Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSHISTORYINDIAMAHARASHTRA

Chhatrapati shahu maharaj – छत्रपती थोरले शाहू महाराज

1 Mins read
  • Chhatrapati shahu maharaj

Chhatrapati shahu maharaj – पुण्यश्लोक छत्रपती थोरले शाहू महाराज 

स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

 

 

१८ मे.१६८२ या दिवशी छत्रपती संभाजी महाराज व महाराणी येसूबाई राणीसाहेब यांना पुत्ररत्न झाले .हेच पुढे थोरले शाहू म्हणून इतिहासात अजरामर झाले.
छत्रपती संभाजी महाराजांनी १६८१ ते १६८९ या नऊ वर्षांच्या कालखंडात मुघल सम्राट औरंगजेबाशी अतिशय धैर्याने सामना दिला.

महाराणी येसूबाई राणीसाहेबांनी राजाराम महाराजांना रायगडच्या वेढ्यातून अतिशय सुज्ञ अशी मसलत करून बाहेर काढले आणि आपण आपले पुत्र शाहूराजे यांच्यासह कैद पत्करली. त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज यांनी जिंजी येथे राहून औरंगजेबाच्या सैन्यावर व अडचणींवर मात केली. संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्यासारखे मर्दानी सेनापती; प्रल्हाद निराजी, रामचंद्रपंत, अमात्य खंडोबल्लाळ व परशुराम त्रिंबक प्रतिनिधी यांच्यासारखी स्वामिनिष्ठ माणसे तयार करूण औरंगजेबाला जेरीस आणले. दुर्दैवाने राजाराम महाराजांचे ३ मार्च १७०० रोजी निधन झाले. त्यानंतर औरंगजेबाला मराठ्यांची पाळेमुळे पूर्णपणे उखडून टाकण्याची खात्री वाटली. मराठ्यांची मर्दुमकी ही गनिमी काव्याच्या कवचात दडलेली आहे, याची जाण धूर्त बादशहाला होती.

मात्र, एखाद्या अद्भुतरम्य कथेतील पोपटासारखा मराठ्यांचे राजे छत्रपती राजाराम महाराज महाराष्ट्राबाहेर केव्हाच निघून गेले व जिंजीला पोचचले होते. तिथे राहून त्यानी आपली राजसूत्रं अशी हलविली, की औरंगजेबाच्या मनोरथाची चाकं महाराष्ट्राच्या मातीत रुतून बसली. मराठ्यांच्या तलवारींना तेज आलेले पाहून औरंगजेब दिपून गेला.

राजाराम महाराजांचा मृत्यू झाल्यावर औरंगजेबाच्या आशेला पालवी फुटली; परंतु राजारामाची राणी ताराराणी , रणरागिणी भद्रकाली महिषासुरमर्दिनीच्या रूपात आपल्यापुढे उभी राहील अशी कल्पनाही त्याच्या डोक्यात आली नाही. अशा वेळी त्या रणचंडिकेचे रूप पाहूनच तो विचलित झाला.
अखेरीस मराठ्यांशी लढता लढता २० फेब्रु. १७०७ या दिवशी औरंगजेब बादशहाचे अहमदनगर येथे निधन झाले.
त्यानंतर त्याचा मुलगा शहाजादा आज्जम याने १७ वर्षाने शाहूराजांना कैदेतून मुक्त केले. महाराणी येसूबाई मात्र पुढे २९ वर्षं कैदेतच होत्या. तब्बल २९ वर्षं या महाराणीने आपले आयुष्य मोगलांच्या कैदेतच काढले.

१२ जाने. १७०८ रोजी छ. शाहूराजांचा सातारा येथील किल्ल्यावर विधीयुक्त राज्याभिषेक झाला. त्यांनी राज्यसूत्रं हातात घेतली. शाहूमराजांनी आपल्या मृदु स्वभावाने आपल्या काकी (महाराणी ताराराणी ) आणि आपले चुलत बंधू ( करवीर छत्रपती )संभाजीराजे यांच्याशी समझोत्याचे राजकारण केले. आपल्या कारकिर्दीत बाजीराव, नानासाहेब पेशवे, सरदार मल्हारराव होळकर, सरदार महादजी शिंदे, गायकवाड, आंग्रे, जाधवराव, दाभाडे यांच्यासारखे शूरवीर निर्माण केले, आणि आपल्या राज्याचे साम्राज्यात रूपांतर केलं.

महाराणी ताराबाई व Chhatrapati shahu maharaj – शाहू महाराज यांच्यात काहीसा संघर्ष निर्माण झाल्यावर ताराराणीने पन्हाळा येथे आपली राजधानी निर्माण केली. वारणेचा तह झाल्यावर सातारा आणि कोल्हापूर अशा दोन गाद्या निर्माण झाल्या. गुंतागुंतींचे राजकारण झाले. तरीसुद्धा शाहूमहाराजांनी अतिशय समजूतदारपणाने राजकारण करून पेशव्यांसारख्याना आणि अनेक मराठा सरदारांना पराक्रमास वाव दिला व हिंदवी स्वराज्याच्या सीमा दिल्लीपर्यंत पोचविल्या.
छ.शाहू महाराजांबद्दल तत्कालीन कागदपत्रांतून अतिशय प्रशंसेचे शब्द वाचण्यास मिळतात,छ. शाहूमहाराज सातार्‍यास तख्त करून राहिले, तेव्हापासून राज्यकारभार अनेक मसलती व युद्धप्रसंग मोठ्या मसलतीने केले.

