POSTBOX LIVE
My page - topic 1, topic 2, topic 3

निर्माते-दिग्दर्शक – शक्ति सामंत 

शक्ति सामंत

हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक

शक्ति सामंत 

त्यांचा जन्म पश्चिम बंगाल मधील बरद्वान येथे १३ जानेवारी १९२६ रोजी झाला (निधन ९ एप्रिल २००९).त्यांचे वडील अभियंता होते. शक्ति दीड वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे अपघाती निधन झाले. त्यामुळे त्यांना शिक्षणाकरिता ते त्यांच्या नातेवाईकांकडे डेहराडून येथे आले. त्यांचे सुरवातीचे शिक्षण डेहराडून तयेथेच झाले.त्यांतर वर्ष १९४४ मधे त्यांनी कोलकाता विद्यापीठातून पदवी घेतली.तेथे त्यांनी हिंदी व उर्दू भाषेचाअभ्यास केला. त्यामुळे त्यांना नंतर हिंदी चित्रपटांचे संवाद व गीते परिणामकारक करण्यासाठी करता आला. हिंदी चित्रपटात नशीब अजमावण्यासाठी व अभिनेता होण्याच्या महत्त्वाकांक्षेने ते मुंबईला आले.दापोली येथील विद्यालयात त्यांनी काही काळ उर्दू शिक्षकाची नोकरीही केली.

ते मुंबई येथील बॉम्बे टॉकीजमध्ये अशोककुमार यांना भेटले.व त्यांच्या सूचनेनुसार त्यांनी वर्ष १९४८ मध्ये साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली व चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. सुरुवातीस फणी मजुमदार, ज्ञान मुखर्जी, सतीश निगम यांच्यासोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वर्ष १९१४९ मधे राज कपूर यांच्या सुनहरे दिन या चित्रपटाचे ते साहाय्यक दिग्दर्शक होते.त्याबरोबर त्यांनी काही चित्रपटांच्या पटकथाही लिहिल्या.त्यामध्ये फणी मजुमदार दिग्दर्शित बादबान आणि धोबी डॉक्टर यांचा समवेश आहे.

वर्ष १९५४ मधे त्यांनी “बहुं” हा स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला त्यांचा पहिला कथात्म चित्रपट आहे. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शित केलेले इन्स्पेक्टर,शेरू, डिटेक्टिव्ह व हिलस्टेशन हे चित्रपट प्रदर्शित झाले.या चित्रपटांच्या यशानंतर त्यांनी ‘शक्ती फिल्म्स’ ही स्वत:ची चित्रपटनिर्मितीसंस्था १९५७ मध्ये स्थापन केली.वर्ष १९५८ मधे ‘शक्ती फिल्म्स’ मार्फत त्यांनी “हावडा ब्रिज” या पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली.पहिला चित्रपट निर्माण केला. अशोककुमार आणि मधुबाला यांचा अभिनय असलेल्या अभिनित या चित्रपटाने लोकप्रियतेचा विक्रम प्रस्थापित केला व त्यामुळे त्यांच्या कारकीर्दीला वळण मिळाले.

सामंतांनी त्यांच्या कारकिर्दीत एकूण ४३ चित्रपट दिग्दर्शित केले. त्यांतील ३७ हिंदी व ६ बंगाली चित्रपट होते.वर्ष १९६४ मधे त्यांनी “कश्मीर की कली “ या चित्रपटापासून रंगीत चित्रपट निर्मिती सुरु केली.कडे वळले.त्यांच्या सर्वोत्कृष्ट, लोकप्रिय व मनोरंजक चित्रपटांमध्ये, कश्मीर की कली, ॲन इव्हनिंग इन पॅरिस, आराधना,कटी पतंग,अमर प्रेम असे चित्रपट उल्लेखनीय आहेत.१९५० ते १९७५ या दरम्यान सामंतांनी प्रामुख्याने शम्मी कपूरला नायक घेऊन चित्रपट दिग्दर्शित केले.नंतरच्या काळात राजेश खन्नाला नायक म्हणून घेऊन त्यांनी चित्रपट काढले.

त्यावेळी आराधना, कटी पतंग व अमर प्रेम हे त्यांचे चित्रपट खूपच लोकप्रिय झाले.या दरम्यानच राजेश खन्ना लोकप्रियतेच्या शिखरावर पोचले.आराधना ह्या चित्रपटाने तर लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता.या मधे राजेश खन्ना-शर्मिला टागोर यांचा सुरेख अभिनय व सचिन देव बर्मन यांचे सुमधुर संगीत, यामुळेच हा चित्रपट यशस्वी झाला.लोकप्रिय कलावंतांचा समावेश त्यांचे काळजाला भिडणारे संवाद व श्रवणमधुर संगीत ही शक्ति सामंत यांच्या यशस्वी चित्रपटांची वैशिष्ट्ये होती.
सामंत यांना ४ चित्रपटांसाठी ‘फिल्मफेअर’ चे सर्वोत्कृष्ट चित्रपटांचे पुरस्कार मिळाले. तसेच ‘झी जीवनगौरव पुरस्कार’ प्राप्त झाला. भारतीय चित्रपट-निर्मात्यांच्या संघटनेचे अध्यक्ष तसेच केंद्रीय चित्रपट-प्रमाणन मंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.

 

माधव विद्वांस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!