Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSHISTORYINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

विश्ववंदे छत्रपती शिवराय

1 Mins read
  • रामचंद्र सालेकर

विश्ववंदे छत्रपती शिवराय

 

रामचंद्र सालेकर

विश्वाच्या नजरेतील शिवराछत्रपती शिवरायांच्या भूमीत जन्माला आल्याचं अहोभाग्य ज्यांना ज्यांना लाभलं ते सर्व आपण भाग्यवान आहोत कारण शिवरायांच्या कर्तुत्व पराक्रमासह सर्व गुणाची जगाने दखल घेवून प्रत्येक क्षेत्रात त्यांचा रोलमाॕडल म्हणून जगभर स्वीकार केला आहे.

य भारताच्या नजरेत उतरु शकले नाही ही आपली फार मोठी शोकांतीका आहे. याचं मुख्य कारण भारतात छत्रपती शिवरायांचा इतिहास त्यांचा द्वेश करणाऱ्या पुर्वाश्रमीच्या विदेशींनी लिहीला. तर जगातील इतर इंग्रज फ्रेंच डच पोर्तुगाल इरान इराक व्हिएतनाम…इ. देशांनी त्यांचा बघितलेला पराक्रम व कर्तृत्व अनुभवून इतिहास लिहीला म्हणून त्यांनी त्यांच्या देशात शिवनीती वापरून विकास साधला.परंतु दुर्दैवाने भारतात मात्र त्यांचा दैदीप्यमान इतिहास विदृप करुन आपसात धार्मिक द्वेष कलह निर्माण करण्यासाठी वापर केला. त्यांचा सामाजिक राजकीय संघर्ष हा धार्मीक संघर्ष म्हणून आपल्यापुढे मांडला. विश्वातील बहुतांश देशानी भारताकडून बुद्धाला व छ.शिवरायांना स्विकारुन त्यांनी त्यांचा विकास साधला परंतु भारतीयांनी आपल्याच या महान धरोहरांना पुर्वाश्रमी युरेशीयन विदेशी मनुवाद्यांच्या कपटाला बळी पडून दूर सारले व स्वतःचीच आपली महान संस्कृती विसरुन परजीवी शोषकांच्या मागे लागून स्वतःला गुलाम करुन घेतले.

डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सर्वश्रेष्ठ भारताच संविधान निर्माण करतांना त्यांच्या नजरेसमोर शिवनीती होती. छत्रपती शिवरायांचा राज्यकारभार डोळ्यासमोर असल्याने हे आदर्श संविधान निर्माण करण्यास मला कोणतीही अडचन गेली नसल्याचे बाबासाहेबांनी स्वतः सांगितले आहे.

म्हणूनच बाबासाहेब आपल्या प्रत्येक पत्राची सुरुवात ‘जय शिवराय’ शब्दाने करत एवढं घट्ट आदर्श नात त्यांच होतं परंतु आम्हा बहुजनांपर्यत खरे शिवराय बाबासाहेब पोहचू न देण्यात मनुवादी यशस्वी झाले.
धर्मनिरपेक्ष छत्रपती शिवराय छत्रपती शिवराय हिंदू धर्मासाठी लढले नसून मानवतावादी समतावादी शिवधर्मासाठी लढले.

छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले याचा अर्थ हिंदुंच राज्य निर्माण केलं असा नव्हे तर हिंद म्हणजे प्रजा, त्यांनी प्रजेचं राज्य निर्माण केलं. छत्रपती शिवरायांच्या राज्यात जाती धर्माला अजीबात थारा नव्हता सर्व जातीधर्माच्या मावळ्यांना मराठा बिरुद देवून एका छत्राखाली आणून जातीवादाला त्यांनी तिलांजली दिली. छत्रपती शिवरायांच्या सैन्यात मदारी मेहतर सारखा आग्र्यावरुन शिवरायांना सहीसलामत सोडवणारा निष्ठावंत मावळा, शिवरायांचा वकील काजी हैदर,आरमाराचा प्रमुख दौलतखान, शिवरायांच्या अंगरक्षकांचा प्रमुख सिद्धी इब्राहीम, निष्ठावंत सेवक दाऊद खान, चित्रकार मीर मोहोम्मद अशाप्रकारे महत्वाच्या पदावरील मुसलमान अधिकारी व त्यांचे अर्धे अधिक अंगरक्षक व सैनिक मुसलमान होते.