आपल्या सेवकांवर पूर्ण विश्वास ठेवून राज्यवृद्धी करण्याचे काम Chhatrapati shahu maharaj – शाहूमहाराजांनी केले. माणसांची योग्यता पारखून त्यांच्यावर विश्वास टाकला व अतिशय सौजन्यशील वृत्तीने त्यांनी सर्वांना जवळ केले.

Chhatrapati shahu maharaj – शाहूमहाराजांनी औरंगजेबाच्या सहवासात १७ वर्षं काढली होती. औरंगजेबाच्या चारित्राचा त्यांनी जवळून अभ्यास केला होता. मोगलांची वृत्ती त्यांनी पूर्णपणे जाणली होती. कोल्हापूरच्या गादीशी तंटे त्यांनी कधीही विकोपास नेले नाहीत, किंबहुना ते सामंजस्यानेच मिटविण्याचे प्रयत्न केले, त्यामुळेच त्यांना पुण्यश्लोक हे विशेषण लावले जाते. थोरले Chhatrapati shahu maharaj –  छ.शाहू महाराजांचा कालखंड अनेक गुंतागुंतीच्या घटनांनी भरलेला आहे. कारण शाहू महाराजांच्या कर्तृत्वामुळे मराठे थेट दिल्लीच्या पुढेही पोचले.

शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र म्हणून जन्माला आलेले संभाजी राजे यांनी अवघ्या नऊ वर्षाच्या अल्पशा कारकिर्दीत औरंगजेबाशी लढत देऊन हौतात्म्य पत्करले.स्वराज्य जगवायचे असेल तर मृत्यूला कवेत घ्यावे लागते हे संभाजीराजांनी जगाला दाखवून दिले.छ. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर आपल्या मातोश्री येसूबाई राणीसाहेब यांच्याबरोबर सात वर्षाच्या शाहूराजांना सुद्धा औरंगजेबाची तब्बल १७ वर्षे कैद स्वीकारावी लागली होती. त्यांची सुटका झाली तेव्हा शाहू महाराजांनी लयाला जाणाऱ्या मराठी साम्राज्याला वाचवण्यासाठी चैतन्य निर्माण करून साऱ्या हिंदुस्तानभर मराठ्यांचा दरारा निर्माण केला.

मोगलांच्या कैदेतून सुटका होणे Chhatrapati shahu maharaj – शाहू महाराजांच्या दृष्टीने एक क्रांतीचे पाऊल ठरले. या संधीचा फायदा घेऊन त्यांनी उत्साही कर्तबगार व्यक्तींना प्रोत्साहित करून राज्य वृद्धीसाठी त्यांचा उपयोग करून घेतला. महाराजांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच स्वराज्याचे साम्राज्य घडविण्याची किमया त्यांनी करून दाखवली. स्वतःच्या हिमतीवर व पराक्रमाने छत्रपती पद मिळवून ते स्वराज्याचे महाराज झाले या संधीचा फायदा घेऊन स्वराज्याला त्यांनी समता बंधुत्व यांचा दिव्य आदर्श निर्माण करून दिला. शाहूमहाराजांच्या सौम्य आणि शांत स्वभावाचे प्रत्यंतर त्यांच्या जीवनात सातत्याने येत होते.

शत्रूला सुद्धा घात करण्याची इच्छा होऊ नये असा हा राजा अजात शत्रू म्हणून प्रसिद्ध होता . वडिलांचे छत्र बालपणीच गेले होते व आईच्या संस्कार करण्याच्या दिवसातच आईचे जीवन कैदेत गेले. वयाच्या सातव्या वर्षापासून शाहूराजे मोगली संस्कृतीत वाढले. संभाजीराजांच्या हाल-हाल करून झालेल्या मृत्यूनंतर येसूबाई व शाहू राजे यांना शापित आयुष्य जगून स्वराज्यासाठी स्वतःची आहुती दिली. शाहूराजे दुर्बल नव्हते ते संभाजी राजांचे पुत्र होते एक निर्मोही उदात्त व सर्वांवर उदार अंतकरणाने प्रेम करणारा हा राजा होता.

Chhatrapati shahu maharaj –  शाहू महाराज म्हणजे सर्वांना छाया देणारे झाड होते म्हणूनच महाराष्ट्राची भगवी पताका स्वराज्यात फडफडत राहिली. शाहू राजे छत्रपती झाले त्यावेळी त्यांच्याकडे स्वतःचे राज्य नव्हते पुरेसे सैन्य नव्हते अशा प्रतिकूल परिस्थितीत शाहूराजांनी दक्षिणेपासून तंजावर पर्यंत तर ओरिसा बंगाल पासून गुजरात पर्यंत मराठा साम्राज्य पसरवले .थोरल्या शाहू छत्रपतींनी आपल्या पूर्ण यशाचे श्रेय छत्रपती शिवरायांना देताना म्हटले “थोरले छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद व त्यांचे पायाचा प्रताप त्यांनी इतके रक्षण करून हे दिवस मला दाखवले”

१५ डिसेंबर १७४९ रोजी छ.शाहू महाराज यांचे सातारा येथे निधन झाले.

अशा या अजातशत्रू पुण्यश्लोक Chhatrapati shahu maharaj –  छत्रपती थोरले शाहू यांना कोटी कोटी प्रणाम.

 

 

 

लेखन 
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर,

Leave a Reply

error: Content is protected !!