Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

कुसुमाग्रज

1 Mins read
  • Marathi Bhasha Diwas कुसुमाग्रज

कुसुमाग्रज

“स्वर्गदारातील तारा” या नावाने आकाशतारांगणा मधे स्थान मिळालेले कुसुमाग्रज. ते १९३९ ते १९४२ या कालखंडामध्ये ते प्रभातचे संपादक होते,या कालावधीतच त्यांचा विशाखा काव्यसंग्रह पूर्णत्वास गेला.!! गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार अन् वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार !! इ.कविताही याचा काळात प्रसिद्ध झाल्या.कुसुमाग्रज यांची साहित्यक्षेत्रातील कवी,नाटककार,समीक्षक कादंबरीकार कथालेखक पत्रकार व पटकथालेखक तसेच संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून ओळख कायक राहील.

कुसुमाग्रज यांचे मूळ विष्णू वामन शिरवाडकर,पण त्यांचे खरे नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर.त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्यामुळे त्यांचे नाव हे बदलून विष्णू वामन शिरवाडकर असे करण्यात आले.त्यांचा जन्म नाशिक येथे २७ फेब्रुवारी १९१२ रोजी झाला.कुसुमाग्रजांना सहा भावंडे आणि “कुसुम “नावाची एकुलती एक लहान बहिण होती,त्यामुळे ती सगळ्यांचीच लाडकी होती कुसुमचे अग्रज म्हणजेच थोरले भाऊ म्हणून ‘कुसुमाग्रज’ असे नाव त्यांनी धारण केले.तेव्हापासून शिरवाडकर कवी ‘कुसुमाग्रज’ या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले.

कुसुमाग्रजांचे वडील हे व्यवसायाने वकील होते.कामानिमित्त ते पिंपळगाव बसवंत या गावी आले त्याच ठिकाणी त्यांचे संपूर्ण बालपण गेले.त्यांचे प्राथमिक शिक्षण पिंपळगाव येथे व माध्यमिक शिक्षण नाशिक येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले, (आता नाशिकचे” जेएस रुंगठा” हायस्कूल म्हणून ओळखले जाते).१९३४ मध्ये, शिरवाडकर यांनी नाशिकच्या एचपीटी कॉलेजमधून मराठी आणि इंग्रजी भाषांमध्ये कला शाखेची पदवी प्राप्त केली.तरुण वयात वर्ष १९३२ मधे त्यांनी नाशिकमध्ये,नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून झालेल्या सत्याग्रहात भाग घेतला.तसेच त्यांनी अनेक सामाजिक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.तसेच त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली.शैक्षणिक पदवी प्राप्त झालेवर नाशिक मध्येच त्यांनी मराठी चित्रपटांसाठी पटकथा लिहिणे सुरू केले.धार्मिक चित्रपट “सती सुलोचना” मध्ये त्यांनी अभिनेता म्हणूनही काम केले.१९३३ मध्ये शिरवाडकरांनी ध्रुव मंडळ (ध्रुव मंडळ) स्थापन केले.“नवा मनू” नावाच्या वृत्तपत्रात लेखन सुरू केले,.कुसुमाग्रजांचे साहित्य समाजसापेक्ष आहे.लेखकाच्या अनुभवाला, त्याच्या स्वातंत्र्याला कुसुमाग्रज महत्त्व देतात.क्रांती ही साहित्याची प्रेरणा आहे असे कुसुमाग्रज यांचे ठाम मत होते.

कुसुमाग्रजांचा ‘जीवनलहरी’ हा पहिला काव्यसंग्रह सन १९३३ मध्ये प्रसिद्ध झाला.त्यांचे एकूण २२ काव्यसंग्रह प्रकाशित झाले त्यामधे त्यानंतर जाईचा कुंज, विशाखा, समिधा, किनारा, मेघदूत, मराठी माती, स्वगत, हिमरेषा, वादळवेल, छंदोमयी यांहा समावेश आहे. त्यांच्या मराठी माती, स्वगत, हिमरेषा या काव्यसंग्रहांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार लाभले आहेत.
ते पत्रकारितेच्या निमित्ताने मुंबईत आले असताना त्यांची मुंबई मराठी साहित्य संघाचे डॉ.अ.ना.भालेराव यांची गाठ भालेराव यांनी कवी शिरवाडकरांना नाटके लिहिण्यास प्रवृत्त केले, भालेरावांनी ‘‘ऑस्कर वाइल्ड’चे “आयडिअल हज्बंड” नाटक शिरवाडकरांच्या हाती सोपविले व त्याचे मराठी रूपांतर करण्याची शिरवाडकरांना केलली.शिरवाडकरांनी ‘दूरचे दिवे’ या नावाने त्या नाटकाचे रूपांतर केले.केवळ कवी असलेले वि.वा. शिरवाडकर बघता बघता एक यशस्वी नाटककार झाले.