स्वतः आपल्या महालापुढे आपल्या मुसलमान मावळ्यांसाठी मज्जीद बांधणारा धर्मनिरपेक्ष राजा छत्रपती शिवाय जगात दुसरा झाला नाही. कुराणाची एखादी प्रत कोण्या सैनिकाच्या हाती लागल्यास सन्मानाने मुसलमान व्यक्तीकडे सुपुर्द करण्याचे शिवरायांचे सैनिकांना फर्मान होते, यावरुन स्पष्ट आहे की त्यांचं राज्य धर्मासाठी अजीबात नव्हतं. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी तर अजिबातच नव्हतं खरं तर हिंदू धर्माच्या विरोधात त्यांचं बंड होतं. या काही घटनावरून आपल्या लक्षात येईल जसे हिंदू धर्मात सागर बंदी होती ही बंदी तोडून शिवरायांनी समुद्रात आरमार उभे केले. हिंदू धर्मात सतिप्रथा होती माँ जिजाऊंना सतिप्रथेपासून रोखून या प्रथेला छेद दिला.

हिंदू धर्मात ब्रह्म हत्या पाप होते परंतु शिवरायांवर वार करणाऱ्या कृष्णा भास्कर कुलकर्णीला उभा कापून काढला. हिंदू धर्मात अमावशा निसिद्ध मानल्या जाते कोणतेही शुभ कार्य अमावसेला केले जात नाही परंतु शिवरायांनी प्रत्येक आमवसेच्या अंधाऱ्या रात्रीच लढाया केल्या. हिंदू धर्मात कोणत्याही शुभकार्यासाठी सत्यनारायनाची पूजा करण्याची प्रथा आहे शिवरायांनी तीनशेच्या वर किल्ले जिंकले व बांधले मात्र एकाही किल्ल्यावर सत्यनारायण किंवा कर्मकांड केले नाही, राज्याभिषेकाला ब्राह्मणाकडून झालेल्या अपमानचा बदला दुसरा राज्याभिषेक एका निश्चलपूरीच्या गोसाव्याकडून अवैदिक पद्धतीने करवून घेतला…

अशा अनेक प्रसंगावरून आपल्या लक्षात येईल की शिवराय हिंदू धर्मासाठी लढले नाही तर समतावादी मानवतावादी शिवधर्मासाठी लढले.म्हणूनच छत्रपती शिवरायांचा जयघोष आपला बहुजन अवैदिकांचा आदर्श नागवंशी निसर्गपूजक मातृसत्ताक कृषी संस्कृतीचा पुरस्कर्ता, निसर्ग विध्वंसक यज्ञ संस्कृतीचा विरोध करून यज्ञ उधळवून लावणारा आमचा आदर्श आद्य गणनायक शंकराचा म्हणजे शिवाचा म्हणजेच शिवधर्माचा ‘हर हर महादेव’ ही गर्जना शिवरायांचा प्रेरणास्रोत जयघोष होता यावरून छत्रपती शिवराय हिंदू धर्मासाठी नव्हे तर मानवतावादी शिवधर्मासाठी लढले. छत्रपती शिवरायांना एखाद्या धर्माशी जोडणं त्यांचा राजकीय संघर्ष हा धार्मीक संघर्ष आपल्यापुढे मांडणे म्हणजे त्यांच्याशी द्रोह करणे होय. असा द्रोह करणाऱ्यांना शिवप्रेमींनी ठेचून काढले पाहिजे कारण हा शिवरायांचा अपमान तर आहेच त्याचबरोबर त्यांचे महान कार्य व विचार संपविण्याचं कटकारस्थान आहे.”

