास मरणाचे भय वाटत नाही का? उत्तर आले . छत्रपती शिवाजीराजें साठी हजार वेळा मरावयास तयार आहे. छत्रपती शिवाजीराजे कोणासही सापडणार नाहीत. हे ऐकून रागाने सिद्दीने शिवा काशीद यांचे शीर कलम करण्याचा आदेश फर्मावला.

veer shiva kashid – शिवा काशीद यांचे धाडस प्राणांची आहुती आपण कदापि विसरू शकणार नाही.माणसाच्या आयुष्यात अखेरचे मोल असते, ते त्याच्या स्वतःच्या प्राणांचे ,पण आपल्या राजाच्या जिवीतापुढे आपले प्राण कवडीमोल समजून त्या प्राणांची आपल्या राजावर उधळण करणारा शिवा काशीद खरोखरीच धन्य होता. स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान देऊन शिवा काशीदने ज्या प्रखर राष्ट्रनिष्ठेचा व स्वामीनिष्ठेचा आदर्श आपल्यासमोर ठेवला आहे. त्याला हिंदुस्तानाच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातही तोड नाही. कारण शिवा काशिद यांसारख्या मावळ्यांच्या बलिदानामुळे स्वराज्याचे देखणे स्वप्न शिवराय साकार करु शकले.स्वराज्यासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या veer shiva kashid –  वीर शिवा काशीद यांच्या कुटुंबियांना महाराजांनी भेट देऊन पत्नी पारूबाई व पुत्र यशवंत यांचे सांत्वन केले .नेबापूर येथे पन्हाळगडाला लागूनच शिवा काशीदांचे स्मारक ऊभारून त्यांचे स्मरण इतिहासात जागते ठेवले. आहे .”

अशा या veer shiva kashid – वीर शिवा काशीद यांना तमाम मराठी जनांचा मानाचा मुजरा”

जय जिजाऊ जय शिवराय

लेखनडाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर
( इतिहास अभ्यासक )

संदर्भ:
डाॅ. सचिन पोवार
शिवछत्रपतींचे शिलेदार

 

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Postbox India

Leave a Reply

error: Content is protected !!