त्यांनी सुमरे २३ नाटके लिहिली.त्यापैकी शिरवाडकरांच्या स्वतंत्र नाटकांत “दुसरा पेशवा”, “कौंतेय”, “आमचं नाव बाबुराव”, “ययाति आणि देवयानी”, “वीज म्हणाली धरतीला”, “नटसम्राट” यांचा प्रमुख नाटकांचा समावेश होतो. दूरचे दिवे, वैजयंती, राजमुकुट , ऑथेल्लो व बेकेट ही त्यांची काही रुपांतरीत नाटकं आहेत. या नाटकातील नटसम्राट गणपतराव ऊर्फ अप्पासाहेब बेलवलकर ही प्रमुख भूमिका डॉ. श्रीराम लागू यांनी अनेक वर्षे रंगवली. ही भूमिका करण्याची संधी मिळणे ही प्रत्येक नाट्याभिनेत्याचे स्वप्न असते.ही भूमिका करणे म्हणजे शिवधनुष्य पेलणे असे समजले जाते.श्रीराम लागूंनंतर सतीश दुभाषी, उपेंद्र दाते, यशवंत दत्त, चंद्रकांत गोखले, दत्ता भट, मधुसूदन कोल्हटकर, राजा गोसावी, गिरीश देशपांडे आणि अलीकडेच नाना पाटेकर यांनी पण नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकर यांची भूमिका वठविली.नटसम्राट नाटकाची मुळ कल्पना विल्यम शेक्सपियरच्या नाटकावर असली तरी मूळ नाट्यांशांचे ते भाषांतर किंवा रूपांतर नाही.त्याचे कथानक.शिरवाडकरांनी आपल्या प्रतिभेने विस्तारले.सध्याचे युगातील जुन्या पिढीतील वृद्ध आणि आताचा तरुण वर्ग यांच्यातील पिढीच्या अंतरामुळे घडणारी क्लेशकारक वास्तवता आत्मचिंतन करण्यास भाग पाडते.या नाटकाचा पहिला प्रयोग २३ डिसेंबर, इ.स. १९७० रोजी बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे सादर केला.पाच दशके प्रेक्षकांना खिळवूं ठेवणारी नातूंयकृती टार्या प्रमाणेच अढळ आहे.

त्यांनी सुमारे ९ कथासंग्रह, ५ कादंबऱ्या,३ एकांकिका कथासंग्रह लिहिले,अनेक मासिके व दिवाळी अंक तसेच ७ लघुनिबंध असे विविध प्रकरात लेखन केले.तसेच त्यांची सुमरे ४४ गीते स्वरबद्ध झाली आहेत.ययाती देवयानी या नाटकातील काही गीते त्यांनी स्वतः लिहिली आहेत.त्यांची अनेक समरगीते आकाशवाणी कलावंतानी सादर केली आहेत.

‘ हिरे-मोती’ यांची पारख असणाऱ्या दाजी लागू यांना कुसुमाग्रज नावाच्या हिऱ्याची पारख असणे स्वाभाविकच होते.त्यांच्या जर्मनीतील एका मित्राकडे ‘इंटरनॅशनल स्टार रजिस्ट्री’ या संस्थेने दिलेले एक सुंदर, आकर्षक मानपत्र त्याने पाहिले होते.त्यात त्या मित्राच.नाव नभांगणातील अगणित ताऱ्यांपकी एका ताऱ्याला दिले होते.कवी कुसुमाग्रज हे दाजीचे एक आदरस्थान होते. ७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिन,त्या दिवशी त्यांना असा तारा भेट द्यावा असा विचार त्यांनी केला.तात्यांच्या जन्मतारखेवरून त्यांची जन्मरास शोधून काढली.अमेरिकेतील आपल्या एका मित्राला ती रास कळवली आणि इंटरनॅशनल स्टार रजिस्ट्रीकडे त्या राशीतील एखाद्या ताऱ्याला कुसुमाग्रजांचे नाव देण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली.त्याप्रमाणे २५ फेब्रुवारी १९९६ -रोजी मिथुन तारकासमुहातील कॅस्टर (पुनर्वसू) व पोलक्स जवळच्या तार्याचे ’कुसुमाग्रज तारा’ असे नामकरण केले. आणि संस्थेकडून मानपत्र आले.तसेच त्याबरोबर तो तारा नेमका कुठे आहे, हे अंतराळस्थानदर्शक एक नकाशापण संस्थेने पाठविला. तात्यांनी कृतज्ञतापूर्वक पोच म्हणून ‘ताराभेट’ ही कविता स्वहस्ताक्षरात लिहून दाजीला पाठवली.ही कविता म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्वात अमूल्य भेट होती, असे खुद्द दाजीनेच लिहिले आहे. ती कविता अशी !!देवघरातील फूल उचलुनी कुणास द्यावे कुणी!! !!तशी नभातील ज्योत आणली तू माझ्या अंगणी!!

कुसुमाग्रजांना आतापर्यंत अनेक मानसन्मान मिळाले आहेत. वर्ष १९६४ मध्ये मडगाव गोवा येथे भरलेल्या पंचेचाळिसाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, वर्ष १९७० मध्ये कोल्हापूर येथे भरलेल्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद. वर्ष १९८९ मध्ये मुंबई येथे भरलेली पहिली जागतिक मराठी परिषडेचे अध्यक्षपद. ‘गडकरी पारितोषिका’चे ते पहिले मानकरी होत. वर्ष १९८७ चा म्हणजे तेविसावा ज्ञानपीठ पुरस्कार,पुणे विद्यापीठानेही डी. लिट. ही सन्मानदर्शक पदवी, ‘राजर्षी शाहू पुरस्काराचे’ ही ते मानकरी ठरले आहेत.१४ मार्च, २००३ रोजी कविवर्य कुसुमाग्रज स्मृती टपाल तिकिटाचे वितरीत करणेत आले.भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.महाराष्ट्राला सुपरिचित अश्या या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा गौरव म्हणून २७ फेब्रुवारी हा “मराठीभाषा” दिन म्हणून साजरा केला जातो.

लेखन

माधव विद्वांस

Leave a Reply

error: Content is protected !!