विज्ञानवादी छत्रपती शिवराय

छत्रपती शिवरायांनी ३६१ किल्ले जिंकले व अनेक किल्ल्याचा जिर्णोद्धार केला परंतु एकाही किल्ल्याला स्वतःचे नाव दिले नाही एवढेच नव्हे तर किल्ल्यावर कर्मंकांड किंवा सत्यनारायण,होम,हवन,शुभाशुभ,यज्ञ,पंचाग,राशी,भविष्य,मुहुर्त, कुंडल्या पाहिल्याची कुठेही नोंद सापडणार नाही. अशुभ समजल्या जाणाऱ्या अमावसेच्या रात्रीच चढाया केल्या. पालथा जन्मलेला राजाराम अशुभ नसून मोगलाईला पालथी करण्यास जन्मा आला असे सांगून अंधश्रद्धा लाथाडली. पित्याच्या निधनानंतर जिजाऊंना सती जाण्यापासून रोखून असल्या अनिष्ठ रुढी परंपरा उचनिच स्पृष्य अस्पृष्य भेदाभेदाने मानव जातीला धर्ममार्तंडांनी कलंकीत केललं साफ धुवून काढलं. ब्रम्ह हत्या पाप सांगणाऱ्या धर्मांध अंधश्रद्धेला अफजल खानाचा दगाबाज वकील कृष्णा भाष्कर कुलकर्णीला उभा कापून ही अंधश्रद्धा दुर केली. शुद्राने सागर उल्लंघन करणे पाप मानणारी अंधश्रद्धा सागरातच आरमार उभारुन मोडून काढली. धर्ममार्तंडांनी शुद्राला राजा बनण्याचा अधिकार नाकरला असला तरी लाख विरोध झुंगारुन सर्व गुलामीच्या शृखला तोडून ६ जून १६७४ ला वैदिक पद्धतीने राज्यभिषेक करवून शिवराय छत्रपतीचे छत्र धारण करुन राजे झाले.छत्र धारण करताच अवघ्या ३ महिन्यांनी २४ सप्टेंबर १६७४ ला राज्याभिषेकामध्ये वैदिककडून झालेल्या अपमानाचा बदला निश्चलपूरीच्या गोसावी कडून अवैदिक पद्धतीने दुसरा राज्याभिषेक करवून घेतला एवढेच नव्हे तर रयेतेचे आदर्श स्वराज्य निर्माण केले. माझ्या या राजाला शत्रू लाख कोशिष करुन हरवू किंवा मारु शकला नाही परंतु राज्यकारभारासाठी जनतेमध्ये लिहण्या वाचण्याच्या शिक्षण अभावापायी नाईलाजास्तव राजदरबारी पोसाव लागलेल्या काही विषारी कपटी मनुवादी राज्यकारभाऱ्यांच्या विरोध कट कारस्थानाने शिवरायांना अवघ्या पन्नास वर्षाच्या अल्प वयात जग सोडावं लागल. शंभूराजांना मनुस्मृतीतं सांगितल्याप्रमाणे हाल हाल करून मारलं जर का छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी दोन्ही माझे राजे शंभर वर्ष जगले असते, शतःयुषी झाले असते तर प्रत्येकाच्या घराला सोन्याची कवाडं असती. इंग्रजांची गुलामी सुद्धा भारताला पहावी लागली नसती.

शेतकऱ्यांचे कैवारी छत्रपती शिवराय

शेतकऱ्यांवरच खरंतर देश जीवंत असल्याचे छत्रपती शिवरायांनी ओळखले होते. शेतीवर कर न लावता आजही देशात नाममात्र अत्यल्प शेतसारा म्हणून महसूल घेतल्या जातो ही पद्धत छत्रपती शिवरायांनी सुरु केलेली होय. देशाच्या या पोशिंद्याची त्यांनी फार काळजी घेतली होती. शिवरायांनी शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले होते. शेतीला पाणी, शेतीला कर्ज, संकट काळात कर्ज सारा माफ, एवढचं नव्हे तर आपल्या सैनिकांना शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये असे फर्मान काढणारा एकमेव राजा,म्हणूनच काय तर स्वराज्यात एकाही शेतकऱ्यानी आत्महत्या केल्याची शिवराज्यात नोंद नाही.शेतकऱ्यांना पोटच्या मुलाप्रमाणे जपणारा,जनतेचा कैवारी राजा छत्रपती शिवराय.

स्त्री सन्मानाचे महामेरु छत्रपती शिवराय

परस्त्रीस मातेसमान मानणारे जगातले एकमेव राजे छत्रपती शिवराय. मुलीच्या अब्रुवर हात टाकणाऱ्या रांज्याच्या पाटलाचे हात छाटणारे छत्रपती शिवराय, लहुजी गायकवाड नावाच्या आपल्या सरदाराने विजयाच्या उन्मादात शत्रू किल्लेदाराच्या पत्नीवर बलात्कार केल्याचे महाराजांना समजताच त्याचे डोळे काढणारे छत्रपती शिवराय,शत्रुच्याही स्त्री ची सन्मानाने साळीचोळी करणारे शिवराय,शत्रूलाही त्यांच्या स्त्रियांना शिवरायांच्या सैनिकांकडून कसलाही धोका नसल्याची खात्री असणारे छत्रपती शिवराय, ममतेच्या पान्ह्याने आपल्या बाळासाठी अधिर झालेली हिरकणी दुर्गम असा कडा उतरुन जाणाऱ्या हिरकणीचा सन्मान करुन त्या कड्याला हिरकणी बुरुज म्हणून नाव देणारे स्त्री सन्मानाचे महामेरू म्हनुन जगात ओळखल्या जाणारे एकमेव राजे छत्रपती शिवराय आहे.

