Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

 अभिनेते शाहू मोडक 

1 Mins read

 अभिनेते शाहू मोडक 

ज्ञानेश्वर म्हणून लोकप्रिय तसेच श्रीकृष्णाच्या भूमिका ३०वेळा साकारणारे अभिनेते शाहू मोडक  त्यांचा जन्म अहमदनगर येथे २५ एप्रिल १९१८ रोजी झाला.
चांगले शिक्षण घेऊन भारतीय प्रशासकीय कलेक्टर व्हायचे त्यांचे स्वप्न होते.एका सुशिक्षित ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेल्या शाहू यांचे वडील रेव्ह.रामकृष्ण अहमदाबाद येथे जिल्हा न्यायाधीश होते.ते नाताळसणा निमित्ताने होणाऱ्या उत्सवात ख्रिस्त कथाविषयांवर आधारित नाटकांतून भूमिका करत. त्यामुळे अभिनयाचे संस्कार शाहू यांचेवर लहानपणीच झाले होते. लहानपणापासून त्यांना संगीताची आवड होती. ते १०-१२ गाणी अतिशय सहजपणे गात असत. ग्रामोफोनवर गाणे ऐकून त्यासारखे गाण्याचा ते प्रयत्न करीत असत .

सरस्वती सिनेटोनचे दिग्दर्शक भालचंद्र पेंढारकर १२-१३ वर्षांच्या एका चांगले गाणाऱ्या बालअभिनेत्याच्या शोधात होते. त्यावेळी अभिनेते भाऊराव दातार यांनी, शाहू मोडक नावाचा मुलगा अगदी कृष्णासारखा दिसतो, असे पेंढारकरांना सांगीतले. मात्र, ते धर्माने ख्रिश्चन असल्याने त्यांच्या घरचे त्यांना हिंदू देवाची भूमिका करू देतील कि नाही याबद्दल पेंढारकर साशंक होते. तरीही ते मोडक यांच्या कुटुंबियांना भेटायला गेले. लगेचच वडिलांच्या सांगण्यावरून शाहू मोडक यांनी पाहुण्यांसमोर एक गाणे म्हणून दाखवले. त्यामुळे पाहुणे खुष झाले. त्यांनी छोट्या शाहूस त्याला चित्रपटात काम करण्याचा प्रस्ताव दिला तसेच यामुळे त्याच्या अभ्यासात बाधा येणार नाही अशी हमी पण दिली. त्यानंतर शाहू मोडकांचा पहिला कृष्णाची भूमिका असलेला “श्यामसुंदर” नावाचा चित्रपट १९३२ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांनी गायलेली सर्व आठही गाणी अतिशय लोकप्रिय झाली. रौप्यमहोत्सव साजरा करणारा हा पहिलाच बोलपट होता.

कृष्णाच्या भूमिकेशी मोडक अतिशय एकरूप झाले होते, कृष्णाच्या भूमिकेवर त्यांमनोमन प्रेम केले. त्यामुळे ते चित्रीकरण काळात चित्रीकरण स्थळावरील स्व्च्छतागृह वापरत नसत. कृष्णाची भूमिका करत असताना नेसलेले धोतरस्वच्छतागृहात जाऊन अपवित्र होऊ नये, अशी त्यांची धारणा होती. या काळात ते दिवसभर फक्त पाण्याचे घोट पिऊन राहत असत. ‘संत ज्ञानेश्वर’ या चित्रपटात त्यांनी हिंदी व मराठी मधे भूमिका केली. हा चित्रपट मराठी प्रेक्षकांना तर आवडलाच पण तो हिंदीमध्येही चांगला चालला .हा चित्रपट न्यूयॉर्कमध्ये कार्नोजी हॉल थिएटरमधून दाखविण्यात आला. अमेरिकेत दाखविला गेलेला हा पहिला मराठी चित्रपट ठरला .

सुंदर चेहरा, आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि सुरेल आवाज यामुळे त्यांना निर्मात्यांची पसंती मिळू लागली. हिंदी आणि मराठीत त्यांच्या नावावर पौराणिक चित्रपट चालू लागले. अर्थात त्यांनी पौराणिक चित्रपटा व्यतिरिक्त इतर चित्रपटही यशस्वी केले.

एकदा मोडक “स्वामी विवेकानंदाची शिकवण” या विषयावर व्याख्यान देणेस गेले होते. तिथे त्यांची जैन साध्वी प्रतिभाजींची ओळख झाली. त्यानंतर मोडक व प्रतिभाजीं विवाहबद्ध झाले. ‘शाहू मोडक: प्रवास एका देवमाणसाचा’ या पुस्तकात, त्यांची पत्नी प्रतिभा यांनी मोडकांच्या विविधांगी व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडून दाखविले आहेत.

चित्रपटांतून निवृत्ती घेतल्यावर ते पुण्यात स्थायिक झाले. तेथेच शाहू मोडक यांचा मृत्यू झाला. शाहू मोडकांनी त्यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे दिवशी सांगितले होते कि “माझे आयुष्य फक्त १८ दिवस राहिले आहे”.त्याप्रमाणे ते खरोखरच त्यांचे ११ मार्च १९९३ रोजी निधन झाले

माधव विद्वांस

Leave a Reply

error: Content is protected !!