Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSHISTORYINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

विनायक कोंडदेव ओक

1 Mins read
  • विनायक कोंडदेव ओक

मराठीतील आद्य लघुकादंबरीकार

विनायक कोंडदेव ओक

 

 

त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील गुहाघर जवळील हेदवी येथे २५ फेब्रुवारी १८४० रोजी झाला(निधन ९ ऑक्टोबर १९१४}. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपल्याने त्यांचे बालपण कष्टात गेले. जेम तें तीन इंग्रजी इयत्तांपर्यंतचे शालेय शिक्षण त्यांना मिळाले होते. त्यानंतर त्यांनी इंग्रजीचे अध्ययन केले.ब्रिटिश राजवट आलेवर इंग्रजी शिक्षणाने अनेक लोकांना जीवनाची नवीन दालने उघडी झाली व त्यांनी नवशिक्षण प्रसारास सुरवात केली मधे ओक यांचे नाव घेतले जाऊ लागले. तसेच लेखक म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांनी शिक्षक म्हणून सरकारी शिक्षण खात्यात अर्थार्जनासाठी नोकरीस प्रारंभ केला, आणि ‘अतिरिक्त उपशिक्षण निरीक्षक या पदावरून ते निवृत्त झाले.

मुलांना वाचनाची गोडी लागावी व शालेय पुस्तकी शिक्षण बरोबरच शाळेच्या बाहेरील ज्ञान समृद्ध व्हावे म्हणून मुलांना समजेल अश्या सोप्या भाषेत पुस्तके लिहिण्याचा विचार केला. शालेय शिक्षणाला जोड म्हणून पूरकवाचन काय देता येईल याचा त्यांनी विचार केला.

पेशवे सरकार दरवर्षी चातुर्मासात विद्वानांना दक्षिणा देत असे. त्यामधे वैदिक विद्वान, इतर पंथीय विद्वान आणि अन्य धर्मातील पंडितांचाही समावेश असायचा.लॉर्ड एल्फिन्स्टन या पहिल्या गव्हर्नरने यात सुधारणा करून ही प्रथा पुढे चालू ठेवली व त्यासाठी दक्षिणा फंड म्हणून सरकारात स्वतंत्र निधीची तरतूद केली होती.त्यातूनच शिक्षणास उत्तेजन व मराठी ग्रंथास पुरस्कार मिळू लागला. योग्य ग्रंथाची शिफारस करण्यासाठी सरकारने इ. स. १८५१ मध्ये दक्षिणा प्राईझ कमिटी या नावाची एक समिती स्थापन केली. या कमिटीच्या प्रोत्साहनाने अनेक मराठी लेखकांना ग्रंथलेखन, मुद्रणप्रसार ह्यांसाठी उत्तेजन मिळाले व मराठी भाषेमधे चांगल्या साहित्याची व साहित्यिकांची भर पडली. इंग्रजीतील चांगल्या ग्रंथांची भाषांतरे मराठीत करवून घ्यावयाची आणि भाषांतरकारांस पुरस्कार द्यायचा कमिटीचा उद्देश होता. या कमिटी मार्फत त्यांच्या ‘लघुनिबंधमाला’ या पुस्तकास बक्षीस मिळाले. त्यांनी “मधुमक्षिका अथवा अनेक उपयुक्त व मनोरंजक विषयांचा संग्रह” या नावाने‘अनेक इंग्लिश ग्रंथांच्या आधाराने एक माहितीपर पुस्तक लिहिले . व मेहरबान दक्षिणा प्राइज कमिटी ह्यांस नजर’ केलेले हे पुस्तक गव्हर्नमेंट सेंट्रल बुक डेपोनेच प्रसिद्ध केले.

ओक यांनी ‘बालबोध’हे पहिले मासिक वर्ष १८८१मधे सुरू केले. त्यांनी या मासिकातून ४०२ चरित्रे, ४०२ कविता, ४०२ निबंध, ३७१ शास्त्रीय निबंध व अन्य ८५० विषयांची माहिती करून दिली.म्हणूनच त्यांना ‘बालवाङ्मयाचे जनक’असे म्हटले जाते.त्यांनी ‘शिरस्तेदार’ या छोट्या कादंबरीतून लाच खाण्यापासून होणाऱ्या सामाजिक दुष्परिणामांचे विवेचन केले आहे. ललित लेखनाबरोबर त्यांनी काव्य लेखनही केले. वर्ष १८७१ मधे संस्कृत तर काही इंग्रजी कवितांवर आधारित‘पुष्पवाटिका’नावाचा काव्यसंग्रह त्यांनी प्रसिद्ध केला. विशेष करून इतिहास विषयावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली.त्यांमधे जगातील प्रसिद्ध राष्ट्रांचा इतिहास सांगणारे ‘इतिहासतरंगिणी’. ‘हिंदुस्थानचा संक्षिप्त इतिहास’, ‘फ्रान्स देशातील राज्यक्रांतीचा इतिहास’, याशिवाय काही थोर पुरुषांची चरित्रे त्यांनी लिहिली. ‘पीटर दी ग्रेट’, ‘शिकंदर बादशहा’, ‘ड्यूक ऑफ वेलिंग्टन’, ‘आल्फ्रेड दी ग्रेट’, ‘अब्राहम लिंकन’ , ‘ग्लॅडस्टन’,अश्या अनेक पुस्तकांचा समावेश आहे.

लेखन
माधव विद्वांस

Leave a Reply

error: Content is protected !!