शिवरायांच्या खऱ्या इतिहासाशी गद्दारी इतिहास रचला मावळ्यांनी परंतु तो लिहीला मनुवादी कावळ्यांनी.
शिवरायांची जगदंब नाव असलेली तलवार भवानी मातेने दिली असल्याचे सांगून त्यांच्या शौर्य पराक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याच काम या मनुवादी इतिहासकारांनी केले.
कडेकपारी सरसर चढाई करणाऱ्या यशवंत घोरपडे या बहाद्दर मावळ्याला यांनी यशवंती घोरपड करुन टाकलं. छ.शिवरायांच्या खऱ्या गुरु माॕ.जिजाऊ व त्यांना वयाच्या १२ व्या वर्षी छत्रपतीची पदवी देणारे जगदगुरु तुकाराम महाराज होते. परंतु शिवरायांशी एकदाही भेट नसणाऱ्या मुघलाचा हेर असणाऱ्याला शिवरायांच्या गुरुस्थानी ठेवले. दादु कोंडदेव या चाकराला त्यांचा गुरु बणविले. शिवरायांचा राजकीय संघर्षाचा इतिहास हा हिंदु मुसलमान संघर्षाचा इतिहास असल्याचे आपल्यापुढे मांडले गेले. या इतिहासकारांनी कुळवाळी भुषण शिवरायांना गोब्राम्हण प्रतिपालक करुन टाकले. परंतु मराठा सेवा संघाच्या इतिहास संशोधनाने खरा इतिहास पुढे आणला.

विश्ववंदे शिवराय

संपूर्ण विश्वाच्या कानाकोपऱ्यात जगभर शिवजयंती उत्साहात साजरी होत आहे. विएतनाम सारख्या छोट्याशा देशाने छत्रपती शिवरायांची युद्धतंत्र वापरुन बलाढ्य अमेरिकेला तब्बल २५ वर्ष जेरीस आणले. बालाढ्य अमेरीकेला पाठ दाखवून माघारी फिराव लागलं. म्हणूनच व्हियतनामचा राष्ट्राध्यक्ष प्रथम छत्रपती शिवरायांच्या समाधीला नतमस्तक होण्यास अधिर होतो व आपल्या देशात शिवरायांच्या चरणाची माती नेतो.व्हियतनामच्या हो-चि-मिन्ह या राष्ट्राध्यक्षाच्या समाधीवर शिवरायांचा मावळा इथे विश्रांती घेत आहे अशा अर्थाचे शब्द कोरलेले आहे. उंच गडावर पाण्याचं प्रभावी व्यवस्थापन या छत्रपती शिवरायांच्या जलनीतीचा इजरायलने अभ्यास करून इजरायल मध्ये कृषिक्रांती घडवून आणली. अशाच प्रकारे जर भारतीय राज्यकर्त्यांनी विषमतावादी पेशवाई ऐवजी आपल्याच या धरोहराची प्रेरणा घेवून जर समता मानवतावादी शिवनितीचा स्वीकार केला असता तर भारत नक्कीच आज महासत्ता असता.

जिजाऊ शिवरायांच्या प्रेरणेचा शिवधर्म

मराठा सेवा संघ या वर्तमान युगातील महान पुरोगामी चळवळीने आपल्या महान प्राचीन मातृसत्ताक निसर्गपुजक बळीशिवकृषीसंस्कृतीच्या खऱ्या आपल्या स्त्री सन्मानाच्या मातृसत्ताक सिंधुसंस्कृतील ‘शिव-पार्वती’ या आपल्या मुळ आद्य गणनायकाच्या लुप्त झालेल्या शिवधर्माचे थोर तत्वज्ञ आ.ह.साळुंखे, अॕड.पुरुषोत्तम खेडेकर …यांच्या सारख्या थोर विचारवंत साहित्यिक इतिहास तज्ञांनी प्राचीन साहित्याचे अभ्यासपूर्ण चिकित्सक सखोल संशोधन करुन माॕ.जिजाऊंना प्रेरणास्थानी ठेवून शिवधर्माचे प्रकटन केले.आचरणासाठी ‘शिवधर्म गाथा’ उपलब्ध करुन दिली. बहुजनांना भयमुक्त भटमुक्त करुन धार्मिक शोषणातून मुक्तता दिली आहे.
प्रत्येक शिवप्रेमींनी शिवजन्मोत्सव हा नाचून नाही तर वाचून,शिवरायांना डोक्यावर घेवून नाही तर डोक्यात घालून विविध समाजोपयोगी उपक्रमाने साजरा करावा.

 

 

 

शब्दांकन तथा लेखन

रामचंद्र सालेकर 

Leave a Reply

error: Content is protected !!